Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

युगानुयुगांची आशा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ५४—चांगला शोमरोनी

    लूक १०:२५-३७.

    चांगला शोमरोनी ह्या गोष्टीमध्ये ख्रिस्ताने खऱ्या धर्माचे स्वरूप उदाहरणाने स्पष्ट केले आहे. रचनाबद्ध संस्था, विधि, संस्कार किंवा तत्त्वे व संप्रदाय यांनी सत्य धर्म बनलेला नाही तर त्यामध्ये मनापासून दयेची कृती करणे, परहित साधणे आणि खरा चागुलपणा व्यक्त करणे ही समाविष्ट आहेत.DAMar 435.1

    येशू लोकांना शिकवीत असताना एक वकील उभे राहून परीक्षा पाहाण्याकरिता ख्रिस्ताला म्हणाला, “गुरूजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल?” अगदी शांततेने मोठा समूदाय उत्तराची अपेक्षा करीत होता. वकीलाने असा प्रश्न विचारून ख्रिस्ताला जाळ्यात अडकविण्याचा याजक व धर्मगुरू यांनी विचार केला होता. परंतु उद्धारक वादात पडला नाही तर प्रश्न विचारणाऱ्याकडून त्याने उत्तराची अपेक्षा केली. त्याने म्हटले, “नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तुझ्या वाचण्यात काय आले आहे?” सिनाय पर्वतावर दिलेल्या आज्ञा येशू कडक रीतीने पाळीत नाही असा यहूद्याचा समज होता. परंतु त्याने तारणाचा प्रश्न देवाच्या आज्ञापालनाकडे वळविला.DAMar 435.2

    वकीलाने म्हटले, “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीती कर; आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.” येशूने म्हटले, “ठीक उत्तर दिलेस; हेच कर म्हणजे जगशील.”DAMar 435.3

    परूशांचा हुद्दा आणि कार्य ह्या बाबतीत वकील समाधानी नव्हता. खरा अर्थ जाणून घेण्यासाठी तो पवित्रशास्त्राचा मनापासून अभ्यास करीत होता. ह्यामध्ये अत्यंत महत्त्वाची गोडी असल्यामुळे त्याने प्रामाणिकपणे प्रश्न विचारिला, “मी काय करू?’ त्याच्या उत्तरात आज्ञापालनाच्या अपेक्षित गोष्टीमध्ये त्याने सर्व विधि संस्कार यांची कल्पना बाजूला सारली. त्यांचे काही मोल नाही असे म्हणून ज्याच्यावर सर्व आज्ञा व संदेष्टे अवलंबून आहेत ती दोन महान तत्त्वे सादर केली. ह्या उत्तराची ख्रिस्ताने प्रशंसा केली आणि त्यामुळे ख्रिस्ताला धर्मगुरूबरोबर परिस्थितीची अनुकूलता लाभली. वकीलाच्या विधानाला मान्यता दिल्याबद्दल त्याला हे दोष देऊ शकले नाहीत.DAMar 435.4

    येशूने म्हटले, “हेच कर, म्हणजे जगशील.” आज्ञामध्ये दिव्य एकात्मता आहे असे त्याने सादर केले आणि त्यातील एक पाळावी आणि दुसरी मोडावी हे बरोबर नाही; कारण सर्व आज्ञामध्ये सारखेच तत्त्व गोवलेले आहे. सबंध आज्ञापालनावर मनुष्याचे भवितव्य अवलंबून आहे. देवावर सर्वश्रेष्ठ प्रेम आणि मानवावर निःपक्षपाती प्रेम ही दोन तत्त्वे जीवनात दृगोचर झाली पाहिजेत. DAMar 436.1

    वकील आज्ञाभंग करणारा होता. ख्रिस्ताच्या शोध वचनाने तो दोषी ठरविला होता. आज्ञांची धार्मिकता त्याला ज्ञात आहे असे तो म्हणत होता परंतु प्रत्यक्ष कृतीत किंवा व्यवहारात ती नव्हती. त्याने आपल्या बांधवावर प्रेम केले नव्हते. पश्चात्तापाची मागणी केली होती परंतु पश्चात्ताप करण्याऐवजी तो स्वतःचे समर्थन करीत होता. सत्य मान्य करण्याच्याऐवजी आज्ञापालन करणे किती कठीण आहे असे सांगत होता. अशा रीतीने लोकांच्यासमोर तो झालेली खात्री टाळीत होता आणि स्वतःचे समर्थन करीत होता. स्वतःच्या प्रश्नाचे उत्तर स्वतःनेच दिल्यामुळे त्याने विचारलेला प्रश्न आवश्यक नव्हता असे उद्धारकाच्या शब्दांनी दाखवून दिले होते. तथापि त्याने दुसरा प्रश्न विचारिला, “पण माझा शेजारी कोण?”DAMar 436.2

    ह्या प्रश्नावर यहूदी लोकामध्ये फार वादविवाद सतत चालू होता. मूर्तिपूजक आणि शोमरोनी यांच्या बाबतीत त्यांच्या मनात काही शंका नव्हती कारण ते परके व शत्रू होते. परंतु त्यांचे स्वतःचे लोक आणि समाजातील वेगवेगळ्या श्रेणीतील लोक यांच्यामध्ये फरक, भेद कोठे करायचा? याजक, धर्मगुरू, वडील यांचा शेजारी कोण असणार? स्वतःला शुद्ध करण्यासाठी ते विधि संस्काराभोवती घुटमळत होते.. अडाणी व हलगर्जीपणाने वागणाऱ्याशी संबंध ठेवल्यास त्याद्वारे अमंगलता लाभेल आणि ती पुसून टाकणे फार श्रमाचे होईल अशी त्यांची शिकवण होती. “अशुद्धांना’ ते शेजारी म्हणतील काय?DAMar 436.3

    येशू पुन्हा वादात पडायला इच्छित नव्हता. त्याचा धिक्कार करून शिक्षा फर्मावण्याच्या वादात असणाऱ्यांच्या फाजील धर्माभिमानाबद्दल त्याने त्याचा दोष दाखविला नाही. परंतु साध्या सोप्या गोष्टीद्वारे त्याने श्रोतेजनासमोर अंतःकरणाला स्पर्श करणारे दिव्य करुणामय चित्र रेखाटले आणि वकीलाकडून सत्याची कबुली करून घेतली.DAMar 436.4

    अंधाराची हकालपट्टी करण्यासाठी प्रकाशाला आत प्रवेश दिला पाहिजे. चुकीची दुरुस्ती करण्यासाठी सत्य पुढे मांडणे हा उत्तम उपाय आहे. देवाच्या प्रेम प्रगटीकरणाद्वारे स्वार्थाने भरलेल्या अंतःकरणाचे पाप व व्यंग स्पष्ट होते.DAMar 436.5

    येशूने म्हटले, “एक मनुष्य यरुशलेमहून खाली यरीहोस जात असताना लुटारूंच्या हाती सापडला; त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला, आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले. मग एक याजक सहज त्याच वाटेने खाली जात होता; तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. तसाच एक लेवीही त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला.’ लूक १०:३०-३२. हा काल्पनिक देखावा नव्हता, तर ती प्रत्यक्ष घडलेली घटना होती आणि येथे जशीच्या तशी देण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूने चालते झालेले याजक व लेवी येशूचे वचन ऐकणाऱ्याच्या जमावात होते.DAMar 436.6

    यरुशलेमहन यरीहोला प्रवास करताना प्रवाशाला यहद्याच्या अरण्यातून जावे लागत होते. तेथून खाली जाणारा रस्ता निर्जन डोंगराळ खिंड होती आणि तेथे चोरांचा सुळसुळाट असून वारंवार जबरदस्तीचे हिंसक प्रकार घडत असत. ह्या ठिकाणी प्रवाशावर हल्ला करून मोल्यवान वस्तू काढून घेतल्या आणि त्याला मार देऊन रस्त्याच्या बाजूला अर्धमेला सोडून दिला होता. अशा स्थितीत पडलेला असताना याजक त्या बाजूने जात होता; परंतु त्याच्याकडे त्याने फक्त नजर फिरविली. नंतर लेवी आला. काय घडले हे पाहाण्यास तो जिज्ञासू होता म्हणून तेथे थांबून दुखणेकराकडे त्याने पाहिले. त्याच्यासाठी काहीतरी केले पाहिजे असे त्याला वाटले; परंतु ते सुखकर, अनुकूल काम नव्हते. त्या बाजूने आला नसता तर त्या जखमी माणसाला पाहाण्याचा प्रसंग मिळाला नसता असे त्याला वाटले. ही काय त्याची जबाबदारी नाही असे समजून तो निघून गेला.DAMar 437.1

    ह्या दोन्हीही व्यक्ती पवित्र कार्यभाग सांभाळत असून पवित्र शास्त्र वचनावर प्रवचन करीत होत्या. लोकांच्यासाठी देवाचे प्रतिनिधीत्व करण्यास ह्या वर्गातील व्यक्तींना निवडण्यात आले होते. त्यांना “अज्ञानी व बहकणारे ह्याच्याबरोबर सौम्यतेने वागावयाचे होते,” (इब्री ५:२) त्याद्वारे मानवतेसाठी असलेल्या देवाच्या महान प्रीतीचे ज्ञान प्राप्त करून घेण्यास ते लोकांना मार्गदर्शन करणार होते. ख्रिस्ताला काम करण्यास त्यांना पाचारण करण्यात आले होते. ख्रिस्ताने म्हटले, “परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला; त्याने मला पाठविले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व अंधळ्यांस पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची घोषणा करावी, ठेचले जात आहेत त्यांस सोडवून पाठवावे.’ लूक ४:१८.DAMar 437.2

    स्वर्गातील दिव्यदूत पृथ्वीवरील देवाच्या लोकांची दुर्दशा, हाल अपेष्टा पाहातात आणि त्यातून त्यांची मुक्तता करण्यासाठी ते मनुष्यांना सहकार्य करण्यास तयार आहेत. देवाने त्याच्या तरतुदीप्रमाणे याजक व लेवी यांना त्या दःखी माणसाला पाहाण्यासाठी त्या वाटेने धाडिले अशासाठी की त्यांनी दयेची गरज समजून घेऊन मदत करावी. ह्या माणसांच्या अंतःकरणाला मानवी दु:खांचा स्पर्श होतो किंवा नाही हे पाहाण्यासाठी अखिल स्वर्ग जागृत होता. उद्धारकानेच इब्री लोकांना अरण्यात शिक्षण दिले होते; याजक व धर्मगुरू यांच्यापासून लोकांना अरण्यात शिक्षण दिले होते; याजक व धर्मगुरू यांच्यापासून लोकांना जे धडे मिळत होते त्यांच्यापासून वेगळे धडे त्यांना मेघस्तंभ व अग्निस्तंभ यांच्यापासून मिळाले. नियमातील दयावंत तरतूदी आपल्या गरजा व दुःखे व्यक्त करू न शकणाऱ्या मुक्या प्राण्यानाही लागू केल्या होत्या. ह्या बाबतीत इस्राएल लोकांच्यासाठी मोशेला मार्गदर्शन करण्यात आले होते. “आपल्या शत्रूचा बैल अथवा गाढव मोकार फिरताना तू पाहिला तर त्यास अवश्य वळवून त्याजकडे पोचता कर. तू आपल्या वैऱ्याचा गाढव बोजाच्या भाराखाली दबलेला पाहिला तर त्याला उठविण्याचे त्या एकट्यावर टाकून जाऊ नको, तर त्याला सहाय्य करून त्याची अवश्य सुटका कर.’ निर्गम २३:४, ५. परंतु लुटारूंनी जखमी केलेल्या मनुष्यामध्ये येशूने जखमी झालेला बंधु सादर केला आहे. ओझे वाहाणाऱ्या प्राण्यापेक्षा आपल्या बांधवाबद्दल त्यांच्या अंतःकरणाला दयेचा किती स्पर्श झाला पाहिजे! मोशेतर्फे त्यांना संदेश देण्यात आला आहे: “तुमचा देव परमेश्वर देवाधिदेव, महान देव, पराक्रमी व भययोग्य तो अनाथ व विधवा यांचा न्याय करितो आणि परदेशीयावर प्रीती करितो.’ म्हणून त्याने आज्ञा दिली, “परदेशीयावर प्रीती करा.” “त्याजवर आपल्यासारखीच प्रीती करा.” अनुवाद १०:१७-१९; लेवी १९:३४.DAMar 437.3

    इयोबाने म्हटले, “कोणा परदेशस्थास माझ्या दाराबाहेर बिहाड करून राहाण्याची पाळी आली नाही. वाटसरास माझे दार खुले असे.” मनुष्यांच्या रूपात दोन दूत सदोमाकडे आले होते तेव्हा लोटाने त्याना भूमीपर्यंत लवून प्रणाम केला आणि म्हटले, “पाहा, महाराज, आपल्या दासाच्या घरी येण्याची कृपा करा आणि रात्र घालवा.” इयोब ३१:३२; उत्पत्ति १९:२. हे सर्व पाठ याजक व लेवी यांना अवगत होते परंतु प्रत्यक्ष कृतीत त्यांनी ते आणिले नव्हते. फाजील धार्माभिमान असलेल्या राष्ट्रीय विद्यालयात प्रशिक्षण झालेले ते स्वार्थी, संकुचित व वेचीव लोकाशी संबंध ठेवण्याची वृत्ती असलेले बनले होते. जखमी माणसाकडे पाहिल्यावर तो एतदेशीय किंवा परदेशीय आहे हे ते समजू शकले नाहीत. तो शोमरोनी असावा असे त्यांना वाटले आणि ते तेथून निघून गेले. DAMar 438.1

    त्यांना मिळालेल्या शिक्षणाप्रमाणे त्यांच्या कृतीत अनुचित काही घडले नाही असे त्यांना वाटले. परंतु आता दुसरा देखावा त्यांच्यापुढे आला होताःDAMar 438.2

    एक शोमरोनी त्या वाटेने चालला असता जखमी मनुष्य पडलेला पाहून त्यास त्याचा कळवळा आला. तो अनोळखी यहूदी किंवा हेल्लेणी आहे असा विचार त्याच्या डोक्यात आला नव्हता. शोमरोनी मनुष्याला पूर्णपणे माहीत होते की, पडलेला जखमी मनुष्य शोमरोनी असता तर यहूदी मनुष्य त्याला पाहून त्याच्या तोंडावर थुकून तिरस्काराने तो तेथून निघून जाईल. ह्यामुळे त्याने हलगर्जीपणा केला नाही. तेथे थाबल्यावर अपघाताचा धोका आहे असा विचारही त्याच्या डोक्यात आला नव्हता. त्याच्यासमोर एक मानवप्राणी जखमी होऊन पडलेला आहे आणि त्याला मदतीची गरज आहे हा विचारच त्याच्यापुढे होता. त्याच्यावर घालण्यासाठी त्याने स्वतःची कपडे काढिली. प्रवासात स्वतःच्या उपयोगासाठी आणलेले तेल व द्राक्षरस वापरून त्या मनुष्याला ताजेतवाने केले. त्याला उचलून आपल्या जनावरावर बसवून रस्त्यात त्रास होऊ नये म्हणून हळूहळू नेले. त्याला उतारशाळेत ठेवून रात्रभर त्याची शुश्रूषा करण्यासाठी तो थांबला. सकाळी त्या जखमी माणसाला थोडे बरे वाटल्यावर तो शोमरोनी पुढच्या प्रवासाला जाण्यास तयार झाला. परंतु त्या अगोदर त्याला त्याने उतारशाळेच्या रक्षकाच्या स्वाधीन केले, झालेला खर्च दिला आणि काही रक्कम इसार म्हणून ठेविली. एवढ्यावरच समाधान न झाल्यामुळे आणखी जास्त होणाऱ्या खर्चाची तरतूद केली व म्हटले, “ह्याला सांभाळा, आणि ह्यापेक्षा अधिक काही खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हाला देईन.”DAMar 438.3

    गोष्ट संपली, त्याचे मन जाणून घेण्यासाठी येशूने आपली दृष्टी वकीलावर खिळली आणि म्हटले, “तर लुटारूंच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी ह्या तिघापैकी तुझ्या मते कोण झाला?’ लूक १०:३६.DAMar 439.1

    वकील आता सुद्धा शोमरोनीचे नाव घ्यायला धजेना आणि म्हटले “त्याच्यावर दया करणारा तो.” येशूने म्हटले, “जा आणि तूही तसेच कर.”DAMar 439.2

    अशा प्रकारे “माझा शेजारी कोण?” ह्या प्रश्नाचे उत्तर कायमचे दिले. ज्या मंडळीचे आम्ही सभासद आहो त्यांच्यातला माझा शेजारी आहे असे ख्रिस्ताने दर्शविले नाही. त्याचा संदर्भ वंश, जात, वर्ण किंवा श्रेणी यांच्याशी नाही. आमच्या मदतीची गरज असलेली प्रत्येक व्यक्ती आमचा शेजारी आहे. शत्रूने ज्याला जखमा केल्या आहेत अशी प्रत्येक व्यक्ती आमचा शेजारी आहे. देवाच्या मालकीचा प्रत्येक आत्मा आमचा शेजारी आहे.DAMar 439.3

    चांगला शोमरोनी ह्या गोष्टीमध्ये येशूने स्वतःचे व त्याच्या कार्याचे चित्र रेखाटले आहे. सैतानाने मनुष्याला फसविले आहे, जखमा केल्या आहेत, लुबाडले आहे आणि नाश पावण्यास सोडले आहे; परंतु आमच्या असाहाय्य परिस्थितीमुळे उद्धारकाने आमच्यावर दया दाखविली. आमची सुटका करण्यासाठी उद्धारकाने आपले वैभव सोडले. त्याने आम्हाला मरणावस्थेत पाहिले आणि त्याने आमच्या जखमा बऱ्या केल्या. त्याने आपल्या धार्मिकतेच्या झग्यानेDAMar 439.4

    आम्हाला झाकून घेतले. त्याने आमच्या सुरक्षतेसाठी आश्रयस्थान खुले केले आणि त्याची पूर्ण किंमत भरण्याची त्याने तरतूद केली. आमच्या उद्धारासाठी त्याने प्राण दिला. स्वतःच्या उदाहरणाकडे बोट करून तो आपल्या अनुयायांना म्हणतो, “तुम्ही एकमेकावर प्रीती करावी म्हणून मी तुम्हाला ह्या आज्ञा करितो.’ “जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकावर प्राती करावी.’ योहान १५:१७; १३:३४DAMar 439.5

    वकीलाने येशला प्रश्न विचारिला, “मी काय करू?” देवावरील व माणसावरील प्रीती हा धार्मिकतेचा सार आहे हे ख्रिस्ताने ओळखून म्हटले, “हेच कर म्हणजे जगशील.’ प्रेमळ व कनवाळू अंतःकरणातून आलेली आज्ञा शोमरोनीने पाळिली आणि त्याद्वारे तो आज्ञापालन करणारा आहे हे सिद्ध केले. ख्रिस्ताने वकीलाला सांगितले, “जा आणि तूही तसेच कर.” देवाच्या लोकाकडून उक्ती व कृती यांची अपेक्षा केली जाते. “मी त्याच्या ठायी राहातो, असे म्हणणाऱ्याने तो जसा चालला तसे स्वतःही चालले पाहिजे.” १ योहान २:६.DAMar 439.6

    ज्या वेळेला येशूने हे उद्गार काढून धडा शिकविला त्याप्रमाणेच आतासुद्धा त्याची आवश्यकता आहे. स्वार्थीपणा आणि शिष्टाचार पालनाचे थंडे स्तोम यांनी जवळ जवळ प्रेमाचा अग्नि विझवून टाकिला आहे आणि शीलस्वभाव मोहक करणाऱ्या आचरणाच्या पद्धति उधळून लाविल्या आहेत. ख्रिस्ताचे नाव घेणारे अनेकजन ख्रिस्ती लोक ख्रिस्ताचे प्रतिनिधी आहेत हे विसरतात. कुटुंबामध्ये, शेजारी राहाणाऱ्या लोकांमध्ये, चर्चमध्ये, आणि जेथे असू तेथे आणि आमचा कोणताही व्यवसाय असो, दुसऱ्याच्या कल्याणासाठी प्रत्यक्ष व्यवहारात अनुभव येणारा स्वार्थत्याग नाही तर आम्ही ख्रिस्ती नाही.DAMar 440.1

    ख्रिस्ताने आपले संबंध मानवतेशी निगडित केले आहेत आणि मानवतेच्या उद्धारासाठी आम्ही त्याच्याशी एक झाले पाहिजे. तो म्हणतो, “तुम्हाला फुकट मिळाले आहे, फुकट द्या.” मत्तय १०:८. सर्व दुष्टाईत पाप हे महान कुकर्म आहे. म्हणून पाप्यावर दया दाखवून त्याला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. अनेकजन चुका करितात आणि त्याबद्दल त्यांना दुःख होऊन शरम वाटते. त्यांना उत्तेजन देण्याची गरज आहे. त्यासाठी ते भूकेले आहेत. आपल्या चुकांचा एकसारखा विचार करून ते अति निराश होतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये. आपण जर ख्रिस्ती आहोत तर गरजू व्यक्तीपासून दूर राहू नये. पापाने किंवा क्लेशाने एकादा मनुष्यप्राणी जेरीस आलेला आहे आणि तो आमच्या नजरेस येतो तेव्हा त्याच्याशी आपले काही कर्तव्य नाही असे आपण म्हणू नये. DAMar 440.2

    “जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहा ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा.” गल. ६:१. विश्वास व प्रार्थना यांच्याद्वारे शत्रूच्या शक्तीला मागे हटवा. तुमचे श्रद्धेचे आणि उत्तेजनाचे शब्द जखमी माणसाला जखम भरून काढणारा सुगंधी मलम होईल. जीवनाच्या झगडण्यात अनेकजन निराश होऊन मूर्च्छित होऊन पडलेत आणि प्रेमाच्या एका शब्दाने त्यांना उत्तेजन प्राप्त होऊन ते विजयी होतील. जे सांत्वन आणि समाधान आम्हाला परमेश्वराकडून लाभले आहे ते दु:खांत असलेल्यांना दिल्याशिवाय आपण स्तब्ध राहू नये.DAMar 440.3

    हे सर्व आज्ञाच्या तत्त्वाची परिपूर्णता आहे. हे तत्त्व चांगला शोमरोनी ह्या गोष्टीमध्ये चित्रीत करून येशूच्या जीवनात त्याचे प्रगटीकरण करण्यात आले आहे. त्याच्या स्वभावाद्वारे आज्ञाचा खरा अर्थ व्यक्त करण्यात आला आहे आणि स्वतःप्रमाणे शेजाऱ्यावर प्रीती करणे ह्याचा खुलासा केला आहे. जेव्हा देवाचे लोक ममता, दयाळूपणा आणि प्रीती सर्व मानवप्राण्यावर व्यक्त करितात तेव्हा ते स्वर्गीय नियमांच्या स्वभावाची साक्ष देतात. “परमेश्वराचे नियमशास्त्र पूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करिते.’ स्तोत्र. १९:७. ह्याची ते साक्ष देते. हे प्रेम व्यक्त करण्यास जो अपयशी ठरतो तो पूज्यबुद्धी दाखविणाऱ्या नियमांचा भंग करितो. आपल्या बंधूला दाखविलेल्या वृत्तीवरून देवाविषयी आमच्या मनात कसली वृत्ती आहे हे व्यक्त होते. आमच्या अंतःकरणातील देवावरील प्रेम आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करण्यास आम्हाला उद्युक्त DAMar 440.4

    करिते. “मी देवावर प्रीती करितो असे म्हणून जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करितो तो लबाड आहे; कारण आपल्या बंधूला पाहिले असून त्याजवर जो प्रीती करीत नाही त्याच्याने न पाहिलेल्या देवावर प्रीती करवत नाही?” प्रियजनहो, “आपण एकमेकावर प्रीती करितो तर देव आपल्या ठायी राहातो, आणि त्याची प्रीती आपल्याठायी पूर्ण होते.” १ योहान ४:२०, १२.DAMar 441.1