Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

युगानुयुगांची आशा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ४६—त्याचे दिव्य रूपात रूपांतर झाले

    मत्तय १७:१-८; मार्क ९:२-८; लूक ९:२८-३६.

    संध्याकाळ होत होती. येशूने आपल्या तीन शिष्यांना पेत्र, याकोब व योहान, शेतातून खडतर वाटेने एका उंच डोंगरावर एकांती नेले. सबंध दिवसभर उद्धारक व शिष्य यांनी आपला वेळ प्रवासात व शिक्षण देण्यात घालविला आणि डोंगराची चढण चढण्याने त्यांना फार थकवा आला. ख्रिस्ताने पुष्कळांना शारीरिक व मानसिक दृष्ट्या व्याधिमुक्त केले; त्यांच्या अशक्तपणात त्यांना जीवनातील स्फूरण, आनंद प्राप्त करून दिला. मानवता परिधान केल्यामुळे तोसुद्धा शिष्यांबरोबर चढाव चढून थकून गेला होता.DAMar 368.1

    सूर्यास्तानंतरचा संधिप्रकाश डोंगर माथ्यावर अजून घुटमळत होता आणि त्यांच्या वाटेवर अंधुक छटा जाणवत होत्या. परंतु लवकरच डोंगर माथ्यावरील तसेच दरीतील प्रकाश नाहीसा होऊन हे एकटे प्रवाशी रात्रीच्या अंधारात सापडले. आजूबाजूचा अंधार त्यांच्या उदासीन मनासारखा वाटला आणि त्यांच्या सभोवती मेघांची गर्दी होत होती.DAMar 368.2

    ख्रिस्त कोठे जात आहे व कशासाठी असे विचारायला शिष्यांनी धाडस केले नाही. वारंवार त्याने सबंध रात्र डोंगरावर प्रार्थना करण्यात घालविली होती. ज्याने डोंगर आणि दऱ्या निर्माण केल्या त्याला निसर्गातील प्रशांत वातावरणात घालवायला हायसे वाटत होते. ख्रिस्ताच्या मागे शिष्य जात होते; तथापि ते थकलेले भागलेले असताना प्रभु त्यांना ही चढण चढायला का लावत होता याचे ते आश्चर्य करीत होते, आणि त्यालाही विसाव्याची फार गरज होती.DAMar 368.3

    आता ख्रिस्त त्यांना यापुढे जायाची काही आवश्यकता नाही असे सांगतो. थोडेसे बाजूला जाऊन दुःखाने व्याकूळ झालेल्या मनुष्याने आक्रोश करून व ओक्साबोक्सी रडून आपल्या विनम्र प्रार्थना सादर केल्या. मानवतेच्या वतीने येणाऱ्या तीव्र कसोटीला तोंड देण्यासाठी सामर्थ्य लाभावे म्हणून तो प्रार्थना करीत होता. सर्वसमर्थ देवाशी त्याला नव्याने पकड धरायची होती कारण केवळ त्याद्वारेच तो भविष्याला तोंड देऊ शकत होता. अंधकाराच्या सामर्थ्याचा धुमाकूळ माजेल तेव्हा शिष्यांचा विश्वास ढळू नये म्हणून तो त्यांच्यासाठी काकुळतेने आर्जवे करीत होता. त्यावेळी दाट धुके होते परंतु त्याची त्याने पर्वा केली नाही. रात्रीचा काळोख गडद होत होता परंतु त्याचा स्वतःवर परिणाम होऊ दिला नाही. अशा प्रकारे वेळ संथपणे जात होती. प्रारंभी शिष्य त्याच्याबरोबर प्रार्थनेत मनापासून भाग घेत होते परंतु थोड्या अवधीनंतर ते अगदी दमून थकून गेले. जरी त्यामध्ये असलेली गोडी राखण्याचा ते प्रयत्न करीत होते तरी शेवटी ते झोपेला वश झाले. आपल्या व्यथेविषयी येशूने त्यांना सांगितले होते; प्रार्थनेमध्ये ते त्याच्याबरोबर सामील होतील म्हणून त्याने त्यांना आपल्या बरोबर नेले होते. आतासुद्धा तो त्यांच्यासाठी प्रार्थना करीत होता. उद्धारकाने शिष्यांची उद्विग्नता पाहिली होती आणि त्यांचा विश्वास निरर्थक नाही ही खात्री देऊन त्यांचे अति तीव्र दुःख हलके करण्यास तो उत्कंठीत होता. ईश्वरप्रणीत ज्ञान देण्यास तो इच्छित होता पण सर्वजण त्याचा स्वीकार करणार नव्हते. गेथशमेन येथे अपरिमित दुःख, यातना यांचे साक्षीदार होणारे ह्या डोंगरावर त्याच्याबरोबर राहाण्यास निवडिले होते. जग निर्माण करण्यापूर्वी पित्याबरोबर असलेले त्याचे गौरव शिष्यांना प्रगट करावे हे आता त्याच्या प्रार्थनेचे मुख्य ओझे होते. त्याच्या राज्याचे प्रगटीकरण मानवी नेत्रांना घडावे आणि त्याच्या दर्शनाने शिष्यांना मजबूत करावे ही त्याची दाट इच्छा होती. त्याच्या देवत्वाच्या प्रकटीकरणाचे ते साक्ष होतील यासाठी तो आर्जव करीत होता. त्याच्या प्राणांतिक दुःख यातनेच्या वेळी तो खात्रीने देवपुत्र आहे व हे लाजीरवाणे मरण तारणाच्या महान योजनेचा एक भाग आहे ह्या ज्ञानाने त्यांचे सांत्वन होईल, यासाठी तो प्रार्थना करीत होता.DAMar 368.4

    त्याची प्रार्थना ऐकण्यात आली. खडकाळ जमीनीवर विनम्र होऊन प्रार्थना करीत असताना एकाएकी आकाश उघडून देवाच्या मंदिराचे दरवाजे उघडले गेले आणि पवित्र तेजाने डोंगरावर उतरून उद्धारकाला संपूर्णपणे आच्छादिले. अंतर्भागातील (आतील) देवत्व मानवतेतून चमकले आणि वरून आलेल्या वैभवाशी भिडले. येशू ख्रिस्त आता देवाच्या वैभवात दिसला. अंतर्यामातील तीव्र वेदना नाहिशा झाल्या. त्याचे मुख “सूर्यासारखे” तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे “प्रकाशासारखी शुभ्र’ झाली.DAMar 369.1

    जागे झाल्यावर शिष्यांनी डोंगर गौरवाने प्रकाशीत झालेला पाहिला. ते भयभीत व चकीत होऊन त्यांनी प्रभूला प्रकाशासारिखे तेजस्वी पाहिले. थोड्या वेळाने पाहिल्यावर येशू तेथे एकटाच दिसला नाही. त्याच्याबरोबर संभाषण करीत असलेल्या दोन स्वर्गीय व्यक्ती दिसल्या. सिनाय पर्वतावर ज्याच्याशी देव संभाषण करीत होता तो एक मोशे होता. दुसरा, मरणाच्या अधिकाराखाली कदापी येणार नाही असा मान लाभलेला एलीया होता.DAMar 369.2

    पंधरा शतकापूर्वी पिसगाच्या शिखरावर उभे राहन मोशे आश्वासित भूमीकडे टक लावून पाहात होता. परंतु मेरीबा येथील त्याच्या पापामुळे त्याला तेथील प्रवेश नाकारला होता. इस्राएल लोकांना त्यांच्या पित्यांच्या वतनात घेऊन जाण्याचा आनंद त्याला इतका नव्हता. व्यथा देणारी त्याची विनंती “तर मला पार उतरून जाऊ दे आणि यार्देन पलीकडे असलेला तो उत्तम देश, तो उत्तम पर्वत आणि लबानोन ही माझ्या दृष्टीस पडू दे’ (अनुवाद ३:२५) नाकारली होती. चाळीस वर्षे अरण्यात भ्रमण करण्याच्या अंधारी अनुभवाचा प्रकाशात रूपांतर होण्याची आशा नाकारण्यात आली. तितक्या वर्षांच्या कष्टांचे आणि मनापासून वाहिलेल्या काळजीचे साध्य अरण्यातील कबर होती. परंतु “आपण ज्याची काही मागणी किंवा कल्पना करितो त्यापेक्षा आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीने” (इफिस ३:२०) ह्या बाबतीत त्याच्या दासाची विनवणी ऐकली. मोशे मरणाच्या अधिपत्यातून मुक्त झाला, त्याला कबरेत राहायाचे नव्हते. स्वतः ख्रिस्ताने त्याला जीवनदान दिले. भुलविणाऱ्या सैतानाने पापामुळे मोशेच्या शरीरावर हक्क सांगितला; परंतु उद्धारक ख्रिस्ताने त्याला कबरेतून बाहेर काढिले. यहूदा ९.DAMar 369.3

    रूपांतर झालेल्या डोंगरावर पाप व मरण यावरील ख्रिस्ताचा विजय याविषयी मोशे साक्षीदार होता. धार्मिकांच्या पुनरुत्थानाच्या वेळेस कबरेतून बाहेर येणाऱ्यांचे मोशेने प्रतिनिधित्व केले. ख्रिस्ताच्या द्वितियागमनाच्या समयी पृथ्वीवर जीवंत असणाऱ्याचे आणि “जे क्षणात, निमिषात शेवटल्या करण्याच्या वेळेस बदलून जातील आणि जे विनाशी ते अविनाशीपण परिधान करतील व जे मर्त्य ते अमरत्व परिधान करतील त्यांचे प्रतिनिधित्व एलीयाने केले. १ करिंथ. १५:५१-५३. द्वितियागमनाच्या वेळी तारणासाठी पापविरहित येईल त्या वेळेसारखी ख्रिस्ताने स्वर्गीय प्रकाशाची शुभ्र वस्त्रे परिधान केली होती. कारण तो “पवित्र देवदूतांच्या आणि आपल्या पित्याच्या गौरवाने येईल.” इब्री ९:२८; मार्क८:३८. उद्धारकाने शिष्यांना दिलेले आश्वासन आता पूर्ण झाले होते. डोंगरावर भावी गौरवी राज्याची लहान प्रतिकृति प्रगट करण्यात आली होती - ख्रिस्त राजा, पुनरुत्थीत संतांचे दर्शक मोशे आणि मरणाचा अनुभव न घेता उद्धारलेल्यांचे दर्शक एलीया.DAMar 370.1

    शिष्यांना ह्या दृश्याचा सुगावा लागला नव्हता; परंतु तो नम्र, सहनशील, सौम्य गुरूजी आणि असहाय्य स्थितीत इकडे तिकडे फिरणारा परका, अपरिचीत याचे स्वर्गातील चाहात्यांनी सन्मान केलेला पाहून त्यांना हर्ष झाला. मशीहा राजाची घोषणा करण्यासाठी आणि ह्या पृथ्वीवर ख्रिस्त आपले राज्य प्रस्थापीत करणार आहे हे घोषीत करण्यासाठी एलीया आला आहे असा त्यांचा विश्वास होता. त्याद्वारे त्यांची भीती आणि निराशा याचे स्मरण एकदाचे नाहीसे होणार होते. येथे देवाचे गौरव प्रगट करण्यात आले होते आणि तेथे ते राहाण्यास आतूर होते. प्रेत्राने म्हटले, “गुरूजी, आपण येथे असावे हे बरे आहेः तर आम्ही तीन मंडप करू या; आपणासाठी एक, मोशासाठी एक व एलीयासाठी एक.” त्यांच्या गुरूजीच्या संरक्षणार्थ आणि राजा या नात्याने त्याची सत्ता प्रस्थापीत करण्यासाठी मोशे आणि एलीया यांना पाठविले आहे असा शिष्यांचा ठाम विश्वास होता.DAMar 370.2

    परंतु राजारोहनाच्या अगोदर वधस्तंभाचा अनुभव आला पाहिजे. ख्रिस्ताबरोबरच्या बैठकीत त्याच्या राज्याभिषेकाचा नाही तर यरुशलेमात घडून येणाऱ्या त्याच्या मृत्यूबद्दल विचारविनिमय करण्यात आला. मानवतेची दुर्बलता अंगिकारून आणि त्यांची व्यथा व अधर्म यांचे ओझे ख्रिस्ताला एकट्यालाच वाहावे लागले. येणाऱ्या कसोटीची तीव्रता गडद काळोखासारखी झाली तेव्हा तो एकाकीपणामुळे आत्म्यात उद्विग्न झाला आणि जगाने त्याला ओळखले नाही. स्वतःचेच दुःख, संशय व महत्वाकांक्षी आशा यांच्यामध्ये रमून गेल्यामुळे त्याच्या प्रिय शिष्यांना त्याच्या कार्याचे रहस्य उकलेले नाही. स्वर्गातील प्रेम व संगत सोबत यांच्यामध्ये तो राहिलेला होता परंतु स्वतः निर्माण केलेल्या जगात तो एकांतवासात होता. आता स्वर्गाने येशूकडे आपले निरोपे पाठविले होते; दूत नाही, परंतु ज्यांनी दुःख व व्याधी सहन केल्या होत्या आणि पृथ्वीवरील जीवनात कसोटीच्या समयी ख्रिस्ताला सहानुभूती दाखवतील अशी माणसे पाठविली होती. मोशे आणि एलीयाने ख्रिस्ताबरोबर काम केले होते. लोकांच्या उद्धारासाठी तो किती उत्कंठित आहे ह्याची कल्पना त्यांना होती. इस्राएल लोकांसाठी मोशेने काकळुतीने विनंती केली होतीः “तरी आता तू त्यांच्या पातकांची क्षमा करशील तर; न करशील तर तूं लिहिलेल्या वहीतून मला काढून टाक.’ निर्गम ३२:३२. आत्म्याची उद्विग्नता एलीयाने अनुभवली होती कारण साडे तीन वर्षांच्या दुष्काळाच्या काळात राष्ट्राचा द्वेष व त्याच्या व्यथा त्याने अनुभवल्या होत्या. कार्मेल पर्वतावर देवासाठी तो एकाटाच होता. निराशा व मनोवेदना यामुळे ओसाड अरण्यात त्याला एकट्यालाच पळावे लागले. सिंहासनाभोवतालचे सर्व दूत सोडून ख्रिस्ताला सहन कराव्या लागणाऱ्या व्याधीविषयी हितगूज करून दिव्य सहानुभूतीची खात्री देऊन त्याचे समाधान करण्यास ही माणसे आली होती. जगाची आशा, प्रत्येक मानवाचा उद्धार हा त्यांच्या मुलाखतीचा मुख्य भाग होता.DAMar 371.1

    शिष्य झोपेत असल्यामुळे ख्रिस्त आणि स्वर्गीय निरोपे यांच्यामधील संवाद त्यांनी पुसट पुसट ऐकिला. जागृत राहा व प्रार्थना करा यामध्ये ते अपयशी झाल्यामुळे ख्रिस्ताच्या दुःखाविषयीचे व त्यानंतर येणारे गौरव यांचे ज्ञान त्यांना मिळाले नाही. हे ज्ञान त्यांना देण्याची देवाची इच्छा होती. त्याच्या स्वार्थत्यागाचे भागीदार होण्याद्वारे मिळणारा कृपाप्रसाद याला ते पारखे झाले. हे शिष्य विश्वास ठेवण्यास अंतःकरणाचे मंद होते. त्यांना समृद्ध करणाऱ्या स्वर्गाच्या दानाविषयी गुणग्राहकता दाखविण्यास ते कमी पडले.DAMar 371.2

    तथापि त्यांना महान प्रकाश मिळाला. ख्रिस्ताच्या नाकार करण्यातील यहूदी राष्ट्राच्या पापाविषयी संपूर्ण स्वर्ग ज्ञात होता याची त्यांना खात्री दिली. उद्धारकाच्या कार्याविषयी त्यांना पूर्ण ज्ञान देण्यात आले होते. मनुष्याला आकलन न होणाऱ्या गोष्टी त्यांनी प्रत्यक्ष कानांनी ऐकल्या व प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्या. ते “त्याचे वैभव प्रत्यक्ष पाहाणारे होते” (२ पेत्र १:१६), कुलपती व संदेष्टे यांनी साक्ष दिलेला आणि सबंध स्वर्गाने तसा मान्य केलेला असा हा येशू खरोखर मशीहा होता असे त्यांना स्पष्ट कळले.DAMar 371.3

    डोंगरावरील दृश्याकडे ते टक लावून पाहात असताना “तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली; आणि पाहा, मेघातून अशी वाणी झालीः हा माझा पुत्र, मला परम प्रिय आहे, याजवर मी संतुष्ट आहे; याचे तुम्ही ऐका.’ अरण्यामध्ये इस्राएल लोकांच्यापुढे जाणाऱ्या मेघस्तंभापेक्षा तेजस्वी असलेला मेघस्तंभ त्यांनी पाहिला; आणि डोंगर कंप पावणारी देवाची भव्य ऐश्वर्याची वाणी जशी त्यांनी ऐकली तसे शिष्य जमिनीवर पालथे पडले व फार भयभीत झाले. ते तसेच पडून राहिले व त्यांचे चेहरे झाकले गेले. नंतर येशूने जवळ येऊन त्यांना स्पर्श केला आणि “उठा, भिऊ नका” ह्या सर्व परिचित शब्दांनी त्याने त्यांची भीती काढून टाकिली. डोळे वर करून पाहाताना दिव्य तेजस्वी गौरव नाहीसे झाले होते, मोशे व एलीया यांच्या आकृती अदृश्य झाल्या होत्या. ते केवळ येशू बरोबर डोंगरावर एकटेच होते.DAMar 372.1