Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ताचे बोधमय दाखले

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    शेवटच्या दिवसात

    या पृथ्वीचा अखेर दृश्याचा देखावा याचा इतिहास कसा असेल याचे दृश्य त्या श्रीमंताचे शेवटचे दिवस यात प्रकट केले आहे. तो श्रीमंत गृहस्थ अब्राहामाचा पुत्र म्हणवीत होता पण त्याचे शील यामुळे तो एका मोठया दरीप्रमाणे दूर होता. अब्राहामाने परमेश्वराचे वचन पाळणे व आज्ञापालन करणे अशा प्रकारे परमेश्वराची सेवा केली. परंतु तो श्रीमंत मनुष्य परमेश्वर व गरजु यांच्या गरजा याबाबत निष्काळजी असा होता. अशप्रकारे अब्राहाम व तो श्रीमंत मनुष्य यांच्यातील दरा म्हणजे आज्ञाभंग असे होते. सध्याही पुष्कळ लोक असे जीवन जगत आहेत. काही लोक मंडळीचे सभासद म्हणून असले पण त्याचा पालट झालेला नाही. ते मंडळीची आराधना व सेवा कार्यात भाग “हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा, माझा जीव तुजसाठी लुलपत आहे‘‘ (स्तोत्र ४२ : १) पण ते खोटी साक्ष देतात. ते परमेश्वराच्या दृष्टीने धार्मिक नसून अधिक पापी असे आहेत. जो जीवात्मा जगिक सुखाकडे धावतो, ज्या मनाला अभिलाषाचा अभिमान असतो तो मनुष्य केव्हाही परमेश्वराची सेवा करू शकत नाहीत. त्या दाखल्यांतील श्रीमंत मनुष्याप्रमाणे देहाच्या वासनाविरूध्द लढाई करणे अशी कोणाचीही प्रवृत्ती नसते. खाणे, पिणे यात त्याला जादा आवड वाटते. तो पापी वातावरणाची निवड करीतो. एकाएकी त्याजवर मरण ओढवून येते आणि त्याने त्याचा सोबती सैतान एजंटाद्वारे आयुष्यभर जे शील संपादन केले त्याच शीलासह त्याच्या कबरेत शेवट होतो. तो एकदा कबरेत गेला म्हणजे बरे वा वाईट याची त्याला निवड करणेचा शेवट झालेला असतो, कबरेत त्याला कसलीही निवड करण्याचे सामर्थ्य नसते, मग ते चांगले वा वाईट असो, कारण ज्या दिवशी मनुष्य मरतो त्याचवेळी त्याचे विचार नष्ट होतात (स्तोत्र १४६ : ४; उपदेशक ९ : ५, ६).COLMar 198.3

    जेव्हा परमेश्वराच्या वाणीने मृत जिवंत होतील त्यावेळी ते कबरेतून येताना, ज्या भावना व जो आचार विचार ते जीवंत असताना होते त्याच प्रकारे त्याचा स्वभाव पुन्हा असेल. जो मनुष्य जिवत असताना परमेश्वराने त्या मनुष्याला पुर्नजन्मासाठी जी संधी दिली त्यावेळी पुर्नजन्म पावू शकला नाही त्या मनुष्याला मरणानंतर परमेश्वर पुर्नजन्म वा पुर्नउत्पत्ति असे कधीही करणार नाही. जो मनुष्य जिवंत असताना त्याने परमेश्वराच्या कोणत्याही कार्यात आनंद मानला नाही वा परमेश्वराची सेवा करणे यात त्याला सुख वाटले नाही. त्या मनुष्याचे शील हे परमेश्वराशी सुसंगत असे नाही, आणि त्याला स्वर्गीय कुटुंबात केव्हाही आनंद व सुखी जीवन असे वाटणार नाही.COLMar 199.1

    सध्या जगात अशा प्रकारचे लोक आहेत की ते त्यांच्या स्वधार्मिकतेत जगतात. ते खादाड नाहीत, ते दारूडे नाहीत, ते नास्तिक नाहीत, पण ते त्यांचे जीवन स्वत:साठी जगतात, आणि परमेश्वरासाठी नाही. परमेश्वर त्याच्या विचारात नाही, म्हणून अशा लोकांची गणना अविश्वासकांमध्ये केली आहे. समजा, जर त्यांना परमेश्वराच्या नगरात प्रवेश मिळाला तर त्यांना जीवनी झाडाचा सहभागिपणाचा हक्क नाही; कारण जेव्हा त्याना परमेश्वराच्या आज्ञा त्याना देवून, सर्व अटींचे स्पष्टीकरण केले त्यावेळी ते म्हणाले नाही. ते येथे असताना त्यांनी परमेश्वराची सेवा केली नाही आणि म्हणूनच ते मरणानंतरही परमेश्वराची सेवा करणार नाहीत. ते लोक परमेश्वराच्या समक्षतेत राहू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना स्वर्गाशिवाय इतर कोणतेही ठिकाण चालेल.COLMar 199.2

    ख्रिस्ताविषयी शिक्षण म्हणजे ख्रिस्ताची कृपा स्वीकारणे, अर्थात् ख्रिस्ताचे शील स्वीकारणे. ज्या कोणास या पृथ्वीवरील संधीमध्ये दिलेले पवित्र वातावरण, मौल्यवान संधी ही आवडली नाही त्या लोकांना स्वर्गातील पवित्र समक्षता व समर्पित आराधना ही आवडणार नाहीत. त्या लोकांचे शील परमेश्वराच्या दृष्टीने सुधारलेले नाही. त्यांनी केलेला निष्काळजीपणा यामुळे जी दरी निर्माण झाली त्यावर पूल बांधणे हे अशक्य होय. धार्मिक व ते स्वार्थी लोक यांच्यात महान दरा वा दरी कायम केली गेली आहे!COLMar 200.1