दया या शब्दावरील त्याचे संदेश श्रोतेजनाला सोयीस्कर असून ते विविध प्रकारचे होते. “शिणलेल्यास बोलून कसा धीर द्यावा’ हे त्याला माहीत होते. (यशया ५०:४). सत्याचा खजिनदार लोकांपुढे आकर्षकपणे मांडण्यासाठी त्याच्या ओठावर कृपेचा वर्षाव केला होता. पूर्वग्रह दूषित मनावर छाप पाडण्याचे कौशल्य त्याच्याठायी आपलेसे करुन घेतले. प्रतिभा शक्तिने लोकांची मने त्याने जिंकून घेतली होती. आणि ती जरी साधी सोपी होती. तरी ती कुतुहलनीय, गुढार्थाने भरली होती. आकाशातील पक्षी, शेतातील फुले, बी, मेंढपाल व मेंढरे ह्या साधनांनी ख्रिस्ताने शाश्वत सत्य पुढे मांडले आणि त्यांच्यानंतर निसर्गामध्ये त्या वस्तु पाहण्याचा त्यांना प्रसंगी मिळाल्यावर त्याच्या शब्दांचे त्यांना स्मरण झाले. ख्रिस्ताच्या उदाहरणांनी त्याच्या पाठांची सातत्याने पुनरावृति केली. - द डीझायर ऑफ एजेस २५४. ChSMar 157.2
देव निर्माणकर्ता आहे आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त मानव जातीचा उद्धारक आहे ही शिकवण प्रेषित या मूर्तिपूजकांना देण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांनी प्रथम त्यांचे लक्ष देवाच्या अद्भुत कार्याकडे वळविले. सूर्य, चंद्र, तारे, आकाशातील ऋतुमानाची आश्चर्यचकित करणारी सुव्यवस्था, बर्फाच्छादित महान पर्वत, वृक्षराजी आणि निसर्गातील अद्भुत विविध प्रकार ही सर्व मानवाच्या आकलन शक्तिच्या आवाक्याबाहेरची असल्याचा दर्शविले आहे. सर्व समर्थ परमेश्वराच्या कार्याद्वारे या विदेशी लोकांना ह्या विश्वाचा महान सूत्रधान, राजाधिराज ह्याच्यावर मन केंद्रित करण्यास भाग पाडले. - द अॅक्टस ऑफ अपोस्टलस १८०. ChSMar 158.1