Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    त्याच्या कार्यातील निराशा

    चिकित्सक कितीही दक्ष असो आणि विश्वासनीय असो परंतु त्याच्या अनुभवानुसार कधी कधी त्याच्या पदरी निराशा आणि अपयश येऊ शकते. सहसा त्याच्या कार्यामध्येही अपयश येऊ शकते. ते कार्य पूर्ण करण्याची त्याची इच्छा जरी असली तरी निराशा पदरी पडते. जरी त्याच्या रुग्णाला आरोग्यलाभ झाला तरीही त्याच्या इतरांना लाभदायक होऊ शकत नाही. अनेक लोकांना योग्य मार्गदर्शनामुळे किंवा उपचारांमुळे त्यांना आरोग्य प्राप्ती होते, परंतु पुन्हा ते आपल्या जुन्या सवयीकडे वळतात व पुन्हा विनाशाकडे वळतात. चिकित्सकांना त्यांच्यासाठी व त्यांना रोगमुक्त केलेले कष्ट वाया जातात.MHMar 88.3

    ख्रिस्ताचाही असाच काहीतरी अनुभव होता, परंतु तरीही त्याचे आपले कार्य बंद केले. नव्हते. त्याने ज्या दहा कुष्ठरोग्यांना बरे केले होते त्यांच्यापैकी एकच त्याच्याकडे त्याचे उपकार मानन्यासाठी आला होता. बाकी नऊ जण त्याला विसरुन गेले होते. तो एक अनोळखी शमरोनी होता. त्या एकामुळे ख्रिस्ताने सर्वांना बरे केले होते. जर डॉक्टरांना ख्रिस्ताकडून अधिक प्रमाणात यश मिळत असेल तरीही त्याने मुख्य चिकित्सकाकडून शिकून घ्यावे. त्याच्याकडून (ख्रिस्ताकडून) धडा शिकणे आवश्यक आहे. त्याविषयी त्याने लिहिले, “पृथ्वीवर न्याय स्थापीपर्यंत तो मंदावणार नाही, भंगणार नाही, त्याच्या धर्मशास्त्राची प्रतीक्षा करतात.” (यशया ४२:४).” त्याच्या जिवाच्या वेदना सरल्यावर तो त्याचे फळ पाहून समाधान पावेल. तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांस निर्दोष ठरविल. त्यांच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल.” (यशया ५३:११).MHMar 89.1

    जर केवळ एकच आत्मा त्याच्या दयेच्या शुभवर्तमानाचा स्वीकार करील तरीही त्या आत्म्याला वाचविण्यासाठी ख्रिस्ताने श्रम, कष्ट, दुःख आणि लज्जास्पद मरण स्वीकारले असते. एका पाप्यासाठी मृत्युची निवड केली असती. जशी आमच्या प्रयत्नाने केवळ एका व्यक्तिमध्ये सुधारणा आणि सन्मान प्राप्त झाला आणि प्रभुच्या न्यायालयामध्ये प्रकाशित होण्यास तयार झाला तर आपल्याला आनंद व्यक्त करण्याचे दुसरे कारण नसणार.MHMar 89.2

    चिकित्सकाचे कर्तव्य अति कठीण कष्टमय आणि जबाबदारीचे असते. हे कर्तव्य योग्यप्रकारे पार पाडण्यासाठी चिकित्सकाचे आरोग्य उत्तम स्फुर्तिदायक आणि निरोगी असणे आवश्यक आहे. थकलेला आणि आजारी चिकित्सक रुग्णांवर योग्य उपचार करु शकणार नाही म्हणून चिकित्सकाने नेहमी निरोगी असावे. आजारपणामुळे चिकित्सकांची मनस्थिति योग्य नसते तो रुग्णाची काळजी घेऊ शकणार नाही.MHMar 89.3

    तसे पाहता कमी झोप, जेवणाकडे दुर्लक्ष सामाजिकतेमध्ये आणि धार्मिक कार्यामध्ये कमी भाग घेणे या सर्व कार्यामुळे चिकित्सकाचे जीवन सतत अंधारामध्ये राहते. जे कष्ट व त्रास तो पाहतो. मदतीसाठी निराधार लोकांची हाक, भ्रष्ट लोकांशी त्यांचा संपर्क असतो. या सर्व गोष्टीमुळे त्याचे हृदय सतत उदास राहते आणि मानवतेवरील त्याचा विश्वास उडून जातो.MHMar 90.1

    आजारपण आणि मृत्युबरोबर जीवनाचा जो संघर्ष असतो यामुळे सहनशक्ति संपून जाते. या भयंकर दबावामध्ये पराकाष्ठेच्या सीमेपर्यंत चारित्र्याची परीक्षा होते आणि यावेळीच येणारी कसोटी पूर्ण शक्तिने प्रहार करते. यामुळे लोकांमध्ये सेवा करणाऱ्या चिकित्सकाला संयम, आत्म्याची पवित्रता आणि त्याला पूर्ण विश्वासाची अति आवश्यकता असते. या गोष्टी स्वर्गाला धरुन राहतात. स्वत:च्या आणि इतरांच्या भल्यासाठी तो स्वत:च्या शरीर व मानसिक अरोग्याच्या नियमांचा भंग करु शकत नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. शरीरातील आरोग्याच्या चांगल्या सवयी आणि गुण यामुळे नैतिकतेची पातळी वाढते.MHMar 90.2

    प्रत्येक अवस्थेमध्ये चिकित्सकाची सुरक्षा केवळ या गोष्टीमध्येच आहे की त्यांनी नियमानुसार कार्य करावे. परमेश्वरावर विश्वास ठेवण्याच्या उद्देशाची दृढतेमधील सन्मान व शक्ति प्राप्त करा. चिकित्सकाला आपल्या चारित्र्यामध्ये श्रेष्ठ असणे आवश्यक आहे. त्याने रोज प्रत्येक तास, प्रत्येक क्षण असे जगले पाहिजे की तो परमेश्वराच्या उपस्थितिमध्ये जगत आहे. मोशेप्रमाणे अदृश्य परमेश्वराची उपस्थिति अनुभवणे. MHMar 90.3

    धार्मिकतेची मूळे धर्मनिष्ठामध्ये असतात. कोणीही मनुष्य सतत आपल्या लोकांसमोर पवित्र आणि स्वच्छ जीवन सांभाळू शकत नाही. जर त्याचे जीवन ख्रिस्ताबरोबर परमेश्वरामध्ये लपलेले नसेल. लोकांमध्ये जितके अधिक काम करावे लागेल तितक्याच अधिक प्रमाणात आपले हृदय स्वर्गाकडे लागणे आणि परमेश्वराशी संपर्क असणे आवश्य आहे.MHMar 90.4

    जितकी आवश्यक त्याची कर्तव्य आणि जितक्या मोठ्या जबाबदाऱ्या असतील तितके अधिक त्यांना स्वर्गीय सामर्थ्याची गरज असते. नाशवंत गोष्टींवर लक्ष देण्याऐवजी किंवा जगीक गोष्टीमध्ये वेळ खर्च करण्याऐवजी स्वर्गीय अविनाशी गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यांचे मनन करणे गरजेचे आहे. जगातील सर्व प्रकारची आकर्षणे अशा प्रकारे हल्ला करतात की मनुष्याला स्वर्गीय गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळच मिळू नये. म्हणून जगातील आकर्षणाच्या सामर्थ्यांना तोंड देण्यासाठी स्वर्गीय गोष्टी, परमेश्वराशी असणारे संबंध सतत आपल्यामध्ये असायला हवे मनुष्यामध्ये सर्वात जास्त गरज असते ती चिकित्सकांना किंवा डॉक्टरांना पवित्रशास्त्राचे अध्ययन आणि प्रार्थनामध्ये स्वत:ला सुरक्षित ठेवणे शक्य असते. आपण सतत पवित्रशास्त्र अध्ययन प्रार्थना आणि मनन करीत राहिलो तर परमेश्वराच्या संरक्षणाखाली सुरक्षित राहू. त्याची धार्मिकता आणि नियमाच्या पालन करण्यामध्ये तत्पर राहिल्यास एक चैतन्य निर्माण होईल व आपण त्याच्या कृपेमध्ये राहू शकतो व आपल्यामध्ये परमेश्वराचे गुण प्रगट होतील.MHMar 90.5

    जितक्या प्रमाणात आपण परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवतो, स्वीकार करतो व त्याला मान्यता देतो तितक्याच प्रमाणात आपले जीवनाचे प्रत्येक कार्य व चारित्र्याच्या प्रत्येक अवस्था प्रभावित करते. आपल्या प्रत्येक विचाराला आणि प्रत्येक इच्छेला नियंत्रणात ठेवले जाते. जे लोक परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवतात ते संतांप्रमाणे होऊन स्वतंत्र सामर्थ्यवान बनतात. मन व आत्मा भ्रष्ट करणाऱ्या सर्व गोष्टींपासून अलिप्त राहून मलिनतेपासून स्वतंत्र होऊन स्वच्छ वातावरणामध्ये श्वास घेतात.MHMar 91.1

    तेव्हा मनुष्य परमेश्वराच्या सहभागितामध्ये राहतो. तेव्हा तो आपल्या उद्देशामध्ये अढळ असतो. जसे दानिएल आणि योसेफ यांना भ्रष्ट मूर्तिपूजक राजदरबारामध्ये परमेश्वराने त्यांना सुरक्षित ठेवल होते. तसेच तो आपणास ठेविल. त्यांचे जीवन शुद्ध व पवित्र करील त्यांच्या पावित्र्याचा पोशाख कलंकरहित ठेविल. त्यांच्या जीवनातील ख्रिस्ताचा प्रकाश मंद असणार नाही. कधी हीन बदलणारे त्याचे गौरव त्यांच्यामध्ये राहिल. पहाटेचा तारा सतत त्यांच्यावर प्रकाशत राहील.MHMar 91.2

    समाजामध्ये त्याची जीवन शक्तिची प्रचिती येईल. ते वाईट विरुद्ध असतील. प्रलोभन किवा मोहाविरुद्ध असतील. जे लोक निराश आहेत निरुत्साही आहेत आणि सत्य मार्गाच्या शोधामध्ये आहेत त्यांच्यासाठी ते मार्गदर्शकाचा प्रकाश असे होतील.MHMar 91.3

    *****

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents