Go to full page →

एक व्यक्तिगत परमेश्वर MHMar 319

महान शक्ति जी सर्व सृष्टीमध्ये कार्य करते आणि सर्व गोष्टी सांभाळते तो एक व्यापक सिद्धान्त चालू ठेवण्यासाठीच नाही आता ही शक्ति आणखीही अनेक गोष्टींसाठी आहे असे ज्ञानी लोक सांगतात. परमेश्वर आत्मा आहे तरीही तो व्यक्तिगत परमेश्वर आहे. कारण त्याने स्वतःला त्याच रूपामध्ये प्रगट केले. MHMar 319.2

“तरी परमेश्वर सत्य देव आहे. तो जिवंत देव, सनातन राजा आहे त्याच्या क्रोधाने पृथ्वी कंपमान होते. त्याच्या कोपापुढे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही. तुम्ही त्यांस हे सांगा की ज्या देवांनी आकाश पृथ्वी केली नाही ते पृथ्वीवरून आकाशाखालून नष्ट होतील.” (यिर्मया १०:१०-११). “जो याकोबाचा वाटा त त्यांच्यासारखा नव्हे तर तो सर्वांचा निर्माणकर्ता आहे व इस्राएल त्याच्या वतनाचा वंश आहे सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम आहे.” (यिर्मया १०:१६). “त्याने पृथ्वी आपल्या सामर्थ्याकडे उत्पन्न केली, त्याने आपल्या बुद्धीने आकाश पसरिले.” (यिर्मया १०:१२). MHMar 319.3