Go to full page →

इस्राएलांसाठी परमेश्वराची योजना MHMar 136

इस्राएल लोकांसाठी परमेश्वराची योजना अशी होती की प्रत्येक कुटुंबाने आपले घर शेतात बांधावे व घराच्या आजूबाजूला शेतीसाठी मोठी जागा असावी. अशा प्रकारे त्यांचे जीवन चरित्र्यासाठी ही सुविधा असावी यावर ते अवलंबून राहावेत. यामुळे त्यांना श्रम आणि त्याचे फळ दोन्हीचा लाभ होईल आणि आजतागायत मनुष्याची कोणतीच युक्ति या योजनेमध्ये यशस्वी झाली नाही किंवा त्यामध्ये सुधारणा घडविली नाही. आज गरीबी आणि दुःखाचे हेच कारण आहे की परमेश्वराच्या योजनेपासून जग खूप दूर गेले आहे. MHMar 136.2

जेव्हा इस्राएल लोक कनान देशात येऊन राहिले. तेव्हा सर्व लोकांमध्ये तेथील भूमीचा वाटणी केली. केवळ लेवीय वंशाचे लोक मंदिरामध्ये सेवा करीत होते त्यांना या जमिनीवाटपापासून दूर ठेवले होते. समाजातील या कुटुंबातील लोकांच्या संख्येनुसार जमिनी दिल्या जात होत्या. त्यांना धन संपत्तीसुद्धा त्याचप्रमाणात दिली जात असे. कोणी एक आपली जमीन काही काळासाठी आपली जमीन एखाद्याला देऊ शकतो परंतु आपल्या मुलांचा हक्क कोणाला विकू शकत नव्हता. जेव्हा त्याला आपली जमीन सोडवू न घ्यायचा असेल तेव्हा केव्हाही सोडवून घेऊ शकत होता. दर सात वर्षांनी कर्ज माफ केले जात असे आणि पन्नास वर्षानी म्हणजे योबेल वर्षी ही जमीन मूळ माल कारण परत दिली जात असे. “जमीन बिकायची तर ती कायमची विकून टाकायची नाही. कारण जमीन माझी असून तुम्ही माझ्या आश्रयाला परके व उपरी आहा म्हणून तुमच्या वतनाच्या सगळ्या व्यवहारात जमीन सोडवून घेण्याची तरतूद करावी.” “तुझा कोणीभाज कंगाल झाला आणि त्याने आपल्या वतनाचा काही भाग विकला तर त्याच्या सगळ्यात जवळच्या आप्ताने पुढे येऊन आपल्या भाऊबंदाने विकलेला भाग सोडवून घ्यावा. एखाद्या मनुष्याच्या वतनाचा भाग सोडवून घेण्याइतकी त्याची स्वत:ची ऐपत वाढली. तर त्याने वतन विकले असेल त्या वर्षात हिशोब करुन उरलेल्या वर्षाचे उत्पन्न विकत घेणाऱ्याला द्यावे आणि आपण आपल्या वतनावर परत जावे. पण ते वतन परत मिळविण्याची त्याला ऐपत नसली तर आपली विकलेली जमीन विकत घेणाऱ्याच्या ताब्यात योबेल वर्षापर्यंत राहू द्यावी. योबेल वर्षी ती सुटेल त्याने तेव्हा आपल्या वतनावर परत जावे.” (लेवीय २५:२३-२९). MHMar 137.1

“त्या पन्नासाव्या वर्षाला पवित्र मानावे आणि देशातील सर्व रहिवासी मुक्त झाल्याची घोषणा करावी. ह्या वर्षाला तुम्ही योबेल म्हणावे. ह्यावर्षी तुम्ही आपापल्या वतनात व आपापल्या कुटुंबात परत जावे.” (लेवीय ५:१०). अशा प्रकारे प्रत्येक कुटुंबाची धन संपत्ति सुरक्षित राहात होती आणि कोणीही अतिधनवान आणि कोणी कायमचा कर्जामध्ये बुडू शकत नव्हता. MHMar 137.2