Go to full page →

स्वभावाकरवी परमेश्वराचे प्रकाशन MHMar 318

“कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृष्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहे. अशासाठी की त्यांना कसलीही सबब राहू नये. (रोमकरास १:२०). MHMar 318.2

निसर्गातील ज्या गोष्टी आम्ही पाहातो त्या एदेन बागेतील गौरवाची अंधुक चित्रे आहेत. पापाने पृथ्वीचे सौंदर्य नष्ट केले आहे. सर्व वस्तूंवर पापाचे वाईट परिणाम दिसून येत आहेत. परंतु अजूनही बरेच सौंदर्य दिसून येते. निसर्ग या गोष्टींची साक्ष देतो की परमेश्वराचे सामर्थ्य अनंत आहे. त्याची दया आणि प्रीति महान आहे. पृथ्वीची रचना त्यानेच केली आहे. शापीत अवस्थेमध्ये सुद्धा निसर्गाच्या स्वामीच्या हस्तकलेचे सौंदर्य प्रगट करते. आपण जिकडे वळतो तिकडे आम्हाला परमेश्वराचा आवाज ऐकू येतो. त्याच्या उपकाराची साक्ष दिसून येतात. MHMar 318.3

समुद्राच्या लाटांचा धीर गंभीर आवाज, लाटांच्या खळखळाटीचे संगीत बनतील पक्षांचे मधूर आवाज, वाऱ्याचे गीत अशा हजारो आवाजामधून ते परमेश्वराची स्तुती करतात. पृथ्वी, समुद्र आणि आकाशातील वेगवेगळ्या रंगाच्या छटा, रानातील रंगीबेरंगी नयनरम्य रंगाची फुले या सर्वामध्ये परमेश्वराचे गौरव दिसून येते. उंच उंच डोंगर पर्वत हे परमेश्वराचे सामर्थ्य दाखविते. उन्हामध्ये झळकणारी हिरवी झाडे, फुले आपल्या निर्माणकर्त्याचे सौंदर्य दाखवितात. जिवंत हिरवळ भोऱ्या जमिनीवर गालीचा अंथरते. निष्फळ प्राण्यांचेही देव संरक्षण करतो असे ही हिरवळ सांगते. समुद्रातील गुहा आणि जमिनीतील खोली परमेश्वराचा खजिना प्रगट करते. ज्याने सागरामध्ये मोती ठेवले आहेत पहाडामध्ये सोने हिरे ठेवले आहेत. तो सुंदरतेचा प्रेमी आहे. आकाशात उगवणारा सूर्य परमेश्वराचा प्रतिनिधी आहे. आपल्या सृष्टीला तो प्रकाश आणि जीवन देतो. सर्व चमक आणि सौंदर्य जे पृथ्वीला सजविते व आकाशाला प्रकाश देते ते परमेश्वराविषयी बोलतात. “त्याचा प्रकाश आकाश व्यापितो.” (हबक्कू ३:३). तुझ्या समृद्धीने पृथ्वी भरली आहे.” (स्तोत्र १०४:२४). “दिवसदिवसाशी संवाद करितो रात्र रात्रीला ज्ञान प्रगट करिते, वाचा नाही शब्द नाही त्याची वाणी ऐकू येत नाही. तरी त्याचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमितो त्याचे शब्द दिगंतरी पोहोचतात सूर्यासाठी त्याने आकाशात मंडप घातला आहे.” (स्तोत्र १९:२-४). MHMar 318.4

सर्व वस्तु परमेश्वराच्या पितातुल्य प्रेमाचे वर्णन करीते व आपल्या मुलांना खुष ठेवण्याची त्याच्या इच्छेचे वर्णन करते. MHMar 319.1