Go to full page →

तिमथ्याची निवड केली तेव्हा तो तारुण्याच्या उंबरठ्यावर होता ChSMar 49

पौलाने तिमथ्याच्या ठायी निष्ठावंत निश्चल वृत्ति, प्रामाणिकपणा हे गुण पाहिले आणि त्याच्या कामात व प्रवासात सोबत म्हणून त्याने त्याची निवड केली. बालपणात ज्यांनी त्याला शिक्षण दिले होते त्यांच्या त्या पुत्राला महान प्रेषिताच्या समागमात आलेला पाहन त्यांना सार्थक झाल्यासारखे वाटले. शिक्षक म्हणून देवाने जेव्हा तिमथ्याची निवड केली तेव्हा तो केवळ तरुण युवक होता, परंतु बालपणात मिळालेल्या शिक्षणाने त्याने अंगिकारलेली तत्त्वे त्याच्या जीवनात स्थिरावलेली होती. त्यामुळे तो पौलाचा सहाय्यक म्हणून राहू शकला. तो जरी तरुण होता तरी त्याने आपली जबाबदारी ख्रिस्ताच्या लीन वृत्तीने पार पाडली. - अॅक्टस ऑफ द आपोस्टल. २०३, २०४. ChSMar 49.1