Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ताचे बोधमय दाखले

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    शोधण्याचे बक्षिस

    कोणीही मनात असा विचार आणू नये की मला सर्व माहित आहे म्हणून अधिक ज्ञान प्राप्तीची गरज नाही. मानवी ज्ञानाचे मोजमाप करीता येते, मानवी कार्य हेही मोजता येतात, पण परमेश्वराचे ज्ञान व कल्पकता यांची उंची, खोली, व विस्तृतता ही कधीही मोजता येत नाहीत. परमेश्वराच्या कार्याची अनंता कधीही मोजता येत नाही. परमेश्वराच्या गौरवाचा थोडासा भाग आपण पाहिला आहे व परमेश्वराच्या ज्ञानाची व चातुर्य किंचित समजली आहेत. आम्ही खनिज संपत्तीच्या अगदी काठावर खणीत आहोत, आम्ही पुढे खणीत राहिलो तर आम्हाला खोल गेल्यावर सोन्याची रेषा मिळेल. सोनेरी रेषा अगदी खोल खोल जाईल आणि शेवटी खजिना सापडला म्हणजे किती अगाध संपत्ती असेल’ आमचा खरा विश्वास याद्वारे परमेश्वराचे ज्ञान हे आमचे मानवी ज्ञान होवून जाईल.COLMar 72.3

    जे कोणी ख्रिस्ताच्या स्फूर्तीने पवित्रशास्त्राचा अभ्यास करून सत्य शोध करीत राहतील. त्यांना वेतन हे खास मिळेल. जेव्हा एकादी व्यक्ति लहान मुलांप्रमाणे ऐकेल, जेव्हा परमेश्वराला सर्वस्वी समर्पण करतील तेव्हा त्यांना पवित्रशास्त्रात सत्य सापडेल. जेव्हा मानव परमेश्वराची आज्ञा पाळतील तेव्हा त्यांना परमेश्वराच्या साम्राज्याचा राज्य कारभार समजून येईल. स्वर्गीय जगातील दालने कृपा व वैभव याचे संशोधनासाठी खुली केली जातील. आता जसा मानव आहे तसा या सत्य संशोधनानंतर राहणार नाही कारण ते सत्य मानवास धार्मिक करील. तारणाचे गूढ ख्रिस्ताचा मानवी जन्म, ख्रिस्ताचा अभिषेक, ही मानवास आताप्रमाणे अस्पष्ट अशी राहणार नाहीत, तर ती मानवास चांगली समजली जातील व मानवास त्याबाबत सर्वश्रेष्ठ सन्मान राहील वा वाटेल.COLMar 72.4

    ख्रिस्ताने, पित्याकडे केलेली प्रार्थना याबाबत मानवास जो धडा दिला तो मानवाने त्यांच्या मनावर व आत्म्यावर कोरून ठेवावा. सार्वकालिक जीवन हेच आहे की त्यांनी, जो तू एकच सत्यदेव (परमेश्वर) त्या तुला व ज्याला तू पाठविले, त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे‘‘ असे येशू म्हणाला योहान १७:३. हेच खरे शिक्षण आहे. या शिक्षणाद्वारे सामर्थ्य प्राप्त होते. परमेश्वर व येशू ख्रिस्त ज्याला पित्याने पाठविले यांची अनुभवी माहिती वा ज्ञान यामुळे मानवाचे रूपातर परमेश्वराच्या स्वरूपात केले जाते. यामुळे मानवास त्याच्या जीवनावर ताबा मिळतो, मानवाचे सर्व जीवन कमी प्रतीचे वा सवयी, स्वभाव यावर ताबा मिळून मानव सर्वस्वी उच्च स्वभावाचा होतो. यामुळे असा मानव परमेश्वराच्या राज्यात परमेश्वराचा पुत्र अर्थात वारस होतो. अशा मानवाचे मन परमेश्वराच्या मनाशी संयुक्त होते व त्याजपढे स्वर्गीय विश्वाचा खजिना खुला केला जातो.COLMar 73.1

    परमेश्वराच्या सत्य वचनाचा शोध केला त्यामुळे हे ज्ञान प्राप्त होते आणि या ठेवीची प्राप्तीसाठी जो कोणी सर्वस्वी देवु इच्छितो त्याला ती ठेव वा खजिना प्राप्त होतो.COLMar 73.2

    “जर तू विवेकाला हाक मारशील, सुज्ञतेची आराधना करशील, जर तू रूष्याप्रमाणे त्याचा शोध करशील, व गुप्त निधीप्रमाणे त्याला उमगून काढशील, तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल‘‘ नितिसूत्रे २:३-५.COLMar 73.3

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents