Go to full page →

आध्यात्मिक पक्षाघात ChSMar 136

व्यायाम केल्याने शक्ति प्राप्त होते. देवाने आम्हास जी पात्रता दिली आहे तिचा वापर करावा. असे केल्याने आपल्या पात्रतेमध्ये वाढ होते. ती देवाच्या कार्यामध्ये उपयोगी होते. जे कोणी देवासाठी काही करीत नाहीत ते देवाची दया आणि त्याच्या सत्यामध्ये त्यांची वाढ होत नाही. त्यामध्ये ते अपयशी होतात. त्यांना देवाचे सत्यही मिळू शकत नाही. जो मनुष्य केवळ पडून राहतो आणि हातपाय हलविण्यास नाकार देतो तो लवकरच आपले सामर्थ्य गमावून बसतो. त्याचप्रमाणे जे ख्रिस्ती लोक देवाने दिलेल्या सामर्थ्याचा वापर करीत नाहीत ते ख्रिस्तामध्ये वाढण्यास समर्थ नसतात. तसेच जे सामर्थ्य त्यांच्यात असते तेही ते गमाऊन बसतात. त्यांना आध्यात्मिक पक्षाघात होतो, परंतु ज्यांना ख्रिस्ताच्या प्रीतिची आस्था आहे ते अंधारात असणाऱ्यांना देवाचे सत्य सांगण्याची कळकळ आहे त्यांना देवाकडून अधिक शक्ति आणि प्रकाश मिळतो. खरे ख्रिश्चन तेच आहेत जे त्याच्यासाठी कार्य करतात. त्यांचे कार्य वरकरणीच्या उत्साहाने नाही, परंतु पूर्ण तत्वानुसार तेही थोड्या काळासाठी नाही, परंतु पूर्ण जीवनभर देवाचे कार्य करीतच राहतात. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ३९३. ChSMar 136.3