Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

युगानुयुगांची आशा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय २२—योहानाचा कारावास व मृत्यू

    मत्तय ११:१-११; १४:१-११; मार्क ६:१७-२८; लूक ७:१९-२८.

    ख्रिस्त राज्याची सुवार्ता सांगणारा त्याचप्रमाणे छळ सोसणाराही बाप्तिस्मा करणारा योहान हा पहिलीच व्यक्ती होता. मोकळ्या, स्वच्छ रानातील वातावरणातून आणि त्याची सुवार्ता ऐकण्यास तोबा गर्दी करणाऱ्या प्रचंड जनसमुदायांतून , आता त्याला चार भीतीच्या अंधाऱ्या कोठडीत डांबून टाकण्यात आले होते. यार्देनेच्या पूर्वेकडील प्रदेशावर अंमल असलेल्या हेरोद अंतिपा राजाच्या महालामध्ये त्याला बंदिस्थ करून ठेवण्यात आले होते. हेरोदाने स्वतः योहानाचे संदेश ऐकले होते. पश्चाताप करण्यास योहानाने केलेल्या आव्हानामुळे दुर्वर्तनी राजाचा थरकाप झाला होता. “योहान धार्मिक व पवित्र पुरुष आहे हे ओळखून, हेरोद त्याचे भय धरीत व त्याचे संरक्षण करीत असे; तो त्याचे ऐकून फार गोंधळात पडत असे; तरी हर्षाने त्याचे ऐकून घेत असे.” हेरोदाने त्याच्या भावाची पत्नी हेरोदिया इच्याशी अनैतिक संबंध ठेवले होते म्हणून योहानाने त्याच्यावर दोषारोप ठेवण्याचा यथार्थ निर्णय केला होता. त्यात्पुरते हेरोदाने दुबळेपणाने त्याला बांधून ठेवलेल्या पापी वासनेच्या बंधनाला तोडून टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु हेरोदियाने त्याला आपल्या जाळ्यात कडेकोटपणे अडकून ठेवले, आणि योहानाचा सूड उगविण्यासाठी त्याला तुरुगांत टाकण्यास हेरोदाला प्रवृत्त केले.DAMar 173.1

    योहानाचा जीवनक्रम सर्वदा उद्योगी होता, आणि आता बंदिवासातील औदासिन्य व निष्क्रियता त्याला अतिशय जड वाटू लागली होती. आठवड्यामागून आठवडे गेले, तरी काहीच बदल झाला नव्हता, निराशा आणि शंका यांनी त्याला जखडले होते. त्याच्या शिष्यांना तरुगांत प्रवेश करण्याची परवानगी मिळाली, आणि तेथे त्यानी येशूच्या कल्याणकारी कार्याचा उत्तम वृत्तांत त्याला दिला, इतकेच नव्हे तर लोक त्याच्याभोवती कसे गर्दी करीत होते हेही त्याला सांगितले. पण त्यांच्यापुढे एक प्रश्न उभा राहिला की, जर हे नवे गुरू मशीहा होते तर त्यांनी योहानाची सुटका करण्यासाठी काहीच कसे काय केले नव्हते. त्याच्या निष्ठावंत सुवार्तीकाच्या हक्काची आणि प्राणाची हानी कशी काय होऊ दिली? DAMar 173.2

    या प्रश्नांचा परिणाम झाला नव्हता असे नाही. अन्यथा ज्या शंका कधीच उत्पन्न झाल्या नसल्या त्या शंकाची कल्पना योहानाला करून देण्यात आली होती. हे शब्द ऐकण्यास व त्या शब्दानी प्रभूच्या सुवार्तीकाच्या आत्म्याला मुका मार लागलेला पाहण्यास सैतानाला संतोष झाला होता. कित्येकदा, जे स्वतःला एकाद्या सद्गृहस्थाचे जीवस्य कंठस्य मित्र समजतात आणि जे त्याला निसीम भक्ती प्रदर्शित करण्यास उत्सुक असतात, तेच त्याचे अतिशय घातक शत्रू असतात, असे सिद्ध होते. किती वेळा ते त्याचा विश्वास भक्कम करण्याऐवजी त्याला उदास व नाउमेद करतात!DAMar 173.3

    येशूच्या शिष्याप्रमाणेच योहानालासुद्धा ख्रिस्ताच्या राज्याचे स्वरूप समजून आले नव्हते. येशूने दावीदाच्या राजासनावर विराजमान व्हावे अशी तो अपेक्षा बाळगत होता. जसा काळ मागे पडला, आणि तारणाऱ्याने वैभवी राज्यपदावर कोणताच अधिकार प्रस्थापित केला नव्हता तेव्हा मात्र योहान गोंधळून गेला होता आणि दुःखीही झाला होता. त्याने लोकांना स्पष्ट सांगितले होते की, प्रभूचा मार्ग स्थिर करण्यापूर्वी यशयाचे, प्रत्येक खोरे उंच होवो, प्रत्येक डोंगर व टेकडी सखल होवो; उचनीच असेल ते सपाट होवो व खडकाळीचे मैदान होवो, हे भाकित पूर्ण झालेच पाहिजे. तो मानवाच्या मोठेपणाची व सत्तेची उच्च स्थाने नष्ट होण्याची वाट पाहत होता. त्याने मशीहाचा, त्याचे सूप त्याच्या हातात आहे, तो आपले खळे अगदी निर्मळ करील; आपले गंहू कोठारात साठवील पण भूस न विझत्या अग्नीने जाळून टाकील, असा निर्देश केला होता. ज्याचे चैतन्य व सामर्थ्य धारण करून तो आला होता, त्या एलीयाप्रमाणे, प्रभूने स्वतःला अग्नीच्याद्वारे उत्तर देणारा देव म्हणून प्रगट करावे याची तो वाट पाहत होता.DAMar 174.1

    योहान त्याचे कार्य करीत असतांना, उच्च आणि नीच अशा दोन्ही ठिकाणी होणाऱ्या पापाची निर्भिडपणे निषेध करणारा म्हणूनच उभा होता. पापाबद्दल दोष देण्यासाठीच तो हेरोदापुढे धैर्याने उभा राहिला होता. कार्यपूर्तीसाठी त्याने स्वतःच्या प्राणालासुद्धा प्रिय मानले नव्हते. आता मात्र त्या अंधाऱ्या कोठडीतून, यहूदी वंशाच्या सिंहाने छळ करणाऱ्या त्या राजाचे गर्वाचे घर खाली करावे, आणि जो गरीब व रुदन करीत होता त्याची सुटका करावी याची तो वाट पाहात होता. परंतु येशू स्वतःभोवती शिष्य जमा करण्यात आणि लोकांना बरे करण्यात व शिक्षण देण्यातच समाधानी होता असे भासत होते. तिकडे येशू जकातदाराच्या पंक्तीला बसून जेवण करीत होता, तर त्याच वेळी दररोज इस्राएल लोकांच्या मानेवरील रोमी जूचा भार वाढत होता, आणि त्याच वेळी राजा हेरोद, व त्याची अधम जारिणी मनमानी वागत होते, आणि गरीबांचा व छळ सोसणाऱ्यांचा आक्रोश स्वर्गाकडे जात होता.DAMar 174.2

    रानात संचार करणाऱ्या संदेष्ट्याला त्या गूढाचा ठाव घेणे हे त्याच्या विचार शक्तीपलीकडचे होते असे त्याला भासत होते. अशा काही घटका होत्या की त्यावेळी पिशाच्च त्याच्या आत्म्याला यातना देत होते; आणि भयंकर भीतीची छाया त्याच्यावर पसरली होती. कदाचित प्रदीर्घ काळापासून ज्या तारणाऱ्याची अपेक्षा केली जात होती तो अद्याप आला नसेल का? मग त्याला स्वतःला दुःख सोसण्यास प्रवृत्त केले होते याचा अर्थ काय होता? त्याच्या फलश्रुतीबद्दल योहान अतिशय निराश झाला होता. त्याने अशी अपेक्षा केली होती की, योशीया व एज्रा यांच्या अमदानीत नियमशास्त्राच्या पारायणामुळे देवाच्या वचनाचा जो परिणाम झाला होता तोच आताही झाला पाहिजे होता (२ इतिहास ३४; नेहेम्या ८, ९); त्याद्वारे अंतःकरणाचा ठाव घेणाऱ्या पश्चातापाच्या कामाची व देवाकडे परतण्याच्या क्रियेची सुरूवात झाली असती. या कार्याच्या यशप्राप्तीसाठी त्याचे संपूर्ण जीवन वाहिलेले होते. ते व्यर्थ झाले असते का?DAMar 174.3

    योहानाचे शिष्य, त्याच्यावरील प्रेमामुळे येशूवर अविश्वास प्रगट करीत होते, हे पाहून योहानाला दुःख झाले होते. त्यांच्यासाठी त्याने केलेले श्रम निष्फळ झाले होते काय? तो त्याच्या कार्यांत अप्रामाणिकपणे वागला होता काय की, त्यामुळे आता त्याला कामापासून दूर करण्यात आले होते? जर वचनदत्त तारणारा आला होता, आणि योहान त्याच्या कार्यांत विश्वासू ठरला असता, तर येशू आता त्या जुलूमशहाची सत्ता उखडून टाकणार नव्हता काय, आणि त्याच्या संदेष्ट्याची सुटका करणार नव्हता काय?DAMar 175.1

    तथापि योहानाने येशूवरील त्याचा विश्वासू ढळू दिला नव्हता. आकाशवाणीचे स्मरण, आणि कबुतराचे उतरणे, येशूची निष्कलंक शुद्धता, येशूच्या समक्षतेत आल्यानंतर योहानाला प्राप्त झालेले पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आणि भविष्यात्मक वचनाची साक्ष, या सर्व गोष्टींनी साक्ष दिली होती की नासरेथकर येशू वचनदत व्यक्ती होता.DAMar 175.2

    योहान त्याच्या चिंतेविषयी व शंकेविषयी त्याच्या सोबत्याशी काहीच ऊहापोह करणार नव्हता. चौकशी करण्यासाठी निरोप पाठविण्याचे त्याने नक्की ठरविले होते. हे काम त्याने त्याच्या दोन शिष्यावर सोपविले. या आशेने की येशूबरोबरच्या मुलाखतीमुळे त्यांचा विश्वास बळकट होईल आणि ते त्यांच्या बंधुसाठी आत्मविश्वास घेऊन येतील. त्याच्यासाठीही काही निरोपाची त्याने अपेक्षा केली.DAMar 175.3

    ते शिष्य निरोप घेऊन येशूकडे आले. “जे यावयाचे ते आपण आहां, किंवा आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी? DAMar 175.4

    “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा, देवाचा कोकरा.” “तो माझ्यामागून येणारा आहे, त्याच्या वाहणेचा बंद सोडावयास मी योग्य नाही’ योहान १:२९, २७. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने हे असे विधान करून व येशूविषयी सांगून किती अल्प काळ मागे पडला होता. पण आता प्रश्न विचारण्यात आला की, “जे यावयाचे ते आपण आहा?” मानवी स्वभावाचे भयंकर कडवट व निराशजनक चित्र असे ते होते. योहानासारखा विश्वासू वाटाड्याच ख्रिस्ताचे काम समजून घेण्यास अपयशी ठरला होता, तर मग स्वार्थनिष्ठ समुदायाकडून काय अपेक्षा करायची होती?DAMar 175.5

    तारणाऱ्याने शिष्याच्या प्रश्नाचे उत्तर ताबडतोब दिले नाही. त्याच्या मुग्धतेकडे आश्चर्याने ते पाहत उभे असता, रोगाने जर्जर झालेले व पिडलेले लोक बरे होण्यासाठी त्याच्याकडे येत होते. अंधळे चाचपत, चाचपत तोबा गर्दीतून कशी तरी वाट काढत होते. तेथे सर्व प्रकारचे रुग्ण येत होते. काहीजन स्वतःच रेटारेटी करून, तर काही लोक मित्राच्या मदतीने प्रचंड गर्दीतून ख्रिस्तापर्यंत पोहचण्यासाठी वाट काढीत होते. महान वैद्याचा मंजूळ आवाज कर्ण बधिराच्या कानात घुसला, आणि त्याला श्रवणशक्ती मिळाली. त्याच्या हाताचा स्पर्श, एक मधुर शब्द, यानी दिवसाचा लख्खलख्खीत प्रकाश, नयनरम्य निसर्ग, मित्राचे प्रफ्फुलित चेहरे आणि मुक्तीदात्याचे प्रसन्न मुख पाहाण्यासाठी अंधाच्या नेत्रात दृष्टी आली. येशूने रोगांना धमकावले, तापाने फणफणलेल्या व्यक्तीचा ताप घालवला, मृताच्या कानात त्याचा आवाज शिरला आणि ते तडकण् उठून खडखडीत बरे झाले. पक्षघाती भूतांना त्याचा शब्द शिरोधार्य मानला, वेड्यांचे वेडेपण त्यांना सोडून गेले. त्या सर्वांनी त्याची उपकारस्तुति केली. येशू रोग्याचे रोग बरे करता करता त्यांना सुशिक्षणही देत होता. गरीब, साधेभोळे लोक ज्याना याजक व धर्मगुरू यानी अस्पृश्य ठरवून दूर लोटले होते ते लोक येशूच्या अगदी समीप आले, आणि त्याने त्याना सार्वकालिक जीवनाविषयी बोध दिला. अशा प्रकारे येशूने काय केले हे पाहाण्यात व ऐकण्यात योहानाच्या शिष्यांचा तो दिवस पार पडला. शेवटी येशूने त्याना त्याच्याकडे बोलवून घेतले आणि त्यांना आज्ञा केली जा आणि त्यानी जे पाहिले होते ते योहानाला सांगा. पुढे तो म्हणाला, “जो कोणी मजविषयी अडखळत नाही तो धन्य आहे.” लूक ७:२३. त्याच्या देवत्वाचा पुरावा पिडीत मानवाच्या गरजांच्या उपयुक्ततेत दिसून आला होता. त्याचे वैभव त्याने स्वतःला आमच्या लीन स्थितीपर्यत लीन करण्यात प्रगट झाले होते.DAMar 175.6

    शिष्यानी तो संदेश योहानाकडे पोहंचता केला, आणि तेवढे पुरेसे झाले. योहानाला भाकीताची आठवण झाली. “प्रभु परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे; कारण दीनास शुभवतृ सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे; भग्न हृदयी जनास पट्टी बांधावी, धरून नेलेल्यास मुक्तता, व बंदिवानास बंधमोचन विदित करावे; परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष, व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करावा; सर्व शोकग्रस्ताचे सात्वन करावे.” यशया ६१:१, २. ख्रिस्ताच्या कृत्यानी तो मशीहा होता हेच केवळ प्रसिद्ध केले नव्हते, तर त्याचे राज्य कोणत्या पद्धतीने स्थापन केले जाणार होते हेही दाखवून दिले होते. रानामध्ये एलीयाला “त्याजसमोरून मोठा सुसाट्याचा वारा सुटून डोंगर विदारीत व खडक फोडीत होता; पण त्या वाऱ्यात परमेश्वर नव्हता. वारा सुटल्यानंतर भूमिकंप झाला; पण त्या भूमिकंपातही परमेश्वर नव्हता. भूमिकंपानंतर अग्नि प्रगट झाला; पण त्या अग्नीतही परमेश्वर नव्हता; त्या अग्नीनंतर शांत, मंद वाणी झाली.” १ राजे १९:११, १२. हे जे सत्य उघडून दाखवले होते तेच कार्य येशूला करावयाचे होते. शस्त्रांच्या खणखणाटाने आणि राज्यासने व राज्ये उलथून टाकून नव्हे, तर कृपामय जीवन व स्वार्थत्याग याद्वारे लोकांच्या अंतःकरणाशी बोलून, त्याला कार्य करावयाचे होते.DAMar 176.1

    स्वत्व परित्यागी जीवन हा योहानाच्या जीवनाचा सामान्य नियम होता आणि ख्रिस्ताच्या राज्याचाही तोच नियम होता. हे सर्व इस्राएली अधिकाऱ्याचा नियम व आशा याच्याशी कसे असंबधित होते हे योहानाला माहिती होते. त्याच्यासाठी जी गोष्ट ख्रिस्ताच्या देवत्वाचा खात्रीचा पुरावा होती ती त्यांच्यासाठी पुरावा नव्हती. ज्याच्याविषयी अभिवचन देण्यात आले नव्हते त्या मशीहाची ते वाट पाहत होते. त्यांच्याकडून तारणाऱ्याचा द्वेष व दोष याच गोष्टी मिळवू शकत होत्या हे योहानाला दिसून आले होते. तथापि योहान जो दुःखाचा घोट घेत होता, त्यातून उरलेला घोट ख्रिस्ताला संपवायचा होता. DAMar 177.1

    “जो कोणी मजसंबंधाने अडखळत नाही तो धन्य आहे.” हे ख्रिस्ताचे शब्द म्हणजे ख्रिस्ताने योहानाची हळूवारपणे केलेली कान टोचणीच होती. अर्थात ती तशी नुकसानकारक ठरली नव्हती. ख्रिस्ताच्या कार्याच्या स्वरूपाची स्पष्टपणे जाणीव करून घेऊन, आता त्याने जगण्यासाठी किंवा मरण्यासाठी स्वतःला देवाला वाहून घेतले, यासाठी की त्याला आवडणाऱ्या कार्यासाठी जे अधिक उत्तम ते करता यावे.DAMar 177.2

    निरोपे निघून गेल्यानंतर, येशूने योहानाविषयी लोकसमुदायाला माहिती दिली. तारणाऱ्याचे अंतःकरण हेरोदाच्या अंधारकोठडीत कोंडून ठेवलेल्या निष्ठावत संदेष्ट्यासाठी मायेने कळवळून येत होते. देव योहानाला विसरून गेला होता किंवा संकट काळात त्याचा विश्वास अपयशी ठरला होता असा निष्कर्ष काढण्यास येशूने लोकांना जागा दिली नव्हती. येशूने त्याना विचारले होते. “तुम्ही काय पाहावयास रानांत गेला होता? वाऱ्याने हालविलेले बोरू काय?”DAMar 177.3

    यार्देनेच्या आसपास उंच उंच सरळसोठ वाढलेले व वाऱ्याच्या प्रत्येक झुळूकीबरोबर खाली झुकणारे बांबू हे योहानाच्या कार्याविरूद्ध टिकाकार व न्यायाधीश म्हणून उभे ठाकलेल्या धर्मगुरूंचे तंतोतंत (यथार्थ) दर्शक होते. लोकमान्य मतांच्या वाऱ्यावर ते इकडून तिकडे व तिकडून इकडे अशा झोकाड्या घेत होते. अंतःकरणाचा ठाव घेणाऱ्या योहानाच्या संदेशाचा स्वीकार करण्याइतके ते स्वतःला नम्र करीत नव्हते, तरीसुद्धा लोकांच्या भीतीमुळे त्याच्या कार्याला उघडपणे विरोध करण्यास ते धजत नव्हते. परंतु देवाचा, हा सुवार्तीक काही भ्याड स्वभावाचा नव्हता. ख्रिस्तासभोवती जमणारा लोकसमूदाय योहानाच्या कार्याचे साक्षीदार होता. निर्भिडपणे पापाचा निषेध करणारे त्याचे संदेश त्यांनी ऐकले होते. आत्मधर्मनिष्ठ परुशी, याजकीय वर्गातील सद्की, राजा हेरोद व त्याच्या राजदरबारातील लोक, राजपूत्र आणि सरदार, जकातदार व साधेभोळे लोक अशा सर्वाबरोबर सारख्याच स्पष्ट भाषेत योहान बोलला होता. तो काय मानवी स्तुती किंवा प्रतिकूल मत याच्या वाऱ्यावर झोकाड्या घेणारा बांबू (बोरू) नव्हता. देवाशी एकनिष्ठता व धार्मिकतेविषयीची आस्था या बाबतीत तो अंधार कोठडीत असताना जितका प्रामाणिक होता, जितकाच तो रानांत उपदेश करीत असताना होता. त्याची तत्त्वनिष्ठा प्रचंड खडकाप्रमाणे कणखर होती.DAMar 177.4

    पुढे येशू म्हणाला, “तर मग काय पाहावयास गेला होता? मऊ वस्त्रे घातलेल्या मनुष्याला काय? पाहा, मऊ वस्त्रे लेणारे राजगृही असतात.’ योहानाला त्याच्या काळातील पाप व खाण्यापिण्यातील अतिरेक यांचा निषेध करण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. त्याचा साधासुद्धा पोशाख व त्यागी जीवनचर्या ही त्याच्या कार्याच्या स्वरूपाला शोभा देणारी अशीच होती. भपकेदार पोषाख व ऐषाराम ह्या गोष्टी देवाच्या सेवकाच्या जीवनाचा भाग नाहीत, तर जे राजवाड्यात राहातात, जे या जगाची सत्ता व श्रीमंती यांचा उपभोग घेतात त्या जगिक अधिकाऱ्याच्या जीवनाचा भाग आहे. ते अधिकारी स्वतः किंमती झगे व मोल्यवान दागदागीने चढवून थाटमाटात सजत होते. त्यांना झगमगाट आणि लोकांचे डोळे दिपविणे प्रिय वाटत होते. अशा प्रकारे लोकाकडून स्वतःची प्रतिष्ठा वाढवून घेत होते. ते लोक देवाची मान्यता मिळवून देणारी शुद्धता प्राप्त करून घेण्यापेक्षा मानवाची प्रशंसा मिळवून घेण्यासाठी अधिक उत्सुक होते. अशा प्रकारे त्यानी दाखवून दिले होते की त्याचे सख्यसंबंध देवाबरोबर नव्हते, तर या जगिक राज्याबरोबर होते.DAMar 178.1

    आणखी येशूने त्याना विचारले, “तर मग का गेला होता? संदेष्ट्याला पाहावयास काय? मी तुम्हास सांगतो, हो; संदेष्ट्याहूनही जो श्रेष्ठ अशाला.” त्याविषयी लिहिले आहे: DAMar 178.2

    “पाहा, मी आपला निरोप्या तुझ्यापुढे पाठवितो,
    तो तुझा मार्ग तुझ्यासमोर सिद्ध करील, तो हाच आहे.”
    DAMar 178.3

    “मी तुम्हास सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्या इसमामध्ये योहानापेक्षा मोठा कोणी नाही.” योहानाच्या जन्मापूर्वी जखऱ्याला सांगितलेल्या वार्तेत देवदूताने जाहीर केले होते की, “तो प्रभूच्या दिसण्यात महान होईल.’ लूक १:१५. दैवी दृष्टिकोनाप्रमाणे मोठेपणात कोणती अंगभूत गोष्ट आहे? किंवा खरा मोठेपणा कशात आहे? अर्थात जग ज्या गोष्टीने मोठेपणा मोजते, त्यांत निश्चित काही नाही; धनसंपतित किंवा दर्जा यात नाही, किंवा कुलीन किंवा मोठे घराणे यांत नाही, मोठी बुद्धिमत्ता यातही नाही. अर्थात या सर्व गोष्टी त्याच्या त्याच्या ठिकाणी उत्तम आहेत. जर बुद्धिमत्तेचे श्रेष्ठत्व, इतर काही विचारात घेण्यासारख्या गोष्टींना फाटा देऊन मान्य केले, तर ज्याच्या बुद्धिमत्तेच्या सामर्थ्याबरोबर आज तागायत कोणीही माणसाने बरोबरी केलेली नाही, तो सैतान आमच्या स्तुतीस पात्र ठरतो. परंतु हाच मुद्दा स्वतःची सेवा या विपरीत दृष्टिकोनातून विचारात घेतला तर मोठी बुद्धिमता मोठा शाप बनतो. नैतिक मूल्यांना देव मूल्यवान मानतो. प्रीती व पावित्र्य यानाच देव महत मानतो. प्रभु योहानाला सर्वांत श्रेष्ठ, मानत होता. धर्मसभेच्या निरोप्यासमोर, इतर लोकासमोर, आणि स्वतःच्या शिष्यासमोर योहानाने स्वतःला मोठेपणा मिळवण्यापासून दूर ठेवले, आणि वचनदत्त म्हणून सर्व मोठेपणा येशूचा आहे असा निर्देश केला. ख्रिस्ताच्या सेवेतील त्याचा निस्वार्थी आनंद आजवर मानवात कधीच प्रगट न झालेल्या उच्च उमद्या स्वभावाचा नमुना दाखवून देतो.DAMar 178.4

    ज्यानी योहानाचा संदेश ऐकला होता, त्यांनी योहानाने येशूविषयी दिलेल्या साक्षीविषयी असे उद्गार काढले होते, की, “योहानाने काही चिन्ह केले नाही खरे; तरी योहानाने याजविषयी जे काही सांगितले ते सर्व खरे आहे.” योहान १०:४१. एलीयाप्रमाणे, आकाशातून अग्नि पाडण्याचे किंवा मृताना जीवदान देण्याचे किंवा देवाच्या नावाने मोशेची सामर्थ्यवान काठी उपयोगात आणण्याचे दान योहानाला देण्यात आले नव्हते. त्याला तारणाऱ्याच्या आगमनाची घोषणा करण्यासाठी आणि त्याच्या येण्याची तयारी करण्याचे आव्हान देण्यासाठी पाठविण्यात आले होते. त्याने त्याच्या जबाबदारीची पूर्तता इतक्या एकनिष्ठतेने केली की, त्याने लोकांना येशूविषयी दिलेल्या शिकवणीची जेव्हा त्यांना आठवण झाली तेव्हा त्यांनी प्रशंसोद्गार काढले की, “योहानाने याजविषयी जे काही सांगितले ते सर्व खरे आहे.’ येशूविषयी अशाच त-हेची साक्ष सादर करण्यासाठी प्रभूच्या प्रत्येक शिष्याला पाचारण करण्यात आलेले आहे.DAMar 179.1

    मशीहाचा निरोप्या या नात्याने, योहान “संदेष्ट्याहूनही श्रेष्ठ” होता. कारण इतर संदेष्ट्यांना येशूचे आगमन फार दूरून पाहावयास मिळाले होते. पण योहानाला येशूला साक्षात पाहावयाला, त्याच्या मशीहापणाविषयी आकाशातून झालेली वाणी ऐकावयाला, आणि त्याला इस्राएल लोकांसाठी देवाने पाठविलेला असे सादर करण्यास मिळाले होते. तरीसुद्धा येशू म्हणाला होता, “स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याजहून श्रेष्ठ आहे.’DAMar 179.2

    योहान दोन कालखंड जोडणारा दुवा होता. देवाचा प्रतिनिधी या नात्याने तो ख्रिस्ती कालखंडात नियमशास्त्र व संदेष्टेशास्त्र यातील संबध प्रदर्शित करण्यास सिद्ध झाला होता. तो तेजस्वी प्रकाश होण्यापूर्वीचा संधी प्रकाश होता. योहानाला पवित्र आत्म्याद्वारे प्रकाशित करण्यात आले होते, यासाठी की त्याला त्याच्या लोकाना प्रकाशित करता यावे. परंतु ख्रिस्ताची शिकवण व त्याचे नमुनेदार जीवन यानी पतीत मानवावर जितका लख्खलख्खीत प्रकाश पाडलेला होता त्यापेक्षा अधिक यापूर्वी पाडलेला नव्हता आणि पुढेही पाडण्यात येणार नाही. ख्रिस्त व त्याचे कार्य याविषयी यज्ञार्पणाच्या रूपकाद्वारे जे प्रगट करण्यात आले होते ते अतिशय अस्पष्टरित्या समजून घेण्यात आले होते. योहानालासुद्धा भविष्यकाळाचे व तारणाऱ्याद्वारे अमरत्व याचे यथायोग्य आकलन झालेले नव्हते.DAMar 179.3

    योहानाला त्याच्या कामाद्वारे मिळालेल्या आनंदाव्यतिरिक्त त्याचे जीवन अतिशय दुःखात गेले होते. रान सोडले तर त्याचा आवाज इतर दुसऱ्या ठिकाणी क्वचितच ऐकला जात होता. तो एकाकी होता; आणि त्याच्या श्रमाचे फळ पाहाण्याची त्याला परवानगी नव्हती. ख्रिस्ताबरोबर राहाण्याची आणि येशूला मदत करणाऱ्या दैवी सामर्थ्याचे प्रगटीकरण पाहाण्याची त्याला संधि मिळाली नव्हती. अंधळे डोळस झालेले, रोगी बरे केलेले आणि मृताना जिवंत केलेले, पाहाणे त्याच्या वाट्याला आले नव्हते. ख्रिस्ताच्या शब्दाद्वारे भाकीताच्या अभिवचनावर प्रकाशमान होणारा तेजस्वी प्रकाश त्याने पाहिला नव्हता. जो कनिष्ट शिष्य, ज्याने ख्रिस्ताची महत्कृत्ये साक्षात पाहिली होती आणि त्याचे शब्द ऐकले होते तो या अर्थाने योहानापेक्षा अतिशय मोठी संधि लाभलेला होता, आणि म्हणून त्याला त्याच्यापेक्षा (योहानापेक्षा) श्रेष्ठ म्हणण्यात आले होते.DAMar 179.4

    योहानाचे संदेश ऐकलेल्या लोकांनी सर्व देशभर त्याची ख्याती पसरविली होती. त्याला तुरूंगात का टाकले होते याबद्दल लोकांत मोठी आस्था निर्माण झाली होती. त्याचे निर्दोष जीवन व त्याच्या बाजूचे भक्कम लोकमत यामुळे असे मत बनले होते की, त्याच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येऊ नये.DAMar 180.1

    योहान देवाचा संदेष्टा होता यावर हेरोदाचा विश्वास होता, आणि त्याची सुटका करण्याची त्याची मनापासून इच्छा होती. परंतु हेरोदियाच्या भीतीमुळे त्याची सुटका करणे त्याने लांबणीवर टाकले.DAMar 180.2

    हेरोदिया जाणून होती की, योहानाला जीवे मारण्यासाठी ती सरळ मार्गाने राजाचे मन कधीच जिंकू शकली नसती. युक्तीकुयुक्तीने स्वतःचा उद्देश साध्य करण्याचा तिने निर्धार केला होता. राजाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या दिवशी, प्रधान, सरदार व गालीलातील प्रमुख लोक याच्यासाठी मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करावयाचा होता, आणि अशा वेळी राजा बेताल होणार होता, आणि मग त्याला तिच्या इच्छेप्रमाणे करण्यास प्रवृत करणे तिला शक्य होणार होते.DAMar 180.3

    जेव्हा तो महोत्सवी दिवस उजाडला होता, तेव्हा राजा त्याच्या सरदारासह सुग्रास भोजनावर ताव मारीत होता, मद्याचे घोट घोटीत होता, अगदी त्याच घटकेस हेरोदियाने आपल्या कन्येला मेजवानीच्या आलिशान, प्रशस्त दिवाणखाण्यात सरदाराच्या मनोरंजनार्थ नृत्य करण्यास पाठविले. सलोमी तिच्या नव यौवन्याने मुसमुसली होती. तिची ठसठशीत स्त्री सुलभ कांती आणि विषयासक्त सौंदर्य यानी उमरावी थाटात मजा लुटण्यास आलेल्या सरदाराना बेहोश केले होते. त्या काळी राजघराण्यातील स्त्रीयांनी अशा सभारंभास हजर राहण्याची प्रथा नव्हती, आणि जेव्हा इस्राएली याजकाच्या व राजाच्या या कन्येने आमंत्रिताच्या मनोरंजनार्थ नृत्य केले तेव्हा त्या सर्वांनी राजाची तोंडपूजा स्तुती तोंड भरून केली.DAMar 180.4

    राजा मद्य प्राशन करून बेसुमार धुंद झाला होता त्याचे विकारी विचार झोकांड्या घेत होते, विवेक जागेवर राहिला नव्हता. त्याला दिसत होता तो मजा लुटण्यास आलेल्या सरदारानी गच्च भरलेला दिवाणखाना, त्यात मांडलेले नक्षीदार मेज, मेजावरील पात्रात चकाकणारी मदिरा, चमचम चमकणारे दिवे आणि त्याच्या समोर नृत्य करणारी तरतरीत तरुण मुलगी. अशा या बेफिकीर वेळी राज्यातील सन्मान्य लोकासमोर त्याची प्रशंसा होईल असे काहीतरी वक्तव्ये करावे असे त्याला वाटले. म्हणून त्याने हेरोदियाच्या कन्येला ती जे मागेल ते मग ते अर्धे राज्य का असेना तिला देण्याचे शपथपूर्वक वचन दिले.DAMar 180.5

    सलोमी तत्काळ आईकडे गेली व तिने काय मागावे याविषयी आईला विचारले. उत्तर ओठावरच होते, - बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर. तिच्या आईचे अंतःकरण द्वेषाच्या तहानेने व्याकुळ झाले होते याची काडीमात्र कल्पना सलोमीला नव्हती. तरी तिने ती मागणी करण्यापासून माघार घेतली होती. परंतु हेरोदिया तिच्या निर्धाराला बिलगन राहिली होती. आणि ती मुलगी त्या क्रूर मागणीची विनंती करण्यास परत गेली, आणि म्हणाली, “बाप्तिस्मा करणारा योहान याचे शीर तबकात घालून आताच मला द्यावे अशी माझी इच्छा आहे.” मार्क ६:२५.DAMar 181.1

    हेरोद आश्चर्याने चकित झाला होता, गोंधळाने गडबडून गेला होता. मोठ्या ऐषारामात चाललेली मौज शांत झाली. मजेला आलेला बहर भयानक शांततेत गडप झाला. योहानाचा प्राण घ्यावयाच्या विचार राजाला अर्धमेला करीत होता. तथापि त्याने प्रतिज्ञापूर्वक वचन दिलेले होते, म्हणून तो चंचलपणाचे व अविचारी प्रदर्शन करू इच्छित नव्हता. पाहुण्याच्या सन्मानार्थ त्याने शपथ घेतली होती, आणि त्या वचनाच्या विरूद्ध पाहुण्यापैकी एकाने जरी आवाज उठविला असता तर त्याने योहानाचा प्राण आनंदाने वाचविला असता. बंदिवान योहान याच्या बाजूने बोलण्यास त्याने त्यांना संधि दिली होती. त्याचा संदेश ऐकण्यासाठी फार दूरदूरवरून ते तेथे आले होते, शिवाय तो निरापराध असून देवाचा दास होता हे त्यांना माहीत होते. तथापि जरी ते त्या मुलीच्या मागणीमुळे थक्क झाले होते, तरी मद्य प्राशनामुळे ते इतके बेताल झाले होते की तक्रार करण्याइतकीही त्यांची शुद्धी भानावर नव्हती. देवाच्या सेवाकाचा प्राण वाचविण्यासाठी कोणीही एक शब्दही काढला नव्हता. ते सर्व लोक राष्ट्रातील उच्च पदावर विराजमान झालेले लोक होते. त्यांच्यावर महान जबाबदारी टाकण्यात आली होती. असे असतानाही खाण्यापिण्यात ते मश्गूल झाले होते. संगीताच्या तालावर नाच पाहून त्यांच्याही माना डुलत होत्या. त्यांचा विवेक सुस्त झाला होता. आपल्या मुग्धतेद्वारे त्या सर्वांनी त्या नीतीभ्रष्ट बाईच्या सूडाचे समाधान करण्यासाठी देवाच्या संदेष्ट्याच्या देहान्त शिक्षेवर शिक्का मोर्तब केले होते.DAMar 181.2

    हेरोद त्याच्या शपथेतून मोकळा होण्याची व्यर्थ मार्गप्रतीक्षा करीत होता, आणि शेवटी नाखुषीने त्याने योहानाचा शीरच्छेद करण्याची आज्ञा दिली. लवकरच त्याचे शीर राजापुढे व त्यांच्या सरदारापुढे आणून ठेवण्यात आले.DAMar 181.3

    त्याच्या कलंकित जीवनापासून मागे वळण्यास हेरोदाला इशारा देणारे ओठ कायमचे बंद करण्यात आले होते. पश्चाताप करा असे लोकांना सांगणारा आवाज लोकांच्या कानावर कधीच पडणार नव्हता. एका रात्रीच्या मौज-मजेसाठी एका महान संदेष्ट्याच्या प्राणाची किंमत मोजावी लागली.DAMar 181.4

    जे लोक नीतिमतेचे रक्षक असायला पाहिजे होते त्यांच्याच अतिरेकाद्वारे कित्येकदा, किती तरी निरपराधी प्राणाचे बली देण्यात आले आहेत! जो कोणी कैफ आणणारी बाटली स्वतःच्या ओठाना लावतो तो त्या कैफाच्या (गुंगीच्या) प्रभावाखाली जो काही अधर्म होऊ शकतो त्यासाठी स्वतःच जबाबदार असतो. त्याच्या संवेदना शक्तीला बधीर करण्याद्वारे तो शांतपणे निर्णय घेण्यास किंवा योग्य व अयोग्य याचे स्पष्ट ज्ञान करून घेण्यास त्याच्यासाठी अशक्य करून ठेवतो. तो त्याच्याद्वारे निरपराधी लोकांचा छळ व नाश करण्याच्या कामासाठी सैतानाचा मार्ग मोकळा करतो. “द्राक्षारस चेष्टा करणारा आहे, मद्य गलबला करणारे आहे, त्यांच्यामुळे झिंगणारा शहाणा नव्हे.” नीति. २०:१. अशा त-हेने ते “न्यायाला मागे” ढकलते, आणि “सत्याचा अगदी” अभाव प्रगट करते; व “दुष्कर्मापासून दूर राहणारा बळी पडतो” यशया ५९:१४, १५. जे कोणी लोकांवर अधिकारी असतात, त्याना, जेव्हा ते असंयमाच्या अधिन जातात तेव्हा त्या गुन्ह्यासाठी दोषी मानले पाहिजे. जे लोक कायद्याचा अंमल चालवितात त्यानी कायदा पाळलाच पाहिजे. त्या लोकानी आत्मसंयमी असले पाहिजे. त्यांनी त्याचे शारीरिक, मानसिक व नैतिक प्राबल्य त्यांच्या काबूत ठेवणे आवश्यक आहे, यासाठी की त्यांना बौद्धिक सामर्थ्य व उच्च नैतिक जाण प्राप्त व्हावी.DAMar 182.1

    योहानाचे शीर हेरोदियाकडे नेले, तिने त्याचा सैतानी (विकृत) समाधानाने स्वीकार केला. ती सूड काढण्यात विजयी झाल्यामुळे ती विजयानदी झाली. स्वतःची वाजवीपेक्षा अधिक वाहवा करून म्हणाली, यापुढे हेरोदाचे डोके कधीच खाण्यात येणार नाही. तथापि त्या क्रूर पातकी कृतीमुळे तिला कसलेच सुख मिळाले नव्हते. उलट तिचे नाव अधिक कुप्रसिद्ध (बदनाम) झाले होते, तिरस्कारनीय झाले होते. हेरोदही योहानाच्या इशाऱ्याने जितका सतावला जात होता त्यापेक्षा अधिक तो तीव्र खेदाने सतावला गेला होता. योहानाच्या शिकवणीचा प्रभाव खंडित झाला नव्हता, तर तो पिढ्यान-पिढ्या काळाचा अंत होईपर्यंत टिकून राहणार होता.DAMar 182.2

    हेरोदाचे पाप सतत त्याच्यापुढे थैमान घालत होते. तो दोषी विवेकाच्या बोचणीपासून सुटका मिळवण्याच्या सातत्याने प्रयत्न करीत होता. योहानावरची त्याची निष्ठा विचलित झाली नव्हती. जेव्हा हेरोदाला, योहानाचे त्यागी जीवन, त्याच्या गंभीर, विनम्र विनंत्या, त्याचे सल्याबाबत समर्पक निर्णय, आणि त्यानंतर त्याचे मृत्यूला सामोरे जाणे हे सर्व आठवत होते तेव्हा त्याला स्वस्थ झोप लागत नव्हती. जेव्हा तो राज्याच्या प्रशासकिय कारभारात गर्क राहून, लोकांकडून मान सन्मान घेत असता, प्रसन्न चेहरा व प्रतिष्ठित ढब धारण करीत होता, तेव्हा तो शापित होता या भीतीने नेहमीच त्याचे अस्वस्थ अंतःकरण दडवून ठेवीत होता.DAMar 182.3

    देवापासून काहीच लपवून ठेवता येत नाही योहानाच्या या शब्दाद्वारे हेरोद अतिशय भारावून गेला होता. देवाचे अस्तित्व सर्व ठिकाणी असते याची त्याला पूर्ण खात्री पटली होती. देवाने दिवाणखाण्यातील सर्व समारंभातील मौजमजा पाहिली होती, योहानाचा शीरच्छेद करण्यास दिलेली आज्ञा त्याने ऐकली होती, त्याचप्रमाणे हेरोदियाचा विजयानंद आणि तिचा निषेध करणाऱ्या योहानाच्या धडावेगळे झालेल्या शीराचा तिने केलेला अवमान त्याने पाहिला होता. संदेष्ट्याच्या तोंडून हेरोदाने ज्या अनेक गोष्टी ऐकल्या होत्या त्या अरण्यापेक्षा आता त्याच्याशी अधिक बोलत होत्या.DAMar 183.1

    जेव्हा हेरोदाने येशूच्या कार्याविषयी ऐकले, तेव्हा तो अत्यंत त्रस्त झाला. त्याला वाटले की, देवाने योहानाला मरणातून उठविले आहे, आणि पापाचा निषेध करण्यासाठी मोठ्या सामर्थ्यानिशी पाठविले आहे. त्याला नेहमीच भीती वाटत होती की, योहान त्याला व त्याच्या घराण्याला शिक्षा करण्याद्वारे आपल्या मरणाचा सूड काढील. देवाने ज्याला पापाचे फळ असे म्हटले होते ते फळ तो चाखीत होता. “तुझे हृदय थरथर कापत राहील; तुझे नेत्र निस्तेज होतील व तुझा जीव झुरत राहील, ... तुझ्या जीविताचा तुला नेहमी संदेह वाटेल; तू रात्रंदिवस थरथर कांपत राहशील; तुला आपल्या जीविताची काही शाश्वती वाटावयाची नाही; तुझ्या मनास जी धास्ती वाटेल आणि तुझ्या नेत्राना जे दिसेल त्यामुळे तू सकाळी म्हणशील, संध्याकाळ होईल तर किती बरे!” आणि संध्याकाळी तू म्हणशील, सकाळ होईल तर किती बरे!” अनुवाद २८:६५-६७. पापी मानसाचे स्वतःचे विचारच त्याच्यावर ठपका ठेवणारे असतात; आणि अपराधी मनाला दंश केलेल्या नांगीपेक्षा दुसरी कोणतीही भयंकर किंवा प्रखर यातना असू शकत नाही. त्याद्वारे त्याला दिवसा किंवा रात्री स्वस्थ-शांत झोप लागत नाही.DAMar 183.2

    योहानाच्या मृत्यूचे गहन गूढ अनेक लोकांना घेरून टाकते. ते प्रश्न विचारतात की, अशा प्रकारे योहानाला झुरत झुरत तुरूंगातच का मरू देण्यात आले. या रहस्यमय ईश्वरी कृतीचे आकलन मानवी मनाला कधीच होऊ शकणार नाही. तरीसुद्धा योहान येशूच्या दुःखाचा एक भागीदार होता याचे आपल्याला स्मरण झाले तर, देवावरचा आपला विश्वास डळमळणार नाही. जे कोणी येशूचे अनुकरण करतील त्यांना स्वार्थत्यागाचा शिरटोप धारण करावा लागेल. स्वार्थी लोक त्यांच्याविषयी गैरसमजूत करून घेतील, आणि ते सैतानाच्याही क्रूर हल्ल्याचे लक्ष्य बनतील. याच स्वार्थत्यागी जीवनशैलीचा नाश करण्यासाठी सैतानाचे राज्य स्थापन केले आहे, आणि जेथे कोठे या स्वार्थत्यागी जीवनविरूद्ध लढाई लढली जाते तेथे तो लढाईस तयार असतो.DAMar 183.3

    बालपण, तारुण्य आणि योहानाची प्रौढावस्था, शिस्त व नैतिक सामर्थ्य याच्याद्वारे गुणवैशिष्ट्यपूर्ण ठरल्या होत्या. जेव्हा अरण्यात, “प्रभूचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा नीट करा.” मत्तय ३:३. अशी घोषणा करण्यात आली, तेव्हा सैतान त्याच्या राज्याच्या सुरक्षिततेबद्दल चिंतातूर झाला होता. पापाचे पापीष्ट रंगरूप अशा प्रकारे उघड करण्यात आले होते की त्यामुळे सर्व मानवाचा थरकाप झाला होता. अनेक लोक ज्या सैतानाच्या कबजात होते त्या सैतानाची सत्ता मोडून काढण्यात आली होती. देवाला वाहून घेतलेल्या योहानाला त्याच्यापासून परावृत करण्यासाठी त्याने अथक प्रयत्न केले होते, पण तो पराभूत झाला होता. येशूवरही विजय मिळविण्यात तो अयशस्वी झाला होता. अरण्यातील कसोटीच्या कालावधित सैतानाचा पराभव करण्यात आला होता. त्यामुळे सैतानाचा क्रोध आणखी भडकला होता. आता योहानावर घाव घालून येशूवर घाला घालण्याचा त्याने निर्धार केला होता. ज्या प्रभूला मोहाच्या मार्गाने पाप करण्यास प्रवृत करू शकला नव्हता त्याला तो दुःख सोसण्यास भाग पाडत होता.DAMar 183.4

    आपल्या दासाची सुटका करण्यासाठी येशू स्वतः मध्ये पडला नव्हता. त्याला माहीत होते की, योहान समर्थपणे प्रसंगास (कसोटीस) तोंड देणार होता. ती अंधारी कोठडी लख्खपणे प्रकाशित करण्यासाठी येशू मोठ्या आनंदाने योहानाकडे जाऊ शकला असता. परंतु तो शत्रूच्या तावडीत जाण्यास तयार नव्हता, आणि देवाच्या कार्यात खंड पडू देणार नव्हता. तो आपल्या निष्ठावंत दासाची आनंदाने सुटका करू शकला असता. परंतु पुढील काळी हजारोच्या संख्येने तरूंगवास - ते मरण अशा प्रसंगातून जाणाऱ्या लोकांसाठी योहानाला तो वीर मरणाचा प्याला पिणे प्राप्त होते, गरजेचे होते. जेव्हा येशूचे अनुयायी तरुंगात खितपत पडतील, किंवा तरवारीने मारले जातील, भाराखाली चिरडले जातील आणि संभाव्य उघडपणे देव व मनुष्य यांच्याकडून नाकारले जातील, तेव्हा त्यांना, ज्या योहानाच्या विश्वासूपणाविषयी येशूने स्वतः साक्ष दिली होती, त्या योहानालासुद्धा अशा दुर्धर प्रसंगातून जावे लागले होते हा विचार किती धीर देईल!DAMar 184.1

    सैतानाला देवाच्या सेवकाचे जगिक जीवन नाहीसे करण्याची परवानगी देण्यात आली होती, परंतु “ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले’ जे जीवन आहे त्याला तो स्पर्शही करू शकला नव्हता. कलस्सै. ३:३. ख्रिस्ताला दुःखाच्या दरीत लोटले होते याबद्दल तो अत्यानंदी झाला होता, पण योहानाच्या बाबतीत तो पूर्णपणे पराभूत झाला होता. केवळ मरणानेच त्याला निरंतर मोहाच्या सामर्थ्याच्या कक्षेपलीकडे ठेवले होते. या लढाईमध्ये सैतान त्याचे स्वतःचे स्वभावगुण प्रदर्शित करीत होता. या सर्वाकडे पाहात असलेल्या विश्वासमोर त्याने देव व मानव यांच्याविरूद्ध असलेले त्याचे शत्रूत्व प्रगट केले. DAMar 184.2

    जरी योहानाला चमत्कारिकरित्या वाचविण्यात आले नव्हते, तरी त्याला सोडून देण्यात आले नव्हते. ख्रिस्ताविषयीची भाकीते आणि पवित्र शास्त्रातील मौलिक अभिवचने याना उघडून दाखविणारे स्वर्गीय देवदूत सतत त्याच्या सोबतीला होते. हे सर्व त्याचा आधार आणि धीर होते, आणि त्याचप्रमाणे ते पुढे येणाऱ्या सर्व काळातील देवाच्या सर्व लोकांचाही आधार असतील. आणि “पाहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हाबरोबर आहे.” मत्तय २८:२०. असे आश्वासन जसे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानानंतर येणाऱ्यांना दिले होते तसे योहानालाही दिले होते.DAMar 184.3

    देव त्याच्या लोकांच्या इच्छेविरूद्ध त्यांना मार्गदर्शन करीत नाही किंवा त्यांचे नेतृत्व करीत नाही. प्रारंभीच त्यांनी शेवट लक्षात घेतला पाहिजे आणि त्याच्याबरोबर सहकामदार या नात्याने उद्देश साध्य करण्यातील मोठेपण त्यांनी सूक्षपणे जाणले पाहिजे. मरणाचा अनुभव न घेता स्वर्गात गेलेला हनोख, अग्नीच्या रथातून उत्थान पावलेला एलीया हे अंधाऱ्या कोठडीत नाश पावलेल्या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानापेक्षा थोर किंवा सन्माननीय नव्हते. “कारण त्याजवर विश्वास ठेवावा इतकेच नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने त्याजकरिता दुःखही सोसावे असा अनुग्रह तुम्हावर झाला आहे.’ फिलिप्पै. १:२९. मानवप्राण्याला स्वर्गातून ज्या देणग्या बहाल करण्यात येतात त्यामध्ये त्याच्या दुःखामध्ये ख्रिस्ताशी सहभाग करणे ही देणगी निस्सिम श्रद्धा आणि उच्च प्रतिष्ठा आहे.DAMar 185.1