Go to full page →

स्वर्गीय अंजन ChSMar 58

मंडळ्यांना त्यांच्या डोळ्यांसाठी स्वर्गीय अंजन घालण्याची गरज आहे. म्हणजे ते देवासाठी मिशनरी कार्य करण्यासाठी अनेक मार्ग पाहू शकतील. देवाने त्याच्या लोकांना अनेकवेळा राजमार्ग आणि गावोगावात जाऊन लोकांना त्याच्या दारातून आत येण्यासाठी पाचारण करण्याचे निमंत्रण देण्यास सांगितले आहे. म्हणजे त्याचे घर भरेल. तरीसुद्धा आम्ही आपल्या घराच्या सावलीतील लोकांना म्हणावा तसा प्रकाशाचा पुरवठा केला नाही. आपण त्यांच्यामध्ये पुरेसा रस दाखविला नाही. त्यांनाही समजू दे की त्यांच्या आत्म्याची आम्ही काळजी घेतो. हे ते कार्य आमच्याजवळ पडून राहिले आहे. तेव्हा देवाने या कार्यासाठी मंडळीला पाचारण केले आहे. आम्ही असे म्हणू शकत नाही की “आमचा शेजारी कोण ?” आम्ही लक्षात ठेवायला हवे की जे आपले शेजारी आहेत त्यांना आपल्या गरजेची नितांत गरज आहे. आपल्या दयेची गरज त्यांना आहे. आपल्या शेजारचा प्रत्येक आत्मा शत्रुने जखमी आणि द:खी केला आहे. आपला शेजीर म्हणजे प्रत्येक जण हा दंवाची संपत्ति आहे. ख्रिस्ताने यहुद्यांना त्यांची प्रतिष्ठा देऊ केली. जे त्याचे शेजारी होते, परंतु नंतर ते उडून गेले. दूर गेले. देवाजवळ प्रादेशिक सीमा नाही. कृत्रिम प्रतिष्ठा नाही. जाती नाही किंवा श्रीमंती व गरीबी नाही. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:२९४. ChSMar 58.2