Go to full page →

खात्रीचे उपचार ChSMar 137

नाउमेद झालेल्यांच्यासाठी खात्रीचा उपाय उपलब्ध आहे तो म्हणजे विश्वास प्रार्थना कृती. विश्वास आणि कृती यांच्याद्वारे आत्मविश्वास आणि समाधान लाभते आणि त्यांची दिवसे न दिवस वृद्धि होत जाते. निराश गर्तेत पडण्याचा तुम्हाला मोह होतो काय ? कठीण प्रसंगी सर्व काही दुःश्चिन्ह वाटते तेव्हा भय धरु नका. तो आपले अभिवचन पूर्ण करणार नाही म्हणून भीती बाळगू नका. देवावर विश्वास ठेवा. तुमची गरज तो जाणतो. तो सर्व शक्तिमान आहे. त्याचे अपरिमित प्रेम आणि करुणा केव्हाही दमलेले नसतात. तो अनंत सत्य आहे. त्याच्यावर प्रेम करणाराशी त्याने केलेला करार तो केव्हाही बदलणार नाही. त्याच्या श्रध्दावंत सेवकांना परिस्थितीप्रमाणे यथायोग्य कार्यक्षमता तो बहाल करील. प्रेषित पौलाने साक्ष दिली आहे. “त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे कारण माझी शक्ति अशक्तपणा पूर्णतेस येतो. - प्रॉफेटस अॅण्ड किंग्स. १६४, १६५. ChSMar 137.1

आध्यात्मिक आळसपणासाठी एक योग्य उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे कार्य आत्म्यासाठी कार्य करण्यासाठी तुमची गरज आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ४:२३६. ChSMar 137.2

ज्याचे हृदय कमजोर आहे त्याच्यासाठी ख्रिस्ताने हा योग्य उपचार सांगितला आहे. संशय आणि घाबरट आत्म्यांना सुद्धा हा उपचार योग्य आहे. देवासमोर जे रडतात आणि दुःखी हृदयाने देवासमोर येतात. तेव्हा उठा आणि त्यांच्या मदतीला जा. त्यांना सहाय्याची गरज आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ६:२६६. ChSMar 137.3

जे ख्रिस्ती लोक सतत चिकाटीने आणि कळकळीने ख्रिस्तामध्ये वाढत जातात. ते प्रीतिच्या बाजूचे आहेत असे ख्रिस्ती मागे पाहात नाहीत. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड. ७ जून १८८७. ChSMar 137.4

जे कोणी या नि:स्वार्थीपणाच्या कार्यामध्ये स्वत:ला गुंतवून घेत नाहीत त्यांना आजारीपणाचा अनुभव येईल. ते क्षीण व शक्तिहीन दिसतील. धडपडणे, संशय घेणे, कुरकुर करणे आणि पापात पडणे तसेच पश्चात्ताप करणे एवढेच नाही तर नेमून दिलेले धार्मिक नियमही ते विसरुन जातील. ते पुन्हा जगाकडेही जाऊ शकत नाहीत. एवढेच नाही, परंतु क्षुल्लक कारणासाठी ते हेवा, मत्सर व एखाद्याला दोष लावणे याकडे त्यांचा कल झुकतो ते लगेच निराश होतील आणि त्यांची मनेही कठोर बनतील. एखाद्याच्या चूकाच शोधून काढण्याच्या मागे लागतील. आपल्या भावामधील केवळ दोषच शोधून काढण्यामध्ये त्यांना समाधान वाटेल. आशाहीन, विश्वासहीन भावना त्यांच्यामध्ये सजतील. त्यांच्या धार्मिक जीवनामध्ये या सर्व प्रकारच्या निराशजनक घटना घडतील - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड. २ सप्टेंबर १८९०. ChSMar 137.5