Go to full page →

प्रशिक्षणाची उपलब्धता करण्याची जबाबदारी ChSMar 83

तिमथ्या सारख्या होतकरु व कर्तबगार माणसांचे परिवर्तन झाल्यास पौ व बर्णबा यांनी त्यांना द्राक्ष मळ्यात काम करण्याची आवश्यकता कळकळीने पटवून दिली. जेव्हा प्रेषित दुसरीकडे काम करण्यास गेले तेव्हा या माणसांचा विश्वास कमी पडला नाही, उलट तो वृद्धिंगत झाला. देवाच्या मार्गाविषयी त्यांना निष्ठेने प्रशिक्षण देण्यात आले होते आणि इतर मनुष्यांसाठी नि:स्वार्थीपणे, मनापासून चिकाटीने कस काम करावे ह्याचेही शिक्षण देण्यात आले होते. पर राष्ट्रियांमध्ये सुवार्ता प्रसाराचे काम करीत असताना नवीन परिवर्तन झालेल्यांना अशा प्रकारचे प्रशिक्षण देणे हा पौल व बर्णबा यांना मिळालेल्या यश प्राप्तीतील अति महत्त्वाचे घटक आहे. - द अॅक्टस ऑफ अपोस्टल. १८६, १८७. ChSMar 83.4

जसे मंडळीची स्थापना करण्यात आली तसे त्यांच्या समोर प्रत्येकाने सत्य घेऊन इतरांना सांगून नव्या मंडळ्या स्थापन करण्याचे धेय्य घेऊनच बाहेर पडावे. अशा प्रकारे प्रत्येक सभादाने आपापल्या दानाचा वापर जे देवाने दिले आहे वापर करावा. आणि त्यांनी आपली मते आपल्या धन्याच्या कार्यामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी तयार करावीत. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ३:२०५. ChSMar 84.1

मिशनरी कार्यामध्ये सतत अडथळे आणि अपयश येत असतात. त्यांच्या डोक्यामध्ये तेच असते जे त्यांना करायचे असते. कामगार जे आपल्या अंत:करणात ईश्वर निष्ठा बाळगतात ते आपला विश्वास योग्यप्रकारे प्रगट करतील. अनेकजण असे आहेत जे मिशनरी बनू शकतात, परंतु ते पाळकीय क्षेत्रात कधी आलेच नाही जे मंडळीमध्येच मर्यादित राहतात किंवा कॉलेजमध्ये असतात त्यांना मिशनरी कामगारांचे ओझे समजत नाही. देवाने त्यांच्यासमोर मार्ग मोकळे केले आहेत त्यांना पाळकीय क्षेत्रामध्ये जावे. आपले सामर्थ्य वापरुन देवाचे कार्य करावे, परंतु ते जात नाहीत आणि प्रार्थना करीत नाहीत. - कॉन्सल्स टू पेरेन्टस, टिचर्स अॅण्ड स्टूडंटस्. ५००, ५०१. ChSMar 84.2

जे कोणी मंडळीची आध्यात्मिकपणे देखरेख करतात ते विचारयुक्त योजना करुन मंडळीच्या प्रत्येक सभासदांसाठी काहीतरी कार्य करण्यासाठी संधी द्यावी. देवाच्या कार्यामध्ये त्यांनी भाग घेतला तर मंडळीला फायदा होईल आणि त्यांनाही आशीर्वाद मिळेल. परंतु या आधी मंडळीच्या सभासदांना कधी असे सहकार्य केले नव्हते. कारण तशी योजना या आधी कधी केली नव्हती. व्यवस्थित योजना केली नव्हती. त्यांच्या योजना पूर्णपणे वापरात आणल्या नव्हत्या. यामुळे मंडळीतील सभासदांना दाने असूनही त्यांचा ते वापर करीत नाहीत त्यामुळे किती नुकसान झाले आहे याची काहींना जाणीव आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:११६.. ChSMar 84.3

मंडळीच्या प्रत्येक सभासदाने इतके तयार असावे की त्यांच्यासाठी आता ही वेळ आहे की त्यांनी स्वत:चे समर्पण करुन मंडळीमध्ये ख्रिस्तासाठी आत्मे जिंकावे. मंडळीला काय म्हटले आहे. “तुम्ही जगाचा प्रकाश आहा.” जे कळपाचे जबाबदारी सांभाळतात त्यांनी ख्रिस्तासाठी आपली जबाबदारी जागेपणे पार पाडावी. आणि मंडळीतील आत्म्यांना कामे सांगावित. प्रत्येकाच्या हाती प्रकाशाचा भाग असावा. त्यांनी ख्रिस्तासाठी कार्य करावे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ६:४३६. ChSMar 84.4