Go to full page →

मनोवेधक दृष्य ChSMar 143

रात्रीच्या दृष्टांतात माझ्या नजरेसमोर एक मनोवेधक दृष्य आले. त्यामध्ये मी पाहिले की एक मोठा अग्नि गोळा एक मोठ्या व सुंदर इमारतीवर कोसळला आणि ती इमारत कोसळली. मी ऐकले कोणीतरी म्हणाले, “आम्हाला ठाऊक आहे की जगावर देवाचा न्याय आला आहे, परंतु आम्हाला ठाऊक नव्हते की ते इतक्या लवकर येईल.’ दुसरे दुःखी आवाजामध्ये म्हणाले “हे तुम्हाला ठाऊक होते, तर मग आम्हाला का नाही सांगितलं ?” “आम्हाला ठाऊक नव्हते” हे शब्द सर्व बाजूंनी ऐकायला येतात. मानसिक दुःखाने मी जागी झाले. मी पुन्हा झोपी गेले. मी एक मोठ्या घोळक्यामध्ये होते. एक अधिकारी एका कंपनी विषयी माहिती सांगत होता. त्याच्यासमोर जगाचा नकाशा पसरला होता. तो म्हणाला नकाशाचे हे चित्र देवाच्या अंगणातील आहे. यामध्ये पेरणी करायची आहे. स्वर्गातून जणू प्रकाश चमकत होता. काही जणांवरील त्याप्रकाशाचे प्रतिबिंब इतरावर पडत होते. अनेक ठिकाणी हा प्रकाश चमकत होता. आणि या प्रकाशामुळे इतर अनेक प्रकाशांची निर्मिती होईल. ChSMar 143.1

या कार्याची पुनरार्वत्ति होईल. “तुम्ही पृथ्वीचे मीठ आणा जर मीठाचा खारटपणा गेला तर तो खारटपणा त्याला कशाने येईल ? ते पुढे बाहेर फेकले जाईल. माणसाच्या पायाखाली तुडविले जाण्या पलिकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. तुम्ही जगाचा प्रकाश आहे. डोंगरावर लपलेले शहर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवीत नसतात दिवठणीवर ठेवतात. म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे.” मतय ५:१३-१६ ChSMar 143.2

मी पाहिले प्रकाशाचा झोप, शहरातून, खेड्यातून आणि उंच ठिकाणाहून खोल भागातून. देवाच्या वचनाचे पालन करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून प्रत्येक शहर व खेड्यातून देवाचे सत्य गाजविले गेले. सर्व जगभर देवाचे सत्य पोहोचले. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. २८, २९. ChSMar 143.3