Go to full page →

अध्याय ४१—दुसऱ्यांच्या संपर्कामध्ये MHMar 382

“एकमेकांची ओझी वाहा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल.” MHMar 382

जीवनातील प्रत्येक व्यवहार आत्मनियंत्रण सहनशीलता आणि सहानुभूतीची अपेक्षा करतो. आम्ही अधिक प्रमाणात सवया आणि शिक्षणामध्ये एकमेकांपासून वेगळे आहोत. काही गोष्टी पाहिल्यावर त्या विषयीची मते भिन्न असतात. सत्या विषयीची आमची समजूत, जीवनाच्या व्यवहाराविषयी आमचे विचार, सर्व गोष्टीमध्ये समान नसतात. जगामध्ये अशा कोणत्याच दोन व्यक्ति नसतात की सर्व विषयांमध्ये त्यांची मते एकसारखीच आहेत. सर्वांची मते एकमेकांविरुद्ध असतातच. एकाची परीक्षा दुसऱ्याच्या परीक्षेसारखी नसते. जे काम एक व्यक्तिला अति सोपे असते तेच काम दुसऱ्या व्यक्तिला अति कठीण असते. ते काम त्याला त्रासदायक वाटते. MHMar 382.1

यावरुन मानवी स्वभाव हा किती चुकीची समजून असणारा व संशय घेणारा आहे. तो किती अशक्त आहे हे कळून येते. म्हणून मानवाने एकमेकांना ओळखतांना खूप काळजी घ्यावी. आमच्या कार्याचे इतरांवर काय परिणाम होतात या विषयी अति थोडे लोक जाणतात. आम्ही जे काय बोलतो किंवा करतो ते आमच्यासाठी अति थोड्या वेळाचे काम असते. परंतु जर आम्ही डोळे उघडून पाहिले तर त्या विषयीचे चांगले किंवा वाईट परिणाम इतरांवर जे पडतात ते अति महत्त्वाचे असतात. MHMar 382.2