Go to full page →

प्रशिक्षण देण्यासाठी तज्ञ अधिकारी निवडा ChSMar 85

नव्या मंडळीसाठी योग्य काळजी घेणारी अधिकारी मंडळी निवडावी. स्त्री आणि पुरुषांना पूर्णपणे तयार होऊ द्या. त्यांच्या मध्ये बदल होऊ द्या. ज्यांची कोणाची निवड तुम्ही कराल. ते सुशिक्षीत असावेत, ते कार्यरत असावेत. त्यांची ओळख जगामध्ये देवाचे सेवक अशी असावी. त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभूचे कार्य करणे आवश्यक आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ६:८५. ChSMar 85.1

मंडळीमध्ये पुढाकार घेणारे आणि वरिष्ठजन यांना त्यांच्या योजनेमध्ये आपले विचार अधिक प्रमाणात घालावेत. त्यांनी अशी योजना करावी की मंडळीतील प्रत्येकांना काही ना काही भाग द्यावा. नाहीतर त्यांना काही उद्देशच राहणार नाही. परंतु त्यांना नेमून दिलेले कार्य त्यांना पूर्ण करावे. ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वत:मधील पात्रता ओळखावी. अशाप्रकारचे शिक्षण त्यांना द्यावे की त्यांनी नि:स्वार्थीपणे स्वत:चे समर्पण करुन कार्यक्षम असावे. देवाच्या कार्यात त्यांनी हिरीरीने भाग घ्यावा आणि त्यांनी असे कार्य करावे की मंडळीची भरभराट व्हावी. एवढेच नाही तर मृत मंडळ्याही जिवंत होऊन त्यांनी ख्रिस्तासाठी आत्मे जिंकण्याचे कार्य करावे. अशा प्रकारे मंडळीच्या सर्व सभासदांनी कार्यरत राहावे. - रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड २ सप्टेंबर १८९०. ChSMar 85.2