Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

युगानुयुगांची आशा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय २६—कफर्णहूमात

    जाताना येताना प्रवासाच्या मधल्या वेळेस येशू कफर्णहूमात राहिला म्हणून ते “त्याचे स्वतःचे शहर” असे समजण्यात आले. ते गालीली समुद्रकिनाऱ्यावर आणि सुंदर गनसरेथ पठाराच्या सीमेनजीक होते.DAMar 205.1

    सरोवरावरील अति कमी दाबाच्या हवामानामुळे किनाऱ्या सभोवती असलेल्या पठारावर दक्षीणेकडील सुखकर हवामान होते. ख्रिस्ताच्या काळात या ठिकाणी येथे माडाची व ऑलिव्ह झाडे फार भरभराटीत होती, तसेच तेथे उपवने व द्राक्षाचे मळे, हिरवीगार शेती, व रंगीबेरंगी उमलणारी फुले होती आणि ह्या सर्वांना कड्यावरून वाहाणाऱ्या जीवंत झऱ्यातून पाणी मिळत होते. तलावाच्या किनाऱ्याने व थोड्या अंतरावर असलेल्या टेकड्यांनी त्याला घेरलेले होते आणि त्यांच्यावर खेडी व गावे वसली होती. सरोवर मासे धरणाऱ्या मचव्यांनी भरून गेले होते. सर्वत्र हालचाल व धामधूम असून सर्वजन कामात दंग होते.DAMar 205.2

    कफर्णहम उद्धारकाच्या कामासाठी मध्यवर्ती ठिकाण होते. दमास्कस ते यरुशलेम व इजिप्त ते भूमध्य समुद्र यांच्या महामार्गावर ते असून तेथे प्रवाशाची फार रहदारी होती. पुष्कळ देशांतील लोक त्या शहरातून जात येत असत आणि तेथे वस्तीसाठीही थांबत असत. ह्या ठिकाणी येशू सर्व देशांतील सर्व थराच्या लोकांना, श्रीमंत, थोर तसेच गरीब व नम्र यांना भेटू शकत होता, आणि त्याने दिलेले पाठ दुसऱ्या देशात व अनेक घराण्यात जात होते. भाकीतावर केलेल्या चिकित्साने खळबळ उडत होती, व उद्धारकाकडे लक्ष वेधण्यात येत होते. अशा प्रकारे त्याचे कार्य जगाच्यापुढे आणण्यात येत होते.DAMar 205.3

    येशूच्या विरूद्ध धर्मसभेने ठराव केलेला असतानासुद्धा लोक त्याच्या कार्याच्या विकासाची आतुरतेने वाट पाहात होते. सबंध स्वर्ग कुतुहलाने खळबळून गेला होता. दिव्यदूत लोकांच्या अंतःकरणावर परिणाम घडवून व त्यांना उद्धारकाकडे आकर्षण करून त्याच्या कार्याची वाट तयार करीत होते.DAMar 205.4

    कफर्णहूममध्ये बरे केलेला अंमलदाराचा मुलगा त्याच्या सामर्थ्याचा पुरावा होता. दरबारातील अंमलदार व त्याचे घराणे यांनी आनंदाने आपल्या श्रद्धेची साक्ष दिली. स्वतः गुरूजी त्यांच्यामध्ये हजर आहे हे समजल्यावर सबंध शहर जागृत झाले. त्याचे दर्शन घेण्यास लोकांच्या झुंडीच्या झुडी जमा झाल्या. शब्बाथ दिवशी मंदिर गच्च भरून गेले आणि अति प्रवेश न मिळाल्यामुळे पुष्कळांना परत जावे लागले.DAMar 205.5

    त्याचे भाषण ऐकणारे सर्वजण “त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त होते.’ “कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्री लोकांसारिखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवीत होता.” लूक ४:३२; मत्तय ७:२९. पाठांतर करून धडा शिकल्याप्रमाणे शास्त्री व वडील लोकांची शिकवण आस्थाशून्य व औपचारिक होती. देवाचे वचन त्यांना सामर्थ्यहीन वाटत होते. त्यांच्या शिक्षणात स्वतःच्या कल्पना व रितीरिवाज घुसडले होते. नित्याच्या परिपाठाप्रमाणे देवाच्या आज्ञाचे स्पष्टीकरण करण्याचे ते भासवीत होते परंतु देवाच्या प्रेरणेने त्यांचे अंतःकरण व श्रोतेजनाचे अंतःकरण जागृत झाले नव्हते.DAMar 206.1

    यहूदी लोकामध्ये फाटाफूट करणाऱ्या विषयाकडे येशूने अगदी दुर्लक्ष केले. सत्य प्रदर्शित करणे हे त्याचे काम होते. मूळ पुरुषांनी व संदेष्ट्यांनी दिलेल्या शिकवणीवर त्याच्या वचनाने लख्ख प्रकाश पडला व देवाच्या शास्त्राचे नवीन प्रकटीकरण झाले. त्याच्या श्रोतेजनांना आतापर्यंत देवाच्या वचनाच्या गूढ अर्थाचे आकलन झाले नव्हते.DAMar 206.2

    जणू काय लोकांचे घोटाळे व गुंतागुत परिचयाचे असल्याप्रमाणे येशू त्यांच्या परिस्थितीला धरून बोलत होता. आडवळणे न घेता सरळ व सोप्या भाषेत सादर करून त्याने सत्य सुरेख बनविले. वाहाणाऱ्या झऱ्याप्रमाणे भाषा शुद्ध, सुसंस्कृत व ओघवती होती. धर्मगुरूचा तोच तोच कंटाळवाणा आवाज ऐकणाऱ्यांना त्याचा आवाज संगीत वाटला. परंतु त्याची शिकवण सोपी असून त्याची वाणी अधिकारसंपन्न होती. ह्या त्याच्या वैशिष्ट्यामुळे इतरांच्या व त्याच्या शिकवणीत फार मोठी तफावत दिसली. पवित्र शास्त्रवचनाचा अर्थ असा किंवा तसा लावण्याच्या मनःस्थितीत धर्मगुरू साशंकेत व अनिश्चिततेत बोलत होते. त्यामुळे श्रोतेजनावर दररोज अनिश्चिततेची छाप पडत होती. परंतु येशूने त्याच्या अधिकाराविषयी कसलाही किन्तु न ठेवता शास्त्रवचनाचे शिक्षण दिले. कोणताही विषय असो त्याच्यावर वाद उपस्थित होणार नाही अशा अधिकार वाणीने तो सादर केला.DAMar 206.3

    तथापि तो उत्सुक होता पण जबरदस्ती करणारा नव्हता. विशिष्ठ उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तो बोलत होता. अनंत जगाची वस्तुस्थिती डोळ्यासमोर तो आणित होता. प्रत्येक मुद्यात देवाचे प्रगटीकरण करण्यात आले. जगातील गोष्टीमध्ये गुंग होणारी व भुरळ घालणारी तीव्र इच्छा खोडून टाकण्याचा येशू प्रयत्न करीत होता. अनंत गोष्टीच्या मानाने ह्या जीवनातील गोष्टी किती खालच्या दर्जाच्या आहेत हे दाखविले; परंतु त्यांचे महत्त्व त्याने दुर्लक्षिले नाही. स्वर्ग व पृथ्वी सांधलेले आहेत आणि नित्याच्या जीवनातील कर्तव्य उत्तम रीतीने करण्यासाठी दिव्य सत्याचे ज्ञान मनुष्यांना अधिक चांगले तयार करिते. देवाशी असलेल्या नातेसंबंधाची जाणीव ठेवून व स्वर्गाशी परिचीत असलेल्यासारखे त्याने भाषण केले, तथापि मानवी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी असलेली त्याची एकात्मता त्याने समजून घेतली. DAMar 206.4

    दया यावरील त्याचे संदेश श्रोतेजनाला सोयीस्कर असून ते विविध प्रकारचे होते. “शिणलेल्यास बोलून धीर कसा द्यावा” हे त्याला माहीत होते (यशया ५०:४); सत्याचा खजिना लोकांच्यापुढे आकर्षकपणे मांडण्यासाठी त्याच्या ओठावर कृपेचा वर्षाव केला होता. पूर्वग्रहदूषित मनावर छाप पाडण्याचे कौशल्य त्याच्याठायी होते आणि समर्पक उदाहरणाने त्यांना आश्चर्यचकित करून त्यांना आपलेसे करून घेतले. प्रतिभाशक्तीने लोकांची मने त्याने जिंकून घेतली. त्याची उदाहरणे नित्याच्या जीवनातून घेतली होती आणि ती जरी साधी सोपी होती तरी ती कुतुलहनीय गूढार्थाने भरली होती. आकाशातील पक्षी, शेतातील कमळे, बी, मेंढपाळ व मेंढरे - ह्या साधनांनी ख्रिस्ताने शाश्वत सत्य पुढे मांडले; आणि त्याच्यानंतर निसर्गामध्ये त्या वस्तू पाहाण्याचा त्यांना प्रसंग मिळाल्यावर त्याच्या शब्दांचे त्यांना स्मरण झाले. ख्रिस्ताच्या उदाहरणांनी त्याच्या पाठांची सातत्याने पुनरावृत्ती केली.DAMar 207.1

    ख्रिस्ताने केव्हाही माणसाची खुशामत केली नाही. कल्पनाशक्ती व अभिरूची उंचावेल अशी भाषणे त्याने कदापिही केली नाहीत. त्यांच्या हुशारीने लावलेल्या शोधाबद्दल त्याने त्यांची स्तुतीही केली नाही. परंतु पूर्वग्रहदूषित नसलेल्यांनी व खोल विचारवंतांनी त्याच्या शिकवणीचा स्वीकार केला आणि त्यांच्या शहाणपणाला तो पटला. सुलभ भाषेमध्ये आध्यात्मिक सत्य प्रदर्शित केल्याचे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. अतिश्रेष्ठ शिक्षणतज्ञ त्याच्या शब्दांनी मोहीत झाले होते आणि त्याचा फायदा नेहमी अशिक्षितांना होत होता. अडाणी लोकांच्यासाठी त्याच्याजवळ संदेश होता तसेच असंस्कृत मूर्तिपूजक लोकांना समजण्यासारखाही त्याच्याजवळ संदेश होता.DAMar 207.2

    थकले भागलेले व आपत्तीने ग्रासलेले यांना त्याच्या नाजूक करुणेचा स्पर्श होऊन आरोग्य प्राप्त झाले. क्रोधाविष्ट व उर्मटपणा करणाऱ्या शत्रूच्यामध्येसुद्धा त्याच्याभोवती शांतीचे वातावरण होते. त्याच्या मुद्रेचे सौदर्य, त्याच्या स्वभावाची विनयशिलता आणि या सर्वापेक्षा अधिक त्याची चर्या व वाणी यांच्याद्वारे अश्रद्धेने ज्यांची मने कठीण झाली नव्हती ते सर्वजण त्याच्याकडे ओढले गेले होते. प्रत्येक दृष्टिक्षेप व शब्द यांच्याद्वारे गोड, मधुर व सहानुभूतीची भावना चमकली नसती तर त्याच्या पाठीमागे लागलेला मोठा घोळका त्याच्याकडे आकर्षित झाला नसता. त्याच्याकडे आलेल्या पीडलेल्यांना वाटले की जीवलग व प्रेमळ मित्राप्रमाणे त्याने आमच्या गोडीत आपल्याप्रमाणे रस घेतला त्यामुळे त्याने शिकविलेल्या सत्याविषयी अधिक माहिती मिळविण्याची त्यांनी इच्छा प्रदर्शित केली. स्वर्ग समीप आणण्यात आला. त्याच्या प्रेमाचे सांत्वन त्यांना सदैव लाभावे म्हणून त्याच्या सहवासात राहाण्याची त्यांना उत्कृट इच्छा झाली.DAMar 207.3

    श्रोतेजनांच्या चेहऱ्यावरील बदलणारी छटा येशूने अगदी मनापासून न्याहळली. ज्यांच्या मुद्रेवर गोडी व आनंद दिसला ते पाहून त्याचे फार समाधान झाले. आत्म्याच्या अंतःकरणात घुसलेल्या सत्याच्या बाणाने स्वार्थीपणाच्या छिंदड्या करून पश्चातापवृत्ती बानवून कृतज्ञता व्यक्त केलेली पाहून उद्धारकाला फार आनंद झाला. त्याने जेव्हा श्रोतेजनावर आपली दृष्टी फिरविली तेव्हा पूर्वी पाहिलेले चेहरे त्याने ओळखले, त्याचा चेहरा हर्षाने प्रकाशमान झाला. त्यांच्यामध्ये त्याला त्याच्या राज्याची आशादायक प्रजा दिसली. प्रेमाने अंतःकरणात बाळगलेल्या प्रतिमेला सोप्या व सरळ भाषेत बोललेल्या सत्याचा स्पर्श झाला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील उदासीन, निषेध व्यक्त करणारा फरक त्याला दिसला. येथे प्रकाशाला मना आहे असे त्यावरून दिसले. शांती संदेशाचा लोकांनी नाकार केलेला पाहून त्याच्या अंतःकरणाला फार वेदना झाल्या.DAMar 208.1

    प्रस्थापित करणाऱ्या राज्याविषयी व सैतानाच्या तावडीत सापडलेल्यांना मुक्त करण्यासाठी आलेल्या त्याच्या कार्याविषयी येशूने मंदिरात भाषण केले. धास्तीच्या कर्कश आवाजाने त्याला अडथळा केला. लोकातून एक वेडा माणूस पुढे सरसावला व मोठ्याने किंचाळला, “हे येशू नासरेथकरा, तू आमच्यामध्ये का पडतोस? आमचा नाश करावयास आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र तो तूच.” DAMar 208.2

    आता सर्व काही गोंधळ व धोक्याची सूचना होती. लोकांचे लक्ष ख्रिस्तापासून दुसरीकडे वळविण्यात आले होते व त्याच्या शब्दाकडेही कानाडोळा केला होता. त्याच्या बळीला धर्मसभेपुढे खेचण्याचा सैतानाचा उद्देश होता. परंतु अशुद्ध आत्म्याला धमकावून येशूने म्हटले, “उगाच राहा व याच्यातून निघ. तेव्हा अशुद्ध आत्मा त्याला पिळून टाकून मोठ्याने ओरडून त्याच्यातून निघून गेला.”DAMar 208.3

    दुःखाने पीडलेल्याचे मन सैतानाने गोंधळून टाकिले होते, परंतु उद्धारकाच्या उपस्थितीने औदासिन्यात प्रकाशाचा किरण चमकला होता. सैतानाच्या कचाट्यातून मुक्त होण्यास तो फार उत्सुक झाला होता; परंतु दुष्ट आत्म्याने ख्रिस्ताच्या सामर्थ्याला विरोध केला. येशूच्या मदतीसाठी जेव्हा माणसाने विनंती केली तेव्हा दुष्ट आत्म्याने त्याच्या मुखात शब्द घातले आणि तो भीतीने व्याकूळ होऊन मोठ्याने ओरडला. त्याला मुक्तता मिळणाऱ्याच्या उपस्थितीत तो आहे असे अंशतः अशुद्ध आत्मा लागलेल्या मनुष्याला वाटले होते; परंतु त्या महान शक्तीच्या कह्यात जाण्याचा प्रयत्न करीत असताना दुसऱ्या इच्छाशक्तीच्या दबावाखाली तो आला व त्याच्या मुखातून दुसरे शब्द बाहेर पडले. मुक्ततेसाठी त्याची मनीषा आणि सैतानी शक्ती यांच्यातील झगडा भयानक होता.DAMar 208.4

    अरण्यातील मोहाच्या वेळी ज्याने सैतानावर विजय संपादन केला होता त्याला पुन्हा शत्रूच्या समोरासमोर आणण्यात आले होते. आपल्या बळीवर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न अशुद्ध आत्म्याने केला. ह्या प्रयत्नात कमी पडणे म्हणजे ख्रिस्ताला विजय संपादन करू देणे होय. म्हणजे ज्या शत्रूने त्या पुरुषाची प्रौढावस्था बरबाद करून टाकली होती त्याच्याशी चाललेल्या झगड्यात हालहाल करून छळलेल्या माणसाने जीव गमावणे होय. परंतु उद्धारक अधिकाराने बोलला आणि त्या बळीला मुक्त केले. अशुद्ध आत्म्याने पछाडलेला मनुष्य मुक्त होऊन आश्चर्यचकित झालेल्या लोकासमोर आनंदी मुद्रेने उभा होता. अशुद्ध आत्म्यानेसुद्धा उद्धारकाच्या दैवी सामर्थ्याची साक्ष दिली.DAMar 209.1

    मुक्तता झाल्याबद्दल त्या मनुष्याने देवाची स्तुती केली. आतापर्यंत वेडेपणाची प्रखर आग नेत्रातून भडकत होती तेच नेत्र ज्ञानाने प्रकाशीत झाले व कृतज्ञतेच्या अश्रूने भरून वाहत होते. लोक आश्चर्याने मुग्ध झाले होते. वाचा फुटल्यानंतर ते एकमेकाला म्हणाले, “हे आहे तरी काय? काय ही अधिकारयुक्त नवीन शिकवण! कोणत्या अधिकाराने हा अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करितो व ते त्याचे ऐकतात.” मार्क १:२७. DAMar 209.2

    त्याच्या जीवनात असलेल्या त्याच्या आपत्तीच्या गुप्त कारणामुळे त्याच्या मित्रांना त्याच्याबद्दल भय वाटले व त्याला स्वतःला ते फार मोठे ओझे वाटले. पापाच्या सुखात तो फार रमला होता व खाणे, पिणे व मजा करणे यात आयुष्य घालवायचे त्याने ठरविले होते. जगात दहशत निर्माण करायची आणि घराण्याला दूषण लावण्याचे त्याच्या मनात नव्हते. निरूपद्रवी मूर्खपणाच्या कृत्यात आपला वेळ घालवू शकतो असे त्याला वाटले. परंतु एकदा अधोगतीला लागल्यावर त्याचे पाय वेगाने घसरू लागले. त्याच्या उमद्या गुणांचे परिवर्तन अतिरेकीपणा व आचार, विचार व उच्चार यामधील अविवेकीपणा यामध्ये झाले, आणि सैतानाने त्याच्यावर पूर्णपणे ताबा घेतला.DAMar 209.3

    पश्चाताप वाटायला विलंब लागला. खालावलेली प्रौढावस्था पुन्हा मिळवायला त्याने धन संपत्ति व सुख यांचा त्याग केला असता, परंतु दष्टाईच्या तावडीत सापडून तो असहाय्य बनला होता. तो शत्रूच्या मुलखात शिरला होता आणि सैतानाने त्याचा पूर्णशः ताबा घेतला होता. मोह घालणाऱ्याने अनेक आकर्षक भेटीने त्याला भुरळ घातली; परंतु हा दुःखी मनुष्य त्याच्या तावडीत चांगलाच अडकला होता, ते पिशाच्च त्रास देण्यात फार कठोर बनले व क्रोधाविष्ट होऊन त्याने हल्ले चढविले. दुष्टाईला बळी पडणाऱ्या सर्वांची गत हीच असणार. सुरूवातीला मोहिनी घालणाऱ्या चैनीचा शेवट निराशाच्या काळोखात किंवा उध्वस्त आत्म्याच्या मूर्खपणात होतो.DAMar 209.4

    ज्या अशुद्ध आत्म्याने अरण्यात येशूवर मोह आणिले व कफर्णहूमात मनुष्याला पिच्छाडिले त्याच आत्म्याने अश्रद्धावंत यहूद्यांना आपल्या ताब्यात ठेविले. त्यांच्या बाबतीत ते पवित्र असल्यामुळे येशूचा धिक्कार करीत आहेत असे भासवून त्यांना फसविले. त्यांची परिस्थिती अशुद्ध आत्मा लागलेल्या मनुष्यापेक्षा फार वाईट होती कारण त्यांना ख्रिस्ताची गरज भासली नाही आणि त्यामुळे ते सैतानाच्या मगरमिठीत अडकून पडले. DAMar 210.1

    लोकामधील ख्रिस्ताच्या वैयक्तिक कार्याच्या वेळी अंधाराच्या राज्याच्या शक्तीच्या हालचाली फार जोरात चालत होत्या. युगानयुगातून सैतान व त्याचे दुष्ट दूत मनुष्यावर पाप व आपत्ति आणण्यासाठी त्यांचे शरीर व मन यांच्यावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करीत होते; त्यानंतर आलेल्या हाल अपेष्टाबद्दल देवाला दोष देण्यात आला होता. येशू देवाचा स्वभाव मनुष्याला प्रगट करीत होता. तो सैतानाची सत्ता उखडून लावून बंदिस्त असणाऱ्याना मुक्त करीत होता. मनुष्याच्या अंतःकरणावर स्वर्गातील नवीन जीवन, प्रेम व सामर्थ्य यांचा प्रभाव पडत होता आणि दुष्टाईचा अधिपती आपल्या राज्यासाठी स्पर्धा करीत होता. सैतानाने सर्व शक्ती एकवट करून प्रत्येक थरावर ख्रिस्ताच्या कार्याशी स्पर्धा केली.DAMar 210.2

    धार्मिकता व पाप यांच्या मधील अखेरच्या संघर्षात हीच गोष्ट होईल. ख्रिस्ताच्या शिष्यांवर वरून नवीन जीवन, प्रकाश व सामर्थ्य उतरत असताना खालून नवीन जीवन उदयास येऊन सैतानाच्या प्रतिनिधीना जागृत करीत आहे. निसर्गातील प्रत्येक घटक जोर धरीत आहे. शतकानुशतके चाणाक्षपणाने झगड्यामध्ये फायदा उठवण्यासाठी दुष्टाईचा अधिपती कपटवेषाने काम करितो. तो प्रकाकाशाच्या वेषात दिसतो आणि लोकांचा मोठा समुदाय “फूस लावणाऱ्या आत्म्यांच्या व भूतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील.’ १ तिम. ४:२.DAMar 210.3

    ख्रिस्ताच्या काळात इस्राएलातील पुढारी व शिक्षक सैतानाच्या कार्याला प्रतिबंध करण्यास असमर्थ होते. दुष्टात्म्याला तोंड देण्यासाठी ज्या साधनांची आवश्यकता होती केवळ त्याच्याकडेच ते दुर्लक्ष करीत होते. देवाच्या वचनाने ख्रिस्ताने दुष्टाईवर मात केली. इस्राएलातील पुढारी देवाच्या वचनाचे स्पष्टीकरण करणारे आहेत असे भासवीत होते परंतु सांप्रदाय व परंपरागत आचार टिकवून ठेवण्यासाठी आणि माणसाने बनविलेले विधि अंमलात आणण्यासाठी फक्त त्यांनी त्याचा अभ्यास केला होता. देवाने कदापि दिले नाहीत अशा प्रकारचे विचार ते त्याचा अर्थ सांगताना मांडत होते. त्याने स्पष्ट व सरळ केलेल्या वचनाची गूढार्थी रचना करून ती अस्पष्ट व अंधुक करून टाकिली. महत्त्व नसलेल्या प्रक्रियेवर ते फार वादविवाद करीत होते आणि प्रत्यक्षात त्यांनी महत्त्वाच्या सत्यांचा अव्हेर केला. अशा प्रकारे अप्रामाणिकपणाची सर्वत्र पेरणी केली होती. देव वचनाच्या सामर्थ्याची नागवणूक केली आणि दुष्टात्म्यांनी आपली इच्छा अंमलात आणली.DAMar 210.4

    इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. समोर बायबल उघडे ठेवून त्याची शिकवण पाळत असल्याचे उघडपणे सांगत असताना आमच्या काळातील अनेक धार्मिक पुढारी ते देवाचे वचन असल्याबद्दलचा विश्वास नष्ट करीत आहेत. अध्ययनासाठी देवाच्या वचनाचे ते विच्छेदन करीत असताना ते स्वतःचे मत स्पष्ट दिलेल्या विधानापेक्षा श्रेष्ठ मानतात. देवाच्या वचनातील नवचैतन्य शक्ती त्यांच्या हातात नष्ट होते. त्यामुळेच अप्रामाणिकपणा बळावतो आणि अधर्म सर्वत्र पसरतो.DAMar 211.1

    बायबलवर सैतानाचा विश्वास नसल्यामुळे तो लोकांना प्रकाशासाठी व सामर्थ्यासाठी दुसऱ्या संशोधनाच्या साधनाकडे वळवितो. अशा रीतीने तो स्वतः यूक्ती प्रयुक्तीने प्रवेश मिळवितो. जे देवाच्या वचनाच्या स्पष्ट व सरळ शिकवणीपासून व खात्री करून देणाऱ्या देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यापासून मागे वळतात ते दुष्टात्म्यांचा ताबा स्वीकारतात. देवाच्या वचनावर टीका करणे व त्याविषयी तर्कावर अधिष्ठित सिद्धात मांडणे ह्यामुळे पिशाच्चवाद किंवा परलोकविद्यावाद आणि ईश्वराचा साक्षात्कार घडवून आणणारे तत्त्वज्ञान यांचा मार्ग खुला झाला आहे. प्राचीन असंस्कृत मूर्तिपूजकांचा हा आधुनिक नमुना असून त्यांनी आज आपला प्रभु येशू ख्रिस्त याच्या चर्चेसमध्येसुद्धा भक्कम पाया रचण्यासाठी प्रवेश मिळविला आहे.DAMar 211.2

    सुवार्ता प्रसाराबरोबर लबाडी करणाऱ्या आत्म्याच्या माध्यमातून प्रतिनिधी कार्य करीत आहेत. पुष्कळ लोक जिज्ञासामुळे त्यामध्ये अनधिकृतरित्या फेरबदल करतात, परंतु मानवी सामर्थ्यापेक्षा अधिक श्रेष्ठ सामर्थ्याच्या कार्याचे पुरावे पाहून ते त्यात अधिकच मोहून जातात आणि शेवटी त्यांच्यापेक्षा अधिक इच्छासामर्थ्याने ते नियंत्रित होतात. त्या दुर्बोध शक्तीतून ते सुटू शकत नाहीत.DAMar 211.3

    आत्म्याची संरक्षणक्षमता मोडखळीस आली आहे. पापाविरूद्ध अटकाव करण्याची त्याची क्षमता राहिली नाही. देवाचे वचन व त्याच्या आत्म्याचे नियंत्रण एकदाचे झिडकारून टाकले तर ती व्यक्ती कोणत्या अवनतीला जाते हे कोणीही सांगू शकत नाही. गुप्त पाप किंवा तीव्र भावनेचे प्राबल्य यामुळे कफर्णहमातील अशुद्ध आत्मा लागलेल्या मनुष्याप्रमाणे ती व्यक्ती असहाय्य बंदिस्त बनते. तथापि त्याची स्थिती आशाहीन राहिली नाही.DAMar 211.4

    येशू ख्रिस्त देववचनाच्या सामर्थ्याने विजयी झाला त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा देववचनाने दुष्टाईच्या अधिपतीवर मात करू शकतो. आमच्या संमतीशिवाय देव आमच्या मनावर ताबा ठेवीत नाही; परंतु जर आम्ही त्याची इच्छा जाणून घेण्याची व त्याप्रमाणे करण्याची मनीषा दर्शविली तर त्याची अभिवचने आमची होतातः “तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हांस बंधमुक्त करील” “जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे करावयाची मनीषा बाळगील त्याला ही शिकवण समजेल.” योहान ८:३२; ७:१७. ह्या आश्वासनावरील विश्वासाने चुकीच्या जाळ्यातून व पापाच्या अधिपत्यातून प्रत्येक माणसाची मुक्तता होईल.DAMar 211.5

    कोणाचे प्राबल्य आपल्यावर असावे हे प्रत्येक मनुष्य ठरवू शकतो. निकृष्ठावस्थेला कोणी गेलेला नाही, कोणी नीच, अधम नाही, परंतु ते ख्रिस्तामध्ये मुक्तता प्राप्त करून घेऊ शकतात. अशुद्ध आत्मा लागलेला मनुष्य प्रार्थना करण्याच्या ऐवजी केवळ सैतानाची वाणी ओरडत होता; तथापि न उद्गारलेली विनवणी ऐकण्यात आली. गरजूवंताची विनवणी, शब्दाने ते व्यक्त केली नाही तरी, ऐकण्यात येईल. स्वर्गीय देवाशी करार करण्यास जे संमती देतात ते सैतानाच्या सामर्थ्याला तोंड देण्यास किंवा स्वतःच्या स्वभावाच्या दुर्बलतेवर अवलंबून राहाण्यास सोडीत नाहीत. उद्धारक त्यांना आमंत्रण देतो, “त्याने माझा आश्रय धरावा, त्याने मजबरोबर दोस्ती करावी, मजबरोबर दोस्ती करावी.यशया २७:५. त्यांच्या ताब्यात असलेल्या आत्म्यासाठी अंधाराचे अधिपती लढाई करतील परंतु देवाचे दिव्यदूत उपलब्ध असलेल्या सामर्थ्याने त्यांच्यासाठी लढा देतील. प्रभु म्हणतो, “वीरापासून लूट हिसकावून घेता येईल काय? पकडून नेलेल्या धार्मिक जनांची सुटका होईल काय? परमेश्वर म्हणतो, हो, वीराने केलेले बंदिवान हिसकावून घेण्यात येईल; जुलमी पुरुषाने केलेली लूट सोडविण्यात येईल; कारण तुजशी युद्ध करणाऱ्याबरोबर मी युद्ध करीन व तुझ्या मुलांचा उद्धार करीन.” यशया ४९:२४, २५.DAMar 212.1

    मंदिरातील मोठा जमाव अजून आश्चर्याने स्तब्ध, तटस्थ होता त्यावेळी येशू थोडा विसावा घेण्यासाठी पेत्राच्या घरी गेला. परंतु तेथेसुद्धा छाया पडली होती. पेत्राची सासू तापाने फणफणत होती. येशूने आजाराला धमकावले आणि आजारी बाई उठली आणि तिने गुरूजीची व शिष्यांची सेवा केली.DAMar 212.2

    सबंध कफर्णहमभर ख्रिस्ताच्या कार्याची वार्ता ताबतडोब पसरली. धर्मगुरूंच्या भीतीमुळे बरे होण्यासाठी लोक शब्बाथ दिवशी आले नाहीत; परंतु सूर्यास्त झाल्याबरोबर तेथे मोठी गडबड उडाली. येशू ज्या साध्या घराच्या आश्रयाला होता तेथे घरातून, दुकानातून, बाजारातून आणि शहरातून येऊन लोकांनी मोठी गर्दी केली. आजाऱ्यांना पलंगावरून आणले होते, काही काठी टेकत टेकत आले, किंवा त्यांना मित्रांनी आधार दिला होता, ते हळू पावलांनी लटपटत उद्धारकासमोर आले.DAMar 212.3

    तासन तास ते येत होते आणि जात होते; दुसऱ्या दिवशी बरे करणारा त्यांच्यामध्ये असणार किंवा नाही ह्याची माहिती कोणालाच नव्हती. कफर्णहूमामध्ये अशा प्रकारचा दिवस पूर्वी कधी उजाडला नव्हता. सर्वत्र वातावरण आनंदाच्या व मुक्तीच्या घोषणेने दुमदुमून गेले होते. त्यांच्यामध्ये हर्ष जागृत केल्याबद्दल उद्धारकाला फार आनंद झाला होता. आलेल्या आजाऱ्यांचे दुःख पाहून त्याचे अंतःकरण सहानुभूतीने द्रवले आणि त्यांना आरोग्य व सुख देणाऱ्या त्याच्या शक्तीने त्याला हर्ष झाला.DAMar 212.4

    शेवटचा रोगी बरा केल्यानंतरच येशूने आपले काम थांबविले. फार रात्रीपर्यंत काम चालले होते. त्यानंतर लोकसमुदाय निघून गेला आणि शिमोनाच्या घरी शांतता प्रस्तापित झाली. कामाचा गजबजलेला दिवस संपला आणि येशूला विसावा घ्यायचा होता. परंतु शहर अजून निद्रावस्थेत असताना उद्धारक “मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला व रानात जाऊन त्याने तेथे एकांतात प्रार्थना केली.”DAMar 213.1

    पृथ्वीवर आपल्या जीवनातील दिवस असे येशूने घालविले. विसावा घेण्यासाठी वारंवार येशूने आपल्या शिष्यांना पाठविले परंतु त्याला त्याच्या कामापासून दूर ठेवण्याच्या शिष्यांच्या प्रयत्नाना त्याने सौम्यपणाने टाळले. अडाण्यांना शिक्षण देण्यासाठी, आजाऱ्यांना बरे करण्यासाठी, आंधळ्यांना दृष्टी देण्यासाठी, समुदायाला जेवण देण्यासाठी, सबंध दिवसभर त्याने कष्ट केले आणि सायंकाळी किंवा मोठ्या पहाटेस सकाळीच तो डोंगरावर एकांतात जाऊन पित्याशी सख्यसंबंध हितगूज करीत असे. वारंवार सबंध रात्र तो प्रार्थनेत व मनन करण्यात घालवीत असे आणि सकाळीच विदस उजाडताच लोकामध्ये काम करण्यासाठी बाहेर पडत असे.DAMar 213.2

    अगदी सकाळीच पेत्र व त्याचे सोबती येशूकडे येऊन म्हणाले की कफर्णहूमातले लोक आपला शोध करीत आहेत. आतापर्यंत येशूचा ज्या प्रकारे स्वीकार करण्यात आला ते पाहून शिष्यांची फार निराशा झाली. यरुशलेमातील अधिकारी त्याचा खून करण्याचा प्रयत्न करीत होते; त्याच्या स्वतःच्या गावचे लोक त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करीत होते; परंतु कफर्णहूममध्ये त्याचे हर्षाने, उत्साहाने स्वागत केले, त्यामुळे शिष्यांच्या आशा नव्याने प्रदीप्त झाल्या. कदाचित स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे गालीली लोक नवीन राज्याला पाठिंबा देणारे होतील. परंतु आश्चर्यचकित होऊन त्यांनी ख्रिस्ताचे शब्द ऐकले, “मला आसपासच्या गावात उपदेश करता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ; कारण ह्याच उद्देशाने मला पाठविले आहे.”DAMar 213.3

    कफर्णहममध्ये उडालेल्या खळबळीमध्ये ख्रिस्ताच्या कार्याच्या उद्देशाकडे दुर्लक्ष होण्याचा धोका होता. शारीरिक रोग बरे करणारा व आश्चर्य निर्माण करणारा म्हणून लोकांनी त्याच्याकडे आकर्षिले जावे यात ख्रिस्ताचे समाधान नव्हते. उद्धारक म्हणून लोकांना आपल्याकडे ओढण्याचा तो प्रयत्न करीत होता. पृथ्वीवर राज्य स्थापन करण्यासाठी तो राजा म्हणून आलेला आहे असे लोकांना वाटत होते परंतु त्यांची विचारसरणी त्यांना पृथ्वीवरून आध्यात्मिक पातळीवर आणावी अशी होती. केवळ जगिक विजय त्याच्या कामात अडखळण होईल.DAMar 213.4

    गलीबल, पर्वा न करणाऱ्या समुदायाच्या आश्चर्याने त्याच्या मनाला धक्का बसला. त्याच्या जीवनात आपलेच घोडे पुढे ढकलण्याची वृत्ती नव्हती. पद किंवा धन किंवा विशेष कौशल्य यांचा जगात करण्यात येणारा मानसन्मान मानवपुत्राला अपरिचित होता. मानसन्मान मिळविण्यासाठी लोक वापरात आणणाऱ्या साधनातील कोणत्याही साधनाचा उपयोग येशूने केला नाही. त्याच्या जन्माच्या अनेक शतके अगोदर त्याच्याविषयी भाकीत करण्यात आले होते. “तो गवगवा करणार नाही, तो आपला स्वर उंच करणार नाही, तो रस्त्यातून पुकारा करणार नाही. चेपलेला बोरू तो मोडणार नाही, मिणमिणीत वात तो विझवणार नाही; तो सत्याने न्यायाची प्रवृत्ती करील. पृथ्वीवर न्याय स्थापीपर्यंत तो मंदावणार नाही व भंगणार नाही.’ यशया ४२:२-४.DAMar 213.5

    परूशी लोकांनी विधिसंस्कार काटेकोर पाळून वैशिष्ट्य साधले आणि त्यांची आराधना व दानशूरपणा यामध्ये स्तुती व्हावी म्हणून डामडौल व दिमाख यांचे प्रदर्शन केले. त्याच्यावर सुसंवाद करून धर्माविषयीचा त्यांचा आवेश त्यांनी सिद्ध केला. विरोधी पंथातील वादविवाद मोठमोठ्याने व प्रदीर्घ होत असे आणि विद्वान कायदेपंडितांचा संघर्षातील क्रोधाविष्ट आवाज रस्त्यावर ऐकणे नेहमीचेच होते.DAMar 214.1

    ह्या सर्वांच्या अगदी विरूद्ध येशूचे जीवन होते. त्या जीवनात गोंगाट करणारा वादविवाद नव्हता, आराधना करताना दिमाख किंवा डामडौलाची स्तुती नव्हती, टाळ्यांचा गजर किंवा प्रशंसा मिळविण्याची कृती नव्हती. देवामध्ये ख्रिस्त लुप्त होता आणि त्याच्या पुत्राच्या स्वभावात देवाचे प्रदर्शन करण्यात आले होते. ह्या प्रकटीकरणाकडे लोकांची मने वेधली जावी आणि त्याचा सत्कार व्हावा ही ख्रिस्ताची दाट इच्छा होती.DAMar 214.2

    त्याच्या वैभवाने ज्ञानेंद्रिय चकित करण्यासाठी धार्मिकतेचा सूर्य ह्या जगात सौंदर्याने आला नाही. ख्रिस्ताविषयी लिहिले आहे, “त्याचा उदय अरुणोदयाप्रमाणे निश्चित आहे.” होशेय. ६:३. निवांत व मंदपणे सूर्यप्रकाश पृथ्वीवर येतो, अंधकाराला उधळून लावतो आणि जगातील जीवनाला जागृत करितो. तशाच प्रकारे धार्मिकतेचा सूर्य, “त्याच्या पंखाच्याठायी आरोग्य घेऊन’ उदय पावतो. मलाखी ४:२.DAMar 214.3