Go to full page →

शाश्वत जीवन प्राप्ती कशी करून घ्यावी? COLMar 290

\“मग पाहा, कोणी एक शास्त्री उभा राहून त्याची परीक्षा पाहण्याकरीता म्हणाला, गुरूजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल ? त्याने त्याला म्हटले, नियमशास्त्रांत काय लिहिले आहे ? तू काय वाचतोस ? त्याने उत्तर दिले, ‘तू आपला देव परमेश्वर याजवर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तिने व पूर्ण बुध्दीने प्रिती कर; आणि ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रिती कर’ त्याने त्याला म्हटले, ठिक उत्तर केलेस; हेच कर म्हणजे वांचशील’ परंतु स्वत:स धार्मिक ठरवून घ्यावे अशी इच्छा धरून तो येशूला म्हणाला, माझा शेजारी तो कोण? COLMar 290.1