Go to full page →

वैयक्तिक अनुभवाचे उदाहरण ChSMar 156

ज्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे त्यांच्या अनुभवावरुन दिसून येईल. पवित आत्म्याने त्यांनापायरी पायरीने कसे मार्गदर्शन केले हे त्यांना समजून येईल. परमेश्वराने ख्रिस्ताला पाठविले त्याच्या माहितीची लागलेली तहान भूक, पवित्र शास्त्र वचनाचा शोध घेणे. याचा परिणाम, त्यांच्या प्रार्थना त्यांच्या आत्म्याची कळकळ व त्रास व त्याबाबत ख्रिस्ताने वचनाद्वारे दिलेल्या दिलासा, “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” हे सर्व अनुभव आले असता कोणीही गप्प बसणे अशक्य आहे, शिवाय ज्या कोणाचे अंत:करण ख्रिस्त प्रीतिने भरले आहे ते तर शांत राहू शकत नाहीत. ज्या प्रमाणे प्रभूने त्यांना सत्याचा खजिना म्हणजे त्यांना जे अनुभव व आशीर्वाद आले आहेत त्याच प्रमाणात ते इतरांना देत राहतील. परमेश्वराचे कृपेने ते किती समद्ध झाले आहेत. ती कृपा ते इतरांना सांगतील. तो त्यांना ख्रिस्त कृपा प्राप्त होईल वा दिली जाईल. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसनस १२५. ChSMar 156.2

प्रत्येक अध्यात्मिक सामर्थ्य उठून कार्य करो. उद्या सर्वांना तुम्ही भेटी देता त्या सर्वांना सांगा की सर्व गोष्टींचा शेवट जवळ आला आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या हृदयाची दारे उघडी करील आणि त्यांच्या मनावर शेवटचाछाप उमटविल. जो कधीच पुसला जाणार नाही. स्त्री आणि पुरुष यांनी त्यांच्या असंवदनेशीलते मधून आध्यात्मिकतेमध्ये जागे होण्याचा कसोशीने प्रयत्न करावा. लोकांना सांगा की त्यांना ख्रिस्त कसा सापडला आणि त्यामुळे येशूने त्यांना कसा आशीर्वाद दिला. जेव्हापासून ते त्यांच्या सेवेमध्ये असल्यामुळे त्यांना सांगा ख्रिस्ताच्या पायाजवळ बसल्यापासून तुम्हाला कोण कोणते आशीर्वाद मिळाले आहेत. त्याच्या मोल्यवान वचनातून तुम्ही घडे शिकला आहात. ख्रिस्ती जीवनामध्ये किती आनंद आहे हेही त्यांना सांगा. सुगंधी वचनाने त्यांना तुम्ही सुवासिक कराल व त्यांची मने ख्रिस्ताकडे वळवाल. त्यांना कळेल की तुम्हाला अति मोल्यवान मोती सापडला आहे. तुमच्या आनंदी शब्दाने त्यांना समजू द्या की तुम्हाला खरेच एक जीवनाचा महामार्ग सापडला आहे. हेच खरे मिशनरी कार्य आहे. आणि असे केल्याने अनेकजण झोपेतून जागे होतील. त्यांच्या जगिक स्वप्नातून उठतील. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:३८. ChSMar 156.3

देवाचे जे कामगार आहेत त्याची साधने आहेत. त्यातील काहीजण अकार्यक्षम मानले जातात, परंतु ते प्रार्थना करु शकतात. साधेपणाने का होईना ते लोकांना सत्य सांगू शकतात. कारण त्यांना सत्य इतरांना सांगणे आवडते. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ते लोकांपर्यंत पोहोचू शकतात. जसे ते साधेपणाने सत्य सादर करतात वचनामधून किंवा काहीतर घटना सांगतात पवित्र आत्मा त्यांना सामर्थ्य देतो. लोकांच्या मनावर तो छाप पाडतो. त्यांचा स्वभाव व मनामध्ये बदल घडू येतो. त्यांच्या इच्छा देवाच्या इच्छेप्रमाणे बदलतात. जे सत्य या पूर्वी त्यांना समजले नव्हते ते आता त्यांना समजून येते. त्यांच्या हृदयामध्ये जिवंतपणाचा बदल घडून येतो. आणि त्यांच्यामध्ये आध्यात्मिकता येते. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:४४४. ChSMar 157.1