जगाला मिशनऱ्यांची गरज आहे, पवित्र होम मिशनरी आणि ज्यांना मिशनरी आत्मा नाही त्याची ख्रिस्ती यांना त्याने स्वर्गातील पुस्तकात नोंद होणार नाही. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड २३ ऑगस्ट १८९२. ChSMar 113.3
जर मंडळीचे सभासद हे कार्य हाती घेणार नाहीत तर त्यांचे देवाशी असणारे संबंध जिवंत नाहीत असे समजावे. त्यांच्या नावाची नोंद सुस्त सेवक असे होईल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ५:४६२, ४६३. ChSMar 113.4
प्रत्येक धार्मिक मोहिमेत काहीजण असे असतात की ते देवाचे काम असल्याबद्दल ते नाकार देत नाहीत. परंतु त्याला सहाय्य देण्याऐवजी ते अलिप्त राहतात. अशा लोकांना लक्षात ठेवणे गरजेचे आहे की त्याची स्वर्गात नोंद करण्यात येते. त्या नोंदणी पुस्तकात कसल्याच चुका नसतात. आणि त्यावरुन त्यांचा न्याय होईल, देवाची सेवा करण्यात आलेली संधी गमावली तर तिची नोंद करण्यात येते. तसेच श्रध्देने आणि प्रेमाने केलेली प्रत्येक कृती स्मरणासाठी तेथे ठेवण्यात येते. - प्रॉफेटस अॅण्ड किंग्स ६३९. ChSMar 113.5
२३ ऑक्टोबर १८७९ च्या सकाळी २ वाजता देवाचा आत्मा माझ्यावर उतरला आणि मी पाहिले न्याय आल्याचे दृष्ट मला दिसले. दहा हजार वेळा दहा हजार त्याच्या मोठ्या आसनाभोवती उभे होते. ऐश्वर्ययुक्त त्या भव्य आसनावर बसणारी व्यक्तिसुद्धा तशीच भव्यदिव्य होती. त्याच्यासमोर काही पुस्तके ठेवली होती. त्या पुस्तकांवर काही अक्षरे लिहिली होती अक्षरे अग्निप्रमाणे झळकत होती. “स्वर्गीय खाते वही’ अशा आशयाची ती अक्षरे होती. या पुस्तकामध्ये त्यांची नावे आहेत की जे दावा करतात की ते सत्यावर विश्वास ठेवतात. मी दृष्टांतामधून बाहेर आले ते अगणित लोक, सिंहासन सर्वांतून बाहेर आले आणि केवळ प्रकाशाचे पुत्र व सत्यावर विश्वास ठेवणारे याकडेच माझे सर्व लक्ष केंद्रित केले. ChSMar 113.6
दुसरे एक पुस्तक उघडले गेले. त्यामध्ये जे सत्य ठाऊक असल्याचा दावा करतात त्यांच्या पापाचे पुस्तक. तो सर्वांचा मुख्य असूनही या पदावर स्वार्थापोटी अनेक प्रकारची पापे त्याच्याकडून घडतात. एक वर्ग असा आहे जो या जगामध्ये अडथळा असा आहे. अशांच्या पापावर पांघरुन घातले जाते आणि चांगुलपणाविषयी त्यांना पारितोषिक दिले जाते आणि आता या भितीमुळे त्यांचे ओठ फिके पडतात, कंप पावतात. कारण त्यांना जाणीव होते की त्यांनी पवित्र विश्वासाचा विश्वासघात केला आहे. त्यांना इशारा आणि संधी देण्यात आली होती, परंतु ते सावध झाले नाहीत किंवा त्यांच्या वागण्यात सुधारणा झाली नाही. त्यांनी देवाच्या कृपेची भलतीच कल्पना करुन घेतली होती. खरे आहे, त्यांनी केलेली नीच व हीन कृत्यांची कबूली देऊन पश्चात्ताप केला नाही. तसेच अंजिराच्या झाडाप्रमाणे ते शापित आहेत कारण त्यांनी काही फळे दिली नाहीत. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या दानांचाही योग्य वापर केला नाही. हा वर्ग केवळ स्वत:च्या स्वार्थासाठीच कार्य करीत आहे. म्हणून ते देवापर्यंत पोहचू शकत नाहीत. त्यांच्या दाव्यासाठी ते प्रत्युत्तर देऊ शकणार नाहीत. जरी ते ख्रिस्ताचे सेवक असल्याचे सांगतात तरी त्यांनी त्याच्या राज्यासाठी आत्मे नाही आणले. याचे कारण ते स्वत:च्याच बुद्धीवर अवलंबून राहिले होते. यामुळे त्यांचे सामर्थ्य मंदावले होते. त्यांनी देवाचे कार्य इतरांवर सोपविले होते. ते स्वत:च्याच स्वार्थी कार्यामध्ये गुंतून असतात. धन्याच्या द्राक्ष मळ्यामध्ये इतरांना कामाला लावतात आणि स्वतः आपल्याच स्वार्थासाठी कार्य करुन देवाचे कार्य करीत असल्याचा दावा करतात. न्यायधीश म्हणतात, “सर्वांचा न्याय त्यांच्या विश्वासाप्रमाणे होईल आणि त्यांच्या कार्याप्रमाणे होईल.” त्यांच्या कार्याचा निष्काळजीपणा किती स्पष्टपणे दिसून येईल आणि कसे काळजीपूर्वक त्यांच्या लोकांच्या कार्याला योग्य न्याय देऊन त्यांचे तारण करतो. प्रत्येकाच्या कार्याचे योग्य प्रमाण देऊन त्यांचा जिवंत विश्वास दाखविण्यात येईल आणि त्याचे कुटुंबिय आणि शेजारी व गरीबांवर प्रीति आणि दया दाखवून आपले मिशनरी कार्य करण्याचे प्रमाण देऊन कार्य करीत असल्याचे सिद्ध होईल, परंतु मेरोजसारख्या शहरावर देवाचा शाप आला कारण त्यांनी देवासाठी काहीच केले नाही. त्यांनी त्या कार्यावर प्रेम केले ज्यामुळे त्यांच्या जीवनासाठी फायदा होईल. यामुळे त्यांच्या सार्वकालिक जीवनाची वही कोरीच राहिली. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ४:३८४ - ३८६. ChSMar 114.1