Go to full page →

ईश्वरी दर्जा ChSMar 86

देवाची इच्छा आहे की आम्ही सर्वांनी शक्य असल्या सर्व प्रकारचे शिक्षण घ्यावे. आपले जे ज्ञान आहे. त्याचा मुख्य हेतु म्हणजे ते ज्ञान जे देवाकडून आले आहे ते इतरांना देणे. हे कोणालाच ठाऊक नाही की देव कोणाला कसे व कोठे देवासाठी लोकांना पाचारण करील व ते जाऊन देवासाठी बोलतील. आपला स्वर्गीय पिता पाहिल की तो एकटा मानवासाठी काय करु शकेल. आपल्या समोर आपला दुर्बल विश्वास आहे त्यामुळे आपण कोणता निर्णय घेऊ शकत नाही. म्हणून आपण आपल्या मनाची अशी तयारी करावी की देवाचे सत्य वचन शक्य असल्यास जगातील सत्ताधाऱ्यांकडे सादर करुन त्याचे गौरव करु शकू. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन्स ३३३, ३३४. ChSMar 86.1

त्याच्यासाठी कोण आपली तयारी करुन त्याच्या मळ्यात कार्य करायला तयार होईल ? नवशिक्याने जाऊन देवाचे कार्य करणे हे देवाला पसंत नाही. त्याची इच्छा आहे की देवाच्या लोकांनी स्वत:ची उत्तम तयारी करुनच शक्य असल्यास स्वत:च्या उत्तम गुणांचा वापर करुन देवाच्या राड्याची सुवार्ता जगाला सांगावी कारण देवाने प्रत्येकाला दाने दिली आहेत. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड २ एप्रिल १८८९. ChSMar 86.2