Go to full page →

विश्वासासाठी चातुर्याने कारण देणे अशक्य ChSMar 65

शेवटच्या दिवशी जे अनेक सत्यावर विश्वास ठेवण्याचा दावा करतात ते उणे पडतील. ते ओझे वाहण्याचे विसरले. त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. त्यांचे परिवर्तन वरवरचे असते ते खोल नसते. उत्साहित नसते व पूर्ण ही नसते. त्यांना ठाऊक नाही की ते विश्वास का ठेवतात ? कारण केवळ इतर लोक सत्यावर विश्वास ठेवतात म्हणून ते ठेवतात. म्हणून त्यांना वाटते की हे सत्य आहे. ते चातुर्याने त्या सत्याविषयी उत्तर देऊ शकत नाहीत. इतर विश्वास ठेवणारांनासुद्धा खरे उत्तर देऊ शकत नाहीत किंवा सत्याविषयी काही अनुभव सांगू शकत नाहीत किंवा त्यांनी त्याविषयी काही अभ्यासही केला नाही. हे त्यांचे कर्तव्य आहे. देवाच्या सत्याविषयी अभ्यास करावा आणि सत्य जाणून घ्यावे. अनुभव घ्यावा. ते सत्य मिळवावे सत्यामध्ये स्थैरता मिळवा तरच तुम्ही त्यात खरा विश्वास संपादन कराल. हृदयपूर्ण व शुद्ध मनाने तुम्हाला सत्य समजेल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. २:६३४. ChSMar 65.3