Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ताचे बोधमय दाखले

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय ११ वा—नव्या जुन्या गोष्टी

    मत्तय १३:५१-५२ यावर आधारीत

    “तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या काय ? ते त्याला म्हणाले, हो. तेव्हा त्याने त्यास म्हटले, जो प्रत्येक शास्त्री स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारांतून नवेजुने पदार्थ काढणाऱ्या गृहस्थासारीखा आहे’ मत्तय १३:५१, ५२.COLMar 82.1

    ख्रिस्त लोकांना शिक्षण देत असता त्यासोबत शिष्यांना भावी काळात काम करणेचे प्रशिक्षण देत होता. येशूच्या सर्व शिक्षणापासून शिष्यांनी धडे शिकावयाचे होते. येशूने जाळे हा दाखला दिला व त्यानंतर शिष्यांना विचारले, “तुम्हांला या सर्व गोष्टी समाजल्या काय?‘‘ ते त्याला म्हणाले, हो‘‘ (मत्तय १३:५१) नंतर दुसऱ्या दाखल्यात येशूने त्यांच्यावर सत्याची जबाबदारी टाकली याबाबत येशू म्हणाला, जो प्रत्येक शास्त्री स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारातून नवेजुने पदार्थ काढणाऱ्या गृहस्थासारीखा झाला आहे.‘‘ मत्तय १३:५२.COLMar 82.2

    त्या घरमालकाला जी संपत्ती प्राप्त झाली ती तो काय साठवून ठेवीत नाही, तर ती संपत्ती सर्वासाठी व्यवहारात उपयोगी आणतो आणि अशाप्रकारे वापर केला त्यामुळे संपत्ती वाढत गेली. घरमालकाकडे दोन्ही मौल्यवान नवेजुने पदार्थ असतात. यावरून ख्रिस्त त्याच्या शिष्यांना शिकवितो की, त्यांना जे सत्य त्यांच्याकडे सोपविले आहे, ते शिष्यांनी जगाला सांगणे आणि जसे जसे हे सत्याचे ज्ञान इतरांना दिले जाईल तशी तशी सत्याची वाढ होत जाईल.COLMar 82.3

    जे कोणी सुवार्ता संदेशाच्या त्यांच्या अंत:करणात स्विकार करीतील, त्यांच्यात इतरांना संदेश सांगणेची तळमळ राहील. ख्रिस्ताची स्वर्गीय प्रिती ही प्रदर्शित केली पाहिजे. ज्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे हे त्यांच्या अनुभवांवरून दिसून येईल, पवित्र आत्म्याने त्यांना पायरी पायरीने कसे मार्गदर्शन केले हे त्यांना समजून येईल, परमेश्वराने ख्रिस्ताला पाठविले. त्याच्या माहितीची लागलेली तहान भूक, पवित्रशास्त्र वचनाचा शोध करणे. याचा परिणाम, त्यांच्या प्रार्थना, त्यांच्या आत्म्याची कळकळ व त्रास व त्याबाबत ख्रिस्ताने वचनाद्वारे दिलेला दिलासा “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे‘‘ हे सर्व अनुभव, आले असता कोणीही गप्प बसणे अशक्य आहे, शिवाय ज्या कोणाचे अंत:करण ख्रिस्त प्रितीने भरले असेल ते तर शांत राहू शकत नाहीत. ज्याप्रमाणे प्रभुने त्यांना सत्याचा खजिना म्हणजे त्यांना जे अनुभव व आशिर्वाद आले आहेत त्याच प्रमाणात ते इतरांना देत राहतील. परमेश्वराच्या कृपेने ते किती समृध्द झाले आहेत. ती कृपा ते इतरांना सांगत राहतील तो तो त्यांना ख्रिस्त कृपा प्राप्त होईल वा दिली जाईल. लहान लेकराप्रमाणे त्यांचे अंत:करण साधे असेल व ते पूर्णपणाने परमेश्वराच्या आज्ञा पालन करतील. पवित्र आत्म्यासाठी त्यांचा आत्मा तान्हेला होईल, त्याना सत्याची अधिक अधिक माहिती दिली जाईल आणि त्याच्यावर कृपेचा वर्षाव होईल. यामुळे ते जगाला सत्य स्पष्ट सांगू शकतील.COLMar 82.4

    परमेश्वर, मानवी जिवीताबरोबर व्यवहार करणे यासाठी सत्याचा महान खजिना परमेश्वराचे वचन अर्थात् पवित्रशास्त्र, निसर्ग पुस्तक व मानवी अनुभव यांचा उपयोग करीतो. ख्रिस्ताच्या कामदारांनी यातून सर्व प्राप्त करून घ्यावे. सत्याचा शोध यासाठी मानवावर अवलंबून न राहता परमेश्वरावर अवलंबून रहावे, कारण मानवाचे ज्ञान हे परमेश्वरापुढे मुर्खपणाचे आहे. जे कोणी असे संशोधक आहेत अशा प्रत्येकास परमेश्वर त्याच्या मार्गाद्वारे ज्ञानाचा पुरवठा करील. COLMar 83.1

    जर ख्रिस्ताचे अनुयायी त्याच्या वचनावर विश्वास ठेवतील व त्या वचनानुसार वागतील, तर नैसर्गिक जगातील असे कोणते विज्ञानशास्त्र नाही की ते त्याला समजू शकणार नाही व तो त्याची प्रशसा करू शकणार नाही नैसर्गिक विज्ञान यात ज्ञानाचा खजिना आहे आणि ख्रिस्ताच्या शाळेतील प्रत्येक विज्ञानाने त्यातून शिक्षण प्राप्त करून घ्यावे. आम्ही निसर्गाचे सौदर्यांवर विचार करीत असता, जमिनीच्या मशागतीचे धडे घेत असता, वनस्पतींची वाढ पाहत असता, पृथ्वीची अद्भुत घटना, समुद्र व आकाश यांचे निरीक्षण करीत असता, आपल्याला सत्याचे नवीन दृष्टीकोन प्राप्त होतील. मानवाच्या व्यवहारात परमेश्वराचे अद्भुत कार्य, परमेश्वराच्या ज्ञानाचा व न्यायाचा मानवाच्या जीवनातील खोलवर भागही दिसून येतील, अशा गोष्टीनी परमेश्वराच्या ज्ञानाचा खजिना भरगच्च भरलेला आहे.COLMar 83.2

    पण पवित्र शास्त्रात परमेश्वराविषयीचे ज्ञान पतित मानवासाठी स्पष्ट असे लिहिले आहे. पवित्र शास्त्र हा ख्रिस्त ज्ञानाचा कधीही न संपणारा असा संशोधनाचा संग्रह साठा आहे.COLMar 83.3

    हे परमेश्वराचे वचन अर्थात् पवित्रशास्त्रांत जुना करार व नवा करार यांचा समावेश आहे. एक वेगळे तर दुसरे अपुरे राहील. ख्रिस्ताने सांगितले की जुन्या करारातील सत्य वचने नव्या करारातील वचना इतकीच सत्य आहेत. सध्या जसा ख्रिस्त आमचा तारणारा आहे तद्वत्च तो जगाच्या प्रारभी सर्व मानवाचा तारणारा होता. ख्रिस्त त्याचे देवत्त्व मानवी देहात धारण करून येणेपुर्वी सुवार्ता संदेश पुढील पुर्वजांनी दिला, आदाम, हनोख, मथशेलट व नोहा. अब्राहामाने कनानांत संदेश दिला तर लोटाने सदोम नगरात दिला, अशा प्रकारे विश्वासू संदेश वाहकांनी हा संदेश त्यांच्या एका पिढीपासून दुसऱ्या पिढीस दिला. यहुदी लोकांचे जे विधी व आर्थिक व्यवस्था ही सर्व ख्रिस्ताने सांगितली होती. यहुदी लोकांचे अर्पण विधी ख्रिस्ताने प्रस्थापित केले होते. त्यांचे सर्व विधी ख्रिस्ताचे येणे व कार्य याचे दर्शक होते. धार्मिक विधीच्या वेळी कोंकरा अर्पण करून जे रक्त अर्पण केले जात होते ते रक्त भावी काळी अर्पिला जाणारा देवाचा कोंकरा याचे अर्पण याचे दर्शक होते. ख्रिस्तापूर्वीचे सर्व अर्पण विधी ख्रिस्ताने त्याच्या काळात पूर्ण केले.COLMar 83.4

    जुन्या करारातील संदेष्टयांना ख्रिस्त नियमात प्रकट केला गेला, पूर्वज जी जी अर्पणे करीत त्यामध्ये ख्रिस्ताचे दर्शक होते. नवा करार यात ख्रिस्ताची सेवा, त्यांचे मरण व त्याचे पुनरूत्थान ही सर्वोकृष्ट खजिना आहे, हे पवित्र आत्म्याद्वारे प्रकट केले जाते. आमचा तारणारा येशू हा जुना व नवा करार यात पित्याचे गौरव प्रगट करितो. COLMar 84.1

    ख्रिस्ताचे जीवन, मरण व मध्यस्थी कार्य याविषयी संदेष्टयांनी भविष्य केले होते, या सर्वाविषयी प्रेषित साक्ष देत गेले, ती साक्ष देत असता ख्रिस्ताने किती अपमान सोसिला, त्याची शुध्दता व पवित्र जीवन, त्याची अतुल प्रिती हेच त्यांचे प्रमुख विजय होते. सुवार्तेचा पूर्ण भाग सांगणे यासाठी केवळ तारणारा येशूचे शिक्षणच नव्हे, तर जुना करार यात सदेष्टयांनी जे भविष्य केले ते व पवित्र स्थानामध्ये जी अर्पणे करावयाची त्यात ख्रिस्ताचे दर्शक हीहि माहिती देणे अवश्य होते.COLMar 84.2

    ख्रिस्त जे शिक्षण देत होता ते सत्य ख्रिस्ताने पुर्वी संदेष्टयांना व पुर्वजांना सांगितले होते, ख्रिस्त हाच सत्याचा मूळ संस्थापक होता, आणि आता त्याच सत्यावर ख्रिस्त नवीन प्रकाश टाकीत होता. त्यामुळे त्यांचा अर्थ किती वेगळा वाटत होता. ख्रिस्ताच्या स्पष्टीकरणाने सत्य प्रकाशित दिसत होते व आध्यात्मिक जीवन दृढ केले जात होते. शिष्यांना अभिवचन दिले की, पवित्र आत्मा येऊन त्यांना अधिक स्पष्टीकरण देऊन उत्तेजन देईल, आणि परमेश्वराच्या वचनाचा चांगला उलगडा होईल आणि यामुळे ते सत्याबाबत नवी नवी माहिती देतील. COLMar 84.3

    एदेन बागेत मानवास तारणाचे प्रथम अभिवचन दिले होते. तेव्हा ख्रिस्ताचे जीवन, त्याच्या सेवेतील स्वभाव व मध्यस्थीचे कार्य हेच मानवाच्या अभ्यासाचे विषय झाले आहेत. ज्या कोणी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने या विषयांचा अभ्यास केला असेल त्यांना नवीन प्रकाश प्राप्त झाला असेल. तारणाचे सत्य हे सतत वाढत असते व मानवास अधिक विस्तृत माहिती देते. जरी तारणदायी सत्य हे जुनेच असेल तरी ते सतत नवीन सत्यशोधकास अधिक गौरव दर्शविते व अधिक सामर्थ्य देते.COLMar 84.4

    प्रत्येक काळात सत्याची नवीन सुधारणा होत गेली आणि तो संदेश त्या काळातील लोकांना होता. जुने सत्य हवे, नवीन सत्य हे जुन्यावर अवलंबून राहत नाही, तर त्याची फोड करीते. जसे जसे आम्हाला जुने सत्य समजेल. त्यावरून नवीन सत्य तसे तसे समजू लागेल. जेव्हा ख्रिस्त त्याच्या पुनरूत्थानविषयी शिष्यांना सत्य सांगू लागला तेव्हा त्याने सुरूवात केली, “मोशे व सर्व संदष्टे यांच्यापासून आरंभ करून सगळया शास्त्रांतील आपणाविषयींच्या गोष्टींचा अर्थ त्यांस सांगितला’ लूक २४:२७. पण जेव्हा जुने सत्य उलगडीत केले जाते व त्याचा गौरवी प्रकाश दिसून येतो. जो कोणी नवीन सत्य नाकारतो वा त्याविषयी निष्काळजीपणा करीतो तेव्हा त्याला जुने सत्य सापडलेले नसते. यामुळे त्याला सत्याचे खरे सामर्थ्य प्राप्त होत नाही म्हणून तो निर्जीव होऊन जातो.COLMar 85.1

    काहीजण जुन्या करारातील सत्यावर विश्वास आहे व ते शिकविणे असे दाखवितात, असे असता ते नवा करार याचा नकार करीतात. पण जे ख्रिस्ताची शिकवण नाकारतात ते असे दर्शवितात की जुन्या करारातील पूर्वज व संदेष्टे यांनी जे शिक्षण दिले त्यावर त्यांचा विश्वास नाही. ख्रिस्त म्हणाला, “तुम्ही मोशाचा विश्वास धरिला असता तर माझा विश्वास धरीला असता, कारण मजविषयी त्याने लिहिले‘‘योहान ५:४६. यावरून हे समजणे की ते जरी जुना कराराप्रमाणे शिक्षण देत असले तरी त्यांच्यात सामर्थ्य नाही. COLMar 85.2

    पुष्कळजण विश्वास ठेवणारे व सुवार्ता गाजविणारे हीच चूक करीतात. जो जुना करार त्याबाबत ख्रिस्त म्हणाला, “तेच मजविषयी साक्ष देणारे आहेत‘‘ योहान ५:३९. असा शास्त्रलेख ते लोक बाजुला ठेवितात. ज्याअर्थी ते जुना करार नाकारतात त्याअर्थी ते नवा करार नाकारतात, दोन्ही ही करार अखंड असून विभक्त करू शकत नाही. कुणीही मनुष्य सुवार्ता बाजुला ठेवून परमेश्वराचे नियमशास्त्र सांगू शकत नाही, किंवा सुवार्ता नियमाशिवाय सांगू शकत नाही. नियम शास्त्र सुवार्तेचे प्रकटीकरण करीते आणि सुवार्ताद्वारे नियमशास्त्राचे स्पष्टीकरण केले जाते. नियमशास्त्र हे मूळ आहे, सुवार्ता ही हंगामी व फलदायी असा आहे.COLMar 85.3

    जुना करार हा नवीन करारावर प्रकाश पाडतो व नवा करार हा जुना करार यावर प्रकाश पाडतो. प्रत्येक कराराद्वारे ख्रिस्तातील परमेश्वराचे गौरव प्रकट केले जाते. दोन्ही कराराद्वारे सत्य शोधकास नवीन भावार्थ प्रकट केले जातील.COLMar 85.4

    ख्रिस्तांत व ख्रिस्ताद्वारे सत्य हे अगणित आहे. पवित्र शास्त्राचा अभ्यासू विद्यार्थी या जलनिधीकडे पाहता त्याच्या खोलीचा व अफाट विस्ताराचा अंत लागत नाही. आमच्या पापासाठी ख्रिस्त येशू देवाच्या पुत्राला प्रायश्चित दिले हे आम्हाला या जीवनात समजणार नाही. या पृथ्वीवरील तारणारा येशूचे कार्य हा विषय आमच्या बुध्दी सामर्थ्याच्या पलीकडे असेल. या तारणाचे गूढ समजावे म्हणून मानव त्याची सर्व बुध्दी कसाला लावून, पाहील, पण त्याची बुध्दी खुंटली जाईल. कोणाही सत्यशोधकास त्याच्या समोर अफाट व सीमा नसलेला समुद्र दिसेल.COLMar 86.1

    ख्रिस्तातील सत्याचा अनुभव येऊ शकतो पण ते कधीही पूर्णपणे स्पष्टीकरण करीता येत नाही, कारण त्या सत्याची उंची, खोली व रूंदी ही सर्व आपल्या बुध्दीच्या पलीकडे आहेत. आम्ही आपली बुध्दीमत्ता कसास लावली तर आम्हाला परमेश्वराच्या प्रितीचे स्पष्टीकरण करीता येणार नाही कारण त्या प्रितीची उंची स्वर्गाइतकी उंच पण त्या प्रितीने पृथ्वीवर येऊन सर्व मानव जातीवर परमेश्वर प्रितीचा शिक्का मोहर केला,COLMar 86.2

    स्वर्गीय प्रितीने जे काही केले ते सर्व आम्हास समजणे शक्य आहे. जे नम्र व पश्चात्तापी अंत:करणाचे आहेत अशांना ते स्पष्ट केले जाते. ज्या प्रमाणात आम्हांस ख्रिस्ताचे मानवासाठी केलेले अर्पण समजेल त्याच प्रमाणात परमेश्वराची प्रिती आम्हास समजेल. नम्र अंत:करणाने आपण परमेश्वराचे वचन शोधीत असताना, अभ्यासाद्वारे प्रमुख विषय तारण हा आम्हांस दिसून येईल अर्थात सापडला जाईल. आम्ही त्याचा अभ्यास करीत असता त्यावर अधिक प्रकाश प्राप्त होईल, आम्ही अधिक संशोधन करीत असताना त्या तारण ज्ञानाची उंची, खोली सतत वाढत जाईल.COLMar 86.3

    ख्रिस्ताच्या जीवनाशी आमचे जीवन संघटित करावे, त्याच्या जीवनातून सामर्थ्य सतत घेत राहावे. ख्रिस्त हा स्वर्गातून उतरलेली जीवंत भाकर आहे, जीवंत पाण्याचा झरा त्यातून जीवंत पाणी घ्यावे, कारण ख्रिस्त हा अलोट खजिना आहे. आम्ही जर प्रभुला आपणासमोर सतत ठेविले व त्याची सतत उपकारस्तुती व स्तुती करीत गेलो तर आमचे धार्मिक जीवन सतत ताजेतवाने राहील. आम्ही आमच्या मित्राशी बोलतो तद्वत् प्रार्थना म्हणजे आपले परमेश्वराशी संभाषणाप्रमाणे असेल. परमेश्वर स्वतः त्याचे अद्भुत चमत्कार आम्हास सांगेल. यामुळे पुष्कळदा येशूच्या गोड सहवासाचा आनंद आम्हांस प्राप्त होईल. येशू जसा हनोखाच्या सहवासात आला तसा तो आपल्या सहवासांत येऊन आपणाशी संभाषण करील. जेव्हा ख्रिस्ती मनुष्याला असा सत्याविषयीचा अनुभव येतो, तेव्हा त्याच्या जीवनात साधेपणा, नम्रता, सौम्यता व सरळपणा ही येतात व यावरून लोकांशी संबंध येतो त्यांना समजून येते की, वरील स्वभावाच्या गृहस्थाने येशूच्या सहवासात राहन शिक्षण घेतले आहे.COLMar 86.4

    ज्या कोणाचा वरील प्रमाणे ख्रिस्ती स्वभाव आहे, त्यांच्या जीवनात ख्रिस्ताचे सामर्थ्य येऊन ते व्यापकपणे, सजीव व आध्यात्मिक सामर्थ्याने भरले जातील. त्यांचे जीवन ताजेतवाने, शक्तिवर्धक, सदा आनदी असे दिसेल. जो कोणी परमेश्वराच्या वचनाचा स्विकार करीतो तो एकादे कोंदट तळे वा फुटके भांडे यांच्या सारखा नाही. तर तो डोंगरातून सतत वाहणारा जलप्रवाह, त्या जलप्रवाहाचे पाणी थड वा कडे व कपारीतून उसळत धावत असते, थकलेला प्रवासी पाणी पिऊन ताजातवाना होतो, तान्हेला व कष्टी यांना समाधान प्राप्त होते.COLMar 87.1

    या अनुभवावरून जे सत्याचे शिक्षक आहेत त्यांनी ख्रिस्ताचा प्रत्येक गुणधर्म धारण करावा अशी उमेद दिली जाते. ख्रिस्ताच्या शिकवणीचा आत्मा यामुळे मानवाच्या दळणवळणात सामर्थ्य व दिशा प्राप्त होऊन प्रार्थनेला दुजोरा मिळेल. ख्रिस्ताविषयीची त्याची साक्ष निर्जीव, अपुरी अशी असणार नाही. उपदेशक तोच तोच संदेश सतत देत राहणार नाहीत. उपदेशकाचे मन पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनासाठी सतत उघडे असेल.COLMar 87.2

    ख्रिस्त म्हणाला, “जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन आहे... जसे जीवंत अशा पित्याने मला पाठविले आणि मी पित्यामुळे वाचतो, तसे तो मला खातो तो ही मजमुळे वाचेल... जीवण करणारा तो आत्माच आहे... मी जी वचने तुम्हांस सांगितली आहेत ती आत्मा व जीवन आहेत.’ योहान ६:५४-६३.COLMar 87.3

    जेव्हा आम्ही ख्रिस्ताचा देह खातो व त्याचे रक्त पितो त्याजमध्ये सार्वकालिक जीवनाची तत्त्वे सेवेत प्राप्त होतील. त्यांच्या सेवेत सर्व काही ताजे व उत्साही असेल, जुन्या विचारांची पुर्नवृत्ती होणार नाही. जुने पुराणे संदेश नाहीसे होतील. जुने सत्य सागितले जाईल पण त्यावर नवीन प्रकाश पाडीला जाईल. त्यातून नवीन सत्याचा उगम होईल, त्याद्वारे स्पष्ट समज व सामर्थ्य प्राप्त होईल. जे कोणी असे सेवा करीत राहतील. त्याना पवित्र आत्म्याचा सहवास, नवा जन्म सामर्थ्य ही प्राप्त होतील. याद्वारे सत्याचा समज होणे त्यांचा समज उत्साही होईल व त्याना नवदृष्टीही प्राप्त होईल.COLMar 87.4

    लेकरांचा व तरूणांचा शिक्षक कसा व्हावा याचे दर्शक विश्वासू घरधनी आहे. जर तो शिक्षक परमेश्वराचे प्रत्येक वचन त्याचा खजिना करील तर त्या खजिन्यातून नवीन सत्य व नवीन सुंदर अर्थ काढीत राहील. हा शिक्षक प्रार्थनेद्वारे परमेश्वरावर अवलंबून राहील, तर परमेश्वराचा आत्मा त्याजवर येईल आणि परमेश्वर त्याच्याद्वार पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने इतरांच्या मनावर कार्य करील. पवित्रशास्त्रांतील विचार यांनी लोकांची मने व अंत:करणे भरून टाकील अशा प्रकारे तरूणांच्याद्वारे कार्य केले जाईल व पवित्र आत्मा शिक्षण देईल.COLMar 87.5

    स्वर्गीय शांति व आनंद ही शिक्षकाच्या मनात पवित्र आम्याच्या सामर्थ्याने वाहात राहतील, आणि ज्यांचा अशा शिक्षकांशी संबंध येईल त्यांच्या अंत:करणातून आशिर्वादाच्या नद्या वाहात राहतील. विद्यार्थ्यांना पवित्रशास्त्र हे कंटाळवाणे पुस्तक आहे असे कधीच वाटणार नाही. ज्ञानी शिक्षकाच्या शिक्षणाने पवित्रशास्त्राचा अभ्यास उत्साही व आशादायक वाटेल. पवित्रशास्त्र ही त्यांना जीवनी भाकर वाटेल व ती जुनी वा शिळी अशी कधीच वाटणार नाही. पवित्रशास्त्राची आकर्षकता व मोहकता लेकरांना व तरूणांना हवीशी वाटेल. सुर्याचे पृथ्वीवर प्रकाश पाडणे यामुळे सतत उजेड, उष्णता ही सतत दिली जातात.COLMar 88.1

    पवित्रशास्त्रात परमेश्वराच्या वचनाचा पवित्र आत्मा हा पवित्र शिक्षक आहे. पवित्रशास्त्राचे प्रत्येक पान त्यातून नवीन, मौल्यवान् उजेड प्रकाशित होतो. त्यातून सत्य प्रकट केले जाते, त्यातील शब्द व वाक्ये ही उज्वल व प्रत्येक प्रसंगासाठी त्या त्या आत्म्याला योग्य प्रकारे परमेश्वराची वाणी असे दिलेले आहेत.COLMar 88.2

    तरूणांना संदेश देणे यात पवित्र आत्म्याला आनंद वाटतो व पवित्र शास्त्रात तरूणांना संदेशाचा खजिना सापडणे हाही आनंदच आहे. महान शिक्षक येशूने दिलेली अभिवचने यामुळे तरूण मोह पावून त्याना प्रोत्साहन मिळेल व आध्यात्मिक जीवन हे प्राप्त होईल. यामुळे जीवन फलदायी होवून ते परमेश्वराच्या गोष्टीशी परिचीत होतील व मोहाला प्रतिकार करतील.COLMar 88.3

    सत्याचे वचन त्याच्या जीवनात वाढत जाईल व त्यांच्या जीवनात महत्त्व येईल त्याचे मोजमापही करीता येणार नाही. त्यांचे रूपांतर होईल त्याचे सौंदर्य व मोल ती त्यांच्या मनावर व स्वभावावर कितीतरी पटीने होतील. स्वर्गीय प्रितीचा प्रकाश प्रेरीत अत:करणावर प्रकाशित होईल. COLMar 88.4

    पवित्रशास्त्राचा जो जो अभ्यास करावा तो तो त्याची आवड वाढत जाते. मग पवित्रशास्त्राचा अभ्यास विद्यार्थी कोणत्याही प्रकारे करो त्यामुळे परमेश्वराची प्रिती व एकमेव ज्ञान ही प्राप्त होतील. COLMar 88.5

    यहुदी अर्थ शास्त्राचे महत्त्व अद्याप पूर्णपणे समजले नव्हते. सत्याचा विस्तृतपणा व खोलवर अर्थही चालीरिती व संज्ञा यांनी झाकले गेले होते. हे गूढ उघडणेची गुरूकिल्ली सुवार्ता आहे. तारणाचे ज्ञान समजले म्हणजे सत्याचा पूर्ण समज येतो. आम्हांला कल्पना नाही यापेक्षा आम्हांला हे अद्भुत सत्य समजणेची संधी आहे. परमेश्वराविषयीचे अगाध ज्ञान आम्हास समजले पाहिजे. जे लोक पश्चात्तापी अंत:करणाने हे सत्य शोधीत आहेत. परमेश्वराच्या वचनाची खोली, रूंदी, लांबी व उंची प्रार्थनेद्वारे शोधीत आहेत, परमेश्वराने हे सत्य मानवांना कळविले आणि देवदतांची इच्छा असताना त्यांना हे कळविले नाही.COLMar 88.6

    आम्ही जगाच्या शेवटच्या काळात जगत असता भविष्याची चिन्हे दाखवितात की आपण शेवटच्या दिवसाबाबत जास्त अभ्यास केला पाहिजे. नवा करारातील शेवटचे पुस्तक त्यांतील सत्याचा आपण जादा अभ्यास केला पाहिजे. सैतानाने पुष्कळांची मने आधळी केली आहेत व त्यामुळे ते आनंदाने निमित्त सांगतात की त्यांनी प्रकटीकरण या पुस्तकाचा अभ्यास केलेला नाही, पण प्रकटीकरणाबाबत कसे काय विशेषत: शेवटच्या काळातील लोकांनी याबाबत ख्रिस्ताने त्याचा सेवक योहानाद्वारे सांगितले, या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य, (आशिर्वादित) कारण समय जवळ आला आहे‘‘ प्रकटी १:३.COLMar 89.1

    ख्रिस्त म्हणाला, “सार्वकालिक जीवन हेच आहे की त्यांनी, जो तू एकच सत्य देव त्या तुला, व ज्याला तू पाठविले, त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे.”योहान १७:३. या ज्ञानाचे महत्त्व आम्हांला का येत नाही ? त्या सत्याने आमचे सर्व जीवन का व्यापले जात नाही?COLMar 89.2

    परमेश्वराने आपल्या तारणासाठी जी जी वचने लागतील ती ती देऊ केली आहेत. या जीवनी विहीरीतून कित्येकांनी पाणी ओढून काढले आहे, तरी तेथील साठा संपत नाही. कित्येकांनी प्रभुला त्यांचा आदर्श म्हणून सामोरा ठेविला आहे आणि त्याचे जीवन ख्रिस्तासमान झाले आहे. ख्रिस्तचे शील, ख्रिस्ताने त्यांच्यासाठी काय केले व ते ख्रिस्तासाठी कोण आहेत हे सर्व सागत असताना त्यांचे अंत:करण पवित्र आत्म्याने जणु काय पेटलेले आहे असे दिसून येते. या सत्यशोधकांना एका मागून एक सत्य वचने प्राप्त होत जातात. अशा प्रकारे तारणाची महत् कृत्ये शोधणे यासाठी हजारो लोकांनी प्रवेश करावा वा करणेची गरज आहे. ख्रिस्ताचे जीवन व त्याच्या कार्याचा भाग याचा आम्ही अभ्यास करू जाता, त्यातील सत्य समजणे यासाठी पवित्र आत्म्याद्वारे प्रकाश दिला जाईल. प्रत्येक सत्य सापडले नंतर ते अधिक आकर्षक वाटून पूर्वी असे कधीच मिळाले नाही असे वाटेल. सत्य शोधणे हा विषय अखंडीत राहील. हा विषय अक्षय राहील. ख्रिस्ताने मानवी देहधारण केला, मानवाप्रित्यर्थ केलेले प्रायश्चित मध्यस्थींचे कार्य यांचा अभ्यास सतत केला जाईल व अभ्यासू विद्यार्थी स्वर्गीय राज्याची अनंत वर्णे यात म्हणतील, “देवत्वाचे हे महान गुढ आहे.”COLMar 89.3

    ज्या करवी आम्हाला समज प्राप्त झाला असता असे जे येथे प्राप्त व्हावयास पाहिजे होते ते आपणास तेथे स्वगती प्राप्त होईल. तेथील सर्वकाळात आम्हाला तारणाचा विषय समजणे यासाठी आपले तन, मन व भाषा यांचा उपयोग करावा लागेल. जे सत्य शिष्यांना सांगावयास पाहिजे होते ते सत्य ख्रिस्त आम्हाला समजावून सागेल, कारण त्यावेळी म्हणजे पृथ्वीवर ते सत्य स्विकारल्यासाठी त्याचा तसा विश्वास नव्हता. ख्रिस्ताच्या सेवेची नवीन नवीन अंगे वा भाग त्यांची पूर्णता व गौरवीपणा हि ही सांगितली जातील. तेथे सदासर्वकाळात विश्वासु जन वा नागरिक स्वर्गीय खजिन्यातून नवे व जुने असे सत्य सतत शोधीत व सागत राहतील.COLMar 90.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents