Go to full page →

सेवेसाठी वेतन आहे ChSMar 139

ख्रिस्ताच्या येण्याच्या वेळी दिलेल्या प्रत्येक दानाची काळजीपूर्वक तपासणी केली जाईल. जे दान त्याने मुद्दल म्हणून दिले आहे त्याच्या व्याजाची तो मागणी करतो. त्याचा नम्रपणा, त्याचा छळ, त्याचे कष्ट आणि त्याचे लज्जास्पद मरण ख्रिस्ताने त्या सर्वांसाठी या सर्व गोष्टी भोगल्या जे त्याचे नाव घेतात, त्याचे सेवक म्हणवून घेतात त्याच्या शिक्षणामध्ये उच्च पदावर आहेत. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:१०४. ChSMar 139.3

सर्व ख्रिस्ती लोक देवाशी असणाराच्या करारा खाली असतात. त्यांच्या पात्रतेप्रमाणे आत्मे जिंकण्याचे कार्य ते करतात. तो म्हणतो, “तुम्ही तुमचे स्वत:चे नाही तर मोल देऊन तुम्हाला विकत घेतले आहे.” म्हणून देवाचे गौरव करा. तुमच्या जीवनामध्ये त्याची सेवा करा, आत्मे जिंका स्त्री-पुरुषांना पापापासून वेगळे करा आणि त्यांना देवाकडे आणा. ख्रिस्ताच्या रक्ताने तुम्हाला विकत घेतले आहे. म्हणजे आम्ही त्याच्या सेवेमध्ये परत त्याच्याकडे स्वर्गात जाऊ. कारण आम्ही त्याचे विश्वासू सेवक होऊ. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:१०४. ChSMar 140.1

देवाने मला त्यांच्या लोकांसाठी संदेश दिला आहे. ते जागे व्हावेत, त्यांना आपले तंबू पसरावेत, लांब व रुंद करावेत. माझ्या बंधू व भगिनींनो तुम्हाला किंमत देऊन विकत घेतले आहे आणि जे काही तुमच्याजवळ आहे त्याने देवाचे गौरव करा. त्याच्या सेवेमध्ये त्याचा वापर करा. ख्रिस्त वधस्तंभावर जगासाठी मेला. पापामध्ये त्याचा छळ झाला. त्याच्या कार्यामध्ये त्याने तुमचे सहकार्य मागीतले. तुम्ही त्याच्यासाठी मदतीचे हात आहात. तेव्हा तुम्ही कष्टाने, काळजीने व कळकळीने, अविरत कार्य करुन हरावलेल्यांना त्याच्या राज्यात घेऊन यावे. लक्षात ठेवा की तुमच्या पापासाठी वधस्तंभ करण्यात आला होता. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ७:९. ChSMar 140.2

ख्रिस्ताचे अनुयायी यांचे तारण केवळ सेवा करणे यासाठी आले आहे. आमचा प्रभु आम्हास हे शिक्षण देतो की आमच्या जीवनाचा खरा हेतु म्हणजे सेवा करणे. ख्रिस्त स्वत: कामगार होता आणि तो त्याच्या सर्व अनुयायांस सेवेचा नियम देतो. जनसेवा ही प्रभुसेवा. येथे जगाला जीवनाचा सर्वश्रेष्ठ हेतु म्हणजे सेवा करणे हे दाखवून देतो. आम्ही इतरांची सेवा करीत असता परमेश्वराच्या व ख्रिस्ताच्या सान्निध्यात येतो. या सेवेच्या नियमांमुळे सहमानव व परमेश्वराचा निकटचा संबंध येतो. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन ३२६. ChSMar 140.3