Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

युगानुयुगांची आशा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय १४—“मशीहा आम्हास सापडला आहे”

    योहान १:१९-५१.

    यार्देनेच्या पलीकडे बेथबारा येथे बाप्तिस्मा करणारा योहान उपदेश करून बाप्तिस्मा करीत होता. यार्देन नदीतून सर्व इस्राएल नदीपार होईपर्यंत तिचा प्रवाह मागे हाटविला होता ते ठिकाण तेथून फार दूर नव्हते. येथून थोड्या अंतरावरील यरीहोचा किल्ला स्वर्गीय देवाच्या सैन्याने उध्वस्त केला होता. ह्या घटनांच्या आठवणीला ह्या वेळी उजाळा देण्यात आला होता आणि योहानाच्या संदेशामध्ये चमत्कारिक गोडी निर्माण झाली होती. भूतकाळात ज्याने अद्भुत कृती केल्या तो इस्राएलाच्या मुक्तीसाठी काही करणार नाही काय? यार्देनेच्या किनाऱ्यावर दररोज जमणाऱ्या समुदायाच्या मनात हा विचार चेतवीत होता.DAMar 97.1

    योहानाच्या उपदेशाची पक्कड सर्व राष्ट्रावर पडली होती, त्यामुळे धार्मिक अधिकाऱ्यांचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले. अशा प्रकारे जमलेला समुदाय पाहून यातून कदाचित बंड होईल अशी शंका रोमी अधिकाऱ्यांना वाटत होती. त्याचसोबत यहूदी अधिकाऱ्यांनाही भीती वाटत होती. काम करण्याची परवानगी योहानाने धर्मसभेकडून घेऊनही त्यांची सत्ता योहानाने मानली नाही. उलट अधिकारी, लोक, परुशी आणि सदूकी यांना त्याने दोष दिला. त्याच्या कामातील गोडी सतत वाढत गेली. सार्वजनिक, राष्ट्रीय शिक्षक या नात्याने तो त्यांच्या अधिकाराखाली येतो असे धर्मसभेला वाटत होते. अर्थात त्याने ते मान्य केले नाही.DAMar 97.2

    ह्या धर्मसभेवर याजकगण, मुख्य अधिकारी आणि राष्ट्रीय शिक्षक यांच्यातून निवडलेले लोक होते, आणि महायाजक अध्यक्ष असे. त्याचे सभासद प्रौढ (वयाने जरी नसले) आणि विद्वान असले पाहिजेत. यहूदी धर्म, इतिहास आणि सर्वसाधारण ज्ञान यात ते पारंगत असले पाहिजेत. त्यांना शारीरिक कलंक नसावा, विवाहीत, पिता, आणि त्यांना मानुसकी असून ते दयाळू, विचारी असावेत. यरुशलेम मंदिराला लागून त्यांचे बैठकीचे ठिकाण होते. यहूदी राष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या काळात धर्मसभा वरीष्ठ न्यायालय होते आणि धर्मासंबंधी व धर्मातीत अधिकार तिला होता. जरी आता रोमी अधिकाऱ्यांच्या सत्तेखाली ती होती तरी मुलकी कारभारात आणि धार्मिक बाबतीत तिचा प्रभाव भारी होता.DAMar 97.3

    योहानाच्या कार्याची चौकशी करण्याचे धर्मसभेने बाजूला ठेविले नव्हते. मंदिरामध्ये जखऱ्याला दिव्य प्रगटीकरण झाल्याचे आणि बापाने हा बाळ मशीहाचा संदेशवाहक असल्याचे केलेले भाकीत काहीना आठवले. गेल्या तीस वर्षाच्या धामधूमीच्या काळात आणि घडलेल्या अदलाबदलीमुळे बहुतांशी ते सर्व विसरून गेले होते. योहानाच्या चेतनात्मक संदेशाद्वारे त्यांची पुन्हा आठवण झाली.DAMar 98.1

    फार दिवसापूर्वी इस्राएल लोकांच्या इतिहासात जेव्हा संदेष्टा होता त्या वेळेसारखीच आता सुधारणा दिसली. पापकबुली करण्याची मागणी नवी व आश्चर्यचकित करणारी वाटली. स्वतःच्या जीवनातील गुप्त गोष्टी उघड करायला लागू नये म्हणून पुढाऱ्यांपैकी पुष्कळजन योहानाची विनतिवजा व दोषारोपाचा संदेश ऐकण्यासाठी जात नसे. तथापि त्याचा संदेश प्रत्यक्ष मशीहाविषयी जाहीर घोषणा होती. मशीहाच्या आगमनाचा अंतर्भाव असलेले दानीएलाच्या भाकीतातील सत्तर वर्षांचा कालावधी बहुतेक समाप्त झाला होता आणि अपेक्षित असलेले राष्ट्रीय वैभव त्या युगात अनुभवायास सर्वजण अति उत्सुक झाले होते. अशा प्रकारचा लोकप्रिय उत्साह धर्मसभेला मान्य करावा लागला असता किंवा योहानाचे कार्य नाकारावे लागले असते. अगोदरच लोकावरील त्यांची सत्ता क्षय पावत होती. आपले स्थान, पद कसे सांभाळावे हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे होता. ह्यातून काहीतरी निश्चित मार्ग काढण्यासाठी याजक आणि प्रतिष्ठित लेवी पुढाऱ्यांचे एक शिष्ठमंडळ यार्देनकडे सल्लामसलतीसाठी धाडले.DAMar 98.2

    ऐकण्यासाठी मोठा समुदाय जमलेला होता त्याच वेळी शिष्टमंडळ येऊन तेथे धडकले. आपल्या अधिकाराचा लोकावर छाप टाकण्यासाठी आणि संदेष्ट्याने दुसऱ्याचे म्हणणे ऐकण्यास भाग पाडण्यासाठी गर्विष्ठ धर्मगुरू तेथे आले. भीतीने तसेच त्यांचा मान राखून समुदायाने त्यांना मधून जाऊ दिले. उंची पोषाख परिधान केलेले, हुद्याचा आणि अधिकारचा मनात अहंमपणा असलेली मोठी माणसे अरण्यातील संदेष्ट्यासमोर उभे राहिली.DAMar 98.3

    “तू कोण आहेस?” त्यांनी विचारले.
    त्यांच्या मनातील विचार जाणून योहानाने उत्तर दिले, “मी ख्रिस्त नाही.”
    “तर मग आपण कोण आहे? एलीया आहे काय?’
    “मी नाही’ तो म्हणाला.
    “आपण तो संदेष्टा आहे काय?”
    “नाही.”
    DAMar 98.4

    “ते त्याला म्हणाले. ज्यांनी आम्हास पाठविले त्यांना आम्ही उत्तर द्यावे म्हणून, आपण कोण आहा हे सांगा. स्वतःविषयी आपले काय म्हणणे आहे?”DAMar 98.5

    “तो म्हणाला, यशया संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे परमेश्वराचा मार्ग नीट करा, असे अरण्यात ओरडण्याची वाणी मी आहे.”DAMar 98.6

    योहानाने उल्लेखलेले शास्त्रवचन यशयाचे मनोवेधक भाकीत होतेः “सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा, असे तुमचा देव म्हणतो. यरुशलेमाच्या मनाला धीर येईल असे बोला, त्याला पुकारून सांगा, तुझे युद्ध संपले आहे, तुझ्या पापाबद्दलचा दंड मिळाला आहे... घोषणा करणाऱ्याची वाणी ऐकू येते की अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा. प्रत्येक खोरे उंच होवो, प्रत्येक डोंगर व टेकडी सखल होवो; उंचनीच असेल ते सपाट होवो व खडकळीचे मैदान होवो; म्हणजे परमेश्वराचे गौरव प्रगट होईल आणि सर्व मानवजाती एकत्र मिळून ते पाहील, कारण हे बोलणे परमेश्वराच्या तोंडचे आहे.” यशया ४०:१-५.DAMar 99.1

    प्राचीन काळी वहिवाट नसलेल्या भागातून राजा जेव्हा प्रवास करीत असे तेव्हा त्याचा रथप्रवास सुखकर होण्यासाठी, रस्त्यावरील खाच खळगे भरून काढण्यासाठी आणि उंचवटे सपाट करण्यासाठी लोकांचे पथक पुढे पाठवीत असे. सुवार्तेच्या कामाविषयी स्पष्टीकरण देण्यासाठी ही प्रथा संदेष्ट्याने वापरली. “प्रत्येक खोरे उंच केले जाईल आणि प्रत्येक डोंगर व टेकडी सखल केली जाईल.” देवाचा आत्मा आपल्या अद्भुत सामर्थ्याने आत्म्याला जेव्हा स्पर्श करितो तेव्हा मानवी अहंकार हास पावतो. जगिक सौख्य, हुद्दा आणि सत्ता निरर्थक वाटते. “तर्क वितर्क व देवज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून प्रत्येक कल्पना ख्रिस्ताधिन व्हावी म्हणून आम्ही ती बंदिवान करून देतो.” २ करिंथ. १०:५. नंतर मनुष्यामध्ये कमी लेखलेली नम्रता व स्वःनाकाराचे प्रेम यांनाच फक्त मोल प्राप्त होते. हे सुवार्तेचे कार्य आहे आणि योहानाचा संदेश ह्या स्वार्तेचा एक भाग आहे.DAMar 99.2

    धर्मगुरूंच्या प्रश्नांचा भडिभार चालूच होताः “आपण ख्रिस्त नाही, एलीया नाही व तो संदेष्टाही नाही तर बाप्तिस्मा का करिता?” येथे “संदेष्टा” हा शब्द मोशेला उद्देशून वापरण्यात आला आहे. मोशेचे मरणातून उत्थान होईल आणि त्याला स्वर्गात नेले जाईल असा यहूदी लोकांचा विश्वास होता. त्याचे अगोदरच पुनरुत्थान झाले आहे हे त्यांना माहीत नव्हते. योहानाने आपल्या कार्याला सुरूवात केली तेव्हा लोकांना वाटले की मेलेल्यातून उठलेला हा मोशे असावा, कारण त्याला शास्त्रवचनाचे व इस्राएलाच्या इतिहासाचे सत्य ज्ञान असल्याचे दिसले.DAMar 99.3

    मशीहाच्या आगमना अगोदर एलीया प्रत्यक्ष आल्याचे दिसेल असा त्यांचा विश्वास होता. त्याचा नाकार केला त्यामध्येच त्याची ती अपेक्षा पूर्ण झाली; परंतु त्याच्या शब्दात खोल अर्थ अंतर्भूत होता. नंतर योहानाच्या संदर्भात येशूने म्हटले, “तुम्ही तो ग्रहण करण्यास मान्य असाल तर जो एलीया येणार तो हाच आहे.” मत्तय ११:१४. एलीयासारखेच काम करण्यासाठी योहान एलीयाच्या उत्साहाने आणि सामर्थ्याने आला होता. यहूद्यांनी त्याचा स्वीकार केला असता तर त्यांच्यासाठी ते साध्य झाले असते. परंतु त्याचा संदेश त्यांनी स्वीकारला नाही. त्यांच्या दृष्टीने तो एलीया नव्हता. जे कार्य तो साध्य करून घ्यावयास आला होता ते त्याने त्यांच्यासाठी केले नाही.DAMar 99.4

    यार्देनच्या ठिकाणी जमलेल्यातील पुष्कळ लोक येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी हजर होते; परंतु त्यातील थोड्या जनानाच त्यावेळचे चिन्ह प्रगट झाले होते. योहानाच्या कार्याच्या काही महिने अगोदर पुष्कळांनी पश्चात्तापाचे पाचारण झिडकारून टाकिले होते. अशा रीतीने त्यांनी अंतःकरणे कठीण केली आणि त्याची आकलनशक्ती मंद झाली. येशूच्या बाप्तिस्म्याच्या समयीची दिव्य साक्ष त्यांना समजली नाही. ज्यांच्या श्रद्धेचे नेत्र अदृश्य असलेल्या व्यक्तीकडे वळले नाहीत त्यांना देवाचे गौरव दिसले नाही. ज्याची वाणी त्यांनी केव्हाही ऐकली नाही त्यांना साक्षीची वाणी ऐकू आली नाही. तीच स्थिती आजही आहे. लोकांच्या एकत्रीत येण्यामध्ये वेळोवेळी ख्रिस्ताचे व सेवा करणाऱ्या दूतांचे वास्तव्य असते तरी पण त्यातील पुष्कळांना त्याचा गंध नसतो. काही अघटित घडत आहे त्याचे ज्ञान त्यांना नसते. परंतु काहीना उद्धारकाचे वास्तव्य प्रगट करण्यात येते. त्यामुळे त्यांची अतःकरणे शांती व आनंद यांनी सचेतन होतात. त्यांचा उत्साह वाढतो, समाधान होते आणि आशीर्वाद लाभतो.DAMar 100.1

    शिष्ठमंडळाने अधिकाराने योहानाला विचारिले, “तू बाप्तिस्मा का करीतोस?” ते त्याच्या उत्तराची अपेक्षा करीत होते. एकाएकी त्याची नजर लोकसमुदयावर फिरली, त्याचे नेत्र तेजस्वी झाले, त्याचा चेहरा प्रकाशित झाला, त्याचा सर्व प्राण गर्द भावनेने उचंबळून आलेला होता. हात पुढे करून त्याने प्रतिपादिले, “मी पाण्याने बाप्तिस्मा करितो. ज्याला तुम्ही ओळखीत नाही असा एक तुम्हामध्ये उभा आहे; तो माझ्या मागून येणार आहे, त्याच्या पायतणाचा बंद सोडावयास मी योग्य नाही.’ योहान १:२६, २७.DAMar 100.2

    संदेश स्पष्ट व असंदिग्ध होता, आणि तो धर्मसभेला कळवायचा होता. योहानाचे शब्द दुसऱ्या कोणाला नाही तर आश्वासित व्यक्तीलाच लागू होते. मशीहा त्यांच्यामध्ये होता! योहान कोणाविषयी बोलत होता याचा त्यांना शोध घ्यावा म्हणून याजक व अधिकारी त्यांच्याकडे आत्यंतिक आश्चर्याने पाहात होते. परंतु घोळक्यामध्ये तो ओळखण्यासारखा नव्हता.DAMar 100.3

    येशूच्या बाप्तिस्म्याच्या समयी योहानाने त्याला देवाचा कोकरा म्हणून संबोधले तेव्हापासून मशीहाच्या कार्यावर नवीन प्रकाश टाकिला. यशयाच्या शब्दाकडे संदेष्ट्याचे मन वेधले, “वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे.’ यशया ५३:७. त्या नंतरच्या सप्ताहात योहानाने मन लावून यज्ञबलीचा विधि व त्याविषयीचे भाकीत यांचा बारकाईने अभ्यास केला. ख्रिस्ताच्या दोन टप्प्याच्या कार्यातील - क्लेशयुक्त यज्ञबली आणि विजयी राजा - फरक त्याने स्पष्ट केला नाही. परंतु याजक आणि लोक यांच्या समजूतीपेक्षा त्याच्या आगमनात खोल अर्थ भरलेला आहे असे त्याने पाहिले. अरण्यातून परतल्यावर त्याने जेव्हा येशूला मोठ्या घोळक्यात पाहिले तेव्हा त्याने आपल्या खऱ्या स्वभावाची लोकांना काहीतरी खूण द्यावी असे त्याला खात्रीने वाटले होते. उद्धारकाने आपल्या कार्याची घोषणा करावी म्हणून तो अधिर होऊन अपेक्षा करीत होता; परंतु त्याविषयी काही उद्गार काढिले नाहीत व काही खूणही नव्हती. योहानाने त्याच्याविषयी केलेल्या घोषणेला ख्रिस्ताने प्रत्युत्तर केले नाही. परंतु योहानाच्या शिष्यामध्ये तो मिसळून गेला, आपल्या विशेष कार्याचा बाह्य पुरावा दिला नाही आणि स्वतःकडे लक्ष वेधण्यासाठी कोणतीही हालचाल केली नाही. DAMar 100.4

    दुसऱ्या दिवशी योहानाने येशूला येताना पाहिले देवाच्या वैभवाचे तेज त्याच्यावर प्रकाशले होते. संदेष्ट्याने हात पुढे करून म्हटले, “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा! माझ्यामागून एक पुरुष येत आहे तो माझ्यापुढे झाला आहे कारण तो माझ्यापूर्वी होता, असे ज्याच्याविषयी मी म्हणालो, तो हाच आहे. मी त्याला ओळखीत नव्हतो; तरी त्याने इस्राएलास प्रगट व्हावे म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा करीत आलो आहे. आणि योहानाने अशी साक्ष दिली की, आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असताना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला. मी तर त्याला ओळखीत नव्हतो तरी ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा करावयास पाठविले त्याने मला सांगितले होते की, ज्या कोणावर आत्मा उतरत असताना व स्थिर राहाताना पाहाशील तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा आहे. मी स्वतः पाहिले आहे व साक्ष दिली आहे की, हा देवाचा पुत्र आहे.” योहान १:२९-३४.DAMar 101.1

    हा ख्रिस्त होता काय? तूर्तच घोषीत केलेल्या देवपुत्राकडे लोक आश्चर्यचकित होऊन पाहू लागले. योहानाच्या उद्गाराने त्यांची अंतःकरणे हेलावली होती. देवाच्या नावात त्याने हे उद्गार काढिले होते. प्रतिदिनी तो त्यांच्याशी बोलून त्यांना पापाबद्दल दोष देत होता आणि त्याला स्वर्गातून पाठविले आहे ह्याची खात्री पक्की झाली. परंतु योहानापेक्षा श्रेष्ठ हा कोण होता? त्याचा पोषाख व वागणूक याद्वारे तो एक मोठा कोणी दर्जेदार असावा असे वाटत नव्हते. तो एक साधा माणूस असून त्यांच्याप्रमाणेच त्याचा गरीबीचा पेहराव होता.DAMar 101.2

    ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्याच्या वेळी त्याचे वैभव पाहाणारे आणि स्वर्गातून झालेली वाणी ऐकणारे काहीजण तेथे होते. परंतु त्यावेळेपासून त्याच्या चेहऱ्यावर फार फरक झाला होता. बाप्तिस्म्याच्या समयी स्वर्गीय प्रकाशाने तेजस्वी झालेला त्याचा चेहरा त्यांनी पाहिला होता; आता तो पिकट, गळलेला, क्षीण झाला होता आणि केवळ योहानाने त्याला ओळखले होते.DAMar 101.3

    लोकांनी त्याच्याकडे निरखून पाहिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर दिव्य सहानुभूती आणि विवेकबुद्धीचे सामर्थ्य यांचा मिलाफ झालेले त्यांच्या निदर्शनास आले. डोळ्याचा प्रत्येक दृष्टीक्षेप व चेहऱ्याचा प्रत्येक भाग यांच्यामध्ये विनम्रता व अतिव प्रेम व्यक्त झालेले दिसत होते. त्याच्याभोवती आध्यात्मिक वातावरणाचा गंध पसरलेला दिसत होता. त्याची वागणूक विनयशील व भिडस्त, निगर्वी होती तरी त्याच्या लपलेल्या शक्तीचा प्रभाव लोकावर त्याने पाडिला कारण ती शक्ती सर्वस्वी लपू शकत नव्हती. इस्राएल लोकांनी फार दिवसापासून अपेक्षा केलेला तर हा नाही ना?DAMar 101.4

    आमचे उदाहरण आणि आमचा उद्धारक होण्यासाठी येशू गरीबीने आणि नम्रतेने आला. राजदरबारी थाटाने आला असता तर नम्रतेचे पाठ कसा देऊ शकला असता? डोंगरावरील प्रवचनातील मर्मभेदक सत्य कसे सादर करू शकला असता? राजा म्हणून आला असता तर नम्र व साध्या माणसांचे आशास्थान कुठे राहिले असते?DAMar 101.5

    योहानाने निर्दिष्ट केलेल्याविषयी मोठ्या अपेक्षा करणे अशक्य आहे असे लोकसमुदायास वाटत होते. म्हणून पुष्कळांची निराशा होऊन ते गोंधळून गेले होते.DAMar 102.1

    याजक व धर्मगुरूंनी फार अपेक्षा केलेला संदेश, येशू इस्राएल लोकांना पुन्हा राज्य मिळून देईल, आतापर्यंत घोषीत करण्यात आला नाही. अशा राजाची ते प्रतिक्षा करीत होते व अशा राजाचा स्वीकार करण्यास ते तयार होते. परंतु त्यांच्या अंतःकरणात धार्मिकतेचे आणि शांतीचे राज्य प्रस्थापित करणाऱ्याचा ते स्वीकार करणार नव्हते.DAMar 102.2

    दुसऱ्या दिवशी जवळच दोन शिष्य उभे राहिले होते तेव्हा योहानाने येशूला लोकामध्ये पाहिला. पुन्हा संदेष्ट्याचे मुख अदृश्य दिव्य वैभवाने प्रकाशीत झाले आणि मोठ्याने तो उद्गारला, “पाहा, तो देवाचा कोकरा!’ ह्या उद्गाराने शिष्यांची अंतःकरणे हर्षाने उचंबळून आली. त्यांना त्याचा पूर्ण अर्थ समजला नाही. योहानाने नामनिर्देश केलेला. “देवाचा कोकरा” म्हणजे काय? योहानाने स्वतःही त्याचे स्पष्टीकरण केले नाही.DAMar 102.3

    योहानाला सोडून येशूच्या शोधात ते गेले. त्यातील एकजण शिमोनाचा भाऊ अंद्रिया होता आणि दुसरा उपदेशक योहान होता. हे ख्रिस्ताचे पहिले शिष्य होते. त्यांच्या भावना उद्दिपीत होऊन ते येशूच्या मागे गेले, त्याच्याशी बोलण्यास ते अति उत्सुक होते, तथापि ते चकित होऊन मुग्ध राहिले. त्यांच्या डोक्यातील अर्थपूर्ण महत्त्वाच्या विचारात ते गर्क झाले होते, “हा मशीहा आहे काय?”DAMar 102.4

    शिष्य त्याच्या मागे येत आहेत हे येशूला माहीत होते. त्याच्या कार्याचे ते प्रथम फळ होते. त्याच्या कृपेचा स्वीकार करण्यास मान्यता दिल्याबद्दल ह्या दिव्य शिक्षकाच्या अंतःकरणाला हर्ष होत होता. तथापि वळून त्याने म्हटले, “तुम्ही काय शोधता?’ त्यांना त्याने मनातील विचार व्यक्त करण्यास किंवा मागे जाण्यास मोकळीक दिली.DAMar 102.5

    केवळ एकाच गोष्टीबाबत ते विचार करीत होते. एका दर्शनाने त्यांचे विचार भरून गेले. ते उद्गारले, “रब्बी, (म्हणजे गुरूजी), आपण कोठे राहाता?” रस्त्याच्या बाजूला झालेल्या मुलाखतीत हवे असलेले सगळेच त्यांना मिळाले नाही. त्याच्याबरोबर निवांत स्थळी जावे, त्याच्या चरणाशी बसून त्याच्या मधुर वाणीचा आस्वाद घ्यावा अशी त्यांची मनिषा होती.DAMar 102.6

    “तो त्यास म्हणाला, या म्हणजे पाहाल. मग त्यांनी जाऊन तो कोठे राहात आहे ते पाहिले व त्या दिवशी ते त्याच्या येथे राहिले.”DAMar 102.7

    योहान आणि आंद्रियाने याजक आणि अधिकारी यांच्यासारखी अश्रद्धेची वृती बाळगली असती तर येशूच्या चरणी बसून शिकण्याची संधि त्यांना मिळाली नसती. ते त्याच्याकडे त्याच्या शब्दावर टीकात्मक शेरे मारण्यासाठी टीकाकार म्हणून आले असते. अशा प्रकारे पुष्कळ जन आलेल्या संधीचे द्वार बंद करतात. परंतु ह्या पहिल्या शिष्यांनी तसे केले नाही. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या संदेशाद्वारे आलेल्या पवित्र आत्म्याच्या हाकेला ओ देऊन ते पुढे आले होते. आता त्यांनी दिव्य गुरूजीची वाणी ओळखली. देवाच्या वचनात त्यांना जीवंतपणा, सत्यता आणि सौंदर्य दिसले. जुना करारातील शिकवणीवर दिव्य प्रकाश चमकत होता सत्याची विविध अंगे नवीन अर्थाने समृद्ध केली.DAMar 102.8

    पश्चात्ताप, विश्वास आणि प्रीती ह्यांच्यामुळे स्वर्गातील ज्ञान संपादन करता येते. प्रेमप्रेरित विश्वास ज्ञानाची गुरुकिल्ली आहे, आणि जो प्रेम करितो तो “देवाला ओळखतो.” १ योहाना ४:७.DAMar 103.1

    शिष्य योहान अति उत्साही, कृपाकटाक्ष, व विचारमग्न, चिंतनप्रिय होता. ख्रिस्ताचे वैभव त्याला आता समजायला लागले - जगातील डामडौल आणि अधिकार नाही, कारण त्याची अपेक्षा करायला त्याला शिकविले होते, परंतु “ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण असलेले गौरव त्याला समजले.” योहान १:१४. अद्भुत गोष्टीमध्ये तो विचारमग्न होता.DAMar 103.2

    मनात भरलेला आनंद व्यक्त करण्याचा प्रयत्न आंद्रिया करीत होता. त्याचा भाऊ शिमोनाला भेटल्यावर तो उद्गारला, “मशीहा आम्हास सांपडला आहे.’ शिमोन एक क्षणही न गमावता, कारण बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा उपदेश त्याने ऐकला होता, उद्धारकाकडे पळाला. येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहिले आणि त्याचा स्वभाव व त्याच्या जीवनाचा इतिहास त्याच्या डोळ्यापुढे आला. त्याचा भावनावश स्वभाव, त्याचे करुणामय व सहानुभूती असलेले अंतःकरण, त्याची महत्त्वाकांक्षा आणि आत्मविश्वास, त्याच्या अपजयाच्या विशिष्ट घटना, त्याचा पश्चात्ताप, त्याचे कार्य आणि त्याचे हुतात्म्याचे मरण हे सर्व उद्धारकाच्या डोळ्यासमोर आले आणि त्याने म्हटले, “तू योहनाचा मुलगा शिमोन आहेस; तुला केफा (म्हणजे पेत्र) खडक म्हणतील.’ DAMar 103.3

    “दुसऱ्या दिवशी त्याने गालीलात जाण्याचा बेत केला, तेव्हा फिलिप्प त्याला भेटला; येशूने त्याला म्हटले, माझ्यामागे ये.” फिलिप्पाने त्याची आज्ञा मानली आणि तडक तो ख्रिस्ताचा कामकरी बनला.DAMar 103.4

    फिलिप्पाने नथनेलला बोलाविले. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने येशूला देवाचा कोकरा असे निदर्शले होते तेव्हा नथनेल लोकसमुदायात होता. येशूकडे पाहिल्यावर नथनेलची निराशा झाली होती. कष्ट व दरिद्री यांनी ग्रस्त झालेला हा मनुष्य मशीहा असू शकेल काय? तथापि नथनेल येशूला नाकारू शकत नव्हता, कारण योहानाच्या संदेशाद्वारे त्याच्या मनाची पक्की खात्री झाली होती.DAMar 103.5

    फिलिप्पाने बोलाविले होते तेव्हा नथनेल योहानाचा संदेश व त्याने मशीहाविषयी केलेले भाकीत यांच्यावर मनन करण्यासाठी उपवनामध्ये गेला होता. योहानाने घोषीत केलेला जर उद्धारक आहे तर त्याचा समज त्याला व्हावा अशी त्याने प्रार्थना केली. देवाचा आत्मा त्याच्यावर आला आणि देवाने इस्राएल लोकांची आठवण करून त्यांच्यातून तारणाचे श्रृंग उदयास येईल अशी खात्री त्याला देण्यात आली. त्याचा मित्र भाकीताचा शोध घेत असावा हे फिलिप्पाला माहीत होते. अंजिराच्या झाडाखाली नथनेल प्रार्थना करीत असताना फिलिप्पाने ते ठिकाण शोधून काढिले. वृक्षाच्या गर्द छायेच्या निवांत ठिकाणी ते दोघेजण वारंवार एकत्र येत असे. DAMar 104.1

    “नियमशास्त्रात आणि भाकीतात मोशेने उल्लेखलेला आम्हाला सांपडला आहे’ हा संदेश नथनेलच्या प्रार्थनेचे ते प्रत्यक्ष उत्तर होते. परंतु फिलिप्पाचा विश्वास अजून डळमळीत होता. साशंक होऊन त्याने म्हटले, “योसेफाचा मुलगा येशू नासरेथकर.” पुन्हा नथनेलच्या मनात पूर्वग्रह उद्भवला. तो उद्गारला, “नासरेथातून काही तरी उत्तम निघू शकते काय?”DAMar 104.2

    फिलिप्प वादात पडला नाही. त्याने म्हटले, “येऊन पाहा. नथनेलाला आपणाकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, पाहा, हा खराखुरा इस्राएली आहे, त्याच्याठायी कपट नाही!” आश्चर्यचकित होऊन नथनेल म्हणाला, “आपणाला माझी ओळख कोठली? येशूने त्याला उत्तर दिले, फिलिप्पाने तुला बोलावण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास तेव्हाच मी तुला पाहिले.”DAMar 104.3

    हे पुरे होते. अंजिराच्या झाडाखाली एकांतात केलेल्या प्रार्थनासमयी दिव्य आत्म्याने ज्याच्याविषयी साक्ष दिली तोच आता त्याच्याशी प्रत्यक्ष येशूच्या शब्दात बोलला. जरी साशंक व कलुषित मनाचा होता तरी सत्य जाणण्याच्या इराद्याने तो येशूकडे आला होता. आता त्याची इच्छा पूर्ण झाली होती. त्याला येशूकडे आपणाऱ्यापेक्षा त्याचा विश्वास अधिक वाढला. नथनेल त्याला म्हणाला, “गुरूजी आपण देवाचे पुत्र आहा; आपण इस्राएलाचे राजे आहा.” DAMar 104.4

    नथनेल धर्मगुरूवर मार्गदर्शनासाठी अवलंबून राहिला असता तर त्याला येशू कदापि सांपडला नसता. स्वतः पाहून आणि परिक्षण करून तो शिष्य बनला. आजसुद्धा पुष्कळांच्या बाबतीत हीच गोष्ट आहे. पूर्वग्रहामुळे ते हित कल्याणापासून दुरावले जातात. प्रत्यक्ष “येऊन येशूला पाहिले” तर त्याची निष्पति किती वेगळी होईल!DAMar 104.5

    मानवी अधिकाराच्या मार्गदर्शनावर अवलंबून राहिल्यास कोणालाही सत्याचे तारणदायी ज्ञान लाभणार नाही. नथनेलप्रमाणे आपण स्वतः देववचनाचे अध्ययन करून अज्ञान नष्ट करण्यासाठी पवित्र आत्म्याची प्रार्थना केली पाहिजे. अंजिराच्या झाडाखाली ज्याने नथनेलाला पाहिले तो प्रार्थेनेच्या गुप्तस्थळी आम्हाला पाहील. दिव्य मार्गदर्शनासाठी नम्रतेने विनवणी करणाऱ्याजवळ देवाचे देवदूत असतात.DAMar 104.6

    योहान, अंद्रिया, शिमोन, फिलिप्प आणि नथनेल यांना पाचारण करून ख्रिस्ती मंडळीच्या पायारचनेला सुरूवात झाली. योहानाने आपल्या दोन शिष्यांना येशूकडे पाठविले. नंतर त्यांच्यापैकी एक अंद्रिया याने आपल्या भावाला उद्धारकाकडे आणिले. मग फिलिप्पाला बोलावण्यात आले आणि तो नथनेलच्या शोधात गेला. ह्या उदाहरणावरून आम्हाला वैयक्तिक कार्याचे महत्त्व समजले पाहिजे. आपले नातेवाईक, स्नेही आणि शेजारी यांच्याशी चांगला घरोबा ठेवावा. आयुष्यभर ख्रिस्ताचा निकटचा संबंध असल्याचे घोषीत करणारे पण एकाही व्यक्तीला ख्रिस्ताकडे आणण्याचा प्रयत्न न करणारे असेही लोक आहेत. ह्या कामाची सगळी जबाबदारी ते पाळकावर टाकतात. पाचारणासाठी तो लायक असू शकेल, परंतु देवाने मंडळीतील सभासदांनी करावयास जे काम दिले आहे तो ते करू शकत नाही.DAMar 105.1

    प्रेमळ ख्रिस्ती लोकांच्या सेवेची आज अनेकांना गरज आहे. शेजारी आणि इतर सर्व साधारण स्त्रिपुरुषांनी शर्तीचे प्रयत्न केले असते तर अनेक लोक नाशापासून बचावले असते. वैयक्तिक भेटीची पुष्कळजण अपेक्षा करीत आहेत. ज्या गावांत आपण राहातो, तेथे, कुटुंबात, आसपासच्या प्रांतात ख्रिस्ताचे मिशनरी म्हणून काम केले पाहिजे. आपण जर ख्रिस्ती आहोत तर असल्या कामाने आम्हाला सुख समाधान प्राप्त होईल. पालट झालेल्या व्यक्तीच्या मनात मिळालेला मोल्यवान मित्र येशू याच्याविषयी इतरांना सांगण्यास ताबडतोब प्रबल इच्छा निर्माण होईल. तारणदायी आणि पवित्र करणारे सत्य अंतःकरणात दबून बसू शकत नाही.DAMar 105.2

    ज्यांनी देवाला वाहून दिले आहे ते प्रकाशवाहक होतील. त्याची कृपासंपत्ति इतरांना सादर करण्यासाठी देव त्यांना त्याचे प्रतिनिधी बनवितो. तो म्हणतो, “मी त्यांस व माझ्या डोंगराभोवतालच्या स्थळास मंगलदायक करीन; पाऊस योग्य ऋतूत पडेल असे मी करीन; मंगलदायक वृष्टि होईल.” यहज्के. ३४:२६.DAMar 105.3

    फिलिप्पाने नथनेलाला म्हटले, “येऊन पाहा.” दुसऱ्याची साक्ष घे असे त्याने त्याला म्हटले नाही, परंतु तू स्वतःच ख्रिस्ताचे दर्शन घे असे सांगितले. आता येशू स्वर्गात गेला आहे, लोकामध्ये त्याचे शिष्य त्याचे प्रतिनिधी आहेत. ख्रिस्तासाठी लोकांना जींकण्याचा उत्कृष्ट मार्ग म्हणजे आमच्या जीवनामध्ये त्याचे गुण आम्ही उदाहरणाने दाखविले पाहिजे. दुसऱ्यावरीलDAMar 105.4

    आमचा प्रभाव आमच्या बोलण्यावर अवलंबून नाही तर आमच्या जीवन पद्धतीवर. आमच्या विचारसरणीला लोक विरोध करतील, नाकारतील, आमची विनवणी मान्य करणार नाहीत; परंतु निर्लोभी करुणामय जीवनाचा ते नाकार करू शकत नाहीत. ख्रिस्ताचा सौम्य व लीन स्वभाव स्पष्ट केलेले सुसंगत जीवन जगातील महान शक्ती आहे.DAMar 105.5

    अंतर्यामात भिनलेली खात्री आणि अनुभव यांचे आविष्करण ख्रिस्ताच्या शिकवणुकीत आहे, आणि जे त्याच्यापासून शिकतात ते दैवी योजनेप्रमाणे शिक्षक बनतात. देवाच्या वचनाद्वारे पवित्र झालेल्याच्या वाणीत जीवन देणारी शक्ती असते आणि श्रोत्यांना ते आकर्षक वाटते आणि ही जीवनाची वस्तुस्थिती असल्याची खात्री होते. जेव्हा एकादा सत्य प्रेमाने स्वीकार करितो तेव्हा तो आपल्या मन वळविण्याच्या पद्धतीप्रमाणे व पोषक वाणीद्वारे ते प्रगट करील. ज्याने स्वतः ऐकले, पाहिले आणि हाताळले ते जीवनी वचन त्याने दुसऱ्यांना प्रगट केले, अशासाठी की ख्रिस्तज्ञानाद्वारे त्यांच्याशी त्याचा सहभाग साधावा. वेदीवरील ज्वलंत निखाऱ्याला स्पर्श झालेल्या ओठातून निघालेली साक्ष ग्रहणक्षम अंतःकरणाला सत्य आहे आणि त्याद्वारे शुद्धीकरणाची प्रक्रिया घडते.DAMar 105.6

    दुसऱ्यांना प्रकाश देणारा स्वतः आशीर्वादित होतो. “आशीर्वादाचा वर्षाव होईल.” “जो पाणी पाजतो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल.” नीति. ११:२५. आमच्या साहाय्याशिवाय मानवाचा उद्धार करण्याचा आपला उद्देश देवाने साध्य करून घेतला असता; परंतु ख्रिस्तासारखा आमचा स्वभाव बनण्यास आम्ही त्याच्या कार्यात सहभागी झाले पाहिजे. त्याच्या आनंदाचे आम्ही सहभागी व्हायला पाहिजे, त्याच्या उद्धार कार्यात भाग घेतला पाहिजे. त्याच्या यज्ञबलीद्वारे उद्धार पावलेल्यांना पाहाणे हा त्याचा आनंद होता.DAMar 106.1

    नथनेलच्या विश्वासाचे पहिलेच आविष्करण कळकळीचे मनापासून व निर्भेळ होते. येशूच्या कानाला ते मधुर वाटले. येशूने म्हटले, “मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू विश्वास धरतोस काय? ह्यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहाशील.” उद्धारकाने आपले पुढील कार्य आनंदाने पाहिले - लीन लोकांच्या कानावर सुवार्ता टाकणे, भग्न हृदयांना दीलासा देणे आणि सैतानाच्या कचाट्यात सापडलेल्यांना मुक्त करणे. मानवावर विशिष्ट आशीर्वाद आणण्यासाठी त्याने म्हटले, “मी तुम्हास खचित खचित सांगतो, आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल.”DAMar 106.2

    ह्या ठिकाणी येशूचे खरे म्हणणे असे आहे की, यार्देन नदीच्या काठावर आकाश उघडलेले होते आणि देवाचा आत्मा त्याच्यावर कबुतरासारखा उतरला. माझ्यावर तुमचा असा विश्वास असला तर तुमचा विश्वास प्रज्वलित होईल. आकाश सतत उघडे असलेले पाहा. केव्हाही बंद पडू देऊ नका. मी तुमच्यासाठी ते उघडले आहे. गरजवंताच्या व दुःखितांच्या प्रार्थना घेऊन देवदूत वर चढताना आणि खाली उतरताना ते आपल्याबरोबर मनुष्यासाठी आशीर्वाद, आशा, धैर्य, साहाय्य आणि जीवन आणीत आहेत.DAMar 106.3

    पृथ्वीवरून स्वर्गाला आणि स्वर्गाहून पृथ्वीला अशी देवदूतांची रहदारी सतत चालू आहे. दुखणाईतासाठी व यातना भोगणाऱ्यासाठी ख्रिस्ताने केलेले चमत्कार देवाच्या सामर्थ्याने दूतांच्या सेवेद्वारे घडले आहेत. तसेच ख्रिस्ताद्वारे त्याच्या दिव्यदूतांच्या मदतीने देवाचा हरेक कृपाप्रसाद आम्हापर्यंत पोहचतो. मानवता परिधान करून आमचा उद्धारक स्वतःची आवड पतन पावलेले आदामाचे पुत्र व कन्या यांच्याशी संयुक्त करितो, आणि आपल्या देवत्वाने देवाच्या सिंहासनाची पक्कड घेतो. अशा प्रकारे देवाशी संवाद किंवा संबंध साधन्यात ख्रिस्त माध्यम आहे.DAMar 106.4

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents