Go to full page →

पुढे जा ChSMar 140

ख्रिस्ती जीवन नेहमीच धोक्याचे असते आणि त्याचे कार्यही कठीणच असते. कल्पना शक्तिची चित्रे नाश करण्यासाठी येत आहेत. त्यांच्या मागे मृत्यु आहे. तरीही देवाचा आवाज स्पष्टपणे बोलतो, “पुढे जा. चला तर आपण आज्ञा पाळू. आपली नजर जरी अंधार पार करु शकत नाही. आपल्या प्रगतीवर विघ्न टपून बसले आहे. संशयी आत्मा थांबल्याशिवाय जात नाही. जोपर्यंत त्यांच्यातील अविश्वास जात नाही तोपर्यंत ते आज्ञपालनास विलंब लावतील. तेथे अनिश्चितता राहील जो पर्यंत ही अनश्चितता जात नाही तोपर्यंत धोके आहेतच आणि तोपर्यंत आज्ञापालन होणार नाही. विश्वास अडचणी व त्रासापलिकडे असतो व न दिसणाऱ्या गोष्टींवर भरवसा ठेवतो. अगदी अनंत शक्तिवरसुद्धा हा प्रत्येक तातडीच्या कार्यामध्ये ख्रिस्ताशी हस्तांदोलन करतो. - गॉस्पल वर्कर्स २६२. ChSMar 140.4

आपल्या सर्व कल्पना अरुंद असतात. परमेश्वर त्याच्या लोकांना प्रकाश पढे सतत घेऊन जाण्यासाठी पाचारण करतो. आपण आपल्या अभ्यासात वाढ करुन मार्गामध्ये वाढ करुन लोकांपर्यंत पोहोण्याचा प्रयत्न करावा. आपण आपल्या कानांनी आपल्या महान कप्तानाचा आवाज ऐकावा की “पुढे जा” आणि आपण कृती करायला हवी आणि देव आपली निराशा करणार नाही. जेव्हा आपण आपल्या विश्वासाने त्याचे कार्य करु तेव्हा तो आपले कार्य करील. बंधू आणि भगिनींनो आम्ही किती दिर्घकाळ त्याच्या विश्वासामध्ये आहोत, परंतु तुम्ही त्याचे कार्य करीत नाही. त्याने तुम्हाला पाचारण केले तरीही मग तुमचे इतर आत्म्यांवरील प्रेस कोठे आहे ? - हिस्टॉरिकल स्केचेस २८९, २९०. ChSMar 141.1

आत्मे जिंकण्यातच ख्रिस्ताला आनंद आहे. हा आनंद तुमचा असू द्या. ते तुमचे कार्य असू दे. ही सर्व कर्तव्ये तुम्ही पार पाडा. ख्रिस्तांसाठी स्वत:ला समर्पित करा आणि तो सतत तुमचे सहाय्य करील. तुमच्या कर्तव्याचा आवाज ज्या ठिकाणी तुम्हाला बोलाविल त्या ठिकाणी पुढे सरळ जा. देवाने दिलेल्या जबाबदाऱ्यांमध्ये कोणतेही अडथळे येऊ नयेत म्हणून प्रार्थना करा. तो नक्कीच तुम्हाला मदत करील. तुम्ही आपली जबाबदारी सांभाळ आणि काही वेळा तुमची ओझे जड होतात तेव्हा असे विचारु नका की “माझा बंधू रिकामा का बसला आहे ? त्याच्या खांद्यावर जू का नाही ? तुम्ही आपले कर्तव्य चोखपणे बजावा. चांगले करा, आपली स्तुति व्हावी या मोहापायी करु नका तर धन्यासाठी करा, कारण तुम्ही त्याचे आहात. - द सदर्न वॉचमन. २ एप्रिल १९०३. ChSMar 141.2

लोकांनी देवाचा मार्ग वरती आणि पुढे पाहावा त्यामध्ये विजय आहे. यहोशवा इस्त्राएल सैनिकाला मार्गदर्शन करीत होता त्यापेक्षाही हा मार्ग महान आहे. आपल्या तारणाचा कप्तान जो आपल्यामध्ये आहे तो आपणास प्रोत्साहन देण्यासाठी म्हणतो, “पाहा मी सदैव तुमच्या सोबत आहे. जगाच्या शेवटापर्यंत तुमच्या बरोबर आहे.” “आनंद व उल्हास करा. मी जगाला जिंकले आहे.” तो आपल्याला नक्कीच विजय मिळवून देईल. देवाचे अभिवचन काय आहे. तो कोणत्याही वेळी त्याचे कार्य सिद्धीस नेईल आणि त्याने आपल्या लोकांना जे कार्य दिले आहे ते तो कोणत्याही क्षणी पूर्ण करु शकेल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. २:१२२. ChSMar 142.1

आपण ख्रिस्ताच्या आत्म्याशी इतके उत्साही का नाही ? या दःखी आणि तिरस्कारयुक्त जगामध्ये आपले कार्य इतके धीमे का आहे ? ख्रिस्ताच्या मुकुटामध्ये अनेक तारे लावण्यासाठी आपण उत्साही नाही काय. जो आत्मा सैतानाने त्याच्या साखळीमध्ये बांधून ठेवला होता तो निसटून मोकळा झाला. त्याला देवाच्या राज्यात वाचविले काय ? मंडळीला आपल्या कर्तव्याची जाणीव होणे आवश्यक आहे आणि त्यानुसार त्यांनी सध्याचे सत्य घेऊन सर्व चराचराला कळविणे आवश्यक आहे. मी तुम्हाला विनंती करते की कृपया जखऱ्याचा तिसरा व चौथा अध्याय वाचा. जर हे अध्याय समजले, ते जर मिळाले, जे धार्मिकतेचे भुकेले व तहानेले आहेत त्यांच्यासाठी कार्य होईल. कार्य म्हणजे मंडळीसाठी आत्मे जिंकणे. “पुढे जा आणि वरवर जा.’ - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ६:२९६. ChSMar 142.2

या पृथ्वीवर राहणारे मोठ्या संख्येच लोकांना आपली धर्मनिष्ठा शत्रुला दिली आहे, परंतु आम्ही फसलो गेलो नाही. असे असतानाही सैतानाचाच विजयवोत्सव मानला जातो. ख्रिस्त त्याचे कार्य पुढे स्वर्गाकडे घेऊन जात आहे. स्वर्गातील पवित्रस्थान आणि पृथ्वीवरील देवाच्या वचनामध्ये जगाच्या शेवटचे हुबेहुब वर्णन केले आहे. जसे आम्ही पाहातो की भविष्यवाणी पूर्ण होत आहे. तसे ख्रिस्ताचे राज्य येण्याच्या शेवटच्या दिवसामध्ये आपल्या विश्वासाला आनंदोत्सव केला पाहिजे आणि आपल्याला अधिक शिक्त प्राप्त होऊन देवाच्या राज्यासाठी मोठ्या जोमाने कार्य करायला हवे. जे देवाने आपल्याला नेमून दिले आहे. - गॉस्पल वर्कर्स २६.२७. ChSMar 142.3