Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

युगानुयुगांची आशा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ६६—संघर्ष

    मत्तय २२:१५-४६; मार्क १२:१३-४०; लूक २०:२०-४७.

    ख्रिस्ताने दिलेली मर्मभेदी कानउघाडणी याजक व अधिकारी यांनी शांतपणे ऐकून घेतली. त्याचे आरोप ते खंडन करू शकले नाहीत. परंतु त्याला जाळयात पकडण्याचा त्यांनी ठाम निर्धार केला. ह्या उद्देशाने त्यांनी त्याच्याकडे हेर पाठविले. “ते त्याच्या पाळतीवर राहिले आणि त्याला बोलण्यात धरून सुभेदाराच्या तावडीत व अधिकारात आणावे म्हणून त्यांनी धार्मिक असल्याची बतावणी केली.’ वारंवार त्याला भेटणारे वयस्कर परूशी त्याच्याकडे पाठविले नाहीत परंतु ख्रिस्ताला ओळख नसलेले आणि तडफ व आवेशी असलेले तरुण पाठविले. त्यांच्या सोबतीला काही ठराविक हेरोदी होते. ते ख्रिस्ताचे बोल ऐकतील आणि त्याच्या चौकशीच्या वेळी त्याच्याविरुद्ध साक्ष देतील. परूशी आणि हेरोदियन्स एकमेकाचे कट्टर शत्रू होते, परंतु ते आता ख्रिस्ताविरुद्ध एक झाले होते.DAMar 523.1

    रोमी साम्राज्याच्या कर वसूलीने परूशी अगदी वैतागून गेले होते. कर किंवा खंडणी देणे देवाच्या नियमाविरुद्ध आहे असे त्यांना वाटत होते. ह्या कचाट्यत ख्रिस्ताला पकडण्याची त्यांनी संधि पाहिली. स्वतःचे कर्तव्य जाणून घेण्याचा बहाणा करून हेर त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “गुरूजी, आम्हास ठाऊक आहे की आपण यथार्थ बोलता व शिक्षण देता; पक्षपात करीत नाही, तर देवाचा मार्ग खरोखर शिकविता; कैसराला कर पट्टी देणे हे योग्य आहे की नाही?’ DAMar 523.2

    “आम्हाला माहीत आहे की आपण यथार्थ बोलता व शिक्षण देता,’ हे शब्द मनापासूनचे खरे असते तर ती विस्मयजनक कबुली होती. परंतु ते बोल फसवणूक करण्यासाठी होते; तथापि ती साक्ष सत्य होती. ख्रिस्ताचे बोल आणि शिक्षण सत्य होते हे परूश्यांना माहीत होते आणि त्यांच्या स्वतःच्या साक्षीवरून त्यांचा न्याय करण्यात येईल.DAMar 523.3

    प्रश्न विचारणाऱ्यांना वाटले की त्यांचा बतावणी करण्याचा उद्देश सफल झाला; परंतु ख्रिस्ताने त्यांची अंतःकरणे ओळखली आणि त्यांच्या ढोंगीपणाचा निर्देश केला. त्याने म्हटले, “माझी परीक्षा का पाहाता?” त्यांचा गुप्त हेर त्याने ओळखिला याची न विचारलेली खूण त्याने त्यांना दिली. “कराचे नाणे मला दाखवा’ असे म्हटल्यावर ते अधिकच गोंधळून गेले. तेव्हा त्यांनी त्याला एक पावली दिली. त्याने त्यास म्हटले, “हा मुखवटा व हा लेख कोणाचा? ते म्हणाले कैसराचा.’ लेखाकडे बोट करून येशूने म्हटले, “तर मग कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरून द्या.”DAMar 523.4

    येशूने त्यांच्या प्रश्नाचे उत्तर सरळ द्यावे असे हेरांना वाटले होते. कैसराला करपट्टी देणे अयोग्य आहे असे त्याने म्हटले असते तर ताबडतोब बंड करण्याला प्रोत्साहन देत आहे म्हणून रोमी अधिकाऱ्यांना त्याच्याविरुद्ध तक्रार केली असती आणि त्याला अटक करण्यात आली असती. जर त्याने करपट्टी देणे योग्य आहे असे म्हटले असते तर तो देवाच्या नियमाला विरोध करीत आहे असे लोकांना सांगण्याचा त्यांनी घाट घातला होता. आता त्यांची फसगत झाल्याचे पाहून ते गोंधळून गेले होते. त्यांची योजना अस्ताव्यस्त झाली होती. ज्या रीतीने त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यात आले त्यानंतर ते निरूत्तर झाले.DAMar 524.1

    ख्रिस्ताचे उत्तर उडवाउडवीचे किंवा टाळाटाळीचे नव्हते तर मोकळ्या मनाने दिलेले सरळ उत्तर होते. कैसराचा शिक्का व नाव असलेले रोमी नाणे हातात घेऊन त्याने म्हटले ज्या अर्थी ते रोमी सत्तेच्या संरक्षणाखाली राहात आहेत त्याअर्थी, त्यांच्या उच्च कर्तव्यात बाधा येत नाही तर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना कर देणे इष्ट आहे. देशाच्या नियमाप्रमाणे वागणे इष्ट जरी असले तरी प्रथम स्थान देवाला दिले पाहिजे.DAMar 524.2

    “देवाचे ते देवाला भरून द्या,” हे उद्धारकाचे शब्द कारस्थानी यहूद्यांना कडक कानउघाडणी होती. देवाशी एकनिष्ठा राहून आज्ञापालन केले असते तर त्यांच्या राष्ट्राचा भंग झाला नसता आणि परकी सत्तेखाली ते आले नसते. यरुशलेम नगरावर रोमन ध्वज फडकला नसता, त्याच्या दरवाजावर रोमी पहारेकरी राहिला नसता, रोमन राजपालाचा अधिकार नगराच्या भीतीच्या आत चालला नसता. देवाचा त्याग केल्यामुळे यहूदी राष्ट्र शिक्षा भोगीत होते.DAMar 524.3

    परूश्यांनी त्याचे उत्तर ऐकल्यावर “आश्चर्य केले आणि त्याला सोडून गेले.’ त्यांचा ढोंगीपणा व आढ्यता याबद्दल त्याने त्यांना दोष दिला आणि त्याद्वारे महान तत्त्व पुढे आणिले. सरकारशी आपले कर्तव्य व देवाशी आपले कर्तव्य यांच्यामधील आमच्या मर्यादा स्पष्ट करून सांगितल्या. पुष्कळांच्या मनातील सतावणारा प्रश्न सुटला. त्यानंतर त्यांनी सत्य तत्त्वाचे पालन केले. जरी अनेकांचे समाधान झाले नाही परंतु सतावणाऱ्या प्रश्नाचा खुलासा झाल्याबद्दल ख्रिस्ताच्या दूरदर्शीपणाचे त्यांनी आश्चर्य केले.DAMar 524.4

    परूश्यांना शांत केले नाही तोच सदूकी एक धूर्त प्रश्न घेऊन पुढे आले. दोन्ही गट परस्पर विरोधी होते. परूशी परंपरेचे, व सांप्रदायाचे कडक भोक्ते होते. धुणे, उपवास करणे, लांब लांब प्रार्थना करणे, दान देणे, बाह्य विधीसंस्कार पाळणे यामध्ये ते फार दक्ष होते. परंतु माणसांच्या तत्त्वांची शिकवण देऊन देवाचे नियमशास्त्र व्यर्थ केले आहे असे ख्रिस्ताने प्रतिपादिले. बहुधा हा गट हटवादी व आढ्यता मिरविणारा होता; तथापि त्यांच्यामध्ये काही प्रामाणिक व धार्मिक होते त्यांनी ख्रिस्ताची शिकवण स्वीकारली आणि त्याचे शिष्य बनले. सदूकी गटाने परूश्यांची परंपरागत नाकारली. पवित्र ग्रंथाच्या बहुअंशी भागावर विश्वास असल्याचे आणि त्याप्रमाणे ते कृती करीत असल्याचे ते सांगत असे; परंतु प्रत्यक्षात ते नास्तिक्यवादी व आधिभौतिकवाद मांडणारे होते.DAMar 524.5

    देवदूतांचे अस्तित्व, मृतांचे पुनरुत्थान आणि भावी जीवन त्याची शिक्षा किंवा इनाम यांचा सदूक्यांनी नाकार केला होता. ह्या सर्व मुद्यावर ते परूशी लोकापासून दूर होते. ह्या दोन गटात पुनरुत्थानाच्या बाबतीत संघर्ष, वादविवाद होता. परूश्यांचा पुनरुत्थानावर ठाम विश्वास होता परंतु भावी अवस्थेबाबतीत त्यांचे विचार गोंधळाचे होते. त्यांना मरण स्पष्ट न करणारे गूढ होते. सदूक्यांच्या वादाला उत्तर देण्यास समर्थ नसल्यामुळे त्यांच्यातील क्षोम अधिकच वाढला. दोन गटातील वादविवादाची परिणति बहुदा भांडणामध्ये होऊन ते एकमेकापासून अधिकच दूर राहात असत.DAMar 525.1

    सदूकी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा संख्येने कमी होते आणि सामान्य दर्जाच्या लोकावर त्यांची भक्कम पकड नव्हती; परंतु त्यांच्या पैकी अनेकजन श्रीमंत होते आणि पैसा मिळविण्याच्या बाबतीत त्यांचा संबंध होता. त्या वर्गामध्ये याजक येत होते आणि त्यांच्यातूनच प्रमुख याजकाची निवड करण्यात येत असे. त्यांच्या संशयखोर मताला प्राधान्य देण्यात येणार नाही या अटीवर हे घडत होते. याजकाचे पद सांभाळताना सदूकी लोकांना वरकरणी परूश्यांच्या तत्त्वाला मान्यता देणे भाग पडत होते कारण त्यांची संख्या जास्त आणि दबावही भारी होता; परंतु असे पद भुषविण्यास ते पात्र असल्यामुळे त्यांच्या चुकांनाही महत्त्व प्राप्त झाले.DAMar 525.2

    सदूकी लोकांनी येशूची शिकवण नाकारली. त्याला आत्म्याच्याद्वारे प्रोत्साहन मिळत होते हा विचार त्यांना मान्य नव्हता आणि देव व भावी आयुष्य-जीवन याविषयीची त्याची शिकवण त्यांच्या तात्त्विक भूमिकेशी विसंगत होती. मनुष्यापेक्षा वरच्या दर्जाचा फक्त देव आहे असा त्यांचा विश्वास होता; परंतु त्यांचा मुद्दा असा होता की, सर्वश्रेष्ठ ईश्वर व दिव्य दूरदृष्टी यांच्याद्वारे मनुष्य स्वतंत्र विचारसरणीला वंचित होईल व शेवटी तो गुलाम होऊन बसेल. देवाने मनुष्याला निर्माण केल्यावर त्याला वरच्या वर्चस्वाखाली न आणता स्वतंत्र वृत्तीचा ठेविला आहे असा त्यांचा विश्वास होता. स्वतःचे जीवन निर्बंधित ठेवण्यास आणि जगातील घटनांना आकार देण्यास मनुष्य मोकळा आहे असे त्यांचे मत होते. म्हणजे त्याचे भवितव्य त्याच्या हातात होते. देवाचा आत्मा मानवी कृती द्वारे किंवा नैसर्गिक साधनाद्वारे कार्य करितो ह्याचा ते नाकार करितात. तथापि स्वाभाविक शक्तीचा वापर केल्याने मनुष्य ज्ञानी-प्रकाशमान होऊन वरच्या पातळीवर जाऊ शकतो आणि कठोर, कडक बळजबरीने त्याच्या जीवनाचे शुद्धीकरण होऊ शकते असा त्याचा विश्वास होता.DAMar 525.3

    देवाविषयीच्या संकल्पनेने त्यांच्या स्वतःच्या शीलस्वभावाला आकार आला. त्यांच्या मताप्रमाणे त्याला मनुष्यामध्ये स्वारस्य नव्हते, म्हणून त्यांना परस्पराविषयी मान नव्हता आणि एकी नव्हती. मनुष्याच्या कृतीवरील पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा प्रभाव नाकारल्यामुळे त्यांच्या जीवनांत त्याच्या सामर्थ्याची उणीवता भासली. बाकीच्या यहृद्याप्रमाणे आम्ही आब्राहामाची मुले आहोत ह्या जन्मसिद्ध हक्काविषयी, नियमशास्त्राचे कडक पालन करण्याविषयी ते फुशारकी मारीत होते; परंतु नियमशास्त्राचा खरा आशय-भावार्थ आणि आब्राहामाचा विश्वास व उपकार बुद्धी या बाबतीत ते कंगाल होते. जीवनातील सुख समाधान व कृपाप्रसाद प्राप्त करून घेणे सर्व लोकांना शक्य आहे असा त्यांचा विश्वास होता आणि दुसऱ्यांच्या गरजा व व्यथा यांच्यामुळे त्यांचे हृदय कळवळले नाही. ते स्वतःसाठीच जगत होते.DAMar 526.1

    देवाच्या सामर्थ्याने साध्य झालेल्या अनन्य साधारण परिणामाची, भावी जीवनाची व मानवाचा पिता असलेल्या देवाची साक्ष ख्रिस्ताने आपल्या उक्तीने व कृतीने दिली. उपकार बुद्धी व दया यांच्याद्वारे त्याने ती प्रगट केली पण तीच निवडक लोकाशी संबंध ठेवणाऱ्या स्वार्थी सदूकींना धमकी होती. मानवाच्या ऐहिक आणि अनंत कल्याणसाठी देव पवित्र आल्याद्वारे कार्य करितो ही शिकवण त्याने दिली. मानवी सामर्थ्यावर विसंबून राहाणे चुकीचे आहे हे त्याने दाखविले. कारण शीलस्वभावाचे परिवर्तन केवळ देवाच्या आत्म्याद्वारे घडून येते.DAMar 526.2

    ह्या शिकवणीची अपकिर्ती करण्याचा घाट सदूक्यांनी घातला होता. येशूबरोबर संघर्ष निर्माण करण्याद्वारे, जरी त्याला शिक्षा झाली नाही तरी त्याची अपकिर्ती होईल असे त्यांना वाटले. पुनरुत्थान ह्या विषयावर प्रश्न विचारण्याचे त्यांनी ठरविले. त्यांच्याशी तो सहमत झाला तर त्याद्वारे तो परूश्यांचा अपराधी ठरेल. त्यांच्याशी मतभेद झाले तर त्याच्या शिकवणीची टर उडविण्याचा त्यांचा बेत होता.DAMar 526.3

    सदूकी लोकांची विचारसरणी होती की मनुष्याच्या मर्त्य व अमर्त्य अवस्थेत शरीराची रचना भौतिक वस्तूच्या परमाणूपासून झालेली आहे तर मरणातून उठविल्यावर त्यांच्या शरीरात मांस आणि रक्त असले पाहिजे आणि पृथ्वीवर खंड पडलेले जीवन सनातन जगात पुन्हा सुरू झाले पाहिजे. त्यावरून त्यांनी निष्कर्ष काढिला की पृथ्वीवरील नाते पुन्हा चालू राहील, नवरा बायको पुन्हा एकत्र येतील, विवाह पूर्ण होतील आणि मरणाच्या अगोदर जे होते ते सर्व व्यवस्थित पुढे चालू राहील, ह्या जगातील दुर्बलता व मनोविकार पुढील जीवनात जागृत राहातील.DAMar 526.4

    त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी येशूने भावी जीवनावरील पडदा बाजूला सारिला. त्याने म्हटले, “पुनरुत्थानात ते लग्न करून घेत नाहीत आणि लग्न करून देतही नाहीत; तर स्वर्गातील देवदूतांप्रमाणे असतात.” सदूकी लोकांचा विश्वास चुकीचा होता हे त्याने दर्शविले. त्यांची विचारसणी चुकीची होती. तो पुढे म्हणाला, “तुम्हास शास्त्र व देवाचे सामर्थ्य न कळल्यामुळे तुम्ही भ्रमात पडला आहा.” परूश्यांना त्यांच्या ढोंगीपणाबद्दल दोष दिला होता तसा आरोप त्याने सदूक्यांवर केला नाही, परंतु त्यांच्या विश्वासात चूक असल्याचे सांगितले.DAMar 526.5

    शास्त्राचे कडकरित्या पालन करीत आहेत असे फुशारकीने सदूकी स्वतःविषयी सांगत असत. परंतु त्याचा खरा अर्थ त्यांना कळला नाही हे ख्रिस्ताने दाखविले. पवित्र आत्म्याच्या प्रकाशाने ज्ञान संपादन केले पाहिजे. त्याने प्रतिपादिले की, पवित्र शास्त्र व देवाचे सामर्थ्य न कळल्यामुळे त्यांच्या विश्वासाचा गोंधळ व मनाचा अंधार झाला होता. देवाचे रहस्य मानवी मर्यादित विचारसरणीत बसविण्याचा त्यांचा कयास होता. पवित्र सत्य समजण्यासाठी मने मोकळी करण्यास ख्रिस्ताने त्यांना आवाहन केले कारण त्याद्वारे त्यांची आकलनशक्ती प्रगल्भ व तीव्र होईल. देवाचे रहस्य न समजल्यामुळे हजारो लोक अश्रद्धाळू, धर्मनिंदक बनतात. दिव्य सामर्थ्याच्या प्रदर्शनाचे ते स्पष्टीकरण करू शकत नाहीत म्हणून त्या सामर्थ्याच्या पुराव्याचा ते त्याग करितात आणि त्याचे श्रेय निसर्गातील घटनेला देतात. आपल्या सभोवती असलेल्या गूढ गोष्टींचा समज होण्यासाठी आम्ही देवाच्या सामर्थ्यावर व त्याच्या उपस्थितीवर विश्वास ठेवून ते मान्य केले पाहिजे. देव विश्वाचा निर्माणकर्ता आहे आणि तो आज्ञा करितो व सर्व काही घडते असे मनुष्याने मान्य करून ओळखिले पाहिजे. त्याचा स्वभाव व त्याच्या कर्तृत्वाचे रहस्य यांच्या विशाल व उदात्त दृश्याचे दर्शन झाले पाहिजे.DAMar 527.1

    ख्रिस्ताने श्रोतेजनाला सांगितले की मृतांचे पुनरुत्थान झाले नाही तर ज्या शास्त्रवचनावर तुम्ही विश्वास ठेविता ते निरर्थक ठरेल. त्याने म्हटले, “मृतांच्या पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हास सांगितले ते तुमच्या वाचण्यात आले नाही काय? ते असे की, मी आब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे. देव मृतांचा नव्हे, जीवंताचा आहे.” देवाला सुरवातीपासूनच अंत दिसतो आणि जणू काय साध्य झाले आहे असे कार्याची निष्पति पाहातो. आदामापासून शेवटचा संत मरेपर्यंत असे मोल्यवान मृत देवपुत्राची वाणी ऐकतील आणि अनंत जीवन जगण्यासाठी कबरेतून उठतील. देव त्यांचा देव होईल आणि ते त्याचे लोक होतील. देव व पुनरुत्थित संत यांच्यामध्ये घनिष्ठ आपुलकीचे नाते राहील. त्याच्या उद्दिष्टासंबंधाने अपेक्षिलेली ही परिस्थिती अगोदरच तेथे असल्याचे त्याला दिसते. त्याच्यासाठी मृत जीवंत राहातात.DAMar 527.2

    ख्रिस्ताच्या वक्तव्याने सदूकी शांत झाले. ते त्याला उत्तर देऊ शकले नाहीत. त्याच्यावर दोषारोप करण्यासाठी किंचितही फायदा करून घेता येईल असा एकही शब्द उच्चारण्यात आला नव्हता. त्याच्या प्रतिस्पर्थ्यांना त्यांचा काहीच फायदा झाला नाही उलट लोकांचा तिटकारा सोसावा लागला.DAMar 527.3

    त्याचे बोल त्याच्याविरुद्ध वापरता येतील असे उद्गार काढायला भाग पाडण्याचे प्रयत्न परूश्यांनी सोडले नाहीत. दहा आज्ञापैकी सर्वांत महत्त्वाची आज्ञा कोणती असा प्रश्न येशूला विचारायला लावण्यास त्यांनी काही विद्वान शास्त्र्यांना प्रोत्साहन दिले.DAMar 527.4

    पहिल्या चार आज्ञामध्ये मनुष्याचे त्याच्या उत्पन्नकर्त्याशी असलेले कर्तव्य सांगितले आहे त्या, ज्या सहा आज्ञामध्ये मनुष्याचे मनुष्याशी असलेल्या कर्तव्याचा उल्लेख केला त्यांच्यापेक्षा महत्त्वाच्या आहेत असे परूश्यांची धारणा होती. त्याचा परिणाम व्यावहारीक सदाचरणावर व धार्मिकतेवर झाला. येशूने लोकांना त्यांची उणीवता दाखविली होती आणि सत्कृत्याचे महत्त्व समजावून सांगितले होते आणि फळावरून झाडाची परीक्षा होते असेही जाहीर केले होते. ह्या कारणावरून तो पहिल्या चार आज्ञापेक्षा दुसऱ्या सहा आज्ञाना फार महत्त्व देतो असा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता.DAMar 528.1

    एका वकीलाने येशूला सरळ स्पष्ट प्रश्न केला, “सर्वात पहिली आज्ञा कोणती?’ ख्रिस्ताचे उत्तरही सरळ आणि जोरदार होतेः “पहिली आज्ञा ही आहे की, हे इस्राएल, श्रवण कर; आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे; तू आपला देव परमेश्वर याजवर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण बुद्धीने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे.” हिच्यासारखीच दुसरी एक आहे येशूने म्हटले, “तू आपल्या शेजाऱ्यावर आपणासारखी प्रीती कर. ह्यांच्यापेक्षा दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही.” “या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदिष्टशास्त्र ही अवलंबून आहेत.”DAMar 528.2

    दहा आज्ञांतील पहिल्या चार आज्ञाचा सारांश एका आज्ञामध्ये काढण्यात आला आहे, “आपला देव परमेश्वर याजवर पूर्ण अंतःकरणाने प्रीती कर.’ शेवटच्या सहा आज्ञा “तू आपल्या शेजाऱ्यावर आपणासारखी प्रीती कर’ या मध्ये समाविष्ट केल्या आहेत. ह्या दोन्ही आज्ञामध्ये प्रेमतत्त्व प्रदर्शित करण्यात आले आहे. दुसरी आज्ञा मोडली तर पहिलीचे पालन करू शकत नाही आणि पहिली मोडली तर दुसरीचे पालन करता येत नाही. जेव्हा आपल्या अंतःकरणात देवाला आद्य स्थान देतो तेव्हा आमच्या शेजाऱ्याला इष्ट स्थान देण्यात येईल. आपणासारखी आम्ही त्याच्यावर प्रीती करू. जेव्हा आम्ही परमेश्वरावर पराकाष्टेने प्रीती करितो तेव्हाच आपल्या शेजाऱ्यावर निःपक्षपातीपणाने प्रीती करणे शक्य होते.DAMar 528.3

    ज्या अर्थी सर्व आज्ञांचा सार देवावरील व मानवावरील प्रेम यामध्ये अंतर्भूत आहे त्याअर्थी ह्या तत्त्वाचा भंग केल्याशिवाय दुसरी कोणतीही आज्ञा मोडली जाणार नाही. याप्रमाणे ख्रिस्ताने श्रोतेजनाना शिकविले की देवाच्या नियमशास्त्रात वेगवेगळे अनेक नियम नसून त्यातील काही दुसऱ्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत असे म्हणणेही इष्ट नाही. आपला प्रभु पहिल्या चार आणि शेवटच्या सहा आज्ञा ह्या सर्व दिव्य एक आहेत असे सादर करितो आणि सर्व आज्ञांच्या पालनाद्वारे देवावरील प्रेम दर्शविण्यात येईल असे शिकवितो.DAMar 528.4

    येशूला प्रश्न विचारलेल्या शास्त्र्याचा नियमशास्त्रावरील अभ्यास दांडगा होता आणि त्याचे बोल ऐकून तो आश्चर्यचकित झाला. ख्रिस्ताने धर्मशास्त्राचे गूढ आणि पूर्ण ज्ञान व्यक्त करावे अशी अपेक्षा त्याने केली नव्हती. पवित्र नियमामध्ये अंतर्भूत असलेल्या तत्त्वाचे सखोल ज्ञान त्याने संपादन केले. तेथे जमलेले याजक व अधिकारी यांच्यासमोर त्याने प्रामाणिकपणे कबुली दिली की, ख्रिस्ताने नियमशास्त्राचा खुलासा अगदी बरोबर केला, आणि म्हटले, “गुरूजी, आपण खरोखर बोलला की, देव एकच आहे, आणि त्याच्याशिवाय दुसरा नाही; आणि पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने व पूर्ण शक्तीने त्याजवर प्रीती करणे, आणि जशी आपणावर तशी शेजाऱ्यावर प्रीती करणे हे सर्व होम व यज्ञ यापेक्षा अधिक आहे.”DAMar 528.5

    ख्रिस्ताच्या उत्तरातील सुज्ञपणाने शास्त्र्याला दोषी ठरविले. आंतरीय धर्मनिष्ठे ऐवजी बाह्यात्कारी विधि संस्कारांनी भरलेला यहूदी धर्म आहे हे त्याला माहीत होते. केवळ विधिसंस्कार पाळण्यात आणि श्रद्धेविना पापक्षालनासाठी रक्त सांडण्यात त्याला गुणहीनता वाटली. देवावर प्रेमकरणे व त्याची आज्ञा पाळणे आणि मानवासाठी निःस्वार्थी आदरभाव दाखविणे हे सर्व संस्कारापेक्षा भारी किंमतीचे त्याला वाटले. ख्रिस्ताच्या विचारसरणीतील बिनचूकपणा मान्य करणे आणि लोकासमोरील त्याची तात्कालिक प्रतिक्रिया यावरून याजक व अधिकारी यांच्यापेक्षा एकदम पूर्णपणे भिन्न मनोवृत्ती त्या मनुष्याची दिसली. मनातील निश्चित मत उघड मांडून यांजकांच्या नापसंतीला आणि अधिकाऱ्यांच्या धमकीला धैर्याने तोंड दिलेल्या त्या प्रामाणिक शास्त्र्यासाठी येशूला दया आली, कीव आली. “त्याने शहाणपणाने प्रत्युत्तर दिले हे पाहून येशूने त्याला म्हटले, तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस.” DAMar 529.1

    तो शास्त्री देवाच्या राज्यानजीक होता, म्हणजे त्याने होमार्पण व यज्ञ यांच्यापेक्षा धार्मिकतेची कृत्ये देवाला मान्य आहेत हे जाणले. परंतु ख्रिस्ताचा दिव्य स्वभाव त्याने ओळखण्याची आणि धार्मिकतेची कृत्ये करण्यासाठी त्याच्यावरील विश्वासाद्वारे सामर्थ्य प्राप्त करून घेण्याची जरूरी होती. जीवंत विश्वासाच्याद्वारे ख्रिस्ताशी संबंध जोडल्याशिवाय विधिसंस्काराला काही महत्त्व नाही. उद्धारकाच्या संबंधात त्यांचा समज करून घेतला नाही तर नैतिक नियमसुद्धा त्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात कमी पडतील. केवळ अधिकाराने दिलेला हुकूम म्हणून स्वीकार करण्यापेक्षा पित्याने दिलेल्या नियमशास्त्रात अधिक खोल अर्थ आहे असे ख्रिस्ताने वारंवार दाखविले आहे. सुवार्तेमध्ये जे तत्त्व प्रगट केले आहे तेच नियमशास्त्रामध्ये अंतर्भूत आहे. नियम मनुष्याचे कर्तव्य आणि त्याचा अपराध दर्शवितो. ख्रिस्ताच्या दृष्टीने त्याने पापक्षमा करून घेतली पाहिजे आणि आज्ञापालनासाठी सामर्थ्याची अपेक्षा केली पाहिजे.DAMar 529.2

    ख्रिस्ताने शास्त्राच्या प्रश्नाचे उत्तर दिले तेव्हा परूश्यांनी येशूच्या जवळ गर्दी केली होती. वळून त्याने त्यांना प्रश्न विचारलाः “ख्रिस्ताविषयी तुम्हास काय वाटते? तो कोणाचा पुत्र आहे?” मशिहा विषयी त्यांच्या विश्वासाची कसोटी करण्यासाठी - त्याला एक मनुष्य आहे म्हणून स्वीकारतात किंवा देवपुत्र म्हणून मानतात हे पाहाण्यासाठी त्याने हा प्रश्न विचारिला. त्यांनी उत्तर दिले, “दाविदाचा पुत्र.’ भाकीतामध्ये मशिहाला ह्या नावाने संबोधिले आहे. जेव्हा अद्भुत शक्तीने येशूने महान चमत्कार करून आपले देवत्व प्रगट केले, जेव्हा दुखणाईतांना बरे केले व मृतास उठविले तेव्हा लोकांनी आपापसांत विचारणा करताना म्हटले, “हा दाविदाचा पुत्र नाही काय?” कनानी बाई, अंध बीमास आणि दुसऱ्या अनेकांनी मदतीसाठी विनंती केली, “प्रभो, दाविदाचे पुत्र, मजवर दया कर.’ यरुशलेमात येशूचा जयोत्सवाने प्रवेश होत असताना असा गजर झाला की, “दाविदाच्या पुत्राला होसान्ना; प्रभूच्या नामाने येणारा धन्यवादित असो.” मत्तय २१:९. मंदिरातील लहान मुले त्याला उद्देशून प्रतिध्वनि काढीत होते. दाविदाचा पुत्र असा उल्लेख करण्यापैकी कित्येकांना त्याच्या देवत्वाचा उमज झाला नाही. दाविदाचा पुत्र, देवपुत्रही आहे हे त्यांना समजले नाही..DAMar 529.3

    दाविदाचा पुत्र ह्या विधानाच्या बाबतीत उत्तर देताना ख्रिस्ताने म्हटले, “तर मग दाविदाने आत्म्याच्या प्रेरणेने त्याला प्रभु असे कसे म्हटले? तो म्हणतो, परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, मी तुझ्या शत्रूस तुझ्या पायांखाली घालीपर्यंत तू उजवीकडे बैस. दावीद जर त्याला प्रभु म्हणतो तर तो त्याचा पुत्र कसा होईल? तेव्हा कोणाला त्यास उत्तर देता येईना; आणि त्या दिवसापासून त्याला आणखी काही विचारवयास कोणीही धजला नाही.”DAMar 530.1