Go to full page →

निसर्ग परमेश्वर नाही MHMar 320

निसर्गामध्ये परमेश्वराची हस्तकला असणे म्हणजे स्वतः परमेश्वर निसर्ग नाही. नैसर्गिक गोष्टी परमेश्वराच्या सामर्थ आणि स्वभावाचे एक अभिव्यक्ति आहे. परंतु आम्ही निसर्गाला परमेश्वर समजू नये. काळजीपूर्वक मानवाची कारागिरी परमेश्वराच्या हातची अतिसुंदर कलाकृति डोळ्यांना अति सुंदर अशी वाटतात या गोष्टी बनविणाऱ्याचा स्वभाव यामुळे प्रगट होतो. त्याचे विचार प्रगट होतात. या गोष्टी बनविणारा सन्मानाचा हक्कदार आहे. तेव्हा निसर्ग सौंदर्य परमेश्वराने बनविले आहे म्हणून त्या निसर्गाचा सन्मान नाही परंतु तो बनविणाऱ्या परमेश्वराचे गौरव होणे आवश्यक आहे. MHMar 320.1

“याहोद्या परमेश्वर जो आपला उत्पन्न करता त्याच्यापुढे आपण गुडघे टेकू त्याची उपासना करू त्याला नमन करु.” (स्तोत्र ९५:६). MHMar 320.2

त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थले आहेत, पर्वताची उंच शिखरे ही त्याचीच आहेत. समुद्र त्याचा आहे. त्यानेच तो उत्पन्न केला कोरडी भूमिही त्याच्याच हातात घडविली गेली. (स्तोत्र ९५:४-५). MHMar 320.3

“ज्याने कृतिका व मृगशीर्ष ही नक्षत्रे केली तो निबिड अंधकाराची प्रभात करतो व दिवसाची काळी रात्र करितो जो समुद्राच्या जलास बोलावून पृथ्वीच्या पाठीवर ओतितो त्याचे नाम परमेश्वर होय.” (आमोस ५:८). “कारण जो पर्वत निर्माण करतो वारा उत्पन्न करितो मनुष्याच्या मनातील विचार काय आहेच याची त्याला जाणीव करुन देतो. जो प्रभात अंधकारमय करितो आणि पृथ्वीच्या उच्च स्थलावर चालतो त्याचे नाम परमेश्वर सेनाधीश देव हे आहे. (आमोस ४:१३). MHMar 320.4