Go to full page →

गीतांची मिनीस्ट्री ChSMar 90

जे विद्यार्थी गायला शिकतील ती एक सुंदर गीतांची व संगीताची सुवार्ता असेल. देवाने दिलेल्या त्यांच्या या दानाचा वापर हा अतिसुंदर संगीत, सुर्यप्रकाश जो अंधारात चमकतो, दुःख परिहार, मनशांती आणि मंदीरामध्ये पावित्र्य आणि स्तुतीपर वातावरण यासाठी अति उपयोग होतो. ChSMar 90.2

विद्यार्थी राजमार्गावर जातात. गल्लीबोळातून व अंधाऱ्या ठिकाणी श्रीमंत, गरीब, उच्च आणि कनिष्ठ लोकांमध्ये जाऊन आपल्या संगीताने त्यांना समाधान देते. त्यांना मिळालेल्या दानाचे ते सोने करतात आणि त्यांना संधी मिळते की कोणीतरी त्यांना जर विचारले की “तुम्ही काही गीते गाऊन सुवार्ता प्रसारामध्ये सहाय्य करु शकता का ?’ नंतर तुम्हाला संधी मिळते की थोड्या शब्दांची प्रार्थना करुन देवाचा आशीर्वाद मिळवू शकता. अनेकजण देवाची स्तुती गीते ऐकण्यास नकार देणार नाहीत. अशाप्रकारचे सत्य व विश्वासू मिशन कार्य आहे. - कॉन्सल्स टू पेरेंटस, टिचर्स अॅण्ड स्टूडंटस. ५४७,५४८ ChSMar 90.3