Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ताचे बोधमय दाखले

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय २५ वा—कला - दान

    मत्तय २५:१३-३० यावर आधारीत

    “यास्तव तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हास तो दिवस किंवा ती घटिका ठाऊक नाही. कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांस बोलावून त्यांस आपली मालमत्ता सोपवून दिली, त्याप्रमाणे हे आहे. एकाला त्याने पाच हजार रूपये एकाला दोन हजार रूपये व एकाला एक हजार असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो प्रवासाला गेला. ज्याला पाच हजार मिळाले होते त्याने लागलेच जावून त्यावर व्यापर केला व आणखी पाच हजार मिळविले. तसेच ज्याला दोन हजार मिळाले होते त्यानेही आणखी दोन हजार मिळविले; परंतु ज्याला एक हजार मिळाले होते त्याने जावून भूमि खणिली व तीत आपल्या धन्याचा पैका लपविला. मग बहुत काळानंतर त्या दासांचा धनी आला व त्यांचा हिशोब घेऊ लागला. तेव्हा ज्याला पाच हजार मिळाले होते तो म्हणाला पाहा, त्यावर मी आणखी पाच हजार मिळविले आहेत. त्याला त्याच्या धन्याने म्हटले; शाबास, भल्या व विश्वासू दासा, तु थोडक्याविषयी विश्वासु झालास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन; आपल्या धन्याचे सुख भोगावयास ये. नंतर ज्याला दोन हजार मिळाले होते तो ही येवून म्हणाला, महाराज, आपण मला दोन हजार रूपये सोपून दिले होते; पाहा त्यावर मी आणखी दोन हजार मिळविले आहेत. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाब्बास, भल्या व विश्वासु दासा, तू थोडक्याविषयी विश्वासु झालास; मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन; आपल्या धन्याचे सुख भोगावयास ये. मग ज्याला एक हजार मिळाले होते तो ही येवून म्हणाला, महाराज आपण कठोर मनुष्य आहा; जेथे आपण पेरिले नाही तेथे कापणी करिता; व जेथे पसरिले नाही तेथून जमा करिता, असे मला आपणाविषयी कळले; म्हणून मी भिऊन आपले हजार रूपये भूमीत लपवून ठेविले होते; पाहा, ते तुमचे तुम्हांस मिळाले आहेत. जेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, अरे दुष्ट व आळशी दासा जेथे मी पेरिले नाही तेथे कापितो; व पसरिले नाही तेथुन गोळा करीतो, हे तुला ठाऊक होते; तर माझे द्रव्य सावकाराकडे ठेवावयाचे असते, म्हणजे मी आल्यावर माझे मला सव्याज मिळाले असते. यास्तव हे हजार रूपये याजपासून घ्या, आणि ज्याच्याजवळ दहा हजार आहेत त्याला द्या. कारण ज्याच्याजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला विपुल होईल; आणि ज्याच्याजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याजपासून घेतले जाईल; आणि त्या निरूपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल‘‘ मत्तय २५:१३-३०.COLMar 244.1

    ख्रिस्ताने जैतूनाच्या डोंगरावर त्याच्या शिष्यांना त्याचे जगात दुसरे येणे याविषयी बोलला होता. येशूचे येणे नजीक होईल तेव्हा ठराविक चिन्हें होतील हे सांगितले, येशूने शिष्यांना सांगितले जागृत व तयारीत राहा. येशूने इशारा पुन: सांगितला: ‘यास्तव तुम्हीही सिध्द व्हा, कारण तुम्हांस वाटत नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.‘‘ मत्तय २४:४४. त्यानंतर येशूने दाखवून दिले की त्याचे येणे यासाठी तयारी करणे म्हणजे काय करणे. वाट पाहाणे हा वेळ आळशीपणात खर्च करणे असे नव्हे तर त्याच्या येण्यासाठी सुवार्ता कार्य करीत राहणे हा धडा येशूने कला-दान या दाखल्यात शिकविला आहे.COLMar 245.1

    “स्वर्गाचे राज्य परदेशी जाणाऱ्या एका मनुष्यासारखे आहे‘‘. येशू म्हणाला; “त्या मनुष्याने आपल्या दासाना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली.’ एकाला त्याने पाच हजार रूपये, एकाला दोन हजार रूपये व एकाला एक हजार असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले, आणि तो प्रवासास गेला.‘‘ मत्तय २५:१४-१५. COLMar 245.2

    दुरदेशी प्रवासाला जाणारा मनुष्य हा ख्रिस्ताचे दर्शक आहे, ख्रिस्त या पृथ्वीवरून स्वर्गाकडे लवकरच जाणार होता. या दाखल्यातील दास किंवा जे गुलाम वा चाकर होते ते ख्रिस्ताचे प्रतिनिधी होते...तुम्ही आपले नव्हा, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहां‘‘... (१करिंथ ६:२०) सोने, रूपे अशा नाशवंत वस्तुंनी नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोंकरा, असा जो ख्रिस्त त्याच्या मौल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहा हे ध्यानात ठेवा. (१ पेत्र १:१८,१९) “आणि तो सर्वांसाठी याकरिता मेला की जे जगतात त्यांनी पुढे स्वत:करिता नव्हे तर यांच्यासाठी जो मेला व उठला त्याच्याकरिता जगावे’ (२ करिथ ५:१५).COLMar 245.3

    ‘सर्व मनुष्यांना येशूच्या मौल्यवान् रक्ताच्या किंमतीने विकत घेतले आहे. यासाठी या जगात स्वर्गीय सर्व संपत्तीचा साठा ओतला गेला, ख्रिस्त येशूला देणे याद्वारे सर्व काही दिले गेले. परमेश्वराने प्रत्येक मानवापासून त्याची इच्छा, त्याची प्रिती, त्याचे मन व त्याचा आत्मा ही विकत घेतली आहेत. प्रत्येक मनुष्य मग तो विश्वासधारक असो वा नसो, तो परमेश्वर।ची मालमत्ता आहे. प्रत्येकांनी परमेश्वराची सेवा करावी यासाठी पाचारण केले आहे. या सेवेत ते कशाप्रकारे सेवा करतील त्या प्रत्येक कृतीचा त्यांना त्या महान न्यायनिवाड्या दिवशी हिशोब द्यावा लागेल.COLMar 245.4

    परमेश्वराचा मानवावर हा हक्क आहे हे, सर्व मानव कबुल करीत नाहीत, जे कोणी ख्रिस्ताचे कामदार म्हणून समजतात, जे या दाखल्यांतील दासाप्रमाणे ख्रिस्ताचे दास समजतात त्यांच्यावर ही जबाबदारी जादा येते.COLMar 246.1

    ख्रिस्ताचे अनुयायी यांचे तारण केवळ सेवा करणे यासाठी झाले आहे. आमचा प्रभु आम्हांस हे शिक्षण देतो की, आमच्या जीवनाचा खरा हेतु म्हणजे सेवा करणे ख्रिस्त स्वतः असा कामदार होता, आणि ख्रिस्त त्याच्या सर्व अनुयायास सेवेचा नियम देतो. जनसेवा ही प्रभुसेवा! येथे जगाला जीवनाचा सर्वश्रेष्ठ हेतु म्हणजे सेवा करणे हे दाखवून देतो. आम्ही इतराची सेवा करीत असता परमेश्वराच्या व ख्रिस्ताच्या सान्निध्यात येतो. ह्या सेवेच्या नियमामुळे सहमानव व परमेश्वर यांचा निकट संबध जोडला जातो.COLMar 246.2

    ख्रिस्त त्याच्या सेवकाकडे “सर्व मालमत्ता‘‘ देतो ती मालमत्ता घेवून ख्रिस्ताप्रित्यर्थ चांगल्या कार्यासाठी वापरली जावी. “ख्रिस्त प्रत्येक मानवास त्यांच्या योग्यतेप्रमाणे देतो.‘‘ स्वर्गीय राज्यासाठी कार्य करणे यासाठी प्रत्येकाला सार्वकालिक योजना दिली आहे. प्रत्येकाने प्रत्येक मानवाचे तारण व्हावे यासाठी या तारणाच्या योजनेत ख्रिस्ताबरोबर सहकार्य करावे. आम्हां प्रत्येकासाठी जसे खात्रीपूर्वक स्वर्गीय राज्यात स्थान तयार आहे तितक्याच खात्रीपूर्वक या पृथ्वीवर प्रभुसेवा करणे यासाठी खात्रीपूर्वक स्थळ तयार केले आहे.COLMar 246.3