Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

युगानुयुगांची आशा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ६४—नाशवंत लोक

    मार्क ११:११-१४, २०, २१; मत्तय २१:१७-१९.

    येशूचा यरुशलेमात जयोत्सवाने प्रवेश झाल्याची घटना, त्याच्या द्वितियागमनाच्या वेळी तो आपले दूतगण व संतमेळा यांच्या समवेत वैभवाने व पराक्रमाने येण्याची आगामी अंधुक सूचना होती. त्यावेळी ख्रिस्ताने परूशी व याजक यांना बोललेले उद्गार पूर्ण होतील: “आतापासून प्रभूच्या नामाने येणारा तो धन्यवादित असे म्हणाल तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणारच नाही.’ मत्तय २३:३९. भाकीताच्या दृष्टांतात तो दिवस अखेरच्या यशाचा दिवस म्हणून जखऱ्याला दाखविला होता; आणि पहिल्या येण्याच्या वेळी ज्यांनी त्याचा धिक्कार केला त्यांचा तो नाशाचा दिवस होता हे त्याने पाहिले. “ज्या मला त्यांनी विधिले त्या मजकडे ते पाहातील; एकुलत्या एका पुत्रासाठी शोक करावा तसे ते त्यासाठी शोक करतील; ज्येष्ठ पुत्राबद्दल जसा कोणी अत्यंत खेद करितो तसा ते त्याबद्दल खेद करतील.’ जखऱ्या १२:१०. ख्रिस्ताने शहराकडे पाहून अश्रु ढाळिले तेव्हा त्याने हे दृश्य पाहिले. यरुशलेम शहराच्या नाशामध्ये देवपुत्राच्या रक्ताचे अपराधी असलेल्या लोकांचा विध्वंस त्याने पाविला.DAMar 504.1

    यहूदी लोकांचा ख्रिस्ताविषयीचा द्वेष शिष्यांनी पाहिला परंतु त्याचा परिणाम काय होणार हे त्यांना अजून समजले नव्हते. इस्राएलाची खरी परिस्थिती आणि अपराधाबद्दल योग्य शिक्षा यरुशलेमावर कोणती येणार होती याचे त्यांना आकलन झाले नव्हते. अर्थपूर्ण वस्तुपाठाद्वारे ख्रिस्ताने ते त्यांना स्पष्ट केले.DAMar 504.2

    यरुशलेमाला शेवटची केलेली विनवणी व्यर्थ ठरली. “हा कोण आहे?” ह्या प्रश्नाच्या उत्तरादाखल लोकसुमदायाने काढलेला आवाज याजक आणि अधिकारी यांनी ऐकिला होता परंतु ती ईश्वरप्रेरित वाणी आहे असे त्यांनी मानले नाही. विस्मयाने व क्रोधाविष्ट होऊन लोकांना शांत ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्या घोळक्यामध्ये रोमी अधिकारी होते आणि येशूचे शत्रू त्याला बंडाचा पुढारी म्हणून त्याच्यावर दोषारोप करतांना त्यांनी ऐकिले होते. मंदिराचा ताबा लवकरच घेऊन तो यरुशलेमात राजा म्हणून राज्य करणार असे ते सांगत होते.DAMar 504.3

    परंतु येशूच्या शांत वाणीने गोंगाट करणारा जमाव शांत झाला आणि त्याने पुन्हा घोषित केले की तो ऐहिक राज्य प्रस्थापित करण्यासाठी आला नाही; तो लवकरच त्याच्या पित्याकडे जाईल आणि तो पुन्हा वैभवाने येईल तो पर्यंत त्याच्यावर दोषारोप करणारे त्याला पाहाणार नाहीत. त्यांच्या तारणासाठी, त्याला मान्यता देण्यासाठी किंवा ओळखण्यासाठी फार विलंब होईल. विव्हळ होऊन असामान्य शक्तीने काढिलेले हे येशूचे बोल होते. रोमी अधिकारी नरम होऊन शांत राहिले होते. जरी दिव्य सामर्थ्याविषयी ते अपरिचित होते तरी त्यांची अंतःकरणे अपूर्वरित्या हेलावून गेली होती. ख्रिस्ताच्या शांत गंभीर मुद्रेवर त्यांना प्रीती, परोपकारबुद्धी, निश्चल माननीयता यांचे दर्शन झाले. समजू शकले नाहीत त्या सहानुभूतीने त्यांना ढवळून आले होते. येशूला अटक करण्याच्याऐवजी त्याला वंदन करण्यास ते उद्युक्त झाले होते. याजक व अधिकारी यांच्याकडे वळून दंगा निर्माण केल्याबद्दल त्यांनी त्यांना दोष दिला. तीव्र हिरमोड व खजील झालेले हे पुढारी आपले गा-हाणे घेऊन लोकाकडे वळले आणि आपापसात रागाने वादविवाद करू लागले.DAMar 504.4

    त्या अवधीत कोणाच्या ध्यानात आले नाही असा येशू मंदिराकडे गेला. तेथे सर्व शांत होते. दुःखीत होऊन त्याच्याकडे पाहात येशू थोडा वेळ थांबला. त्यानंतर शिष्यांना घेऊन तो बेथानीला गेला. लोक त्याला राजासनावर बसविण्यास त्याचा शोध करीत होते परंतु तो कोठे दिसला नाही.DAMar 505.1

    सबंध रात्र येशूने प्रार्थनेत घालविली आणि सकाळीच तो पुन्हा मंदिराकडे आला. रस्त्यात अंजीराच्या झाडाची बाग त्याला लागली. त्याला भूक लागली होती, “तेव्हा पाल्याने भरलेले असे अंजिराचे एक झाड त्याने दुरून पाहिले आणि कदाचित त्यावर काही मिळेल म्हणून तो त्याकडे गेला; परंतु तेथे गेल्यावर पानावाचून त्याला काही आढळले नाही; कारण अंजिराचा हंगाम आला नव्हता.”DAMar 505.2

    काही ठिकाणे सोडून, तो पक्व अंजीराचा हंगाम नव्हता; आणि विशेषतः यरुशलेमाच्या आसपास पहाडी मुलूखात “अंजिराचा हंगाम आला नव्हता” असे म्हणणे सयुक्तिक होते. परंतु ज्या बागेत येशू गेला होता तेथे एक झाड इतर झाडापेक्षा फळ देण्यात तयार झाले आहे असे वाटले. ते पानांनी भरून गेले होते. पानांनी भरून जाण्याअगोदर झाडावर फळे लागलेली दिसतात हा अंजिराचा गुणधर्म आहे. त्यामुळे पानांनी भरलेल्या झाडावर पक्व फळांची आशा होती. परंतु त्याचे बाह्यस्वरूप फसवे होते. खालपासून वरच्या फांदीपर्यंत शोध केल्यावर येशूला “पानाशिवाय” दुसरे काहीच मिळाले नाही.” ते फक्त अहंमन्य, ढोंगी पानांचा झुबका होता, दुसरे काही नव्हते.DAMar 505.3

    ख्रिस्ताने त्याला सुकून जाण्याचा शाप दिला. त्याने म्हटले, “या पुढे कोणी तुझे फळ कधीही न खावो.” दुसऱ्या दिवशी उद्धारक आणि शिष्य नगराकडे चालले होते आणि जळलेल्या फांद्या व खाली वाळलेल्या पानांच्याकडे शिष्यांचे लक्ष गेले. पेत्राने म्हटले, “गुरूजी, पाहा, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे.”DAMar 505.4

    अंजिराच्या झाडाला ख्रिस्ताने शाप दिलेला पाहन शिष्यांना आश्चर्य वाटले. ही कृती त्याच्या वागणुकीच्या व स्वभावाच्या विरुद्ध वाटली. जगाचा नाश करण्यासाठी नाही तर उद्धार करण्यासाठी ख्रिस्त आला आहे असे घोषित केलेले पुष्कळ वेळा शिष्यांनी ऐकिले होते. त्यांना त्याच्या शब्दांची आवठण झाली, “कारण मनुष्याचा पुत्र माणसांच्या प्राणांचा नाश करावयास आला नाही, तर तारावयास आला.” लूक ९:५६. त्याचे अद्भुत कार्य नाश करण्याकरिता नाही गमावलेले त्यास पुन्हा मिळवून देण्यासाठी होते. पुन्हा स्थापन करणारा आणि आरोग्य देणारा असा ख्रिस्ताविषयी त्यांचा विश्वास होता. ही कृती अगदी वेगळीच होती. त्याचा उद्देश काय होता? त्यांनी विचारिले.DAMar 506.1

    “देवाला दया करण्यात आनंद वाटतो.” “प्रभु परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, कोणी दुर्जन मरावा यात मला काही संतोष नाही.’ मीखा ७:१८; यहज्के. ३३:११. नाश करण्याची कृती आणि दोषारोप करणे ही देवाच्या दृष्टीने “विलक्षण कृती” आहे. यशया २८:२१. दया व प्रेम यामुळे तो भविष्य प्रगट करून लोकांना पापाच्या परिणामाची जाणीव करून देतो.DAMar 506.2

    अंजिराच्या झाडाला शाप देणे हा कृती केलेला दाखला आहे. ख्रिस्ताच्या समोर पानांच्या झुबक्याने ढोंगीपणाचे प्रदर्शन करणारा फळ न देणारा वृक्ष यहूदी राष्ट्राचे दर्शक होता. इस्राएल राष्ट्राच्या नाशाचे कारण व निश्चितता शिष्यांच्यापुढे स्पष्ट करावे अशी ख्रिस्ताची इच्छा होती. ह्या कारणास्तव त्याने त्या वृक्षामध्ये काही नैतिक गुण घातले होते आणि त्याला दिव्य सत्य उघड करणारा बनविले. देवावरील निष्ठा व्यक्त करून यहूदी राष्ट्र इतर राष्ट्राहून वेगळे बनले होते. त्याने त्यांच्यावर उपकार केले होते, आणि ते इतर राष्ट्रांच्यापेक्षा धार्मिक असल्याचे प्रतिपादन करीत होते. परंतु ते ऐहिक प्रेम व लोभ याद्वारे भ्रष्ट झालेले होते. त्यांच्या विद्वतेविषयी ते फार फुशारकी मारीत होते, परंतु देवाच्या अपेक्षित गोष्टीविषयी अज्ञानी असून फार ढोंगी होते. फळ न देणाऱ्या वृक्षाप्रमाणे त्यांनी आढ्यताखोर फांद्या उंच वाढविल्या होत्या, दिसण्यात वाजवीपेक्षा फाजील, मनोरम परंतु त्यांचे फळ “पानांच्या शिवाय दुसरे काही नव्हते.’ यहूदी धर्मातील भव्य मंदिर, पवित्र वेदी, मुकुट घातलेले याजक आणि परिणामकारक विधि ही सर्व बाह्यदृष्ट्या खरोखर सुरेख सुंदर होती परंतु त्यामध्ये नम्रता, प्रीती व परोपरकारबुद्धी यांची उणीवता होती.DAMar 506.3

    अंजिराच्या बागेतील सर्व झाडावर फळे नव्हती; परंतु पर्णहीन वृक्षावर फळाची अपेक्षा केली नाही आणि निराशाही झाली नाही. हे वृक्ष हेल्लेणी लोकांचे दर्शक होते. यहूद्यांच्या ठायी ईश्वरनिष्ठा नव्हती त्याप्रमाणे हे कंगाल दरिद्री होते; परंतु ते ईश्वरसेवा करितात असे सांगत नव्हते. ते धार्मिकतेचा आव आणून फुशारकी मारीत नव्हते. देवाचे स्वभाव व कार्य याविषयी ते अजाण होते. त्यांच्यासाठी अंजिराचा हंगाम अजून आलेला नव्हता. आशा आणि प्रकाश त्यांना लाभेल त्या दिवसाची ते वाट पाहात होते. देवाचा कृपाप्रसाद विपुलतेने लाभलेले यहूदी लोक ह्या दानाचा दुरूपयोग केल्याबद्दल जबाबदार धरले होते. जे विशेषाधिकार त्यांना मिळाले त्यामुळेच त्यांचा अपराध वाढीस लागला.DAMar 506.4

    भूकेने व्याकूळ झालेला येशू काही खाण्यास मिळेल म्हणून त्या अंजिराच्या झाडाकडे आला. त्याप्रमाणेच धार्मिकतेची फळे त्यांच्यामध्ये मिळावी म्हणून तो इस्राएल लोकाकडे आला. त्याने त्यांच्यावर दानांचा सढळ हाताने वर्षाव केला की त्यामुळे ते सर्व जगाला कृपाप्रसाद होतील. त्याने त्यांना प्रत्येक संधि व अधिकार दिला आणि त्याच्या कृपेच्या कार्यात त्याने त्यांची सहानुभूती आणि सहकार्य अपेक्षिले. स्वःनाकार, करुणा, देवासाठी उत्साह आणि त्यांच्या बांधवाच्या तारणासाठी उत्कंठा, तळमळ ही त्यांच्या मध्ये पाहाण्यास तो फार उत्सुक होता. देवाच्या आज्ञा त्यांनी पाळल्या असत्या तर ख्रिस्ताने केलेले निस्वार्थी कार्य त्यांनी केले असते. परंतु देव व मानव याच्यावरील प्रेमाला अहंपणा व स्वावलंबीपणा यामुळे ग्रहण लागले होते. दुसऱ्यांची सेवा करण्याचे नाकारून त्यांनी स्वतःवर नाश ओढवून घेतला होता. देवाने त्यांना दिलेल्या सत्याच्या खजिन्यातून त्यांनी जगाला काही दिले नाही. फलहीन वृक्षामध्ये त्यांचे पाप व त्यांची शिक्षा त्यांना दिसून येईल. उद्धारकाच्या शापाने मुळापासून वाळून गेलेल्या, नाश पावलेल्या वृक्षाने, देवाची कृपा काढून टाकिल्यावर यहूदी लोकांची स्थिति काय होईल ते दर्शविले. इतरांना कृपाप्रसाद देण्याचे नाकारल्याने त्यांना तो पुन्हा मिळणार नव्हता. प्रभु म्हणतो, “हे इस्राएला, तू तुझा स्वतःचा नाश करून घेतलास.” होशेय १३:९.DAMar 507.1

    हा इशारा सर्व काळासाठी आहे. वृक्षाला शाप देण्याची ख्रिस्ताची क्रिया त्याचे सामर्थ्य आहे आणि हा इशारा सर्व मंडळ्यांना व सर्व ख्रिस्ती लोकांना आहे. दुसऱ्यांची सेवा केल्याशिवाय कोणीही देवाची आज्ञा पाळू शकत नाही. परंतु अनेकजन ख्रिस्ताचे दयापूर्ण व स्वनाकाराचे जीवन जगत नाहीत. स्वतःला अव्वल दर्जाचे प्रतिष्ठित ख्रिस्ती समजतात त्यांना देवाच्या सेवेमध्ये काय अंतर्भूत आहे ते समजत नाही. त्यांचा सगळा व्यवहार स्वार्थ केंद्रित असतो. स्वतःसाठी जमा करण्याच्या वेळीच त्यांना वेळेचे महत्त्व वाटते. जीवनातील सबंध व्यवहारात हाच त्यांचा उद्देश असतो. दुसऱ्यांची सेवा नाही तर स्वतःचीच सेवा करण्यात ते गर्क होतात. दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी देवाने त्यांना ह्या जगात निर्माण केले आहे. शक्य त्या प्रत्येक बाबतीत त्यांनी दुसऱ्यांची सेवा करावी ही देवाची इच्छा आहे. परंतु स्वत्व इतके मोठे आहे की त्यांच्या पलीकडील काही दिसत नाही. मानवतेशी त्यांचा संबंध येत नाही. स्वतःसाठी जगणारे अंजिराच्या झाडासारखे आहेत. ते हरएक बाबतीत नसता देखावा करितात परंतु फलहीन असतात. त्यांची उपासना, अनुताप किंवा श्रद्धा यांच्याविना आकृतीबद्ध असते. देवाच्या नियमाचा आदर करतात असे ते सांगतात परंतु आज्ञापालनामध्ये ते कमी ठरतात. उक्ती आहे पण कृती नाही. झाडाला दिलेल्या शापग्रस्त विधानाने पोकळ बतावणी किंवा बहाणा ख्रिस्ताच्या दृष्टीने किती तिरस्कारणीय आहे हे दर्शविले आहे. त्याने स्पष्ट केले की, देवाची सेवा करण्याचे सांगून त्याच्या गौरवासाठी जो कांही फळे देत नाही त्याच्यापेक्षा उघड पाप करणारा कमी अपराधी आहे.DAMar 507.2

    यरुशलेमाला भेट देण्याच्या अगोदर सांगितलेला अंजिराच्या झाडाचा दाखला याचा प्रत्यक्ष संबंध फलहीन झाडाला दिलेल्या शापाद्वारे शिकविलेल्या धड्याशी होता. फलहीन झाडासाठी माळ्याने विनंती केली की, यंदाचे वर्ष ते असू द्या, म्हणजे मी त्याच्याभोवती खणून खत घालीन; मग त्याला फळ आले तर बरे; नाहीतर आपण ते तोडून टाकावे. फलहीन झाडाची अधिक काळजी घ्यायला पाहिजे. हरएक सुविधा प्राप्त करून द्यायला पाहिजे. परंतु शेवटी ते फलहीन राहिले तर त्याला कापून टाकिल्याशिवाय गत्यंतर नाही. माळ्याच्या कष्टाचा परिणाम काय होणार होता हे दाखल्यात अगोदर सांगितले नव्हते. ख्रिस्ताचे शब्द कोणाला बोलण्यात आले होते यावर ते अवलंबून होते. ते फलहीन असल्याचे सांगितले होते आणि त्यांचे भवितव्य त्यांनी ठरवायचे होते. स्वर्गातून येणाऱ्या लाभाचा फायदा त्यांनी घेतला नाही. फलहीन झाडाला दिलेल्या शापाने काय परिणाम होतो हे दाखविले होते. त्यांचा नाश त्यांनी ओढवून घेतला होता.DAMar 508.1

    हजार वर्षापेक्षा अधिक दिव्य यहूदी राष्ट्राने देवाच्या करुणेचा दुरुपयोग करून घेतला होता आणि देवाने दिलेली शिक्षा ओढवून घेतली होती. त्याने दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून संदेष्ट्यांचा त्यांनी वध केला होता. तोच मार्ग अवलंबून ख्रिस्तकालीन लोकांनी त्या पापांची जबाबदारी आपणावर घेतली. सांप्रत कृपेचा आणि इशाऱ्यांचा धिक्कार करणे हा त्या पिढीचा अपराध होता. अनेक वर्षापासून जी बंधने लादण्यात राष्ट्र कष्टाने प्रगती करीत होते त्यामध्ये ख्रिस्ताच्या काळातील लोक स्वतःलाच घट्ट बांधून टाकीत होते.DAMar 508.2

    प्रत्येक युगामध्ये लोकांना प्रकाश आणि विशेष अधिकार तसेच देवाशी समेट घडवून आणण्याचा कृपेचा काळ देण्यात येतो. परंतु ह्या कृपेच्या काळाला मर्यादा आहे. वर्षानुवर्ष दया कळकळीची विनंती करिते परंतु तिची उपेक्षा करून नाकारली जाते. परंतु अशी वेळ येते की ती तिची शेवटची विनवणी असते. अंतःकरण कठोर बनते आणि देवाच्या आत्म्याला प्रतिसाद देत नाही. त्यानंतर मधुर, चित्तवेधक वाणी पाप्याला विनवणी करीत नाही आणि इशारा देत नाही किंवा शब्द प्रहार करीत नाही.DAMar 508.3

    यरुशलेमात तो दिवस आला होता. नाश पावणाऱ्या नगरीकडे पाहून येशू दुःखाने अश्रु ढाळीत होता, परंतु तिचा तो उद्धार करू शकत नव्हता. त्याने सर्व प्रयत्न केले. देवाच्या इशाऱ्याचा नाकार करून इस्राएलांनी मदतीच्या साधनाचाच नाकार केला होता. दुसऱ्या कोणत्या शक्तीने ह्यांचा उद्धार होणार नव्हता.DAMar 508.4

    अनंत प्रेमाची विनवणी तुच्छ मानणाऱ्या सर्व युगातील लोकांचे दर्शक यहूदी राष्ट्र होते. यरुशलेमाकडे पाहून ख्रिस्ताने ढाळलेले अश्रु सर्व काळातील पापासाठी होते. इस्राएल लोकांना दिलेल्या शिक्षेमध्ये, पवित्र आत्म्याने दिलेला इशारा व दोषारोप यांचा जे धिक्कार करितात त्यांना स्वतःचा धिक्कार दिसेल.DAMar 509.1

    ह्या पिढीमध्ये अनेकजन, अश्रद्धावंत यहूद्यांनी घेतलेल्या मार्गावरून वाटचाल करीत आहेत. देवाच्या सामर्थ्याचे प्रगटीकरण झाल्याचे त्यांनी पाहिले आहे; त्यांच्या अंतःकरणाशी पवित्र आत्मा बोलला आहे, परंतु ते अश्रद्धा आणि प्रतिकार याला चिकटून राहातात. देव त्यांना ताकीद देतो व दोषारोप करीतो परंतु ते स्वतःच्या चुका कबूल करीत नाहीत आणि ते त्याचा संदेश व संदेशवाहक यांचा त्याग करितात. त्यांच्या मुक्ततेसाठी वापरण्यात आलेले साधन त्यांना अडखळण करणारा धोंडा बनतो.DAMar 509.2

    देवाच्या संदेष्ट्याद्वारे इस्राएल लोकांचे पाप उघड करण्यात आले म्हणून धर्मभ्रष्ट इस्राएल लोक त्यांचा द्वेष करीत होते. संदेष्टा राजाच्या गुप्त पापाबद्दल कान उघाडणी करीत होता म्हणून आहाब राजा एलीया संदेष्ट्याला त्याचा शत्रू समजत होता. त्याचप्रमाणे आज देवाचा सेवक, पापदोष दाखविणारा, याचाही तिरस्कार, नाकार व उपहास करण्यात येतो. बायबल सत्य व ख्रिस्ताचा धर्म नैतिक अवनतीच्या जोरदार प्रवाहाशी झगडतो. ख्रिस्ताच्या काळापेक्षा आज दुराग्रह भारी आहे. ख्रिस्ताने मानवांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत; त्याच्या जीवनाने त्यांच्या पापाबद्दल कान उघाडणी केली आणि त्यांनी त्याचा त्याग केला. आजसुद्धा देवाच्या सत्य वचनाशी मनुष्यांच्या संवयी आणि त्यांच्या स्वाभाविक प्रवृत्ती यांचा मेळ बसत नाही आणि हजारो त्याच्या प्रकाशाचा त्याग करितात. सैतानाच्याद्वारे उत्तेजित झालेली माणसे देवाच्या वचनाचा संशय करितात आणि स्वतःचा निर्णय अंमलात आणण्याचे ठरवितात. प्रकाशाऐवजी ते अंधार निवडतात परंतु ते स्वतःचा जीव धोक्यात घालून करितात. जे ख्रिस्ताच्या वचनातील दोष काढतात ते दोष काढण्याचे निमित्त शोधतात आणि शेवटी ते सत्य व जीवन यांना पाठमोरे होतात. तीच गत आजही आहे. दैहिक अंतःकरणाने त्याच्या सत्याविरुद्ध आणलेले सर्व अडथळे दूर करण्याचा देवाचा इरादा नाही. अंधकाराचे निराकरण करणाऱ्या प्रकाश किरणाचा जे त्याग करितात त्यांना देवाच्या वचनाचे गूढ कायमचे गूढच राहील. त्यांच्या दृष्टीआड सत्य राहील. ते न पाहाता, अविचाराने चालतील आणि त्यांच्या समोर असलेला नाश त्यांना समजणार नाही.DAMar 509.3

    जैतूनाच्या डोंगराच्या उंचीवरून ख्रिस्ताने जगावर आणि सर्व युगांवर नजर फेकिली; दिव्य करुणेच्या विनवणीकडे मुद्दाम दुर्लक्ष करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याचे वचन लागू पडते. त्याच्या प्रेमाचा उपहास करणाऱ्यांना तो आज म्हणतो. तुमच्या शांतीला आवश्यक असणाऱ्या गोष्टी “तुम्हाला माहीत असणे जरूरीचे आहे. स्वतःसाठी जे अश्रु ढाळीत नाहीत त्यांच्यासाठी ख्रिस्त दुःखाचे अश्रु ढाळीत आहे. ज्याद्वारे परूश्यांचा नाश झाला त्या अंतःकरणाचा कठोरपणा तुमच्यामध्ये दिसत आहे. देवाच्या कृपेची प्रत्येक खूण, दिव्य प्रकाशाचा प्रत्येक किरण आत्म्याला विरघळून वश करून घेत आहे किंवा हताश अनुपातशून्य स्थितीला पृष्टी देत आहे.DAMar 509.4

    यरुशलेम दुराग्रही, हट्टी व पश्चात्ताप न करणारे राहील हे ख्रिस्ताने पाहिले; तथापि सर्व अपराध, करुणेचा त्याग केल्यानंतरचा सर्व परिणाम त्याच्या दारी लावण्यात येईल. त्या मार्गाचे अवलंबन करणाऱ्या प्रत्येक आत्म्याची तीच गत होईल. प्रभु घोषीत करितो, “हे इस्राएल, तू तुझा स्वतःचा नाश केला आहेस.” “अगे पृथ्वी, ऐक; पाहा, मी या लोकांच्या कल्पनांचे फळ, अर्थात् विपत्ति, त्याजवर आणीन; कारण त्यांनी माझी वचने ऐकली नाहीत, माझ्या नियमशास्त्राचा त्यांनी धिक्कार केला आहे.” होशेय १३:९; यिर्मया ६:१९.DAMar 510.1