Go to full page →

खास प्रशिक्षण ChSMar 82

लोकांना आरोग्यदायी जीवनाचे शिक्षण देण्यासाठी मोठे कष्ट घेणे आवश्यक आहे. आरोग्यदायी जीवनाची तत्त्वे त्यांना शिकविणे गरजेचे आहे. आरोग्यदायी स्वयंपाक कलाची शिक्षण शाळा प्रत्येक ठिकाणी उघडणे आवश्यक आहे. अशाप्रकारची केंद्रे ख्रिस्ती लोकांनी स्थापन करावित. केवळ शिकविणेच नाही परंतु अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शक असणे आवश्यक आहे. तरुण आणि वृध्दांनीही आरोग्यदायी खाद्यपदार्थ कसे करावेत ते साधे व सोपे असावे असे ChSMar 82.4

त्यांना शिकवावेत. ज्या ठिकाणी सत्याचे अस्तित्व आहे त्या ठिकाणी साधे व आरोग्यदायी अन्न कसे करावे ते शिकविले जाते. तरीही ते पचनास हलके असावे. मांसाहार विना पोषकदायी अन्न पदार्थ उपलब्ध कसे करावे याचे शिक्षण आवश्यक आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:१६१. ChSMar 83.1

ज्या सर्व ठिकाणी मंडळ्या आहेत त्या सर्व ठिकाणी साधे व सोपे पोषकदायी अन्न तयार करण्याचे प्रशिक्षण देणे अति आवश्यक असावे. आरोग्यदायी जीवनाच्या तत्त्वाप्रमाणे कसे चालावे व कशाप्रकारचा आहार असावा याचे प्रशिक्षण द्यावे. देवाच्या लोकांना आपल्या शेजाऱ्यांना ही अशा प्रकारचे आरोग्यदायी जीवन जगण्याचे शिक्षण द्यावे. - गॉस्पल वर्कर्स ३६२. ChSMar 83.2