Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

युगानुयुगांची आशा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय ५०—हेरगिरीच्या पाशात

    योहान ७:१६-३६, ४०-५३; ८:१-११.

    सणाच्या समयी येशू ख्रिस्त यरुशलेमात असतांना त्याच्यावर हेरगिरीची गुप्त पाळत होती. त्याला गप्प करण्यासाठी प्रत्येक दिवशी नवी नवी कारस्थाने वापरात येत होती. त्याला अडचणीत फकडण्यासाठी याजक व अधिकारी आतुरतेने टेहळणी करीत होते. जबरदस्तीने त्याचे कार्य बंद पाडण्याची त्यांची योजना होती. परंतु हेच काही सगळे नव्हते. सर्व लोकांच्यासमोर ह्या गालीली गुरूजीची मानहानी करण्याचा त्यांचा निर्धार होता.DAMar 398.1

    सणाच्या पहिल्याच दिवशी अधिकारी त्याच्याकडे आले आणि कोणत्या अधिकाराने आपण हे प्रबोधन करीत आहा असे विचारू लागले. ह्यावरून त्याच्यावरील लक्ष शिक्षण देण्याच्या त्याच्या अधिकाराकडे वळविण्याचा त्यांचा इरादा होता आणि त्याद्वारे स्वतःचा अधिकार व महती गाजविण्याचा प्रयत्न होता.DAMar 398.2

    येशूने म्हटले, “माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठविले त्याची आहे. त्याच्या इच्छेप्रमाणे करावयास कोणी मनात आणिल्यास ह्या शिकवणी विषयी त्याला समजेल की ही देवापासून आहे किंवा मी आपल्या मनचे बोलतो.” योहान ७:१६, १७. कारणावाचून दोष लावणाऱ्यांना येशने दोषाचे निराकरण करण्यासाठी उत्तर दिले नाही परंतु आत्म्याच्या उद्धारासाठी असलेले महत्त्वाचे सत्य त्यांच्यासमोर मांडले, उघड केले. सत्याविषयीचे ज्ञान होणे आणि त्याची गुणवता जाणणे बुद्धीपेक्षा मनावर (अंतःकरणावर) अधिक अवलंबून आहे असे त्याने म्हटले. आत्म्याने सत्य समाविष्ट करून घेतले पाहिजे आणि त्याला संमती देण्यास ते इच्छाशक्तीवर हक्क गाजविते. सत्याच्या बाबतीत केवळ वैचारिक दृष्टीकोनातून पाहिल्यास त्याचा स्वीकार करताना अहंपणा आड येणार नाही. परंतु त्याचा स्वीकार अंतःकरणात कार्यरत असलेल्या कृपेद्वारे केला पाहिजे, आणि त्याचा स्वीकार देवाच्या आत्म्याने प्रगट केलेल्या प्रत्येक पापाचा त्याग करण्यावर अवलंबून आहे. सत्याविषयीचे ज्ञान संपादन करणे कितीही मोठे कृत्य असले परंतु ते स्वीकारण्यासाठी अंतःकरण मोकळे नाही आणि त्याच्या तत्त्वाला विरोध करणारी प्रत्येक संवय आणि प्रत्येक कृती सोडून दिली नाही तर त्याचा त्याला लाभ होणार नाही. जे मनापासून देवाला शरण जातात आणि त्याची इच्छा जाणून त्याप्रमाणे करण्यास प्रामाणिक राहातात त्यांना सत्य तारणासाठी देवाचे सामर्थ्य असल्याचे प्रगट करण्यात येते. तो देवासाठी बोलतो किंवा स्वतः मनचे बोलतो ह्याच्यातील फरक ह्या लोकांना कळून येईल. परूशी लोक देवाच्या इच्छेशी एकरूप झाले नव्हते. ते सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करण्याऐवजी ते टाळण्याचा प्रयत्न करीत होते. ह्याच कारणामुळे त्याची शिकवण त्यांना कळत नव्हती हे ख्रिस्ताने दाखवून दिले.DAMar 398.3

    आता त्याने त्यांना एक चांचणी दिली की त्याद्वारे ते दगलबाज करणाऱ्यापासून खरा शिक्षक ओळखू शकत होते. त्याने म्हटले, “जो आपल्या मनचे बोलतो तो स्वतःचेच गौरव पाहतो; परंतु आपणाला ज्याने पाठविले त्याचे गौरव जो पाहातो तो खरा आहे व त्यामध्ये काही अधर्म नाही.” योहान ७:१८. जो स्वतःचेच गौरव करून घेतो तो आपल्या मनचेच बोलतो. आपमतलबी वृत्ती त्याच्या मूळावर आघात करिते, विश्वासघात करिते. ख्रिस्त देवाचे गौरव करीत होता. तो देवाचे वचन सांगत होता. सत्याचा शिक्षक असल्याच्या अधिकाराचा तो पुरावा होता.DAMar 399.1

    त्यांचे अंतःकरण (मन) त्याने जाणले हे त्याच्या निदर्शनास आणून येशूने आपल्या देवत्वाचा पुरावा धर्मगुरूंना दिला. बेथसैदा येथील चमत्कारापासून ते त्याच्या वधाचा कट करीत होते. अशा प्रकारे ते आज्ञाभंग करीत होते. त्याने म्हटले, “मोशाने तुम्हास नियमशास्त्र दिले की नाही? तरी तुम्हातून कोणी नियमशास्त्र पाळीत नाही. तुम्ही मला जिवे मारावयास का पाहाता?”DAMar 399.2

    हे शब्द प्रकाशाच्या झोताप्रमाणे एकदम धर्मगुरूपुढे चमकले आणि ज्या विध्वंशाच्या खंदकात ते झेप घेण्याच्या बेतात होते तो त्यांच्या निदर्शनास आणून दिला. आकस्मात ते भयभीत झाले. ते अगाध सामर्थ्याच्या संघर्षात पडले होते असे त्यांना दिसून आले. परंतु ते इशारा घेण्यास तयार नव्हते. लोकावरील त्यांचे वर्चस्व राखण्यासाठी त्यांची खूनी योजना त्यांना गुप्त ठेवायची होती. येशूने विचारलेला प्रश्न टाळून ते उद्गारले, “तुला भूत लागले आहे; तुला जिवे मारावयास कोण पाहातो?” अप्रत्यक्षरित्या ते सुचवीत होते की, येशूने केलेल्या अद्भुतजन्य कार्याला दुरात्म्याचे प्रोत्साहन होते, चिथावणी होती.DAMar 399.3

    ह्या त्यांच्या चिथावणीला ख्रिस्ताने महत्त्व दिले नाही. बेथसैदा येथील चमत्कार शब्बाथाच्या आज्ञेशी एकरूप होता आणि यहूद्यांनी नियमाचे केलेल्या स्पष्टीकरणाप्रमाणे ते योग्य होते असे तो दाखवीत होता. त्याने म्हटले, “मोशाने तुम्हास सुंता लावून दिली आणि तुम्ही शब्बाथ दिवशी ती करिता.’ नियमाप्रमाणे प्रत्येक मुलाची सुंता आठव्या दिवशी झाली पाहिजे. ही नेमलेली वेळ शब्बाथ दिवशी आली तर हा सुतेचा विधि पार पाडण्यात येतो. तर मग “शब्बाथ दिवशी एका मनुष्याला सर्वांगी बरे करणे’ हे नियमाच्या भूमिकेशी किती एकरूप आहे! “तोंड देखला न्याय करू नका तर यथार्थ न्याय करा’ असा त्यांना इशारा दिला.DAMar 399.4

    अधिकारी स्तब्ध राहिले; आणि लोकातील कित्येक उद्गारले, “ज्याला जिवे मारावयास पाहातात तो हाच आहेना? पाहा, तो उघड बोलतो व ते त्याला काही म्हणत नाहीत. हा ख्रिस्त आहे असे अधिकाऱ्यांनी खरोखर जाणिले आहे काय?”DAMar 400.1

    यरुशलेमात निवास करणाऱ्या ख्रिस्ताच्या अनेक श्रोतेजणाला त्याच्या विरुद्ध अधिकारी आखत असलेला कट माहीत होता. ते ख्रिस्ताकडे अति शक्तिमान सामर्थ्याने आकृष्ट झाले होते. तो देवपुत्र आहे अशी त्यांची नक्की खात्री झाली होती. परंतु सैतान त्यांच्यात संशय निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होता. मशीहा व त्याचे आगमन ह्याविषयी त्यांच्या चुकीच्या कल्पना त्याला कारणीभूत होत होत्या. सर्वसाधारण असा विश्वास होता की ख्रिस्ताचा जन्म बेथलेहेमध्ये होईल, परंतु काही काळाने तो अदृश्य होईल आणि त्याच्या दुसऱ्या दर्शनाच्या वेळी तो कोठून आला ह्याचा थांगपत्ता कोणाला असणार नाही. मशीहाचा मानवतेची स्वाभाविक संबंध असणार नाही असाही पुष्कळांचा विश्वास होता. मशीहाच्या वैभवाविषयी लोकप्रिय कल्पना नासरेथकर येशूमध्ये दिसली नाही म्हणून अनेकजण म्हणत होते की, “हा कोठचा आहे हे आम्हास ठाऊक आहे; पण ख्रिस्त येईल तेव्हा तो कोठचा आहे हे कोणास कळणार नाही.”DAMar 400.2

    हे श्रद्धा व संशय यांच्यामध्ये हेलकावे खात असताना, येशने त्यांची विचारसरणी घेऊन त्यांना उत्तर दिले: “तुम्ही मला जाणता व मी कोठचा आहे याचीही तुम्हाला जाणीव आहे, तरी मी आपण होऊन आलो नाही; ज्याने मला पाठविले तो खरा आहे, त्याला तुम्ही ओळखीत नाही.’ ख्रिस्ताचे मूळ काय आहे ह्याचे ज्ञान असल्याचे ते ग्वाही देत होते परंतु ते संपूर्णतः त्याविषयी अजाण होते. देवाच्या इच्छेप्रमाणे त्यांची वर्तणूक असती तर प्रगट केलेला त्याचा पुत्र त्यांना ओळखून आला असता.DAMar 400.3

    श्रोतेजनाला ख्रिस्ताच्या वचनाचे ज्ञान झाले. अनेक महिन्यापूर्वी धर्मसभेपुढे तो देवपुत्र असल्याची घोषणा केली होती त्याची ही पुनरावृत्ती होती. त्यावेळी अधिकारी वर्ग त्याचा वध घडवून आणण्याचा प्रयत्न करीत होते त्याचप्रमाणे ते आता त्याला धरण्याचा प्रयत्न करू लागले; परंतु अदृश्य शक्तीने त्यांना अटकाव केला. त्यामुळे त्यांच्या क्रोधावर आवर घातली, आणि म्हटले, तुम्ही येथपर्यंत जाऊ शकता परंतु ह्याच्यापुढे तुम्हाला सरकता येत नाही. DAMar 400.4

    पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेविला आणि म्हटले, “ख्रिस्त येईल तेव्हा तो याने केलेल्या चिन्हांपेक्षा अधिक चिन्हे करील काय?” घडत असलेल्या सगळया घटनाचे निरिक्षण करणाऱ्या परूशी पुढाऱ्यांना त्याच्याविषयी लोकामध्ये सहानुभूती निर्माण झाल्याचे दिसून आले. मुख्य याजकाकडे धावत जाऊन त्याला अटक करण्याचा विचार त्यांनी पुढे मांडला. तथापि तो एकटा असताना त्याला अटक करण्याची व्यवस्था केली. कारण लोकांच्यासमोर तसे करण्यास ते धजत नव्हते. त्यांचा हेतू त्याला समजल्याचे येशूने पुन्हा उघड केले. येशूने म्हटले, “मी आणखी थोडावेळ तुम्हाबरोबर आहे, मग ज्याने मला पाठविले त्याजकडे मी निघून जाईन. तुम्ही माझा शोध कराल तरी मी तुम्हास सापडणार नाही; आणि जेथे मी असेन तेथे तुमच्याने येववणार नाही.” त्यांचा द्वेष, तिरस्कार आणि उपहास यांच्यापासून निसटून त्वरित त्याला आश्रयस्थान लाभेल. तो पित्याकडे वर जाईल, तेथे पुन्हा दूत त्याची आराधना करतील; आणि तेथे मारेकऱ्यांचा प्रवेश केव्हाही होणार नाही.DAMar 400.5

    उपहासात्मक टोमणा मारून धर्मगुरू म्हणाले, “हा असा कोठे जाणार की तो आम्हास सापडणार नाही? तो हेल्लेणी लोकात पांगलेल्याकडे जाणार आणि हेल्लेण्यास शिकवणार काय?” ह्या उपाहासात्मक बोलामध्ये ख्रिस्ताच्या सेवाकार्याचे ते चित्र रेखाटत होते हे त्यांना ध्यानीही आले नव्हते! मी सारा दिवस आपले हात आज्ञा मोडणाऱ्या व उलटून बोलणाऱ्या लोकाकडे केले आहेत. तथापि माझा धावा करीत नसलेल्यांना मी प्राप्त झालो; ज्यांनी मजजवळ मागितले नाही त्यांस मी प्रगट झालो. रोम. १०:२०, २१.DAMar 401.1

    येशू देवपुत्र असल्याची अनेकांची खात्री झाली होती परंतु याजक व धर्मगुरू यांच्या चुकीच्या विचारसणीने त्यांची दिशाभूल झाली होती. “मशीहा सोयोन डोंगरावर व यरुशलेमात आपल्या प्रजेतील वडीलासमोर वैभवाने राज्य करील; आणि समुद्रापासून समुद्रापर्यत व नदीपासून पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्याची सत्ता होईल.” ह्या मशीहाविषयीच्या भाकीतावर हे धर्मगुरू, शिक्षक अतिशय जोर देऊन वारंवार सांगत होते. यशया २४:२३; स्तोत्र. ७२:८. त्यानंतर ते ह्या ठिकाणी उल्लेखिलेले वैभव आणि येशूचे विनम्र स्वरूप यांची अनादरव्यंजक तुलना करीत असे. भाकीतातील शब्दांचा विपर्यास त्यांनी करून चुकांना मान्यता दिली. जर लोकांनी मनापासून प्रामाणिकपणे स्वतःहून अभ्यास केला असता तर त्यांची दिशाभूल झाली नसती. करावयाचे काम ख्रिस्ताने केले ह्याची साक्ष यशयाच्या एकसष्टाव्या अध्यायाने दिली आहे. त्रेपन्नाव्या अध्यायात त्याचा नापसंत म्हणून केलेल्या नाकार आणि जगातील त्याच्या व्यथा, दुःख यांचा उल्लेख केला आहे, आणि अध्याय एकोणसाठमध्ये याजक व धर्मगुरू यांच्या स्वभावांचे वर्णन करण्यात आले आहे.DAMar 401.2

    अविश्वासाचा त्याग करण्यास देव मनुष्यावर जबरदस्ती करीत नाही. त्यांच्यासमोर अंधार व प्रकाश, सत्य व असत्य असते. त्यातून कोणते स्वीकारायचे ते त्यांनी ठरवायचे असते. खरे आणि खोटे यांच्यातील फरक, तारतम्य पाहून पसंत करण्याची विवेकबुद्धी मनुष्याला देण्यात आली आहे. भावनाविवश होऊन नाही तर साक्षी पुराव्याचे महत्त्व जाणून आणि काळजीपूर्वक वचन वचनाशी ताडून पाहून मनुष्याने निर्णय घ्यावा अशी देवाची धारणा, योजना आहे. यहूदी लोकांनी आपला दुराग्रह बाजूला सारून, लिखित भाकीते ख्रिस्त जीवनातील घटनेशी तुलना करून घेतली असती तर त्यांना भाकीते आणि येशूच्या जीवनात व त्याच्या सेवाकार्यात त्यांची झालेली परिपूर्णता यांचा सुरेख मेळ झाल्याचे आकलन झाले असते.DAMar 401.3

    यहूदी लोकाप्रमाणेच आज अनेकजणांची फसगत होत आहे. स्वतःच्या बुद्धीमतेप्रमाणे व परंपरागत प्रथेप्रमाणे धर्मगुरू शास्त्रवचन करितात. लोक स्वतः होऊन शास्त्रवचनाचे अध्ययन करून सत्याचा अर्थ समजून घेत नाहीत परंतु ते पुढाऱ्यांच्या मतावर अवलंबून राहून, त्याप्रमाणे करितात. सत्यप्रकाशाचा प्रसार करण्यासाठी प्रवचन करणे व अध्यापन करणे ही साधने देवाने योजीली आहेत, परंतु प्रत्येक माणसाची शिकवण देवाच्या सत्यवचनाशी ताडून पाहिली पाहिजे. सत्य जाणण्यासाठी मनापासून प्रार्थनापूर्वक जे शास्त्रवचनाचे अध्ययन करितात आणि त्याचे पालन करितात त्यांना दैवी ज्ञान प्राप्त होईल, त्यांना शास्त्रबोध होईल. “त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यास जो कोणी मनात आणील त्याला ह्या शिकवणीचा अर्थबोध होईल.’ योहान ७:१७.DAMar 402.1

    सणाच्या अखेरच्या दिवशी याजक व अधिकारी यांनी येशूला अटक करण्यासाठी अंमलदार पाठविले परंतु ते अटक न करता तसेच परत आले. “तुम्ही त्याला का आणिले नाही?” असे त्यांनी त्यांना रागाने विचारिले. गंभीर चेहरे करून त्यांनी उत्तर दिले, “कोणी मनुष्य त्याच्यासारिखा कधी बोलला नाही.” DAMar 402.2

    ते जरी कठोर अंतःकरणाचे होते तरी त्याच्या भाषणाने त्यांची अंतःकरणे मृदु झाली होती. मंदिराच्या पटांगणात तो भाषण करीत असतांना त्याच्या मुखातून त्याच्याविरुद्ध काही वापरता येईल अशी विधाने पकडण्यासाठी ते तेथे घुटमळत होते. परंतु त्याची शिकवण ऐकत असताना ते त्यामध्ये इतके रमले होते की ज्या उद्देशासाठी ते तेथे आले होते त्याचे भान त्यांना राहिले नाही. मोहिनी घातल्यासारखे ते तेथे खडे होते. ख्रिस्त स्वतः त्यांना प्रगट झाला. याजक व अधिकारी यांना जे दिसले नाही त्याचे दर्शन ह्यांना झाले - मानवता दिव्य वैभवाने फुलून गेली होती. त्याच्या प्रवचनाने प्रभावित होऊन ते परतले, आणि “तुम्ही त्याला का आणिले नाही?’ ह्या प्रश्नाला केवळ त्यांचे उत्तर “कोणी मनुष्य त्याच्यासारिखा कधी बोलला नाही’ हे होते.DAMar 402.3

    याजक व अधिकारी प्रथमच ख्रिस्ताच्या संपर्कात आल्यावर त्यांचीही तशीच खात्री झाली होती. त्यांच्या मनावर इष्ट पगडा पडला होता आणि त्यांच्या मुखातून उद्गार निघाले की, “कोणी मनुष्य त्याच्यासारिखा कधी बोलला नाही.’ परंतु पवित्र आत्म्याची प्रेरणात्मक खात्री त्यांनी दाबून टाकिली. आता द्वेषबुद्धीने क्रोधाविष्ट होऊन ते ओरडले, “तुम्हीही फसला आहा काय? अधिकाऱ्यांपैकी किंवा परूश्यांपैकी कोणी तरी त्याजवर विश्वास ठेविला आहे काय? जो हा लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही तो शापीत आहे.”DAMar 402.4

    ज्यांच्यासाठी हा सत्य संदेश देण्यात येतो ते क्वचितच विचारतात की, “हे खरे आहे काय?” परंतु “हा संदेश कोण देत आहे?” किती जणांनी हा संदेश स्वीकारिला आहे त्यावरून लोक त्याचे मूल्पमापन करितात. त्यावर असाही प्रश्न विचारिला जातो की, “ह्या संदेशावर विद्वानांचा किंवा धर्मगुरूंचा विश्वास आहे काय?’ ख्रिस्ताच्या काळाप्रमाणेच लोक आजही खऱ्या देवभक्तीला, ईश्वरनिष्ठेला अनुकूल नाहीत. ते अनंत संपत्तीकडे दुर्लक्ष करून जगिक संपत्ति संपादन करण्यात मग्न झाले आहेत. बहुसंख्य लोकांनी किंवा जगातील महान व्यक्तींनी व धर्मपुढाऱ्यांनी त्याचा अंगिकार केला नाही हा काही सत्याच्या विरुद्ध असलेला मुद्दा नाही.DAMar 403.1

    येशूला अटक करण्याच्या योजना याजक व अधिकारी यांनी पुन्हा आखल्या. जर त्याला अशी मोकळीक फार दिवस दिली तर प्रस्थापित पुढाऱ्याविषयी लोकांचा आदर विचलित होईल म्हणून विनाविलंब त्याची कायमची वाट लावणे हा इष्ट मार्ग आहे. हा वादविवाद जोरात चालू असतानाच आकस्मात त्यांना आवर घातला. निकदेमाने विचारिले, “कोणाचे ऐकून घेतल्यावाचून व तो काय करितो ह्याची माहिती करून घेतल्यावाचून आपले नियमशास्त्र त्याचा न्याय करिते काय?” त्यानंतर सभागृह शांत झाले. निकदेमाचे शब्द त्यांच्या विवेकबुद्धीला भिडले. त्याचे ऐकून घेतल्याशिवाय ते मनुष्याला दोषी ठरवू शकत नव्हते. गर्विष्ठ अधिकारी न्यायाच्या बाजूने बोलणाऱ्याकडे टक लावून पाहात होते. केवळ ह्या कारणामुळेच ते शांत राहिले नाहीत. त्यांच्यातीलच एकजणावर येशूच्या स्वभावाचा प्रभाव पडून तो त्याच्या वतीने बोलण्यास तयार झालेला पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसून त्यांचा हिरमोड झाला. त्या आश्चर्याच्या अवस्थेतून स्वतःला सावरून निकदेमला मर्मभेदी टोमणा देऊन म्हणाले, “तूही गालीलातला आहेस काय? शोध करून पाहा की गालीलात कोणी संदेष्टा उदय पावत नाही.” DAMar 403.2

    तथापि त्या विरोधामुळे सल्लागार मंडळाचे काम स्थगित करण्यात आले. त्याचे म्हणणे ऐकल्याशिवाय अधिकाऱ्यांना येशूला दंड करून त्यांची योजना अंमलात आणता आली नाही. तात्पुरता पराभव पत्करून “प्रत्येक मनुष्य आपआपल्या घरी निघून गेला. येशू जैतूनाच्या डोंगराकडे गेला.”DAMar 403.3

    शहरातील गडबड, घोटाळा, उत्साही लोकसमुदाय आणि विश्वासघातकी धर्मगुरू या सर्वांना मागे टाकून येशू जैतूनाच्या निवांत बागेत देवाबरोबर वेळ घालविणयास गेला. परंतु प्रातःकाळी तो मंदिराकडे परतला आणि जसजसे लोक त्याच्याभोवती जमू लागले तसतसे तो त्यांना बसून शिकवू लागला.DAMar 403.4

    थोड्याच अवधीत त्याला अटकाव केला; अडथळा आणिला. शास्त्री व परूशी यांनी घाबरून गेलेल्या एका स्त्रीला ओढत त्याच्याकडे आणिले आणि तिने सातवी आज्ञा भंग केल्याचे कडक शब्दात सांगितले. त्याच्या समोर तिला ढकलून ढोंगीपणाने म्हटले, “मोशाने नियमशास्त्रात अशी आज्ञा दिली आहे की अशास दगडमार करावा; तर आपण तिच्याविषयी काय सांगता?”DAMar 403.5

    त्याच्या विनाशासाठी रचलेला कट ह्या घटनेमध्ये गुप्त ठेवण्यात आला होता. ह्या बाबतीत त्याने कोणतीही भूमिका घेतली तर त्यातील एकाद्या निमित्तावरून त्याला दोषी ठरविण्याचा प्रसंग मिळेल ह्या संधीची ते अपेक्षा करीत होते. त्याने त्या स्त्रीला निर्दोष सोडले तर त्याने मोशेच्या नियमाचा अवमान केल्याचे होईल. त्याने तिला मरणदंड ठोठाविला तर ही शिक्षा देणे केवळ रोमी अधिकाऱ्याच्या अखत्यारातली आहे, त्याचा अधिकार नाही असा त्याच्यावर आरोप करण्यात येईल.DAMar 404.1

    येशूने क्षणभर ते दृश्य पाहिले-शरमेने भयभीत झालेली ती स्त्री, निर्दय वृत्तीचे आणि मानवी दया नसलेले पदाधिकारी. त्याचे निष्कलंक पावित्र्य ते दृश्य पाहून संकोच पावले. कोणत्या उद्देशाने ही बाब त्याच्याकडे आणली आहे हे त्याला कळले. त्याच्यासमोर उभे असलेल्यांचे मन त्याने ओळखले आणि प्रत्येकाचा स्वभाव व जीवन चरित्र जाणले. येशूला पाशात टाकण्यासाठी न्यायबुद्धीचे पालक, रक्षक असणाऱ्यांनी त्या स्त्रीला पापात पाडिले होते. त्यांचा प्रश्न त्याने ऐकल्याची काहीही खूण न देता तो खाली ओणवून भूमीवर लिहू लागला.DAMar 404.2

    त्याची उघड दिसणारी अनास्था आणि विलंब पाहून अधीर झालेले फिर्यादी, (दोष लावणारे) त्याच्या जवळ आले व त्या गोष्टीत लक्ष घालण्यास सांगू लागले. परंतु त्यांचे लक्ष भूमीकडे वळले तेव्हा त्यांचे चेहरे बदलून गेले. त्यांच्या जीवनातील गुप्त दुष्कृत्ये त्यांच्या दृष्टीस तेथे पडली. आकस्मात चेहरा बदलण्यासाठी काय होते हे पाहाण्यासाठी लोक पुढे सरसावले.DAMar 404.3

    नियमशास्त्राविषयी पूज्यबुद्धी असल्याचे जाहीर करणारे धर्मगुरू त्या स्त्रीच्या विरुद्ध आरोप करून त्यात दिलेल्या तरतूदीचा अनादर करीत होते. स्त्रीच्याविरुद्ध कृती करणे नवऱ्याचे कर्तव्य होते, आणि दोषी व्यक्तीला सारखीच शिक्षा ठोठावली होती. आरोप करणाऱ्याची कृती अनधिकृत होती. त्यांच्याच मुद्यावर हे येशूचे भाष्य होते. दगडमार करण्यात साक्षीदारांनी प्रथम दगड मारला पाहिजे असे नियम सांगतो. तो वर उठला आणि कट करणाऱ्या वडिलांवर दृष्टी खिळून म्हणाला, “तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा.’ मग तो पुन्हा खाली ओनवून भूमीवर लिहू लागला. DAMar 404.4

    मोशेचे नियमशास्त्र त्याने रद्द केले नाही आणि रोमी अधिकारावरही अतिक्रमण केले नाही. दोष ठेवणाऱ्यांचा पराजय झाला. ढोंगी पावित्र्याचा त्यांचा झगा फाटून गेला आणि ते अनंत पावित्र्याच्या समोर दोषी व शिक्षास पात्र असे उभे राहिले. त्याच्या जीवनातील गुप्त दोष सर्वांच्यासमोर उघड होतील म्हणून त्यांची घाबरून गाळण उडाली आणि खाली मान घालून एकामागून एक असे ते सर्व निघून गेले आणि तेथे फक्त ती स्त्री आणि येशू राहिला.DAMar 404.5

    नंतर येशू उठला आणि त्या स्त्रीला पाहून म्हणाला, “बाई, तुला दोष देणारे ते कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरविला नाही काय? ती म्हणाली, प्रभूजी, कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठरवीत नाही; जा; यापुढे पाप करू नको.”DAMar 404.6

    भीतीने थरकाप होऊन ती स्त्री येशूच्या समोर उभी होती. “तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा.” त्याचे हे उद्गार तिला देहांत शासन वाटले. ती उद्धारकाकडे पाहाण्यास धजली नाही परंतु शातपणे आपल्या नाशाची वाट पाहात होती. तिला दोषी ठरविणारे सर्वजण गुपचिप निघून गेलेले पाहून ती आश्चर्यचकित झाली. त्यानंतर आशादायक शब्द तिच्या कानावर पडले, “मीही तुला दंड ठरवीत नाही; जा; यापुढे पाप करू नको.” तिचे अंतःकरण द्रवून गेले आणि येशूच्या चरणी तिने मस्तक ठेविले, हुंदके देऊन आपले प्रेम व्यक्त केले व अश्रू ढाळून आपले पाप कबूल केले.DAMar 405.1

    अशा रितीने तिच्या नव जीवनाला प्रारंभ झाला. हे जीवन पावित्र्याचे व शांतीचे असून देवकार्याला वाहिलेले होते. पतन पावलेल्या व्यक्तीला उभे करून शारीरिक रोग बरे करण्यापेक्षा येशूने मोठा चमत्कार केला. त्याने आध्यात्मिक रोग बरा केला. ती पश्चात्तापी स्त्री त्याची निष्ठावंत अनुयायी बनली. स्वार्थत्याग व भक्तीभाव व्यक्त करून तिने त्याच्या क्षमा करणाऱ्या दयेची भरपाई केली.DAMar 405.2

    ह्या स्त्रीची पापक्षमा करणे व तिला सात्त्विक जीवन जगण्यास उत्तेजन देणे ह्या ख्रिस्ताच्या कृतीमध्ये ख्रिस्ताचा परिपूर्ण धार्मिक स्वभाव प्रकाशतो. तो पापाची आणि अपराधाची तीव्रता कमी लेखत नाही, तो दोषी ठरवीत नाही परंतु उद्धार करितो. चुकणाऱ्या बाईचा जगात उपहास व तिरस्कार होतो; परंतु येशू तिला आशेचे व समाधानाचे शब्द बोलतो, निष्पापी पाप्यावर दया दाखवितो व मदतीचा हात पुढे करितो. ढोंगी परूशी बदनामी करितात परंतु येशू म्हणतो, “जा; यापुढे पाप करू नको.”DAMar 405.3

    ख्रिस्ताचे अनुयायी दुर्लक्ष करून एकाद्याला सन्मार्गापासून दूर जाऊन अधोगति करून घेण्यास अवसर देत नाहीत. दुसऱ्यांना दोष देणारे आणि शिक्षा देण्यात पुढाकार घेणारे दुसऱ्यापेक्षा जास्त दोषी असतात. माणसे पाप्याचा द्वेष करितात आणि पापावर प्रेम करितात. ख्रिस्त पापाला तुच्छ लेखितो परंतु पाप्यावर प्रेम करितो. ख्रिस्ती प्रेम निर्भत्सना करण्यास मंद आहे, अनुताप ओळखण्यास तीक्ष्ण असते, पापक्षमा करण्यास तत्पर असते, प्रोत्साहन देण्यास, भटकणाऱ्याला पवित्र मार्गात प्रस्थापित करण्यास ते तयार असते.DAMar 405.4

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents