पौल प्रभावशाली वक्ता होता. त्याचे परिवर्तन होण्याच्या अगोदरच्या काळात परिणामकारक वक्तृत्वाद्वारे श्रोतेजनांना भारावून सोडण्यासाठी त्याचा वारंवार वापर करण्यात आला होता, परंतु आता ते सर्व त्याने सोडून दिले हाते. काव्यात्मक वर्णन करणे व काल्पनिक भूमिका वठविणे ह्यांच्यामुळे कल्पनाशक्तिचे पोषण होऊन इंद्रियांचे समाधान होत असते, परंतु त्याद्वारे प्रतिदिनाच्या अनुभवाला कसलाच स्पर्श होत नाही. त्याऐवजी सोपी सुलभ भाषा वापरुन महत्त्वाच्या सत्याचा मनावर परिणाम पाडण्याचा प्रयत्न पौल करीत होता. काल्पनिक भूमिकेतून सत्य प्रदर्शित केल्याने भावना तीव्र होतील. परंतु अशाप्रकारे सादर केलेल्या सत्याच्या परिणामाने जीवनाच्या लढ्यात भाविकांना लढण्यासाठी पोषक मजबूत करणारे अन्न मिळत नाही. ख्रिस्ती धर्माच्या मूलभूत तत्त्वाच्या व्यावहारिक विवेचनाद्वारे धडपड करणाऱ्या जिवात्म्यांच्या सांप्रत कसोट्या आणि तात्कालिक गरजा यांचे निवारण झाले पाहिजे. - अॅक्टस ऑफ द अपोस्टलस् २५१, २५२. ChSMar 158.2