Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ताचे बोधमय दाखले

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय ८ वा—लपविलेली ठेव

    मत्तय १३:४४ यावर आधारीत

    “स्वर्गाचे राज्य शेतात लपविलेल्या ठेवीसारीखे आहे, ती कोणी एका मनुष्याला सापडल्यावर त्याने ती लपवून ठेविली, आणि आनंदामुळे त्याने जावून आपले सर्वस्व विकले, मग ते शेत विकत घेतले. मत्तय १३:४४.COLMar 64.1

    पर्वांच्या काळी लोक त्यांचे धन शेतात लपवून ठेवीत असत. त्या काळी चोर व लुटारू कमी होते. जेव्हा सत्ताधिकारी बदलले जात तेव्हा ते ज्यांचेकडे जादा धन असेल त्यांना अधिक कर लादीत असत. याशिवाय देशावर परकीयांची धाड येत असे. यासाठी श्रीमंत लोक त्यांचे धन लपवून ठेवित असत आणि जमिनीत पुरून ठेवणे हे सुरक्षित वाटत असे. असे लपवून ठेवलेले धन कोठे ठेविले हे लोक विसरून जात असत, धनाचा मालक मरण पावत असे, कधी त्याला तुरूंगवास तर कधी हद्दपार करीत असत व ते धन तसेच राहत असे व ज्या धनासाठी एवढे कष्ट केले ते कधी ज्याला सापडत असे तो भाग्यवान होत असे. ख्रिस्ताच्या काळी अशाच लपविलेल्या शेतात जुनी नाणी व दागदागिने सोने व चांदीचे लोकांना सापडत असत.COLMar 64.2

    एका मनुष्याने करावयास घेतलेले शेत नांगरीत असता एक लपविलेली ठेव दिसली, त्या ठेवीमध्ये सोने पाहन त्याचे भाग्य उजळले. त्याने ती ठेव परत त्या शेतात ठेविली घरी गेला व ते शेत विकत घेणे यासाठी त्याने आपले सर्वस्व विकले. यामुळे त्याच्या कुटुंबातील व शेजारी म्हणू लागले हा असा काय वेडयासारखा करीत आहे. त्यांनी ते शेत पाहिले तेव्हा त्यांना ते पडीक जमीन असे दिसले. पण त्या मनुष्याला माहित होते की तो काय करीत होता. जेव्हा त्याच्या नावाचे खरेदीखत झाले तेव्हा त्याने त्या शेतात लपविलेली ठेव शोधू लागला.COLMar 64.3

    स्वर्गीय खजिना व शोधणे त्याप्रित्यर्थ प्रयत्न करणे यांचे महत्त्व किती आहे हे या दाखल्यावरून समजते. खजिना शोधकाने सर्व काही विकले व सर्व प्रयत्न केले मग त्याला ती लपविलेली ठेव मिळाली. तद्वत् स्वर्गीय खजिना शोधणार। त्याला कितीही परिश्रम व कितीही मोल द्यावे लागले तरी सत्याच्या खजिन्यापुढे हे कमीच पडणार.COLMar 64.4

    दाखल्यातील ठेव असलेले शेत हे पवित्रशास्त्राचे दर्शक आहे आणि सुवार्ता ही ठेव आहे. पृथ्वीत सोनेरी रेषांचे गुफण नाही इतके गुंफण मौल्यवान वस्तुंचे पवित्रशास्त्रात आहे.COLMar 65.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents