Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    आजारावरील नियंत्रण

    केवळ धार्मिक विधीमध्येच नाही, परंतु त्यांच्या रोजच्या जीवनामध्येही स्वच्छतेचे शिक्षण दिले गेले. शुद्ध व अशुद्धतेमध्ये अंतर ठेवले गेले. जे संसर्गिक रोगाने ग्रासित होत असत त्यांना छावणीबाहेर ठेवले जात असे आणि जोपर्यंत ते रोगांपासून मुक्त होत नाहीत. कपडे धुवून स्वच्छ व शुद्ध होत नाहीत तोपर्यंत ते बाहेरच राहतील. जे लोक अशुद्ध करणाऱ्या रोगाने पीडित आहेत त्यांना पुढील सूचना आहेत. MHMar 212.2

    “स्त्राव होणारा मनुष्य ज्या बिछान्यावर निजेल तो प्रत्येकजण अशुद्ध होय. आणि ज्या वस्तुवर तो बसेल तीही अशुद्ध होय, जो त्याच्या बिछान्यावर बसेल तोही अशुद्ध होय. जो त्याच्या बिछान्याला शिवेल त्याने आपले कपडे धुवावेत. पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. स्ताव होणारा मनुष्याच्या बसलेल्या वस्तुवर कोणी बसला तर त्याने आपले कपडे धुवावेत स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. स्त्राव होणाऱ्या मनुष्याच्या अंगाला कोणी शिवल्यास त्याने आपले कपडे धुवावेत. पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. स्त्राव होणारा मनुष्य एखाद्या शुद्ध मनुष्यावर थुकला तर त्याने आपले कपडे धुवावे. स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. स्ताव होणारा मनुष्य एखाद्या वाहनाचा वापर करील तर वाहन अशुद्ध समजावे. त्याच्या अंगाखालच्या एखाद्या वस्तुला कोणी शिवला तर त्याने आपले कपडे धुवावे, स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. स्त्राव होणारा मनुष्य पाण्याने हात न धुता एखाद्याला शिवला तर त्याने आपले कपडे धुवावेत, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. स्त्राव होणारा मनुष्य एखाद्या मातीच्या पात्राला शिवला तर ते फोडून टाकावे, मात्र प्रत्येक लाकडी पात्र पाण्याने धुवावे स्त्राव होणारा मनुष्य आपल्या स्त्रावापासून बरा झाल्यास आपल्या शुद्धी करणासाठी त्याने मोजून सात दिवस थांबावे आणि मग आपले कपडे वाहत्या पाण्यात धुवून आपले शरीर धुवावे मग तो शुद्ध ठरेल.” (लेवीय १५:४-१२).MHMar 212.3

    महारोगासंबंधी असणारा नियमसुद्धा एक उदाहरण आहे की कशाप्रकारे हे नियम लागू केले होते.MHMar 213.1

    “जितके दिवस हा चट्टा त्याच्या अंगावर राहील तितके दिवस त्याने अशुद्ध राहावे. तो अशुद्ध होय त्याने एकटे राहावे छावणीच्या बाहेर त्याचे वसतीस्थान असावे.MHMar 213.2

    एखाद्या वस्त्राला मग ते लोकरीचे असो की सणाचे, महारोगाचा चट्टा पडला अथवा तो सणाच्या किंवा लोकरीच्या बाण्याला किंवा वाण्याला, चमड्याच्या किंवा चमड्याला एखाद्या वस्तुला पडला आणि त्या वस्त्राला, त्याच्या ताण्याला किंवा त्याच्या बाण्याला अथवा चमाड्याला किंवा चामड्याच्या वस्तुला पडलेला तो चट्टा हिरवट अथवा तांबूस असला तर तो महारोगाचा चट्टा होय. तो याजकाला दाखवावा. याजकाने तो चट्टा तपासावा. चट्टा पडलेली वस्तु त्याने सात दिवस बंद करुन ठेवावी. त्याने सातव्या दिवशी तो चट्टा तपासून पाहावा आणि वस्ताच्या ताव्यावर किंवा बाण्यावर चामड्यावर किंवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्ट पसरलेला दिसला तर ते चरत जाणारे कुष्ठ समजावे ती वस्तु अशुद्ध होय. ते वस्त्र लोकरीचे असो अथवा सणाचे असो त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर तसेच चामड्यावर किंवा चामड्याच्या वस्तूवर तो चट्टा असला तर ती वस्तु जाळावी ते चरत जाणारे कुष्ठ असून ती वस्तु अग्नीत जाळावी. (लेवीय १३:४६-५२). MHMar 213.3

    अशाप्रकारे एक घर जर राहण्यासाठी असुरक्षित असेल तर ते नष्ट करावे. हे याजकाचे काम आहे की त्याने ते नष्ट करावे. “मग त्याने ते घर खणून पाडावे. त्याचे दगड, लाकूड व चूना काढून नगराबाहेर एखाद्या अशुद्ध स्थळी फेकून द्यावे आणि घर बंद असता त्यात कोणी शिरला तर तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावा आणि कोणी त्या घरात निजला तर त्याने आपले कपडे धुवावे. त्याचप्रमाणे त्या घरात कोणी काही खाल्ले तर त्याने आपले कपडे धुवावे. त्याचप्रमाणे त्या घरात कोणी काही खाल्ले तर त्यानेही आपले कपडे धुवावे.” (लेवीय १४:४५-४७).MHMar 213.4