Go to full page →

अध्याय १२—बेघर आणि बेरोजगारांसाठी सहाय MHMar 136

मोठ्या मनाचे स्त्रीपुरुष आहेत गरीब लोकांची अवस्था सुधारण्यासाठी त्यांच्या कल्याणासाठी काही मार्ग शोधून काढू शकतात कारण त्यांना त्यांचा कळवळा येतो, त्यांची चिंता करतात त्याचविषयी ते विचार करु शकतात ज्यांना घरे नाहीत व रोजगार नाही अशांना ती कशी प्राप्त होतील कशाप्रकारे त्यांना मदत करावी म्हणजे त्यांना परमेश्वराच्या राज्याती आशीर्वाद प्राप्त होईल आणि त्याच्या योजनेप्रमाणे ते जीवन जगतील. हा एक असा प्रश्न आहे की याचे उत्तर मिळविण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करीत आहेत. पण सुशिक्षित किंवा राजनीतिमध्ये सुद्धा जास्त प्रमाणात लोक नाहीत ज्यांना या गरीब व बेघर लोकांसाठी काहीतरी करतील. समाजाची परिस्थितीत समजू शकत नाहीत. ज्यांच्या हाती राज्यकारभार व शासन आहे ते सुद्धाय गरीब भुकेले व बेघर असणाऱ्यांसाठी काही करण्यास असमर्थ आहेत आणि यामुळे अपराधांचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. व्यवसायीक आणि प्रतिष्ठित लोकांच्या सुरक्षितेसाठी व्यर्थ प्रयत्न केले जातात. जर मनुष्याने परमेश्वरांच्या वचनाकडे जास्त प्रमाणात लक्ष दिले तर ते या त्रासदायक समस्येचे निवारण करु शकतात. इतके प्रभावी परमेश्वराचे शिक्षण आहे त्याचे वचन अद्भुत आहे. पवित्र शास्त्राच्या जुन्या करारात गरीबांचे सहाय्य आणि बेरोजगारांविषयी दिलेल्या शिक्षणामध्ये खूप काही शिकता येते. MHMar 136.1