Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

युगानुयुगांची आशा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय ६७—परूश्यांना धिक्कार

    मत्तय २३; मार्क १२:४१-४४; लूक २०:४५-४७; २१:१-४.

    मंदिरामध्ये प्रवचन करण्याचा हा ख्रिस्ताचा शेवटचा दिवस होता. यरुशलेमामध्ये जमलेल्या अफाट लोकसमूदायाचे लक्ष त्याच्याकडे वेधले होते: जोरात चाललेली स्पर्धा पाहाण्यासाठी मंदिराच्या अंगणात त्यांनी गर्दी केली होती आणि त्याच्या मुखातून पडलेला प्रत्येक शब्द त्यांनी ग्रहण केला. अशा प्रकारचा देखावा पूर्वी कधी पाहिला नव्हता. जगातील कसल्याच मानसन्मानाने विभूषित न झालेला किंवा राजाला शोभेल अशी कसलीही खूण नसलेला हा गालीली तरुण होता. भारी किमतीचा पेहराव केलेले याजक, त्यांच्या उच्च पदाला शोभून दिसणारी अधिकाराची वस्त्रे चढविलेले शास्ते आणि वारंवार वापरण्यात येणारी गुंडाळी घेतलेले शास्त्री त्याच्या सभोवती होते. राजाला शोभेल अशा विनम्रतेने ख्रिस्त शांतपणे त्यांच्यासमोर उभा होता. ज्यांनी त्याची शिकवण नाकारून धिक्कारली होती आणि ज्यांनी त्याचा प्राण घेण्याचा विडा उचलला होता त्या त्याच्या प्रतिस्पर्धापुढे न कचरता, स्वर्गातून प्राप्त झालेल्या अधिकाराने तो पाहात होता. अनेक वेळा त्यांनी त्याच्यावर हल्ला केला होता परंतु त्याला जाळ्यात अटकवण्याचे आणि दोषी ठरविण्याचे कारस्थान साध्य झाले नाही. याजक व परूशी यांनी सादर केलेल्या चुकीच्या व अंधुक शिकवणीच्या तुलनेत तेजस्वी व शुद्ध पवित्र सत्य सादर करून त्याने त्यांच्या आवाहनांना तोंड दिले होते. त्यांची खरी अवस्था त्यांच्यापुढे माडून आणि अधर्मकृतीला चिकटून राहिल्याबद्दल येणारी देवाची शिक्षा त्याने त्या पुढाऱ्यांच्यापुढे ठेविली. खरमरीत इशारा देण्यात आला होता. तथापि ख्रिस्ताला दुसरे एक काम करायचे होते. दुसरा एक हेतू साध्य करून घ्यायचा होता.DAMar 531.1

    ख्रिस्त व त्याचे कार्य यांच्याविषयी लोकांच्या मनात अविचल गोडी वाढत होती. त्याच्या शिकवणीने ते मोहून गेले होते. परंतु त्या सोबत ते गोंधळून गेले होते. त्यांची विद्वता व दिखाऊ धर्मनिष्ठा या संदर्भात याजक व धर्मगुरू यांचा त्यांना आदर होता. सर्व धार्मिक कार्यात त्यांच्या अधिकाराला बिनतक्रार त्यांनी मान दिला होता. तथापि ज्या गुरूजीचे सद्गुण व ज्ञान, बुद्धिमता प्रत्येक हल्ल्याच्यावेळी उजवी व उजळ दिसली त्याची हे लोक नापत करताना त्यांनी पाहिले. याजक व वडील यांच्यावरील त्यांचा विश्वास कमी होत असलेला दिसला आणि त्यामुळे त्यांचा गोंधळ होऊन घाबरगुंडी उडाली. त्याची शिकवण साधी व सोपी असूनसुद्धा अधिकारी येशूवर विश्वास ठेवीत नाहीत ह्याचे त्यांना कौतुक वाटले. कोणता मार्ग स्वीकारावा हे त्यांना समजेना. ज्यांचा सल्ला आतापर्यंत नेहमी मानण्यात आला त्यांची हालचाल अति उत्सुकतेने, काळजीपूर्वक त्यांनी जागरूकतेने पाहिली.DAMar 531.2

    ख्रिस्ताने दिलेल्या दाखल्यामध्ये अधिकाऱ्यांना इशारा देणे व शिकाऊ लोकांचे प्रबोधन करणे हा उद्देश होता. परंतु ह्यापेक्षा अधिक सुलभ भाषेत ते सांगण्याची गरज होती. सांप्रदाय व परांपरा याविषयीचा त्यांचा आदर आणि भ्रष्ट याजकांवरील अंधश्रद्धा ह्यामुळे लोकांना गुलाम बनवून टाकिले होते. ही श्रृंखला ख्रिस्ताला तोडून टाकायची होती. याजक, अधिकारी व परूशी यांचा शीलस्वभाव पूर्णपणे उघड करायला पाहिजे होता.DAMar 532.1

    त्याने म्हटले, “शास्त्री व परूशी मोशेच्या आसनावर बसले आहेत; ह्यास्तव ते जे काही सांगतील ते सर्व आचरीत व पाळीत जा; परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका; कारण ते सांगतात पण तसे आचरण करीत नाहीत.” मोशेप्रमाणे शास्त्री व परूशी यांना दिव्य अधिकार देण्यात आला आहे अशी त्यांची समजूत होती. नियमांचे स्पष्टीकरण करणे व लोकांचा न्याय करणे या बाबतीत ते त्याची जागा घेतात असे धरून ते चालतात. म्हणून ते लोकाकडून कडक आज्ञापालनाची व आदर सन्मानाची अपेक्षा करितात. येशूने श्रोतेजनाना सांगितले की, नियमाप्रमाणे ते सांगतील ते करा परंतु त्यांचा कित्ता गिरवू नका. स्वतःची शिकवण ते कृतीमध्ये आणीत नव्हते. DAMar 532.2

    बहुतेक त्यांची शिकवण शास्त्रवचनाच्याविरुद्ध होती. येशूने प्रतिपादिले, “जड ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यावर देतात. परंतु ती काढण्यास ते स्वतः बोटही लावीत नाहीत.” परंपरा यांच्यावर पायाभूत असलेले आणि वैयक्तिक स्वातंत्र्यावर विनाकारण बंधन आणणाऱ्या अगणित नियमावलीत परूश्यांना स्वारस्य वाटत असे. नियमशास्त्राचा काही भाग लोकांना पाळण्यास ते शिकवीत असे परंतु गुप्तरित्या त्याच्याकडे ते दुर्लक्ष करीत असे आणि त्यामध्ये त्यांचा हेतू साध्य झाल्यावर, त्याबाबतीत त्यांना सवलत असल्याचे सांगत असे.DAMar 532.3

    धर्मनिष्ठतेचा मोठा भपका करायचा हा त्यांचा नित्याचा प्रयत्न होता. हे साध्य करण्यासाठी कोणत्याही गोष्टींची त्यांनी पर्वा केली नाही. नियमशास्त्राविषयी देवाने मोशेला म्हटले, “त्या आपल्या हाताला चित्रादाखल बांध आणि आपल्या दोन्ही डोळ्यांच्या मधल्या भागी कपाळपट्टी म्हणून लाव.” अनुवाद ६:८. ह्या शब्दात खोल अर्थ भरलेला आहे. देवाच्या वचनावर मनन करून जीवनात त्याचा वापर केला तर मनुष्याला उदात्तता लाभते. त्याच्या धार्मिकतेच्या व सदयतेच्या व्यवहारात देवाच्या नियमाचे प्रगटीकरण होते. लाचलुचपत, भ्रष्टाचार व फसवणूक या बाबतीत ते निर्मळ शुद्ध राहातील. प्रेममय व दयेच्या कामात ते उत्साही व दक्ष राहातील. त्यांचे उदात्त हेतू स्पष्ट व सत्य असतील. अर्थपूर्ण चेहरा व बोलके नेत्र देवाच्या वचनावर जो प्रीती करितो व त्याचा सन्मान राखितो त्याच्या निर्दोष शीलस्वभावाची साक्ष देतील. येशूच्या काळात यहूद्यांना ह्या सर्वातील सूक्ष्मपणा दिसला नाही. मोशेला दिलेल्या नियमाचा अर्थ असा लावला होता की, त्याची गुंडाळी मनुष्याने अंगावर घातली पाहिजे. म्हणून ते चर्मपटावर लिहून ठराविक पद्धतीने कपाळपटीवर व मनगटावर बांधण्यात येत असे. परंतु ह्याद्वारे मन व अंतःकरणावर त्यांची घट्ट पकड बसली नाही. लक्ष वेधण्यासाठी त्यांचा वापर बिल्ल्यासारखा करण्यात आला. त्याचा वापर करण्यामुळे भक्तीभावना निर्माण होईल आणि लोकांचा आदर मिळेल असे वाटले होते. ह्या निरर्थक बतावणीला येशूने जोराचा तडाखा दिलाः DAMar 532.4

    “आपली सर्व कामे लोकांनी पाहावी म्हणून ते ती करितात, आपली मंत्रपत्रे रूंद करितात, व आपले गोंडे मोठे करितात; जेवणावळीतील श्रेष्ठ स्थाने, सभास्थानातील श्रेष्ठ आसने, बाजारात नमस्कार घेणे, व लोकाकडून गुरूजी असे म्हणवून घेणे ही त्यास आवडतात. तुम्ही तर आपणास गुरूजी असे म्हणवून घेऊ नका; कारण तुमचा गुरू एक आहे व तुम्ही सर्व भाऊ भाऊ आहा. पृथ्वीवरील कोणाला बाप म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गीय आहे. तसेच आपणास स्वामी असे म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा स्वामी एक तो ख्रिस्त आहे.’ द्वेष व लोभ यांनी अंतःकरण भरलेले असतांना, फसवी नम्रता दाखवून पद व सत्ता हस्तगत करणारी स्वार्थी महत्वाकांक्षा ख्रिस्ताने ह्या सुलभ व सोप्या भाषेत प्रगट केली. मेजवाणीस आलेल्या अतिथींना त्यांच्या हुद्याप्रमाणे बसविण्यात येत असे आणि सन्मानाचे स्थान दिलेल्यांच्याकडे अधिक लक्ष देण्यात आले. हा मान मिळविण्यासाठी परूशी सतत कारस्थान, धडपड करीत असे. ह्या आचरणाला ख्रिस्ताने दोष दिला.DAMar 533.1

    गुरूजी म्हणवून घेण्याची हाक त्याने निषिद्ध असल्याचे सांगितले. हा हुद्दा मनुष्यासाठी नाही पण ख्रिस्तासाठी आहे. याजक, शास्त्री, अधिकारी, धर्मशास्त्राचे स्पष्टीकरण व व्यवस्थापन करणारे हे सर्वजन भाऊ भाऊ होते, एका पित्याची मूले. आपल्या विश्वासावर किंवा सदसदविवेक बुद्धीवर कोणाही मनुष्याचे वर्चस्व मानू नये हा विचार येशूने लोकांच्या मनावर ठसविला.DAMar 533.2

    आज ख्रिस्त ह्या पृथ्वीवर असता आणि त्याच्या भोवती “रेव्हरंड” किंवा “राइट रेव्हरंड’ हा हुद्दा घेतलेले पाहिले असते तर तो त्याच्या उक्तीचा पुनरुच्चार करणार नाही काय? “तर आपणास स्वामी असे म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा स्वामी एक, तो ख्रिस्त आहे.” देवाविषयी धर्मशास्त्र म्हणते, “त्याचे नाम पवित्र व भययोग्य आहे.’ स्तोत्र. १११:९. हा हुद्दा कोणत्या माणसाला शोभेल? त्यामध्ये अंतर्भूत असलेली धार्मिकता व शहाणपणा मनुष्य किती अल्प प्रमाणात प्रगट करतो! ह्या हुद्याचा अंगिकार करणाऱ्यापैकी कितीजन देवाचे नाम व त्याचा स्वभाव यांचा विपर्यास करितात! उच्च व पवित्र पदस्थाच्या झग्याखाली ऐहिक महत्वाकांक्षा, जुलूम आणि नीच पापे किती वेळा झाकलेली असतात! तारणारा पुढे म्हणालाःDAMar 533.3

    “तुम्हामध्ये जो मोठा आहे त्याने तुमचा सेवक व्हावे. जो कोणी आपणाला उंच करील तो नीच केला जाईल आणि जो कोणी आपणाला नीच करील तो उंच केला जाईल.” वारंवार ख्रिस्ताने शिकविले आहे की, खऱ्या मोठेपणाचे मूल्य त्याच्या नैतिक योग्यतेवर ठरविण्यात येते. स्वर्गाच्या दृष्टीने बांधवाच्या कल्याणासाठी जगणे व प्रेमाचे व दयेचे कार्य करणे ह्यामध्ये शीलस्वभावाचा मोठेपणा अंतर्भूत आहे. वैभवी राजा ख्रिस्त पतित मानवाचा सेवक होता.DAMar 534.1

    येशूने म्हटले, “अहो शास्त्र्यांनो व परूश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुम्हास धिक्कार असो! कारण लोकांनी आत जाऊ नये म्हणून तुम्ही स्वर्गाचे राज्य बंद करिता; तुम्ही स्वतः आत जात नाही व आत जाणाऱ्यासही जाऊ देत नाही.” धर्मशास्त्रवचनाचा विपर्यास करून याजक व वकिलांनी लोकांची मने अंध करून टाकिली आहेत, नाहीतर ख्रिस्त राज्याचे ज्ञान आणि खऱ्या पावित्र्यासाठी आवश्यक असलेले अंतरंग, दिव्य जीवन त्यांना प्राप्त झाले असते.DAMar 534.2

    “अहो शास्त्र्यांनो व परूश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुम्हास धिक्कार असो! कारण तुम्ही विधवांची घरे खाऊन टाकिता व ढोंगाने लांब लांब प्रार्थना करिता, यामुळे तुम्ही अधिक दंड पावाल.” परूश्यांचे लोकावर चांगले वजन होते आणि स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा त्यांनी उपयोग करून घेतला. त्यांनी सात्त्विक, भक्तिमान विधवांचा विश्वास संपादन केला आणि नंतर सांगितले की, त्यांची संपत्ति धार्मिक कार्यासाठी अर्पण करणे त्यांचे कर्तव्य आहे. त्यांच्या संपत्तीचा ताबा घेतल्यावर त्या कपटी कावेबाज कारस्थान्यांनी ते सर्व स्वतःच्या फायद्यासाठी खर्ची करून टाकिले. हा अप्रामाणिकपणा झाकून टाकण्यासाठी त्यांनी चव्हाट्यावर लांबलचक प्रार्थना केली व धार्मिकतेचा मोठा देखावा केला. ह्या ढोंगाने त्यांच्यावर अधिक दंड येईल असे ख्रिस्ताने प्रतिपादिले. संद्यासुद्धा धर्मनिष्ठेचा अधिक आव आणणाऱ्यावर तोच दंड येईल. त्यांचे जीवन स्वार्थाने व लोभाने कलंकित झाले आहे तथापि ते त्याच्यावर धार्मिकतेच्या झग्याचे पांघरून घालतात आणि काही काळ त्यांच्या सोबत्यांची फसवणूक करितात. परंतु ते देवाची फसवणूक करू शकत नाहीत. तो मनातील सर्व उद्दिष्ट जाणतो आणि त्यांच्या कृतीप्रमाणे प्रत्येकाचा न्याय करील.DAMar 534.3

    दुरूपयोगाचा ख्रिस्ताने कडकरित्या धिक्कार केला, परंतु कर्तव्य दक्षतेत त्याने उणीवता ठेविली नाही. विधवांच्या देणग्या बळजबरीने घेऊन दुरूपयोग केल्याबद्दल त्याने धिक्कार केला त्या सोबत ज्या विधवेने देवाच्या खजीन्यात देणगी टाकिली तिची प्रशंसा केली. मनुष्याने देणगीचा अपव्यय केल्यामुळे देवाचा कृपाप्रसाद देणाऱ्यापासून हिरावून घेतला जाणार नाही.DAMar 534.4

    अंगणातील दान पेटीत लोक दान टाकीत असताना ख्रिस्ताने पाहिले. श्रीमंत लोक थाटामाटाने मोठ्या देणग्या आणून दान पेटीत टाकीत होते. येशूने त्यांच्याकडे दुःखाने पाहिले परंतु त्यावर काही भाष्य केले नाही. कोणाच्या दृष्टीस येऊ नये म्हणून घाबरत व कचरत एक गरीब विधवा आलेली पाहिल्यावर त्याचा चेहरा तेजोमय झाला. धनवान आणि गर्विष्ठ आपली मोठी दाने टाकण्यास जाताना पाहिल्यावर पुढे जाण्यास ती कचरली. तरी तिला प्रीय असलेल्या कार्यासाठी फूल नाही फुलाची पाकळी वाहाण्यास तिचे मन आतुर होते. हातातील आपल्या दमडीकडे तिने पाहिले. दुसरे देत असलेल्या देणगीच्या तुलनेने ते काहीच नव्हते, तथापि तिचे ते सर्व काही होते. संधि मिळाल्याबरोबर लगबगीने तिने त्या दोन टोल्या टाकिल्या आणि परत जाण्यास ती वळली. परंतु तिच्या ह्या कृतीवर ख्रिस्ताची दृष्टी खिळली होती.DAMar 535.1

    उद्धारकाने शिष्यांना जवळ बोलावून विधवेच्या दारिद्याकडे लक्ष देण्यास सांगितले. त्यानंतर त्याचे स्तुतीपर उद्गार तिच्या कानावर पडले: “मी तुम्हास खचित सांगतो की जे भांडारात टाकीत आहेत त्या सर्वापेक्षा या दरिद्री विधवेने अधिक टाकिले.’ तिची कृती जाणून घेऊन; गुणग्रहण केलेले पाहून तिच्या डोळयात आनंदाश्रू भरले. तिचे क्षुद्र वेतन स्वतःसाठी राखून ठेवण्यास अनेकांनी तिला सल्ला दिला असता. गबर झालेल्या याजकांच्या हातात पडल्यावर भांडारात टाकलेल्या मोठ्या मोल्यवान देणग्यामध्ये त्याचा विचारही झाला नसता. परंतु येशूला तिचा उद्देश कळला. देवाला भेटण्याची वेळ म्हणजे मंदिराची सेवा करणे होय असा तिचा विश्वास होता आणि तो उचलून धरण्यास ती अति उत्सुक होती. जे शक्य होते ते तिने केले आणि तिची कृती आठवणीतील निरंतरचे स्मारक व हर्ष राहाणार होते. पूर्ण अंतःकरणाने, मनापासून दिलेले ते दान होते. नाण्यामध्ये त्याचे मूल्य ठरविण्यात आले नव्हते, परंतु देवावरील प्रीतीने आणि त्याच्या कार्याविषयीच्या कळकळीने व आपुलकीने ही कृती करण्यास प्रेरणा झाली होती.DAMar 535.2

    दरिद्री विधवेला येशूने म्हटले, “जे भांडारात टाकीत आहेत त्या सर्वापेक्षा या दरिद्री विधवेने अधिक टाकिले.” लोकांनी पाहून वाहवा करावी म्हणून धनवानांनी आपल्या समृद्धीतून टाकिले. मोठी देणगी दिल्याने त्याचा परिणाम त्यांच्या सुखसमाधानवर व आरामशीर जीवनावर झाला नाही; त्यांना कसलाच त्याग करण्याची गरज भासली नाही किंवा आवश्यकता नव्हती आणि मूल्याच्या बाबतीत विधवेच्या टोल्याबरोबर तुलना करू शकत नाही.DAMar 535.3

    आमच्या कृती बदनामी आहेत किंवा नैतिक मूल्याच्या आहेत असा दाखला आमचे उद्दिष्ट देतात. मनुष्यांच्या दृष्टीने जे श्रेष्ट व स्तुत्य असते ते देवाच्या दृष्टीने असू शकत नाही. हसत मुखाने केलेली लहान सहान कामे, भपका न करणारी व मनुष्याच्या दृष्टीने टाकाऊ वाटणारी भेट देवाच्या दृष्टीने बहुधा श्रेष्ठ ठरते. प्रिय असलेल्या कार्यासाठी त्या दोन टोल्या देण्यास तिला उपासमार करावी लागली. तिने ते विश्वासाने केले आणि तिचा स्वर्गीय पिता तिच्या गरजेकडे दुर्लक्ष करणार नाही अशी श्रद्धा बाळगली. निस्वार्थी वृत्ती व बालकासारखा विश्वास ह्यामुळे उद्धारकाची प्रशंसा तिला लाभली.DAMar 535.4

    देवाची कृपा व सत्य ह्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यास अति उत्सुक असलेले अनेकजण दरिद्री लोकात आहेत. त्याचे सेवाकार्य उचलून धरण्यासाठी प्रगतशील बांधवाबरोबर आपला भाग करण्यास ते फार इच्छितात. अशाना मागे हटवू नये. स्वर्गीय भांडारात त्यांना आपली दमडी टाकू द्या. देवावरील प्रेमाने आणि भक्तीभावाने दिलेले हे क्षुल्लक दान समर्पित व अमूल्य देणगी बनते, देवाचे समाधान होते व त्यावर तो कृपाप्रसाद वर्षितो.DAMar 536.1

    ख्रिस्ताने जेव्हा म्हटले, “त्या सर्वापेक्षा या दरिद्री विधवेने अधिक टाकिले” तेव्हा त्याचे शब्द उद्देशाच्या बाबतीतच नाही तर तिच्या देणगीचा परिणाम, निष्पती यांच्या बाबतीतही सत्य होते. “दोन टोल्याची एक दमडी होते” ती तिने देवाच्या भांडारात टाकिली, धनवान यहृद्यांनी टाकलेल्या धनापेक्षा ती अधिक मोल्यवान होती. झऱ्याप्रमाणे सुरवातीला ह्या लहान देणगीचा प्रभाव क्षुल्लक होता परंतु पुढे तो विस्तारलेला आणि खोलवर गेलेला होता. हजारो मार्गाने गरीबांचा दुःख परिहार होऊन सुवार्ताप्रसार झाला आहे. प्रत्येक देशातील व प्रत्येक युगातील हजारो अंतःकरणावर तिच्या स्वनाकाराच्या उदाहरणाचा परिणाम पुन्हा पुन्हा झाला आहे. धनवान व दरिद्री यांना ते आकर्षित झाले आहे आणि त्यांच्या दानामुळे तिच्या दानाची किंमत भरमसाठ झाली आहे. विधवेच्या टोल्यावर आलेला देवाचा कृपाप्रसाद मोठ्या फलनिष्पतीचे उगमस्थान झाले आहे. देवाने बहाल केलेले प्रत्येक दान व अंतःकरणापासून केलेली प्रत्येक कृती देवाच्या गौरवासाठी वापरल्यास तशीच फलनिष्पति होईल. सर्व शक्तिमान देवाच्या उद्दिष्टाशी त्याचे संधान बांधले आहे. त्याच्या उपयुक्त परिणामाचे मोजमाप कोणी मनुष्य करू शकत नाही. DAMar 536.2

    शास्त्री व परूशी यांच्यावरील उघडपणे केलेले दोषारोप ख्रिस्ताने पुढे चालू ठेविले: “अहो अंधळ्या वाट्याड्यांनो, तुम्हास धिक्कार असो! कारण तुम्ही म्हणता कोणी मंदिराची शपथ घेतली तर त्यात काही नाही, परंतु कोणी मंदिराच्या सोन्याची शपथ घेतली तर तो ऋणी आहे. अहो मूर्ख व अंधळे लोकहो, मोठे कोणते, ते सोने किंवा ज्याच्या योगाने ते सोने पवित्र झाले ते मंदिर? तुम्ही म्हणता, कोणी वेदीची शपथ घेतली तर त्यात काही नाही, परंतु कोणी तिजवरील अर्पणाची शपथ घेतली तर तो ऋणी आहे. अहो अंधळ्यानो, मोठे कोणते; अर्पण किंवा अर्पण पवित्र करणारी वेदी?’ याजकांनी देवाच्या अपेक्षित गोष्टींचा अर्थ त्यांच्या संकुचित व खोट्या, चुकीच्या प्रमाणाप्रमाणे लावला. वेगवेगळ्या पापदोषामध्ये तुलनात्मकदृष्ट्या भिन्नता दाखविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. काही पापाकडे सहजरित्या पाहून ती दृष्टीआड केली तर दुसरी पापे कमी परिणामाची समजली. पैशाच्या बाबतीत ते माणसांना शपथेतून मोकळे करीत. मोठी रक्कम असल्यास कधी कधी ते अधिक गंभीर अपराधाकडे दुर्लक्ष करी. परंतु त्याच वेळेस हे याजक व अधिकारी अगदी क्षुल्लक अपराधाबद्दल दुसऱ्याच्या बाबतीत कठोर शिक्षा ठोठावीत असत.DAMar 536.3

    “अहो शास्त्र्यांनो व परूश्यांनो, अहो ढोंग्यानो, तुम्हास धिक्कार असो! कारण पुदिना, शेप व जिरे यांचा दशाश तुम्ही देता आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी, म्हणजे न्याय, दया व विश्वास ह्या तुम्ही सोडिल्या आहेत; ह्या करावयाच्या होत्या, तरी त्या सोडावयास पाहिजे होत्या असे नाही.” पवित्र कर्तव्याचा दुरूपयोग केल्याबद्दल ख्रिस्त ह्या वचनाद्वारे दोष देतो. हे कर्तव्य तो बाजूला ढकलीत नाही. दशांश पद्धत ही ईश्वरी संकल्पना आहे आणि प्राचीन काळापासून ती पाळण्यात आली आहे. विश्वासकांचा पिता आब्राहाम याने आपल्या अवघ्याचा दशांश दिला, यहूदी पुढाऱ्यांनी दशांशाचे वचन समजून घेतले आणि ते ठीक होते; परंतु त्यातील कर्तव्य पार पाडण्यासाठी त्यांनी लोकांना मोकळीक दिली नाही. मनाला येईल तसे जुलमी नियम त्यांनी लादले. मागणी करणाऱ्या गोष्टी इतक्या गंतागंतीच्या करून टाकिल्या होत्या की त्या पूर्ण करणे अशक्य झाले होते. त्यांची सिद्धता केव्हा झाली ते कोणालाच माहीत नव्हते. देवाने दिलेली दशांशाची पद्धत रचनाबद्ध होती; परंतु याजक व धर्मपुढाऱ्यांनी ते एक मोठे ओझे करून टाकिले होते.DAMar 537.1

    ज्याची अपेक्षा देव करितो त्याचे महत्त्व असते. दशांश देणे हे कर्तव्य आहे हे ख्रिस्ताने जाणले, परंतु हे करीत असतांना दुसऱ्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करायचे नाही हे त्याने दाखविले. परूशी बागेतील वनस्पति, पुदिना, शेप व जिरे यांच्यावरील दशांश देण्यात फार दक्ष, कडक होते; त्यासाठी त्यांना फार कष्ट घ्यावे लागले नाही किंवा किंमत मोजावी लागली नाही, त्याद्वारे त्यांचा तंतोततपणा व पावित्र्य ह्या बाबतीत ख्याती झाली. त्याचवेळी निरूपयोगी बंधनांनी लोक चिरडून गेले आणि देवाने दिलेल्या पवित्र पद्धतीचा आदर नष्ट झाला. महत्त्वाच्या सत्य गोष्टीवरून त्यांचे लक्ष उडून क्षुल्लक, किरकोळ व कमी महत्त्वाच्या गोष्टीत गुंतून गेले. नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी, म्हणजे न्याय, दया, विश्वास व सत्य ह्यांच्याकडे दुर्लक्ष केले. ख्रिस्ताने म्हटले, “ह्या करावयाच्या होत्या, तरी त्या सोडावयाला पाहिजे होत्या असे नाही.”DAMar 537.2

    त्याचप्रमाणे दुसरे नियमही धर्मपुढाऱ्यांनी विपर्यस्त करून टाकिले होते. अशुद्ध पदार्थांचा आहार वर्ण्य करण्यास मोशेला दिलेल्या नियमात सांगितले होते. डुकराचे मांस आणि दुसऱ्या काही पशुंचे मांस खाण्यास मनाई होती, कारण त्याद्वारे अशुद्ध पदार्थ रक्तामध्ये मिसळून जीवनावर परिणाम होत असे. परंतु देवाने सांगितल्याप्रमाणे परूश्यांनी ते पाळले नाही. त्यामध्ये त्यांनी अतिशयोक्ती केली. वापरण्यात आलेल्या पाण्यात अशुद्ध समजलेले जंतू सापडू नये म्हणून सर्व पाणी गाळण्यास लोकांना सांगण्यात आले. ह्या क्षुल्लक गोष्टीची तुलना ते करीत असलेल्या मोठ्या पापाशी करून येशूने परूश्यांना म्हटले, “अहो अंधळ्या वाटाड्यांनो, तुम्ही मुरकूट गाळून काढिता व उंट गिळून टाकिता.” DAMar 537.3

    “अहो शास्त्र्यांनो व परूश्यांनो, अहो ढोंग्यानो, तुम्हास धिक्कार असो! कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरासारखे आहे, त्या बाहेरून सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या मळांने भरलेल्या आहेत.” वरून शुभ्र व सुशोभीत केलेली परंतु आत सडलेली घाण लपविलेल्या कबरेप्रमाणे याजक व अधिकारी यांच्या वरून दिसणाऱ्या पावित्र्याने आतील अनीति, पाप झाकले होते. येशूने पुढे म्हटले:DAMar 538.1

    “अहो शास्त्र्यांनो व परूश्यांनो, अहो ढोंग्यानो, तुम्हास धिक्कार असो! कारण तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधिता व धार्मिक लोकांची धडी शृंगारिता; आणि म्हणता, आम्ही आपल्या वडीलांच्या दिवसात असतो तर संदेष्ट्यांचा रक्तपात करण्यात त्यांचे भागीदार झाला नसतो. यावरून तुम्ही संदेष्ट्यांचा घात करणाऱ्यांचे पुत्र आहा, अशी तुम्ही स्वतःच साक्ष देता.” मृत संदेष्ट्यांना आदर दाखविण्यासाठी यहूदी कबरा शृंगारण्यास अगदी उत्सुक होते; परंतु त्यांच्या शिकवणीचा त्यांना काही फायदा झाला नाही किंवा त्यांच्यावर ठेवलेल्या ठपक्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही.DAMar 538.2

    ख्रिस्ताच्या काळात मृतांच्या कबरेविषयी फार वेडगळ समजूत होती म्हणून तिला सुशोभित करण्यासाठी पैसा फार खर्च करीत असे. देवाच्या दृष्टीने ही मूर्तिपूजा होती. मृताबद्दल बेसुमार आदर दाखविल्यामुळे त्यांनी देवावर परम प्रेम आणि शेजाऱ्यावर स्वतःप्रमाणे प्रेम केले नसल्याचे दर्शविले. आज तीच मूर्तिपूजा अधिक प्रमाणात करण्यात येत आहे. मृतासाठी मोठे स्मारक उभारण्यासाठी अनेकजन विधवा व पोरके, दरिद्री व दुखणाईत यांच्याकडे दुर्लक्ष करून दोषी ठरत आहेत. ह्या कारणासाठी वेळ, पैसा व कष्ट मुबलक खर्च करीत आहोत परंतु जीवंतासाठी करावयाचे कर्तव्य - ख्रिस्ताने आज्ञापिलेले कर्तव्य - तसेच सोडून दिले आहे.DAMar 538.3

    परूश्यांनी संदेष्ट्यासाठी कबरा बांधिल्या, त्यांची थडी शृंगारली आणि एकमेकास म्हणाले, आम्ही आपल्या वडिलांच्या दिवसात असतो तर देवाच्या सेवकांचा रक्तपात करण्यात त्यांचे भागीदार झालो नसतो. त्याच वेळी त्याच्या पुत्राचा प्राण घेण्याच्या योजना ते आखीत होते. हा धडा आमच्यासाठी आहे. सत्य प्रकाशापासून आम्हाला अंधारात टाकणाऱ्या सैतानाच्या फसवणुकीबद्दल आम्ही जागृत राहिले पाहिजे. अनेकजन परूश्यांच्या चाकोरीतून चालतात. त्यांच्या विश्वासासाठी मरणाऱ्यांचा ते आदर करितात. ख्रिस्ताचा नाकार करणाऱ्या यहृद्यांच्या अंधळेपणाबद्दल ते आश्चर्य करितात. आम्ही त्याच्या काळात राहिलो असतो तर ते म्हणतात की आम्ही त्याची शिकवण आनंदाने स्वीकारली असती; उद्धारकाचा त्याग करणाऱ्यांचे आम्ही भागीदार होऊन केव्हाही दोषी ठरलो नसतो. परंतु देवाची आज्ञा पाळण्यासाठी स्वःनाकार व नम्रता यांची गरज आहे असे समजल्यावर तेच लोक आपले ठाम मत दडपून टाकितात आणि आज्ञापालन नाकारतात. याप्रमाणे ख्रिस्ताने दोष दिलेल्या परूश्याप्रमाणे ते प्रवृत्ति दर्शवितात.DAMar 538.4

    ख्रिस्ताचा त्याग करण्यात त्यांच्यावर पडलेल्या भयंकर जबाबदारीची कल्पना यहूद्यांना बहुधा आलेली नव्हती. काईनाच्या हातून सात्त्विक हाबेलाचे निरपराधी रक्त सांडण्यात आले त्या वेळेपासून मोठ्या प्रमाणातील अपराधाने त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. प्रत्येक युगामध्ये संदेष्ट्यांनी राजे, अधिकारी व लोक यांच्याविरुद्ध आवाज उठवून देवाचे वचन सांगितले आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याचे आज्ञापालन केले. पिढ्यानपिढ्या सत्य व प्रकाश यांचा अव्हेर करणाऱ्यांच्या भयानक शिक्षेची रास पडत आहे. पूर्वीच्या पिढ्यापेक्षा याजक व अधिकारी यांचे पाप मोठे आहे. उद्धारकाचा नाकार करून, हाबेलापासून ख्रिस्तापर्यंत धार्मिक लोकांच्या सांडलेल्या रक्ताची ते जबाबदारी घेत होते. त्यांच्या दुष्टाईचा प्याला ते भरत होते व तो भरून वाहात होता आणि अपराधाची शिक्षा म्हणून त्यांच्या माथ्यावर लवकरच तो ओतण्यात येणार होता. ह्याविषयी येशूने त्यांना इशारा दिलाःDAMar 539.1

    “यासाठी की धार्मिक हाबेल याच्या रक्तापासून वेदी व पवित्रस्थान यांच्यामध्ये ज्याला तुम्ही जिवे मारिले तो बरख्याचा पुत्र जखऱ्या याच्या रक्तापर्यंत, जे सर्व धार्मिक लोकांचे रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले ते तुम्हावर यावे. मी तुम्हास खचीत सांगतो, हे सर्व या पिढीवर येईल.” DAMar 539.2

    ज्या शास्त्र्यांनी आणि परूश्यांनी येशूचे वचन ऐकिले त्यांना त्याचे बोलणे खरे वाटले. प्रेषित जखऱ्याला कसे मारले होते हे त्यांना माहीत होते. देवाचा इशाऱ्याचा संदेश त्याच्या मुखातून बाहेर पडत असताना सैतानाच्या क्रोधाने धर्मभ्रष्ट राजाला पछाडले आणि त्याच्या हकूमाने संदेष्ट्याचा वध करण्यात आला. मंदिराच्या अंगणातील दगडावर त्याच्या रक्ताचा उमटलेला ठसा पुसू जाऊ शकला नाही, धर्मभ्रष्ट इस्राएलाच्या विरुद्ध तो साक्ष देत राहिला. जोपर्यंत मंदिर उभे राहिले तोपर्यंत त्या धार्मिक रक्ताचा डाग अन्यायाचा सूड घेण्यासाठी देवाजवळ ओरडत होता. येशूने ह्या भयानक पापांचा उल्लेख केल्यावर लोकसमुदाय घाबरून गेला.DAMar 539.3

    भविष्याकडे पाहून येशूने प्रतिपादन केले की यहूद्यांचा निगरगट्टपणा आणि देवाच्या सेवकाविषयी त्यांची असहिष्णुता आता जशी आहे तशीच पुढे भविष्यात राहील: DAMar 539.4

    “पाहा, मी तुम्हाकडे संदेष्टे, ज्ञानी व शास्त्री यास पाठवितो. तुम्ही त्यांतून कित्येकांस जीवे माराल व वधस्तंभावर खिळाल आणि कित्येकांस आपल्या सभास्थानामध्ये फटके माराल व नगरोनगरी त्यांचा पाठलाग कराल.” श्रद्धावंत व पवित्र आत्म्याने प्रेरित झालेले संदेष्टे व ज्ञानी - स्तेफन, याकोब आणि अनेकजन - यांना दोषी ठरवून त्यांचा वध करण्यात येईल. त्याच्या सभोवती दिव्य प्रकाशाने कडे केले असताना स्वर्गाकडे हात वर करून ख्रिस्त न्यायधिशाप्रमाणे समोर असलेल्यांच्या बरोबर बोलला. आतापर्यंत नम्रतेने व विनंती करणारा ऐकण्यात आलेला आवाज दोष देणारा आणि धमकावणारा होता. श्रोतेजन थरारले, दचकले. त्याचा दृष्टिक्षेप व वक्तव्य यांनी त्यांच्या मनावर केलेला परिणाम केव्हाही पुसला जाणार नव्हता. DAMar 539.5

    ज्याच्याद्वारे लोक स्वतःचा नाश करून घेत होते, लोकांची फसगत करीत होते आणि देवाचा अनादर करीत होते त्या अति निंद्य ढोंगीपणाच्या पापाविरुद्ध देवाचा क्रोध होता. याजक व अधिकारी यांच्या युक्तीवादामध्ये सैतानाचे प्रतिनिधी कार्य करीत होते. पापावर उघड दोषारोप करणारे त्याचे शब्द तीक्ष्ण व भेदक होते परंतु सूडाची भाषा त्याने वापरली नाही. अंधाराच्या अधिपतीवर त्याचा सात्त्विक क्रोध होता; परंतु त्याने चिडखोर स्वभाव व्यक्त केला नाही. देवाच्या इच्छेप्रमाणे वागणारे आणि त्याचा प्रेमळ व दयापूर्ण स्वभाव धारण करणाऱ्या ख्रिस्ती लोकांचा पापाविरूद्ध सात्त्विक संताप होईल परंतु भावनाविवश होऊन निंदा करणाऱ्यांची नालस्ती करण्यास ते उठणार नाहीत. बैठकीत खोटेपणा सिद्ध करण्यासाठी सैतानी शक्तीने जरी काहीजण प्रक्षुब्ध झाले तरी ते ख्रिस्तामध्ये शांत राहून मनाची अविचलता राखतील.DAMar 540.1

    मंदिर व श्रोतेजन यांच्याकडे दृष्टिक्षेप केल्यावर देवपुत्राच्या मुद्रेवर दैवी करुणा, कींव दिसली. दुःखाने कंठ दाटून व डोळ्यात अश्रु आणून तो उद्गारला, “यरुशलेमा, यरुशलेमा, संदेष्ट्यांचा घात करणाऱ्या, व तुजकडे पाठविलेल्यास दगडमार करणाऱ्या! जशी कोंबडी आपली पिल्ले पंखाखाली एकवटते त्या प्रकारे तुझ्या मुलाबाळांना एकवटावयाची कितीदा माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती!’ ही धडपड वियोग होण्याच्या समयीची होती. ख्रिस्ताच्या ह्या विलापामध्ये देवाचे अंतःकरण ओतले गेले आहे. देवत्वाच्या अत्यंत सहनशील प्रीतीचा हा रहस्यमय निरोप आहे.DAMar 540.2

    परूशी व सदूकी सारखेच शांत होते. येशूने आपल्या शिष्यांना बोलाविले व मंदिर सोडून जाण्यास ते सज्ज झाले. पराभूत होऊन प्रतिपक्षापासून माघार घेण्यासाठी म्हणून नव्हे तर कार्य यशस्वीपणे तडीस गेल्यामुळे ते निघाले. झगड्यात विजेता होऊन तो निघून गेला.DAMar 540.3

    त्या घटनापूर्ण दिवशी ख्रिस्ताच्या मुखातून पडलेली मोल्यवान सत्य रत्ने अनेकांनी अंतःकरणात साठवून ठेविली. त्यांच्या जीवनात नवीन विचार कार्यरत झाले, नव्या प्रेरणा जागृत झाल्या आणि नव्या इतिहासाला सुरवात झाली. ख्रिस्ताचा वधस्तंभ आणि पुनरुत्थान यांच्यानंतर हे लोक पुढे सरसावले आणि महान कार्याच्या तुलनेत ज्ञानाने व आवेशाने त्यांनी दिव्य कामगिरी साध्य केली. जुन्या लोकभ्रमाने किंवा वेडगळ समजुतीने त्यांचे जीवन खुजे झाले होते किंवा वाढ खुंटली होती. तो भ्रम नाहिसा करणारा संदेश त्यांनी सादर केला व तो लोकांना आवडला. त्यांच्या प्रभावी साक्षीपुढे मानवी सिद्धांत आणि तत्त्वज्ञान निरर्थक दंतकथा बनल्या. यरुशलेमातील मंदिरामध्ये जमलेल्या लोकसमुदायाला येशूचे वचन ऐकून आश्चर्य वाटले व धाक बसला.DAMar 540.4

    राष्ट्र या नात्याने इस्राएलाची देवापासून ताटातूट झाली. जैतूनाच्या झाडाच्या फाद्या तुटून मोडून गेल्या होत्या. शेवटच्या वेळी मंदिराच्या आतल्या बाजूला पाहून येशूने करुणामय उद्गार काढिले: “पाहा, तुमचे घर तुम्हालाच ओसाड सोडिले आहे. मी तुम्हास सांगतो की आतापासून प्रभूच्या नामात येणारा तो धन्यवादित असे म्हणाल तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणारच नाही.” आतापर्यंत मंदिराला पित्याचे गृह म्हटले होते; परंतु आता देवपुत्र जसे मंदिराच्या बाहेर पडेल तसे त्याच्या गौरवासाठी बांधलेल्या मंदिरातून देवाची उपस्थिति कायमची नाहिशी होईल. आतापासून तेथील विधिसंस्कार अर्थहीन ठरतील आणि सेवाकार्य उपहास, विडंबन होईल.DAMar 541.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents