Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

युगानुयुगांची आशा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ६९—जैतूनाच्या डोंगरावर

    मत्तय २४; मार्क १३; लूक २१:५-३८.

    “पाहा, तुमचे घर तुम्हालाच ओसाड सोडिले आहे” (मत्तय २३:३८) ख्रिस्ताच्या ह्या शब्दाने याजक व अधिकारी यांची अंतःकरणे भयभीत झाली. त्याद्वारे ते उदासिन झाले परंतु ह्या शब्दांचा अर्थ काय हा प्रश्न त्यांच्या डोक्यात घोळत होता. अदृश्य धोका त्यांना भेडसावीत होता. राष्ट्राचे वैभव असलेले भव्य मंदिर लवकरच विध्वंसाचा ढीगारा राहाणार आहे काय? वाईटाविषयीचे भाकीत शिष्यांना समजले परंतु त्याविषयी ख्रिस्ताने केलेली आणखी विधाने ऐकण्यासाठी ते थांबले. मंदिरातून बाहेर पडताना त्यांनी त्याचे लक्ष मंदिराचे वैभव व मजबूतपणा याकडे वेधले. मंदिराला बसविलेले चिरे सफेत शुभ्र संगमरवरी दगडाचे असून कमालीचे मोठे होते. नबुखद्रेसरच्या सैन्याने घातलेल्या वेढ्याच्या संग्रामात भीतीचा काही भाग टिकून राहिला होता. दगडाच्या खाणीतून भला मोठा एकच दगड आणून बसविल्यासारखे भक्कम गवंडीकाम होते. ह्या भक्कम भीती कशा उध्वस्त होतील हे शिष्यांना समजत नव्हते.DAMar 548.1

    भव्य मंदिराकडे ख्रिस्ताचे लक्ष वेधल्यानंतर ज्याचा नाकार केला त्याच्या मनांत कोणते विचार आले असतील! त्याच्यासमोरचे दृश्य रमणीय होते परंतु दुःखाने त्याने म्हटले हे सर्व मी पहातो. इमारती भव्य आहेत. त्याच्या भीती भक्कम आहेत असे तुम्ही म्हणता, परंतु माझे शब्द ऐकाः “पाडला जाणार नाही असा दगडावर दगड येथे राहाणार नाही’ असा दिवस येईल.DAMar 548.2

    मोठ्या समुदायासमोर ख्रिस्त हे बोलला होता, परंतु जैतूनाच्या डोंगरावर तो एकटा बसला असताना पेत्र, योहान, याकोब व आंद्रिया त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे व या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय? हे आम्हास सांगा.’ यरुशलेमाचा नाश आणि त्याच्या येण्याचा महान दिवस हे वेगवेगळे घेऊन येशूने उत्तर दिले नाही. त्याने ह्या दोन्हीही घटना एकत्र घेतल्या. भावी घटना त्याच्यापुढे व्यक्त केल्या असत्या तर त्यांचे दृश्य त्यांना असह्य झाले असते. म्हणून ह्या दोन्ही घटना एकत्र घेऊन त्याने त्यांच्यावर दया दाखविली आणि त्यांनी स्वतः त्याचा अभ्यास करण्यास त्यांना मोकळीक दिली. जेव्हा त्याने यरुशलेमाच्या नाशाचा उल्लेख केला तेव्हा त्याच्या भविष्यसूचक शब्दांचा टप्पा अंतिम आगीच्या वणव्यापर्यंत पोहंचतो. त्यावेळेस दुष्टाईबद्दल जगाला शिक्षा देण्यास प्रभु उठेल आणि पृथ्वी आपले रक्त व वध केलेले उघडकीस आणील. हे सगळे प्रवचन शिष्यांच्यासाठीच नव्हते तर पृथ्वीवरील शेवटच्या घटनासमयी जे जीवंत असतील त्या सर्वांच्यासाठी देण्यात आले होते.DAMar 548.3

    शिष्यांकडे वळून ख्रिस्ताने म्हटले, “तुम्हास कोणी फसवू नये म्हणून जपा. कारण पुष्कळजण माझ्या नामाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व बहुतास फसवतील.” अनेक खोटे मशिहा येतील, ते चमत्कार करण्याचे तसेच यहूदी राष्ट्राच्या मुक्तीची वेळ आली आहे असे सांगतील. ह्यामुळे पुष्कळांची फसगत होईल. ख्रिस्ताचे बोल पूर्ण होतील. त्याचे मरण व यरुशलेमाचा वेढा यांच्यामधील काळात पुष्कळ खोटे मशिहा निघतील. जगातील ह्या युगात राहाणाऱ्यांना हा इशारा देण्यात आला होता. यरुशलेमाच्या नाशाच्या अगोदर जी फसवणूक करण्यात आली तीच फसवणूक युगानयुगात चालू ठेविली आणि पुन्हा तिची पुनरावृत्ति करण्यात येईल.DAMar 549.1

    “तुम्ही लढायाविषयी ऐकाल व लढायांच्या आवया ऐकाल, तेव्हा सांभाळा; घाबरू नका, कारण असे होणे अवश्य आहे; परंतु तेव्हढ्यात शेवट होत नाही.’ यरुशलेमाचा विध्वंस होण्याअगोदर श्रेष्ठपणा मिळविण्यासाठी लोकात चढाओढ चालेल. बादशाहांचा खून खरण्यात आला. सिंहासनावर विराजमान होणाऱ्याचा निघूण वध करण्यात आला. लढाया आणि लढायांच्या आवया सर्वत्र पसरल्या. ख्रिस्ताने म्हटले, “असे होणे अवश्य आहे परंतु तेव्हढ्यात (यहूदी राष्ट्राचा राष्ट्र म्हणून) शेवट होत नाही. कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील, पण सर्व वेदनांचा हा प्रारंभ आहे.’ धर्मगुरू ही चिन्हे पाहातील तेव्हा ख्रिस्ताने म्हटले, त्याचे निवडिलेले लोक दास्यात ठेविल्यामुळे राष्ट्रावर आलेला देवाचा न्यायदंड आहे असे ते जाहीर करतील. ही चिन्हे मशिहाच्या येण्याची निशाणी आहे असे ते प्रतिपादन करतील. तुमची फसवणूक होऊ नये; त्याच्या न्यायाची ही सुरवात आहे. लोक स्वतःमध्येच निमग्न झाले होते. त्यांना निरोगी ठेवण्यासाठी लोकांनी पश्चात्ताप केला नाही व त्यांचे परिवर्तन झाले नाही.DAMar 549.2

    तेव्हा तुमचे हाल करण्याकरिता ते तुम्हास धरून देतील व तुम्हास जिवे मारतील; आणि माझ्या नामामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करितील. त्या वेळी बहुत अडखळतील व एकमेकास धरून देतील व एकमेकांचा द्वेष करतील.” ह्या सगळ्यात ख्रिस्ती लोकांचा छळ होईल. आईबाप त्यांच्या मुलांचा विश्वासघात करतील. मुले आईबापांचा विश्वासघात करतील. मित्र मित्राला धर्मसभेपुढे उभे करतील. मारेकऱ्यांनी स्तेफन, याकोब आणि इतर ख्रिस्तभक्तांचा वध करून आपले उद्दिष्ट साध्य केले.DAMar 549.3

    त्याच्या सेवकांच्याद्वारे देवाने यहूदी लोकांना पश्चात्ताप करण्यास शेवटची संधि दिली. त्यांची अटक, त्यांची कसोटी आणि त्यांचा बंदिवास ह्यांच्याद्वारे दिलेल्या साक्षीमध्ये त्याने स्वतःला प्रगट केले. तरी न्यायाधिशाने त्यांना मरणदंडाची शिक्षा फर्माविली. त्यांचा वध करून यहूद्यांनी देवपुत्राला नव्याने वधस्तंभावर खिळिले. तसे पुन्हा होईल. धार्मिक स्वातंत्र्याला आळा घालण्यासाठी अधिकारी कायदेकानू करतील. देवाच्या मालकीचा हक्क ते धारण करतील. केवळ देवाच्या नियंत्रणाखाली असलेल्या सद्सद्विवेक बुद्धीवर जुलूम बळजबरी करू शकतो असे त्यांना वाटते. आतासुद्धा ते त्याचा प्रारंभ करीत आहेत; मर्यादेला पोहंचेपर्यंत ते हे कार्य करीत राहातील. कारण त्यापुढे ते जाऊ शकत नाहीत. त्याच्या एकनिष्ठ, आज्ञापालन करणाऱ्या लोकांच्या वतीने देव मध्यस्थी करील, अडथळा आणील.DAMar 550.1

    छळ व गांजवणूक होताना जे पाहातात ते ख्रिस्ताच्या बाजूने किंवा विरुद्ध असल्याचा निर्णय घेतात. चुकीने ज्यांचा छळ करण्यात आला त्यांच्याविषयी सहानुभूती दाखविणारे त्यांचा ख्रिस्ताशी संबंध असल्याचे दर्शवितात. दुसरे दुःखित होतात कारण त्यांची वागणूक तत्त्वाच्या विरुद्ध असते. अनेक ठेचाळून पडतात व एकदा ग्रहीत धरलेल्या विश्वासाचा ते त्याग करितात. कसोटीच्या प्रसंगी स्वतःच्या संरक्षणासाठी जे धर्मत्याग करितात ते खोटी साक्ष देऊन त्यांच्या बांधवांचा विश्वासघात करितात. प्रकाशाचा त्याग करणाऱ्यांची निष्ठुर व अस्वाभाविक वागणूक पाहून तुम्हाला आश्चर्य वाटू नये म्हणून ख्रिस्ताने आम्हाला इशारा दिला आहे.DAMar 550.2

    यरुशलेमाच्या नाशाने आणि त्यातून कसे निभावून जावे याविषयी ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना चिन्ह दिले: “ह्यावर यरुशलेमास सैन्यांचा वेढा पडत आहे असे पाहाल तेव्हा त्याचा विध्वंस जवळ आला आहे असे समजा. त्या समयी जे यहूदीयात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे, जे यरुशलेमात असतील त्यांनी बाहेर जावे; व जे शिवारात असतील त्यांनी त्यात येऊ नये. कारण सर्व लिहिलेल्या गोष्टी पूर्ण होण्यासाठी हे सूड घेण्याचे दिवस आहेत.” ह्या दिलेल्या इशाराकडे चाळीस वर्षांनी यरुशलेमाचा विध्वंस होईल तेव्हा लक्ष द्यावयाचे होते. ख्रिस्ती लोकांनी इशाऱ्याचे पालन केले आणि एकही ख्रिस्ती शहराच्या पाडावात मृत्यू पावला नाही.DAMar 550.3

    ख्रिस्ताने म्हटले, “तुमचे पलायन शब्बाथ दिवशी किंवा हिवाळ्यात होऊ नये म्हणून प्रार्थना करा.’ ज्याने शब्बाथ प्रस्थापिला त्याने वधस्तंभावर खिळून तो रद्द केला नाही. त्याच्या मरणाने शब्बाथ फोल, व्यर्थ, निरर्थक केला नाही. वधस्तंभानंतर चाळीस वर्ष तो पवित्र मानला होता. त्यांचे पलायन शब्बाथ दिवशी होऊ नये म्हणून चाळीस वर्षे शिष्यांना प्रार्थना करावयाची होती.DAMar 550.4

    यरुशलेमाच्या नाशानंतर पृथ्वीच्या इतिहासातील महान घटना देवपुत्राचे गौरवाने व वैभवाने येणे याकडे ख्रिस्त वळला. ह्या दोन घटनामध्ये मंडळीला प्राणांतिक दुःख, वेदना, अश्रु व रक्ताचा सडा यांचा अनुभव घ्यावा लावणारा अंधकारमय दीर्घकाळ होता असे ख्रिस्ताने पाहिले. अशा दृश्याकडे पाहाणे शिष्यांना सोसवणार नाही म्हणून त्याचा केवळ उल्लेख करून ख्रिस्त पुढे गेला. त्याने म्हटले, “जगाच्या प्रारंभापासून आजपर्यंत आले नाही व येणारही नाही असे मोठे संकट त्याकाळी येईल. आणि ते दिवस धोडे केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता; म्हणून निवडलेल्यासाठी ते थोडे केले जातील.’ जगाच्या पाठीवर पूर्वी कधी आला नाही असा संकटाचा काळ ख्रिस्ताच्या अनुयायावर हजारापेक्षा अधिक वर्षे येणार होता. लाखांनी त्याचे निष्ठांवत साक्षीदार त्यात बळी पडणार होते. देवाने हस्तक्षेप करून त्याच्या लोकांचे संरक्षण केले नसते तर सर्वांचा नाश झाला असता. त्याने म्हटले, “म्हणून निवडलेल्यासाठी ते दिवस थोडे केले जातील.’DAMar 551.1

    आता अस्खलित भाषेत आमचा प्रभु त्याच्या दितियागमनाविषयी बोलतो आणि येण्याअगोदर उद्धवणाऱ्या धोक्यांचा इशारा देतो. “त्या वेळेस कोणी तुम्हास म्हणेल, पाहा, ख्रिस्त येथे आहे किंवा तेथे आहे, तर खरे मानू नका. कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्टे होतील व अशी मोठी चिन्हे व अद्भुते दाखवितील की साधेल तर निवडलेल्यास देखील फसवितील. पाहा, मी हे अगोदरच तुम्हास सांगून ठेविले आहे. यास्तव कोणी तुम्हास म्हणतील, पाहा तो अरण्यात आहे, तर तिकडे जाऊ नका; तुम्हास म्हणतील, पाहा तो आतल्या खोल्यात आहे, तर खरे मानू नका. कारण जशी वीज पूर्वेकडून निघून पश्चिमेपर्यंत चमकते तसे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल.” यरुशलेमाच्या नाशाचे एक चिन्ह ख्रिस्ताने दिले आहे ते म्हणजे “पुष्कळ खोटे संदेष्टे येतील आणि पुष्कळांना फसवतील.” खोटे संदष्टे आले, त्यांनी लोकांना फसविले व मोठ्या समुदायाला अरण्यात नेले. जादूगार व चेटक्यांनी चमत्कार केल्याचे सांगून पुष्कळांना डोंगराच्या एकांतवासात नेले. हे भाकीत शेवटच्या काळासाठी असल्याचे सांगण्यात आले. हे चिन्ह द्वितियागमनाचे चिन्ह म्हणून दिले. आजसुद्धा खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्टे चिन्हे व अद्भुते करून त्याच्या शिष्यांना फसविण्याचा प्रयत्न करीत आहेत. “पाहा तो अरण्यात आहे’ ही आरोळी आम्ही ऐकत नाही काय? ख्रिस्ताच्या शोधार्थ हजारो अरण्यात गेले नाहीत काय? मृतांच्या आत्म्याशी दळणवळण ठेवू शकतो असे सांगणाऱ्या हजारोंच्या जमावांची हाक “पाहा तो आतल्या खोल्यात आहे’ आता ऐकली जात नाही काय? पिशाचवादी हेच हक्काने प्रतिपादन करितात. परंतु ख्रिस्त काय म्हणतो? “ते खरे मानू नका. कारण जशी वीज पूर्वेकडून निघून पश्चिमेपर्यंत चमकते तसे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल.”DAMar 551.2

    उद्धारक त्याच्या येण्याविषयी ह्यापेक्षा अधिक चिन्हे देतो. ह्यातील पहिले चिन्ह केव्हा होईल ह्याची वेळ तो ठरवितोः “त्या दिवसातील संकटामागून लागलेच सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशातून पतन पावतील, व आकाशाची बळे डळमळतील. तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात दिसेल; मग पृथ्वीवरल्या सर्व जातीचे लोक शोक करतील; ते मनुष्याच्या पुत्राला आकाशाच्या मेघावर आरुढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहातील. करण्याच्या महानादाबरोबर तो आपल्या दूतांस पाठवील आणि ते आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्यास चाही दिशाकडून जमा करतील.”DAMar 551.3

    पोपसत्तेच्या महान छळाच्या काळाच्या शेवटी ख्रिस्ताने म्हटले सूर्य अंधकारमय होईल आणि चंद्र प्रकाश देणार नाही. त्या नंतर तारे आकाशातून पतन पावतील. तो म्हणतो, “अंजिराच्या झाडावरून दाखला घ्या; त्याची डहाळी कोमल होऊन पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला असे तुम्ही समजता; तसेच या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ दारानजीक आहे असे समजा.’ मत्तय २४:३२, ३३.DAMar 552.1

    ख्रिस्ताने त्याच्या येण्याची चिन्हे दिली आहेत. त्याचे येणे नजीक, दाराजवळ आहे हे आम्हाला माहीत आहे असे तो म्हणतो. ही चिन्हें पाहाणाऱ्याविषयी तो म्हणतो, “हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही.” ही चिन्हें दृगोच्चर झालेली आहेत. प्रभूचे येणे अगदी नजीक आहे हे आम्हाला निश्चित ठाऊक आहे. तो म्हणतो, “आकाश व पृथ्वी ही नाहीतशी होतील, परंतु माझी वचने नाहीतशी होणारच नाहीत.” DAMar 552.2

    ख्रिस्त मोठ्या पराक्रमाने व वैभवाने मेघारूढ होऊन येत आहे. देवदूतांचा समुदाय त्याचे सेवा करतील. तो मृतास उठविण्यास येईल आणि जीवंत संतभक्तांचे वैभवी परिवर्तन करील. ज्यांनी त्याच्यावर प्रीती केली व त्याच्या आज्ञा पाळिल्या त्यांचा सन्मान करण्यासाठी व आपल्याजवळ राहाण्यासाठी घेऊन जाण्यास तो येईल. त्याला त्यांचा व त्याच्या आश्वासनाचा विसर पडला नाही. त्यावेळेस पुन्हा कुटुंब शृंखलाचा दुवा जोडला जाईल. जेव्हा आम्ही आमच्या मृतांचा विचार करितो आणि जेव्हा देवाचा कर्णा वाजेल तेव्हा आम्ही प्रभातसमयाची आठवण करू. त्या वेळेस “मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील, आणि आपण बदलून जाऊ.” १ करिंथ. १५:५२. आणि थोड्याच अवधीत आम्ही राजाला त्याच्या वैभवानिशी पाहू, तो आमच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील. थोड्याच अवधीत तो तुम्हास “आपल्या ऐश्वर्ययुक्त सान्निध्यात निर्दोष असे उल्लासाने सादर करील.’ यहूदा २४. म्हणूनच चिन्हें देण्याच्या वेळी त्याने म्हटले, “या गोष्टीस आरंभ होऊ लागेल तेव्हा नीट उभे राहा, आणि आपली डोकी वर करा; कारण तुमची मुक्तता समीप आली आहे.”DAMar 552.3

    परंतु त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी ख्रिस्ताने प्रगटीकरण केले नाही. त्याने स्पष्टपणे शिष्यांना सांगितले की त्याच्या दुसऱ्या येण्याच्या दिवसाविषयी किंवा घटकेविषयी काही व्यक्त करू शकत नाही. हे उघड करण्यास तो बंधनमुक्त असता तर त्याच्या येण्यासाठी सदैव तयार राहा असे का सांगितले असते? प्रभूच्या येण्याचा दिवस व घटिका माहीत आहे असे का सांगणारे काहीजण आहेत. भविष्याची रूपरेखा तयार करण्यात ते फार आवेशी आहेत. परंतु त्यांच्या ह्या भूमिकेबद्दल प्रभूने त्यांना इशारा दिला आहे. मानवपुत्राच्या द्वितियागमनाची ठराविक वेळ हे देवाचे रहस्य आहे.DAMar 552.4

    त्याच्या येण्याच्या वेळी जगाची परिस्थिती कशी असणार हे ख्रिस्त पुढे सांगत आहे: “नोहाच्या दिवसातल्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोव्हा नौकेत जाईपर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत त्यांस समजले नाही; तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल.’ ज्या अवधीत अनंत काळासाठी तयारी करावयाची त्या हजार वर्षाच्या कालदर्शकाविषयी ख्रिस्त येथे बोलत नाही. तो निर्देश करितो की मानवपुत्र येईल तेव्हा नोहाच्या दिवसातल्याप्रमाणे असेल.DAMar 553.1

    नोहाच्या दिवसात कसे होते? “पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे, त्यांच्या मनात येणारे सर्व विचारतरंग केवळ एकसारखे वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले.” उत्पत्ति ६:५. जलप्रलयापूर्वीचे रहिवासी त्याच्या पवित्र आज्ञा पाळण्याचे नाकारून ते यहोवापासून दूर गेले. स्वतःचे अपवित्र विचारतरंग आणि विकृत संकल्पना यांचे पालन त्यांनी केले. त्यांच्या दुष्टाईमुळे त्यांचा नाश करण्यात आला; आणि आज जग तोच मार्ग घेत आहे. देवाच्या आज्ञा उल्लंघन करणारे आपल्या दुष्टाईने पृथ्वी भरून टाकीत आहेत. घोड्याच्या शर्यती, जुगार, पैज, उधळपट्टी, पापवासना, तीव्र मनोविकार आणि हिंसाचार यांनी जग भरून जात आहे.DAMar 553.2

    यरुशलेम नाशाच्या भाकीतामध्ये ख्रिस्ताने म्हटले, “आणि अनीति वाढल्यामुळे पुष्काळांची प्रीती थंडावेल; परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. सर्व राष्ट्रांस साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवितील; तेव्हा शेवट होईल.” हे भाकीत पुन्हा पूर्ण होईल. ह्या पिढीमध्ये त्या काळची अनीति सारखीच दिसेल. सुवार्तेची घोषणा करण्यासंबंधाने तीच वस्तुस्थिती असेल. यरुशलेमाचा पाडाव होण्याअगोदर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने पौलाने घोषीत केले की, “आकाशाखालच्या सृष्टीतील सर्वांना सुवार्तेची घोषणा केली.’ कलस्सै. १:२३. त्याचप्रमाणे मानवपुत्राचे येणे होण्याअगोदर अनंतकालिक सुवार्ता “प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा व लोक यांना’ गाजविली जाईल. प्रगटी. १४:६, १४. “देवाने एक दिवस नेमस्त केला आहे की त्या दिवशी आपण नेमिलेल्या मनुष्याच्याद्वारे तो जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करील.’ प्रेषित १७:३१. तो दिवस कधी येईल हे ख्रिस्त सांगतो. सर्व जगाचे परिवर्तन होईल असे तो सांगत नाही, परंतु “सर्व राष्ट्रास साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवितील; तेव्हा शेवट होईल.” सर्व जगाला सुवार्ता गाजविण्याद्वारे प्रभूचे येणे लवकर होण्यास आम्ही कारणीभूत होतो. त्याच्या येण्याची आम्ही अपेक्षा करीतच बसू नये तर येणे लवकर होण्यास कारणीभूत झाले पाहिजे. २ पेत्र ३:११. देवाच्या संकल्पाप्रमाणे ख्रिस्ताच्या मंडळीने नेमून दिलेले काम केले तर सर्व जगाला इशाऱ्याचा संदेश दिला जाईल आणि प्रभू येशू पराक्रमाने आणि वैभवाने पृथ्वीवर येईल.DAMar 553.3

    त्याच्या येण्याचे चिन्ह दिल्यानंतर, ख्रिस्ताने म्हटले, “ह्या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ दारानजीक आहे, असे समजा.’ “सावध असा, जागृत राहा आणि प्रार्थना करा.” येणाऱ्या न्यायनिवाड्याविषयी देवाने मनुष्याला नेहमीच इशारा दिलेला आहे. ज्यांनी त्याच्या संदेशावर विश्वास ठेविला आणि त्याच्या आज्ञा पाळून विश्वास कृतीत व्यक्त केला ते अविश्वासू व आज्ञाभंग करणारे यांच्यावर आलेल्या शिक्षेतून बचावले. नोहाला सांगण्यात आले, “तू आपल्या सर्व कुटुंबासह तारवात चल; कारण या पिढीत तूच मजशी धर्माने वर्तणारा असा मला दिसला आहेस.’ नोहाने आज्ञा पाळली आणि तो वाचला. लोटाकडे निरोप आला, “उठा, या स्थानातून बाहेर पडा, कारण परमेश्वर या नगराचा नाश करणार आहे.” उत्पत्ति ७:१; १९:१४. स्वर्गीय निरोप्याच्या संरक्षणाखाली लोट आला आणि त्याचा बचाव झाला. यरुशलेमाच्या नाशाविषयीचा इशारा ख्रिस्ताच्या शिष्यांना देण्यात आला होता. येणाऱ्या नाशाच्या चिन्हाविषयी जागृत राहून नगरातून जे पळून गेले ते नाशापासून बचावले. ख्रिस्ताच्या द्वितियागमनाविषयी व जगावर येणाऱ्या विध्वंसाविषयी आता आम्हाला ताकीद देण्यात आली आहे. जे इशाऱ्याची वाणी ऐकतात त्यांचा बचाव होतो. DAMar 554.1

    त्याची येण्याची घटिका आम्हाला माहीत नाही म्हणून जागृत राहाण्यास सांगण्यात आले आहे. “धनी येऊन ज्या दासास जागृत असलेले पाहील ते धन्य.” लूक १२:३७. प्रभूच्या येण्याविषयी जागृत असलेले आळशी राहून अपेक्षा करीत बसलेले नाहीत. प्रभूच्या येण्याची अपेक्षा करणे म्हणजे लोकांना प्रभूचे व अवज्ञा करणाऱ्यावर येणाऱ्या न्यायदंडाचे भय धरण्यास भाग पाडणे होय. त्याने बहाल केलेल्या दयेचा नाकार करणे हे महापाप आहे हे जाणण्यास त्यांना जागृत करणे होय. प्रभूच्या येण्याविषयी जागृत राहाणारे सत्याचे पालन करून अंतरंग शुद्ध करून घेतात, दक्षतेने जागृत राहून कळकळीने काम करितात. प्रभु दाराशी आहे हे जाणून आत्म्याच्या तारणासाठी कार्य करण्यास दिव्य बुद्धिचातुर्याशी सहकार्य करण्यास त्यांचा उत्साह प्रज्वलित झाला आहे. प्रभूच्या परिवाराला “यथाकाळी त्याच्या वाट्याचा शिधासामुग्री” देणारे हे विश्वासू व विचारशील दास आहेत. लूक १२:४२. सद्या व्यवहार्य असलेले सत्य ते जाहीर करीत आहेत. हनोख, नोहा, आब्राहाम आणि मोशे यांनी त्याच्या काळासाठी लागू असलेले सत्य घोषीत केले तसेच ख्रिस्ताचे दास त्यांच्या पिढीला व्यवहार्य असलेला विशिष्ट इशारा देतात.DAMar 554.2

    ख्रिस्त दुसरा एक वर्ग पुढे आणितोः “आपला धनी येण्यास विलंब लागेल असे आपल्या मनात म्हणून एकादा दुष्ट दास आपल्या सोबतीच्या दासास मारू लागेल व झिंगलेल्याबरोबर खाईल पिईल तर तो वाट पाहात नाही अशा दिवशी व त्याला माहीत नाही अशा घटकेस त्या दासाचा धनी येईल.’DAMar 555.1

    दुष्ट दास आपल्या मनात म्हणतो, “माझा धनी येण्यास विलंब लागेल.’ ख्रिस्ताचे येणे होणार नाही असे तो म्हणत नाही. द्वितियागमनाच्या संकल्पनेचा तो उपहास करीत नाही. परंतु कृतीने आणि उक्तीने आपल्या मनात तो धनी येण्यास विलंब करीत आहे असे जाहीर करितो. ख्रिस्ताचे येणे तत्पर होत आहे हा विचार दुसऱ्यांच्या मनातून दूर करीत आहे. त्याच्या प्रभावामुळे इतरांच्या मनावर परिणाम होऊन ते विलंबाचे बाबतीत अनुमान करितात आणि ते ऐहिक गोष्टीत व मोहात दृढ होतात, अधिक रमतात. जगीक मनोविकार, भ्रष्ट विचार त्यांच्या मनाचा ताबा घेतात. दुष्ट दास झिंगलेल्याबरोबर पिऊन ख्याली खुशाली करण्यासाठी जगामध्ये सामील होतो. तो आपल्या सोबतीच्या दासांना मारहाण करितो आणि धन्याशी एकनिष्ठ राहिलेल्यावर दोषारोप करून नालस्ती करितो. तो जगाशी संमिश्र होतो. उलंघनाच्या बाबतीत जशी खाण तशी माती. हे समरस होणे धोक्याचे आहे. जगाच्या जाळ्यात तो अडकलेला आहे. “त्याला माहीत नाही अशा घटकेस त्या दासाचा धनी येऊन त्याला कापून काढील व ढोंग्याना द्यावयाचा वांटा त्याच्या पदरी बांधील.”DAMar 555.2

    “कारण तू जागृत न झालास तर मी चोरासारखा येईन; मी कोणत्या घटकेस तुजवर येईन हे तुला कळणार नाही.” प्रगटी. ३:३. ख्रिस्त आगमनाने खोट्या शिक्षकांना आश्चर्य वाटेल. “शांती आहे, निर्भय आहे’ असे ते म्हणतात. यरुशलेमाचा नाश होण्याअगोदर जगीक ऐश्वर्य व समृद्धी मंडळीने अनुभवावे असे याजक व धर्मगुरू यांना वाटत होते. काळाची चिन्हे ह्याच्या अगोदरच व्यक्त केली आहेत असे ते म्हणतात. परंतु ईश्वर प्रेरित वचन काय म्हणते? “त्यांजवर आकस्मात नाश येतो.’ १ थेस्स. ५:३. ह्या भूतलावर राहाणाऱ्या सगळ्यांना, आणि हे जग स्वतःचे निवासस्थान करणाऱ्या सर्वांना देवाचा दिवस फासाप्रमाणे येईल. भक्ष्याच्या शोधार्थ भटकणाऱ्या चोरासारखा तो दिवस त्यांच्यावर येईल.DAMar 555.3

    दंगा, मारामारी, अनैतिक ख्यालीखुशाली यांनी भरलेले जग ऐहिक सुरक्षितेत गाढ निद्रेत आहे. प्रभूचे येणे ते लांबणीवर टाकीत आहेत. दिलेल्या इशाऱ्याची ते थट्टामस्करी करितात. अहंकारी बढाई करून म्हणतात, “उत्पत्तीच्या प्रारंभापासून जसे चालू होते तसेच सर्व काही चालेले आहे.” “आजच्यासारखा उद्याचा दिवस होईल, तो पराकाष्ठेच्या चैनीचा होईल.’ २ पेत्र ३:४; यशया ५६:१२. आम्ही भरपूर मनसोक्त चैन करू. परंतु ख्रिस्त म्हणतो, “पाहा, मी चोरासारखा येतो.” प्रगटी. १६:१५. “त्याच्या येण्याचे आश्वासन कोठे आहे?” थट्टा करून जग हा प्रश्न विचारीत असतांना चिन्हे पूर्ण होत आहेत. “शांती आहे, निर्भय आहे’ असे म्हणत असतानाच आकस्मात नाश होत आहे. थट्टा करणारे, सत्याचा त्याग करणारे फाजील उद्दाम बनतात; तत्त्वांना तिलांजली देऊन पैसा मिळविण्याचे सर्व व्यवहार विनानिबंध चालविले जातात; बायबल ज्ञान सोडून इतर ज्ञान मिळविण्याचा अट्टाहास विद्यार्थी करीत असताना तेव्हांच ख्रिस्त चोरासारखा येतो.DAMar 555.4

    जगामध्ये सर्व काही प्रक्षुब्ध दिसते. काळाची चिन्हे अनिष्टसूचक आहेत. येणाऱ्या घटनाची छाया आगाऊ पडते. देवाचा आत्मा पृथ्वीवरून माघार घेत आहे आणि समुद्रावर व भूमीवर अत्यंत दुःखद घटनामागून घटना घडत आहेत. वादळे, भूमिकंप, आग, जलप्रलय अनेक प्रकारचे खून दिसतात. भविष्यकाळ कोणाला समजतो? सुरक्षितता कोठे आहे? जगामध्ये किंवा मानवी प्रयत्नामध्ये खात्री नाही. निवडलेल्या झेंड्याखाली लोक एकत्र जमा होत आहेत. बेचैन होऊन ते त्यांच्या पुढाऱ्यांची हालचाल न्याहाळीत आहेत. प्रभूच्या आगमनाची वाट पाहून जागृतीने काम करणारे काहीजण आहेत. महान धर्मभ्रष्टाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेला दुसरा एक गट आहे. अगदी मनापासून थोड्यानाच वाटते की त्यांना नरक टाळून स्वर्ग जींकायचा आहे.DAMar 556.1

    क्रमाक्रमाने आणीबाणीची वेळ आम्हावर येत आहे. नित्याप्रमाणे आकाशात सूर्य प्रकाशून भ्रमण करितो आणि आकाश अद्याप देवाचा महिमा वर्णिते. मनुष्यांचे नित्याचे खाणे पिणे, ख्याली खुशाली करणे, लागवड करणे, बांधकाम करणे, लग्न करणे व लग्न करून देणे हे सर्व सरास चालू राहातात. व्यापारी क्रयविक्रय करतात, स्पर्धा करून उच्च स्थान पटकावण्याचा लोक प्रयत्न करतात. ख्यालीखुशालीचा आस्वाद घेणारे रेसकोर्स, सिनेमा गृहे, जुगाराचे अड्डे येथे गर्दी करीत आहेत. प्रचंड खळबळ उडली आहे, तथापि कृपेची घटिका द्रुतगतीने येत आहे आणि प्रत्येकाचा निकाल कायमचा लागण्याचा समय येऊन ठेपला आहे. वेळ अगदी थोडी आहे हे सैतान ओळखून आहे. कृपेच्या काळाचा शेवट होईल आणि दयेचा दरवाजा कायमचा बंद होईल तोपर्यंत मनुष्यांची फसवणूक करण्यासाठी, भ्रमात ठेवण्यासाठी व कह्यात राखण्यासाठी त्याने आपले सर्व प्रतिनिधि व साधने कामी लावले आहेत.DAMar 556.2

    जैतूनाच्या डोंगरावर आमच्या प्रभूने गांभीर्याने दिलेला इशारा किंवा ताकीद शतकानु शतकातून आज आमच्या कडे येत आहे: “तुम्ही आपणास सांभाळा, नाहीतर कदाचित गुंगी, दारूबाजी व संसाराच्या चिंता यांनी तुमची अंतःकरणे जड होऊन तो दिवस पाशाप्रमाणे आकस्मात तुम्हावर येईल.” “तुम्ही तर या सर्व होणाऱ्या गोष्टी चुकवावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा.”DAMar 556.3