Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

युगानुयुगांची आशा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय १—“आम्हाबरोबर देव”

    “त्याला इम्मानुएल म्हणतील. त्या नावाचा अर्थ आम्हाबरोबर देव.’ असा आहे. “देवाच्या वैभवाचे तेज येशू ख्रिस्ताच्या चेहऱ्यावर दृश्यमान होते.” सनातन काळापासून प्रभु येशू ख्रिस्त पित्याबरोबर होता; तो “देवाची प्रतिमा’ होता, त्याची थोरवी ऐश्वर्य आणि “त्याच्या अतुलनीय वैभवाची’ तो प्रतिमा होता. हे वैभव प्रगट करण्यासाठी तो आमच्या जगात आला. पापकलंकित पृथ्वीला देवाचा प्रेमप्रकाश प्रगट करण्यासाठी तो आला. - म्हणजे “आम्हाबरोबर देव.’ त्यामुळेच “त्याचे नाव इम्मानुएल म्हणतील’ असे भाकीत करण्यात आले होते.DAMar 7.1

    आम्हाबरोबर निवास करण्याद्वारे येशू, मानव आणि देवदूत यांना देवाचे प्रगटीकरण करणार होता. तो देवाचा शब्द होता, त्याने देवाचा विचार ऐकविला, बोलून दाखविला. आपल्या शिष्यांसाठी केलेल्या प्रार्थनेत तो म्हणतो, “त्यांस मी तुझे नाम प्रगट केले आहे,” — “दयाळू व कनवाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर,” — “यासाठी की जी प्रीती तू मजवर केली ती त्यांजमध्ये असावी आणि मी त्यांजमध्ये असावे.’ केवळ ह्या पृथ्वीवरील रहिवाशासाठी हे आविष्करण करण्यात आले नव्हते. हे आमचे लहानसे जग अफाट विश्वातील धडे शिकण्याचे एक उदाहरण आहे. देवाच्या कृपेचा आश्चर्यकारक हेतू उद्देश, उद्धार करणाऱ्या प्रेमाचे रहस्य हा मुख्य विषय असून त्याच्यावर देवदूतांना सखोल विचार करावयाचा आहे. एवढेच नाही तर येणाऱ्या युगामध्ये या विषयावर त्यांचा सततचा अभ्यास राहील. उद्धार पावलेले आणि पतन न पावलेले यांना ख्रिस्ताच्या वधस्तंभामध्ये त्यांचे गीत आणि ज्ञानशास्त्र लाभेल. ख्रिस्ताच्या मुखावर जे वैभवी तेज दिसेल ते आत्मयज्ञामध्ये प्रगट केलेल्या प्रेम वैभवाचे होते. वधस्तंभाच्या संदर्भात पाहिल्यास स्वार्थत्यागातून प्रगट केलेला प्रीतीनियम हा पृथ्वीवर आणि स्वर्गात जीवनाचा नियम आहे. जी प्रीती स्वार्थ पाहात नाही तिचा उगम देवाच्या अंतर्यामात आहे, आणि जो प्रकाशात निवास करितो त्याचा स्वभाव विनम्र आणि सौम्य यामध्ये प्रगट करण्यात आला आहे.DAMar 7.2

    प्रारंभी सृष्टीच्या उत्पत्तीकार्यामध्ये देवाचे प्रगटीकरण करण्यात आले. ख्रिस्तानेच पृथ्वीचा पाया घातला आणि आकाश निर्माण केले. अंतराळामध्ये अनेक जग त्याने निर्माण केली आणि भूमी फूलझाडांनी सुशोभीत केली. “आपल्या सामर्थ्याने पर्वत स्थिर ठेवितोस.’ “समुद्र त्याचा आहे, त्यानेच तो उत्पन्न केला.” स्तोत्र ६५:६; ९५:५. पृथ्वी त्याने सुशोभीत केली आणि गाण्याने वातावरण भरून टाकिले, आणि पृथ्वीवरील सर्व सृष्ट वस्तूवर, अंतराळात आणि वायूवर पित्याचा प्रेमसंदेश त्याने लिहिला.DAMar 7.3

    पापामुळे देवाच्या परिपूर्ण करणीला कलंक लागला. तरी हस्तलेख कायम राहिला. आजसुद्धा उत्पत्तीकार्य त्याचा महिमा वर्णिते. स्वतःसाठीच कोणी जगत नाही. फक्त स्वार्थी मनुष्य स्वतःचेच पाहातो. हवेत भरारी मारणारा पक्षी नाही, किंवा भूमीवर संचार करणारा प्राणी नाही कारण ते दुसऱ्याची सेवा करण्यात रमतात. जंगलातील पान घ्या किंवा गवताची पाने घ्या त्यांचा उपयोग दुसऱ्यासाठी होतो. प्रत्येक वृक्ष आणि झुडूप व पान मानवाच्या आणि जनावरांच्या जीवनासाठी पोषक अशा नैसर्गिक घटकांचा वर्षाव करितात. त्याविना त्यांना जगणे अशक्य. उलटपक्षी वृक्ष, झुडूप व पान यांची जोपासना मानव आणि जनावरे करतात. फुलांच्या मधुर सुगंधाने आणि सौंदर्याने पृथ्वी दखळून व सजून जाते. हजारो जगांना आनंदीत करण्यासाठी सूर्यप्रकाश किरण सर्वत्र पसरतो. भूभागातील प्रत्येक नाले व झरे यांच्याद्वारे महासागरला पाण्याचा पुरवठा होतो आणि तो महासागर नद्या आणि झरे यांचा उगम बनतो. येथे महासागर देण्यासाठी स्वीकारतो. धुक्याद्वारे भूमीवर पाण्याचा वर्षाव होतो आणि त्यामुळे भूमीला नवीन पालवी फुटते आणि कोंब येतात.DAMar 8.1

    जे कलंकीत आणि अपवित्र आहेत त्यांच्यावर प्रीती करून जागरूकतेने त्यांची काळजी वाहाण्यात देवदतांना आनंद होतो. ते मानवाचे अंतःकरण प्रेमाने जिंकण्याचा प्रयत्न करितात: ते ह्या अंध:कारमय जगात वरून स्वर्गातून प्रकाश आणतात; सौम्यतेने आणि सहिष्णुतीने मानवाच्या अंतःकरणावर कार्य करून त्यांना ख्रिस्ताच्या सान्निध्यात आणण्याचा प्रयत्न करितात. हा अनुभव त्यांना अधिक जवळचा वाटतो.DAMar 8.2

    विचारार्थ मांडलेले कमी दर्जाचे सर्व प्रतिनिधित्व सोडून आम्ही येशूमध्ये देवाला निरखून पाहातो. येशूला पाहिल्यावर तो देवाचे वैभव, गौरव असल्याचे दिसते. येशूने म्हटले, “मी आपण होऊन काही करीत नाही. जीवंत पित्याने मला पाठविले आहे आणि मी पित्यामुळे वाचतो (जगतो). मी स्वतःचे गौरव पाहात नाही, पण ज्याने मला पाठविले त्याचे गौरव करितो.” योहान ८:२८; ६:५७; ८:५०; ७:१८. ह्या वचनामध्ये जे महान तत्त्व आलेले आहे ते विश्वातील जीवनाचा नीतिनियम आहे. ख्रिस्ताला सर्व काही देवापासून मिळाले परंतु त्याने ते इतरांच्या कल्याणाकरिता दिले. म्हणून स्वर्गामध्ये, आपल्या प्रिय पुत्राच्या सेवाकार्याद्वारे निर्माण केलेल्या सर्वांच्यापर्यंत पित्याचा जीवनस्रोत वाहात जातो; आणि पुत्राच्याद्वारे तो पुन्हा, संतोषाने व प्रेमाने दिलेली सेवा याद्वारे तो सर्वांचा महाउगम याकडे परत येतो. अशा रीतीने हितकारक गोलाकार फेरी पूर्ण होते आणि त्यामध्ये महान देणगी देणाऱ्याचा स्वभाव आणि जीवनाचा नीतिनियम व्यक्त होतो.DAMar 8.3

    ह्या नियामाचे उलंघन स्वर्गातच झाले. स्वार्थनिष्ठेत पापाचे बीज आहे, उगम आहे. लुसीफर, पाखर घालणारा अभिषिक्त करूब याच्या मनात स्वर्गात प्रथम स्थान पटकावण्याची लालसा निर्माण झाली. स्वर्गातील गणांवर नियंत्रण प्रस्थापीत करण्याचा त्याने प्रयत्न केला, निर्माणकर्त्यापासून त्यांना दुरावण्याचा हिय्या केला, आणि अशा रीतीने त्यांच्याकडून सन्मान मिळविण्याचा अट्टाहास केला. देवावर कडक ताशेरे मारायला सुरूवात केली. त्याच्या गुणांचा विपर्यास करून म्हटले, “देवाला प्रथम स्थान, आत्मस्तुती पाहिजे.” अशा रीतीने प्रेमळ निर्माणकर्त्याचे चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला. त्याने देवदूत व मानव यांची फसवणूक केली. देवाचे वचन आणि त्याचा चांगलेपणा, सद्गुण याविषयी त्यांच्या मनात संशय निर्माण केला. देव सार्वभौम व न्यायी असल्यामुळे सैतानाने आरोप केला की तो कडक, जुलमी आणि क्षमा न करणारा निर्दय आहे. अशा रीतीने त्याने देवाविरूद्ध बंड करून आपल्या पक्षाला माणसे आकर्षीत करून घेतली, आणि अनर्थ, अरिष्टांची रात्र ह्या जगावर आली.DAMar 9.1

    देवाविषयी गैरसमज पसरविल्यामुळे पृथ्वीवर उदासीनतेची गर्द काळोखी छटा पसरली होती. ही उदासीनतेची छाया नाहीशी करून आशादायी वातावरण निर्माण करता येईल, बहकलेल्या जगाला देवाकडे परत आणता येईल, आणि सैतानाच्या फसव्या मार्गाचा धुव्वा उडविण्यात येईल. परंतु हे सर्व जुलमी सामर्थ्याने करू शकत नाही. बळजबरीचा उपयोग करणे देवाच्या कारभाराच्या तत्त्वाविरूद्ध आहे. प्रेमप्रेरित सेवा तो अपेक्षितो. प्रेमावर हुकमत, स्वामित्व चालू शकत नाही. अधिकाराने किंवा जुलमाने ते प्राप्त करू शकत नाही. प्रेमानेच प्रेम जागृत होते. देवाला ओळखणे म्हणजे त्याच्यावर प्रीती करणे. तुलनात्मक दृष्टीने देवाचा स्वभाव सैतानाच्या स्वभावाविरूद्ध प्रगट केला पाहिजे. सबंध विश्वामध्ये हे महत्त्वपूर्ण कार्य केवळ एकच व्यक्ती करू शकते. ज्याला देवाच्या प्रेमाची उंची व खोली अवगत आहे केवळ तीच व्यक्ती इतरांना सांगू शकते. जगाच्या पाठीवरील काळोखी रात्री “पंखाच्याठायी आरोग्य असलेला” धार्मिकतेचा सूर्य उदय पावेल. मलाखी ४:२.DAMar 9.2

    आदामाचे पतन झाल्यानंतर आमचा उद्धार करण्याची योजना आखण्यात आली नव्हती. “जे गूज युगानयुग गुप्त ठेविलेले होते ते आता प्रगट करण्यात आले होते’ रोम १६:२५. जे तत्त्व अनंतकालापासून देवाच्या सिंहासनाचा पाया होते त्याचे हे प्रगटीकरण आहे. सैतानाचा स्वधर्मत्याग आणि त्याच्या फसवणूकीद्वारे झालेले मानवाचे पतन याविषयी प्रारंभापासूनच देव आणि ख्रिस्त यांना माहीत होते. देवाने पापाच्या अस्तीत्वाला अधिकृत केले नव्हते, परंतु त्याच्या अस्तीत्वाची त्याला आगाऊ चाहूल होती. म्हणून हा निकडीचा भयंकर प्रसंग हाताळण्यासाठी त्याने तरतूद करून ठेविली. ह्या जगावर त्याचे महान प्रेम होते म्हणून आपला एकुलता एक पुत्र देण्याची प्रतिज्ञा केली, “त्यामुळे जो कोणी त्याजवर विश्वास ठेवील त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” योहान ३:१६.DAMar 9.3

    लुसीफराने म्हटले, “मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करीन, ... मी परात्परासमान होईन.’ यशया १४:१३, १४. परंतु ख्रिस्त, “देवाच्या स्वरूपाचा असूनही देवासमान असणे हा लाभ असा त्याने मानिला नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले.” फिलिप्पै २:६, ७.DAMar 10.1

    हे स्वखुषीचे समर्पण होते. पित्याच्या खांद्याला खादा लावून येशू राहिला असता. दिव्य वैभव आणि दूतगणांचा सन्मान त्याने राखला असता. परंतु तसे न करता त्याने आपला राजदंड पित्याच्या हाती दिला आणि विश्वाच्या सिंहासनावरून खाली उतरून अंधारात गाढलेल्या, पापात बुडालेल्या विप्पन्नावस्थेतील जीवाकडे धाव घेतली.DAMar 10.2

    सुमारे दोन हजार वर्षामागे, देवाच्या सिंहासनावरून गूढ गर्भितार्थाची वाणी ऐकली. ती म्हणाली, “यज्ञपशु व अन्नार्पण यांची तुला इच्छा नाही, तू माझ्यासाठी शरीर तयार केले आहे; ... पाहा, हे देवा, ग्रंथपटात मजविषयी लिहून ठेविले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करावयासाठी मी आलो आहे.” इब्री १०:५-७. सनातन काळापासून गुप्त ठेवलेल्या उदिष्टाची परिपूर्तता झाल्याचे या वचनामध्ये घोषीत केले आहे. मानव अवतार धारण करण्यासाठी ख्रिस्त या पृथ्वीवर येणार होता. तो म्हणतो, “तू माझ्यासाठी शरीर तयार केले आहे.’ पृथ्वी अस्तित्वात येण्याच्या अगोदर पित्याबरोबर त्याचे जे वैभव होते त्यासहीत तो जर आला असता तर त्याच्या प्रकाशमय, तेजोमय दर्शनापुढे आमचा टिकाव लागला नसता. आम्ही त्याचे दर्शन घेतल्यावर आमचा नाश होऊ नये म्हणून त्याच्या वैभवावर आवरण होते. त्याचे देवत्व मानवतेने आच्छादले होते, - म्हणजे अदृश्य वैभव मानवी आकारात दृश्य होते.DAMar 10.3

    हा महान उद्देश दाखले, चिन्हे आणि संकेत यांच्यामध्ये झाकलेला होता. जळणाऱ्या झुडपामध्ये ख्रिस्ताने मोशेला दर्शन दिले त्यामध्ये देव प्रगट झाला. देवत्वाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी वापरण्यात आलेले साधे झुडूप याला कोणत्याही प्रकारचे आकर्षण नव्हते. त्यामध्ये सनातन परमेश्वर आच्छादित केला होता. सर्वश्रेष्ठ, ममताळू देवाचे वैभव अशा नम्रतेत गुंडाळिले होते. मोशेने त्याचे दर्शन घेऊन जगायचे होते. तसेच दिवसा मेघस्तंभ आणि रात्री अग्निस्तंभ याद्वारे देवाने इस्राएलाशी दळणवळण ठेविले आणि आपली इच्छा प्रगट करून त्यांना कृपा बहाल केली. दुबळ्या, मर्यादित मनुष्यांना दर्शन घेता यावे म्हणून देवाचे वैभव नम्र करण्यात आले होते व त्याचे ऐश्वर्य आच्छादिले होते. “तुमच्या आमच्या निच्चावस्थेतील शरीराने” ख्रिस्त येणार होता. फिलि. ३:२१. जगाच्या दृष्टीकोणातून पाहाणाऱ्यांना त्याच्याठायी अपेक्षित सौंदर्य नव्हते; तथापि तो देह धारण केलेला देव होता, तो स्वर्गात व पृथ्वीवर प्रकाश होता. दुःखी, कष्टी, मोहात पडलेल्या लोकाकडे तो आकर्षिला जावा म्हणून त्याचे वैभव आच्छादिले होते, त्याचे श्रेष्ठत्व व ऐश्वर्य अज्ञात ठेवले होते.DAMar 10.4

    देवाने इस्राएल लोकासाठी मोशेला आज्ञा केली की, “माझा त्यांच्यामध्ये निवास व्हावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्रस्थान करावे” (निर्गम २५:८), आणि तो लोकांच्यामध्ये पवित्रस्थानात राहिला. अरण्यातील खडतर प्रवासामध्ये त्याच्या समक्षतेचे चिन्ह सतत त्यांच्याबरोबर होते. मानवाने ठोकलेल्या तळामध्ये ख्रिस्ताने आपला मंडप उभारला. मनुष्यांनी उभारलेल्या राहुट्यांच्या शेजारीच ख्रिस्ताने आपला तंबू उभारला आणि त्याद्वारे त्यांच्यामध्ये राहून आपल्या दिव्य जीवनाची आणि स्वभावाची त्यांना ओळख करून दिली. “शब्द देही झाला, आणि कृपा व सत्य यांनी परिपूर्ण असून त्याने आम्हामध्ये वस्ती केली; आम्ही त्याचे गौरव पाहिले ते गौरव पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे असावे असे होते.’ योहान १:१४.DAMar 11.1

    ज्या अर्थी ख्रिस्त आम्हामध्ये वस्ती करण्यास आला त्यावरून देवाला आमच्या दुःख संकटाचा परिचय आहे हे आम्ही जाणतो. सृष्टीकर्ता पाप्यांचा स्नेही आहे हे आदामाच्या हरएक पुत्रकन्याला समजले पाहिजे. कारण कृपेच्या प्रत्येक शिकवणीत, आनंदाच्या प्रत्येक अभिवचनात, प्रेमाच्या प्रत्येक कृतीत आणि पृथ्वीवर उद्धारकाच्या जीवनातील प्रत्येक दिव्य आकर्षणात “आम्हाबरोबर देव’ हे आम्ही पाहातो.DAMar 11.2

    देवाचे प्रेममय नियम स्वार्थाचे नियम आहेत असे सैतान दर्शवितो. तो प्रतिपादितो की मानवाला हे नियम पाळणे अशक्य कोटीतले आहे. आपल्या आद्य मातापित्याचे पतन आणि त्याचा परिणाम म्हणून आलेली अरिष्टे त्यांचे खापर तो सृष्टिकर्त्यावर फोडतो आणि त्याद्वारे आलेल्या व्यथा, मरण आणि पाप यांचा उत्पादक देव आहे असे भासवितो. येशू ख्रिस्त ह्या फसवणुकीचे पितळ उघडे करणार होता. आम्हापैकी तो एक आहे म्हणून तो आज्ञापालनाचे उदाहरण पुढे ठेवणार होता. ह्या कारणास्वत त्याने आमचा स्वभाव धारण केला आणि आमचा अनुभव चाखला. “यास्तव त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधुवर्गासारखे होणे अगत्य होते.” इब्री २:१७. ज्या अनुभवातून येशू गेला नाही अशा अनुभवाला आम्हाला पुढे जावे लागले तर अशा वेळी देवाचे सामर्थ्य अपूरे आहे असा आरोप सैतान करील. म्हणून “तो सर्व प्रकारे आमच्या प्रमाणे पारखलेला होता.” इब्री ४:१५. आमच्यावर येणाऱ्या प्रत्येक अरिष्टाला त्याने तोंड दिले. जे साहाय्य, जे सामर्थ्य आम्हाला उपलब्ध आहे त्याशिवाय दुसऱ्या सामर्थ्याचा त्याने वापर केला नाही. मनुष्य या नात्याने त्याच्यावर मोह आले आणि देवाच्या सामर्थ्याद्वारे त्याने त्यावर विजय संपादन केला. तो म्हणतो, “हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला संतोष आहे; तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.” स्तोत्र ४०:८. सत्कृत्ये करीत आणि सैतानाने पछाडलेल्यांना मुक्त करून बरे करीत असतांना त्याने देवाच्या नियमाचे स्वरूप, लक्षणे आणि त्याच्या सेवेची भूमिका लोकांच्यापुढे स्पष्ट केली. आम्हीसुद्धा देवाचे नियम पाळू शकतो याविषयी त्याचे जीवन साक्ष देते.DAMar 11.3

    त्याच्या मानवतेद्वारे त्याने मानवतेला स्पर्श केला; त्याच्या देवत्वाद्वारे देवाच्या सिंहासनाशी संबंध जोडीला. त्याने मानवपुत्र या नात्याने आज्ञापालनाचे उदाहरण आमच्यापुढे ठेविले; देवपुत्र या नात्याने आज्ञापालन करण्यास तो आम्हाला सामर्थ्य देतो. होरेब डोंगरावर झुडपातून अग्निज्वालेच्या द्वारे येशू ख्रिस्त बोलत होता. तो म्हणाला, “मी जो असावयाचा तोच असणार. तू इस्राएल लोकास सांग मी असणारयाने मला तुम्हाकडे पाठविले आहे.” निर्गम ३:१४. इस्राएल लोकांच्या मुक्ततेची ही प्रतिज्ञा होती. “मानवाच्या प्रतिमेत” जेव्हा तो अवतरला तेव्हा त्याने मी असणार अशी घोषणा केली. बेथलेहेमातील बालक, विनम्र आणि सौम्य उद्धारक “देहाने प्रगट झालेला’ देव आहे. १ तिम. ३:१६. तो आम्हाला सांगतोः “मी उत्तम मेंढपाळ आहे.’ “मी जीवनी भाकर आहे.’ “मी मार्ग, सत्य व जीवन आहे.” “स्वर्गात व पृथ्वीवर सर्व सामर्थ्य मला दिले आहे.” योहान १०:११; ६:५१; १४:६; मत्तय २८:१८. प्रत्येक आश्वासनाची मी खात्री आहे. मी असणार; भयभीत होऊ नका. पापमुक्ततेची हमी आणि दैवी नियम पालनाच्या सामर्थ्याची खात्री “आम्हाबरोबर देव’ ही आहे.DAMar 12.1

    नम्र होऊन मानवता परिधान करण्याद्वारे ख्रिस्ताने सैतानाच्या स्वभावाविरूद्ध असलेला स्वभाव प्रगट केला. त्याहीपेक्षा अधिक निच्चावस्थेतील विनम्रता त्याने स्वीकारली. “आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोशिले; एथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.” फिलिप्पै २:८. ज्याप्रमाणे महायाजकाने आपला भपकेदार पोषाख काढून बाजूला ठेविला आणि साध्या याजकाचा शुभ्र सफेत पोषाख घालून विधी उरकला त्याप्रमाणे ख्रिस्ताने चाकराचे रूप घेतले आणि यज्ञार्पण केले. स्वतःच याजक आणि स्वतःच यज्ञ. “खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला; आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली; त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हांस आरोग्य प्राप्त झाले.” यशया ५३:५.DAMar 12.2

    आम्हाला मिळणारी वागणूक ख्रिस्ताला देण्यात आली अशासाठी की त्याला मिळणारी वागणूक आम्हाला मिळावी. ज्या आमच्या पापामध्ये त्याचा अंशभरही भाग नव्हता त्याबद्दल त्याच्यावर दोषारोप करण्यात आले कारण ज्यामध्ये आमचा काहीच भाग नाही अशा त्याच्या धार्मिकतेद्वारे आम्ही दोषमुक्त व्हावे. आमचे मरण त्याला घ्यावे लागले की त्याद्वारे त्याचे जीवन आम्हाला मिळावे. “त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले.”DAMar 12.3

    पापामुळे जी नासाडी, विध्वंस झाला त्याच्यापेक्षा अधिक ख्रिस्ताच्या जीवनाने व मरणाने साधले. देव व मानव यांच्यामध्ये निरंतरचा दुरावा निर्माण करावा ही सैतानाची योजना होती; पण ख्रिस्तामध्ये आम्ही पतन न झालेल्या स्थितीपेक्षा देवाच्या अधिक सन्निद्ध आलो. आमचा स्वभाव धारण करून उद्धारकाने मानवतेशी जो निकटचा संबंध जोडला आहे त्याची फारकत कदापीही होणार नाही. निरंतरचा तो आम्हाशी बांधलेला राहील. “देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला.” योहान ३:१६. आमचे पापाचे ओझे वाहून यज्ञबलीचे मरण मरण्यासाठीच त्याने त्याला दिले नाही तर पतीत वंशासाठी दिले. त्याच्या न बदलणाऱ्या, निर्विकार शांतीच्या सल्ल्याच्या खात्रीसाठी देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला मानवी कुटुंबात सामील होण्यासाठी दिले आणि तो निरंतरचा मानवी स्वभाव राखून ठेवणार आहे. ह्या प्रतीक्षेची देव परिपूर्ती करील. “आम्हांसाठी बाल जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे; त्याच्या खांद्यावर सत्ता राहील.” आपल्या पुत्राद्वारे देवाने मानवी स्वभाव स्वीकारला आणि तो वर स्वर्गात नेला. विश्वाच्या सिंहासनावर “मानवपुत्र’ विराजमान होऊन भागीदारी करतो. “मानव पुत्रालाच” अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपति म्हणतील.” यशया ९:६. मी असणार हा देव आणि मानवता यांच्यामधील दुवा आहे आणि तो दोहोवर हात ठेवतो, तो “पवित्र, सात्विक, निर्मळ असून पापी जनापासून वेगळा,” आहे आणि तो आम्हाला बंधुम्हणावयास लाजत नाही. इब्री ७:२६; २:११. ख्रिस्तामध्ये स्वर्गातील कुटुंब आणि पृथ्वीवरील कुटुंब बंधनाने निगडित झाले आहेत. गौरविलेला ख्रिस्त आमचा बंधु आहे. मानवतेच्या देव्हाऱ्यात स्वर्ग विराजमान झाला आहे आणि अपरंपार प्रेमाच्या कुशीत मानवता आच्छादलेली आहे.DAMar 12.4

    आपल्या लोकाविषयी देव म्हणतो, “ते त्याच्या देशांत मुकुटावरील रत्नाप्रमाणे उंच स्थानी शोभतील. त्यांची आबादानी केवढी! त्याचे सौंदर्य केवढे!” जखऱ्या ९:१६, १७. उद्धार पावलेल्यांची प्रशंसा व स्तुती म्हणजे देवाच्या दयेची ती निरंतरची साक्ष आहे. “ख्रिस्त येशूमध्ये त्याची आपल्यावर जी ममता तिच्याद्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार संपत्ति दाखवावी.” “यासाठी की जो युगादिकालचा संकल्प त्याने आपल्या प्रभु ख्रिस्त येशूमध्ये केला त्याप्रमाणे देवाचे बहुविध ज्ञान स्वर्गातील अधिपति व अधिकारी यांस मंडळीच्याद्वारे आता कळावे.’ इफिस २:७; ३:१०, ११.DAMar 13.1

    ख्रिस्ताच्या उद्धारकार्याद्वारे देवाच्या राज्यकारभाराचे समर्थन करण्यात येते. सर्वशक्तीमान देव प्रेममय आहे असे सांगितले जाते. सैतानाचे आरोप खोडून टाकण्यात आले आहेत आणि त्याचे दुष्ट स्वभाव उघडे केले आहेत. पुन्हा कदापीही बंड तोंड वर काढणार नाही. अनाद्यन्त काळात धर्मभ्रष्टतेपासून सर्व काही सुरक्षीत ठेवले आहे. प्रेमप्रणीत यज्ञबलीद्वारे पृथ्वीवरील आणि स्वर्गातील रहिवाशी टिकाऊ, दृढ संयोगाने निर्माणकर्त्याशी बांधले गेले आहेत.DAMar 13.2

    उद्धारकार्य पूर्ण होईल. पापाच्या जागी देवाचा अनुग्रह विपुलतेने दिसेल. ज्या पृथ्वीवर सैतान आपला अधिकार, हक्क सांगतो तिला सैतानाच्या कचाट्यातून मुक्त करण्यात येईल एवढेच नाही पण तिला उच्च दर्जा देण्यात येईल. गौरवयुक्त सृष्टी निर्माण- कार्यातील पापाच्या शापाने कलंकीत झालेल्या आमच्या लहानशा जगाचा सन्मान देवाच्या विश्वातील सर्व जगापेक्षा अधिक करण्यात येईल. जेथे देवपुत्राने मानवतेमध्ये आपला मंडप घातला; जेथे वैभवी राजाने जीवन घालविले; दुःख, व्यथा भोगल्या आणि प्राणयज्ञ केला आणि जेव्हा तो सर्व काही नवीन करील तेव्हा येथे देवाचा मंडप मनुष्यामध्ये असेल, “तो त्यांच्यामध्ये वस्ती करील आणि ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर असेल आणि तो त्यांचा देव होईल.” आणि निरंतर उद्धार पावलेले भक्तगण प्रभूच्या प्रकाशात वावरत असतांना ते देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल त्याची स्तुती करतील.DAMar 13.3

    इम्मानुएल, “आम्हाबरोबर देव”

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents