Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ताचे बोधमय दाखले

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    खजिना शोधणे

    आम्ही परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करणे पवित्रशास्त्रात जे सत्य आहे ते आपण आपली मुलेबाळे यांना शिकविले पाहिजे. हा अतूर अर्थात न संपणारा खजिना आहे, पण हा खजिना आपणापाशी आहे तोवर आपण त्याचा शोध करीत नाही. पुष्कळजण सत्याविषयींचे सत्य समजणे ऐवजी त्यांच्या भावनांचा विचार करीतात. जीवनात काय उपयोगी आहे या ऐवजी ते ज्यादा वर वर गोष्टीबाबत समाधान मानतात. सत्याऐवजी लोकांच्या म्हणीवर जादा भर देतात, कारण परमेश्वराचे वचनाबाबत सखोल, काळजीपूर्वक अभ्यास करून शोध करणे याबाबत ते आळशी आहेत. मनुष्याचे संशोधन यावर आपण अवलंबून राह शकत नाही. ते नाशकारक आहेत. कारण संशोधन हे मानवास परमेश्वराच्या जागी बसविणेंचा प्रयत्न करीतात. “परमेश्वर असे म्हणतो‘‘ याऐवजी मानवाचे विचार व म्हणी ठेवू पाहतात.COLMar 69.1

    ख्रिस्त हाच सत्य आहे. ख्रिस्ताचे वचन सत्य असून त्यात खोल अर्थ आहेत. ख्रिस्ताच्या सर्व शिक्षणात भावार्थ आहे. पवित्र आत्म्याने प्रेरीत झालेली मनेच केवळ, ख्रिस्ताच्या शिक्षणाचा अर्थ समजू शकतील. ख्रिस्ताचे वचन हे ठेवीप्रमाणे जरी लपविलेले असेल तरी ते सापडले जावून त्याचा सखोल, मोलवान सत्य प्रकाश समजून येईल. COLMar 69.2

    मानवी तत्त्वज्ञान व कल्पना याद्वारे परमेश्वराचे वचन समजू शकत नाही. जे तत्त्वज्ञानी लोक आहेत त्यांच्याद्वारे लपविलेल्या ठेवीचे स्पष्टीकरण मिळू शकेल व मंडळीत पाखंडीमते येणेस बंदी होईल असे वाटते. पण उलट या तत्त्वज्ञानी लोकांनी त्यांची पाखंडी मते व तत्त्वज्ञान ही मंडळीत आणिली. पवित्र शास्त्रातील गूढ वचनांची त्यांना वाटणारी गुंतागुंत त्यांनी स्पष्ट करणेचा प्रयत्न केला पण स्पष्टीकरण करणे ऐवजी उलट सर्व गुंतागुंत व अधकार असे केले गेले.COLMar 69.3

    परूशी व शास्त्री यानी परमेश्वराचे वचनावर त्यांचे स्वत:चे स्पष्टीकरण याद्वारे भर टाकीत आहेत असे त्यांना वाटले, पण ख्रिस्त त्यांच्याविषयी असे म्हणाला, “तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य ही न आळखल्यामुळे भ्रमात पडला आहात ना?”मार्क १२:२४, येशूने त्यांना दोष दिला, “हे मनुष्यांचे नियम, शास्त्र म्हणून शिकवून व्यर्थ माझी उपासना करीतात’ मार्क ७:७. जरी त्यांना वाटत होते की परमेश्वराचे वचन त्यांना समजत होते, पण ते वचनाप्रमाणे वागत नव्हते. वचनाचा खरेपणा त्यांना दिसून येवू नये यासाठी सैतानाने त्याचे डोळे-ज्ञानचक्षु अंधळे केले होते. COLMar 69.4

    सध्याच्या काळात असे काम करणारे पुष्कळ आहेत. पुष्कळ मंडळीत हे पाप आहे म्हणून त्या मंडळया दोषी आहेत. पुर्वीच्या ज्या यहुदी शिक्षकांचा जो अनुभव होता तो अनुभव सध्याच्या मंडळीत स्वत:ला शहाणे म्हणविणारे लोक फार धोक्यात, अति धोक्यात आहेत. सत्याचे वचन याबाबत ते लोक खोटे व भलतेच स्पष्टीकरण देतात व ऐकणारे आत्मे यांना गोंधळून अधिक अंधारात व चितेंत लोटतात.COLMar 70.1

    मानवी पाखंडी मते व दंतकथाच्या प्रकाशात पवित्र शास्त्राचे सत्य वचन कधीही वाचू नये. आम्ही मशाल घेवून सूर्याला प्रकाश देणे म्हणजे पवित्रशास्त्र यांचे स्पष्टीकरण दंतकथा व कल्पक गोष्टीद्वारे देणे यासारीखे आहे. परमेश्वराच्या वचनाला या पृथ्वीवरील कोणत्याही प्रकाशाने गौरवी प्रकाश प्राप्त होवू शकत नाही. परमेश्वराचा स्वयं पकाश या वचनात प्रकाशित केला आहे आणि यापुढे सर्व प्रकाश अधुक पडतात.COLMar 70.2

    आपण पवित्रशास्त्राचा अभ्यास कळकळीने व काळजीपूर्वक संशोधन या दृष्टीने करावा. सत्यवचन शिस्तबध्द व स्पष्ट माहितीसाठी आळसाने काम होत नाही. कळकळीने, सहनशीलतेने व चिकाटीने अभ्यास केला म्हणजेच आशिर्वाद या जीवनासाठी प्राप्त होतात. जर मनुष्याला व्यापारात यश हवे असेल तर इच्छा व विश्वास यांची गरज आहे. आध्यात्मिक आशिर्वादासाठी आपणास कष्टाविना मार्ग नाही, शेतात लपविलेली ठेव, त्या मनुष्याने कष्टाने शोधून काढली. तद्वत आम्हीही सत्याची ठेव शोधत राहिले पाहिजे. काम करीत असता उळमळीत मनाने करू नये कारण त्याचा परिणाम काहीत होत नाही. प्रत्येक वृध्द व तरूणाने केवळ पवित्रशास्त्र वाचून भागत नाही तर पूर्ण अंत:करणाने, प्रार्थनापूर्वक सत्य वचनाचा शोध करणे याद्वारे लपविलेली तारणाची ठेव सापडेल. जे कोणी असा प्रयत्न करीत राहतील अशांना ख्रिस्ताचे वेतन मिळेल व त्याना वचन समजले जाईल.COLMar 70.3

    पवित्र शास्त्रांतील सत्याचे ज्ञान यावर आपले तारण अवलंबून आहे. आपणास ही सत्य ठेव सापडली जावी अशी परमेश्वराची इच्छा आहे. अंत:करणास पवित्र शास्त्रातील वचनाची भूक लागली आहे. अशा भावनेने आपण शोध करणे. खाणीतील सोन्याची रेषा सापडावी यासाठी लोक खणतात तद्वत् पवित्र शास्त्रात शोधत राहणे. परमेश्वराची तुम्हांविषयीची इच्छा व तुमचे परमेश्वराशी नाते समजणे तोवर संशोधन चालू ठेवा. ख्रिस्त म्हणाला, “तुम्ही जे काही माझ्या नामाने मागाल ते मी करीन, यासाठी की पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे. तुम्ही माझ्या नामाने मजजवळ काही COLMar 70.4

    मागाल तर मी ते करीन‘‘ योहान १४:१३,१४.COLMar 70.5

    धार्मिक व कर्तबगार लोकांना सार्वकालिक खरेपणा त्वरीत दिसून येतो, पण ज्या गोष्टी दिसतात त्याचे ग्रहण पडते व अदृश्य गोष्टींचे गौरव दिसून येत नाही. त्यामुळे त्यांना बहुधा योग्य समज येत नाही. जो कोणी पराकाष्ठेने लपविलेली ठेव शोधितो त्याने या जगातील गोष्टीपासून स्वत:ला उंचावले पाहिजे. शोधकाने त्याचे तन मन धन त्या शोधार्थ समर्पित करावे.COLMar 71.1

    पवित्र शास्त्रांतून अगणित ज्ञान प्राप्त झाले असते पण आज्ञाभगाने हे अशक्य झाले आहे. परमेश्वराच्या आज्ञा समजणे म्हणजे त्या आज्ञा पाळणे. मानवाचा द्वेष व पूर्वतेढ यासाठी पवित्र शास्त्राचा उपयोग करू नये जे कोणी नम्रपणे सत्याचे ज्ञान शोधतात व आज्ञा पाळतात त्यांनाच पवित्रशास्त्र समजते.COLMar 71.2

    “मला तारण प्राप्त व्हावे यासाठी मी काय करावे? असा प्रश्न तुम्ही विचारता काय ? तुमच्या संशोधनाच्या दारापाशी, तुम्ही तुमची पाखंडी मते, तुमच्या परंपरा व तुमच्या सुधारक कल्पना सोडून देणे. तुमच्या विचाराचे समर्थन करणे यासाठी तुम्ही पवित्रशास्त्राचा उपयोग कराल तर तुम्हाला सत्य कधीच सापडणार नाही. परमेश्वराचे काय म्हणणे आहे या हेतूने पवित्रशास्त्राचे चिकित्सापूर्वक वाचन करा. असे करीत असता जर तुमचा पालट झाला. तुमच्या मनातील विचार हे पवित्र शास्त्रातील सत्य वचनाशी सुसंगत नाहीत असे दिसून आले तर तुमच्या मतांशी वचनाचा ओढून ताडून अर्थ लावून नका, तर सत्य वचनाचा प्रकाश स्विकारा. आपले मन व अंत:करण उघडे करा व परमेश्वराने पवित्र शास्त्रात किती अद्भूत गोष्टींचे प्रकटीकरण केले हे पाहा.COLMar 71.3

    ख्रिस्त, जगाचा तारणारा याजवर विश्वास ठेवणे म्हणजे आमची जी बुध्दिमत्ता आहे तिला ती स्वर्गीय ठेव दिसावी व तिचे महत्त्व वाटावे. हा विश्वास, पश्चात्ताप व अंत:करणाचा पालट यापासून विभक्त करणे अशक्य आहे, विश्वास असणे म्हणजे ती सुवार्ता ठेव शोधणे व तिचा स्विकार करणे, मग त्यासाठी कितीही कष्ट करावे लागले तरी हरकत नाही.COLMar 71.4

    “नव्याने जन्मल्यावाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही.‘‘ योहान ३:३. एकाद्याला अनुमान वा कल्पना करीता येईल पण केवळ विश्वासाच्या डोळयासच ती स्वर्गीय ठेव दिसते. ख्रिस्ताने त्याचा प्राण देवून आम्हांसाठी ती अपार अलोट संपत्ती प्राप्त केली. पण विश्वासाने ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आपला पुर्नजन्म होत नाही तर, आपल्या पापांची क्षमा नाही, व नाशवंत आत्म्यास ती स्वर्गीय ठेव मिळणार नाही.COLMar 71.5

    परमेश्वराचे, पवित्रशास्त्रातील सत्य आम्हास दिसावे यासाठी आम्हास पवित्र आत्म्याची गरज आहे. या पृथ्वीवरील सृष्टी सौंदर्य जर दिसावयाचे असेल तर सूर्योदय हवा, अंधार नाहीसा होणे अवश्य व भरपूर सूर्यप्रकाश सर्वत्र पडला पाहिजे. अशाच प्रकारे पवित्रशास्त्रातील अद्भूत गोष्टी दृष्टीस पडणे व समजणे यासाठी धार्मिकतेचा सूर्य प्रभु यांच्या प्रकाशाची गरज आहे.COLMar 72.1

    स्वर्गातून पवित्र आत्मा परमेश्वराच्या प्रितीने, सदिच्छेने पाठविला आहे, पवित्र आत्मा परमेश्वराच्या गोष्टी, ज्याचा परमेश्वरावर एकनिष्ठ विश्वास आहे. त्यांना प्रकट करीतो. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने सत्य मनावर बिबविले जाते व तारणाचा जीवनाचा मार्ग अचूक व सुलभ दर्शविला जातो. आम्ही पवित्रशास्त्राचा अभ्यास करीत असता प्रार्थना करावी परमेश्वराच्या आत्म्याने वचन प्रकाशित व्हावे. तेणेकरून ते वचन आम्हांस दिसून ती ठेव याबाबत समाधान मिळावे.COLMar 72.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents