Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय २५—आहाराच्या सीमा

    “तुमची कोमलता सर्व मनुष्यांवर प्रगट होवो.’MHMar 245.1

    आहाराच्या सुधारणेवर जे विश्वास ठेवतात. परंतु वास्तविकता सर्वच गोष्टींमध्ये सुधारणा होत नाही. काही लोकांना सुधारणेचा अर्थ असा करून घेतात की काही निवडक खाद्यपदार्थ जे आरोग्यासाठी शरीरास घातक असतात ते आहारातून वगळणे. आरोग्याचे नियम त्यांना स्पष्टपणे समजले नाहीत असे दिसते. योग्य संयम बाळगणारे ख्रिस्ती जीवनात इतरांसाठी आदर्श ठेवणे तर दूरच परंतु आजसुद्धा त्यांच्या भोजनाच्या टेबलावर शरीरास हानिकारक पदार्थ असतातच.MHMar 245.2

    दुसऱ्या वर्गातील लोक योग्य उदाहरण देण्याच्या इच्छेने त्याच्या एकदम उलट्या मार्गाने जातात. काही लोक असेही आहेत की त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना भोजन मिळत नाही. त्यांच्या गरजेची इच्छापुर्ती होत नाही म्हणून ते निकृष्ट भोजनाचा अवलंब करतात. यामुळे त्यांच्या आरोग्यावर होणारे परिणाम चांगले नसतात. त्यामुळे आरोग्यदायी जीवनाविरुद्ध साक्ष ते देतात.MHMar 245.3

    आरोग्यासाठी साधारण भोजनाची गरज असल्याचे काही लोक विचार करतात. म्हणून भोजनाची निवड आणि बनविण्यामधील सावधगिरीची गरज कमी असते असे त्यांना वाटते. काही लोक सक्तीने आपल्या भोजनावर नियंत्रण ठेवतात. आणि त्यामध्ये शरीरावश्यक पोषण नसल्यास आरोग्य ढासळते आणि होणाऱ्या परिणामाला तोंड द्यावे लागते.MHMar 245.4

    ज्या लोकांनी आरोग्य सुधारण्याच्या सिद्धांताला शंका निर्माण केली ते अधिक हट्टी असतात. ते स्वतःचे विचार स्वतःवरच लागू करतात असे नाही परंतु आपल्या कुटुंबियांवर आणि शेजाऱ्यांवर सुद्धा लागू करतात. व तसे प्रयत्न करतात. त्यांच्या चुकीच्या सुधारणेचे परिणाम त्यांच्या आजारी शरीरावर दिसून येतात. आणि स्वतःचे तेच विचार इतरांवर थोपविल्याने त्यांच्याही मनावर गैरसमजाचे चित्र निर्माण होते. यामुळे लोक पूर्णपणे अशाप्रकारच्या सुधारणुकीचा नकार करतात.MHMar 245.5

    ज्या लोकांना आरोग्याचे नियम समजतात आणि त्याच्या सिद्धांताचा स्विकार करतात आणि त्यामुळे लठ्ठपणा आणि इतर अनारोग्य घटकांपासून स्वतःचे रक्षण करतात. त्यांच्या भोजनपदार्थांची निवड ही केवळ भूक शमविण्यासाठीच नसते तर शरीररोग्यासाठी सुद्धा असते. असे लोक त्यांचे सर्व सामर्थ्य परमेश्वर आणि मानवाची सेवा करण्यासाठी वापरतात. त्यांसाठीच ते आपल्या आरोग्याचा वापर करतात. त्यांची भूक विवेक व तर्क नियंत्रणामध्ये ठेवतात आणि ते शरीर व आत्मा या दोहोंसाठी इनाम मिळवितात. ते आपले विचार इतरांवर जबरदस्तीने थोपवित नाहीत. त्यांचे आदर्शयुक्त जीवन योग्य सिद्धांताच्या पक्षामध्ये असते. त्यांची साक्ष इतरांना दिसून येतात. असे लोक इतरांवर आपली छाप पाडतात.MHMar 246.1

    आहाराच्या सुधारणेमध्ये एक व्यवहारीक बुद्धी असते. या विषयाचा खोल अभ्यास करण्याची गरज असते. कोणीही इतरांची आलोचना करू नये. कारण असे केल्याने त्याचा इतर चांगल्या गोष्टीशी ताळमेळ होत नाही ज्यांनी आपल्या आहारामध्ये सुधारणा केली आहे. प्रत्येक सवयीवर नियंत्रण करणारांमध्ये चांगलेच गुण असतील. सर्व लोक एक प्रकारचे पदार्थ खात नाहीत. जे खाद्यपदार्थ एका व्यक्तिला आवडतात व स्वादिष्ट लागतात तेच पदार्थ दुसऱ्या व्यक्तिला बेचव लागतात. एवढेच नाही परंतु यापदार्थांमुळे त्यांना धोकाही पोहोचू शकतो. काही लोक दूध घेत नाहीत. त्यांना ते पचत नाही तर काहींना दूध अति उपयुक्त असते. काही लोकांना वाटाणा काहींना बीन्स आवडत नाहीत व पचतही नाहीत. तर काहींना ते पौष्टिक असतात. काही लोकांना मोठ्या धान्याचे पदार्थ आवडत नाहीत तर काहींना ते अति आवडतात.MHMar 246.2

    जे लोक गाव, खेडी, आणि गरीब क्षेत्रामध्ये राहतात. ज्यांना सुकी व पौष्टिक फळे मिळत नाहीत अशांना त्यांच्या आहारामधून दूध व अंडी घेऊ नये असे सांगू नये. सत्य असे आहे की जे लोक मांसाहारी आहेत त्यांनी इतर उत्तेजनयुक्त पदार्थांचा वापर करू नये. मुले असणाऱ्या कुटुंबामध्ये अंड्याचा वापर करू नये. अंड्यांच्या वापरामुळे कामुकपणा वाढतो. परंतु जे लोक कमजोर व अशक्त असतात त्यांच्यामध्ये रक्ताचे प्रमाण कमी असते, त्यांना पौष्टिक पदार्थ सहसा मिळत नाही त्यांनी दूध व अंडी यांचा समावेश करावा. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवावी की निरोगी गाईच्या दूधाचाच वापर करावा. या गाई आणि कोंबड्यांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. अंडी चांगली शिजवून घ्यावी म्हणजे पचनास सुलभ होतील.MHMar 246.3

    आरोग्याची सुधारणा प्रगतीशील होणे आवश्यक आहे. जसजसे प्राणी व पक्षांमध्ये रोगराई वाढत जाते तसे प्राण्यांचे मांस, दूध आणि अंडी खाणे असुरक्षित होईल. यांच्याऐवजी दुसरे व आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करावा. प्रत्येक ठिकाणच्या लोकांनी अंडी, मांस आणि दूधाच्या जागी इतर आरोग्यदायी पदार्थांचा वापर करण्यास शिकावे. शक्य होईल तर अंडी आणि दधाविना भोजन स्वादिष्ट आणि पौष्टिक कसे बनवावे ते शिकू द्या.MHMar 247.1

    केवळ दोन वेळा भोजन करण्याच्या सवयी आरोग्यदायी असतात. परंतु काही परिस्थितीमध्ये तिसरे भोजन करणेसुद्धा गरजेचे आवश्यक असते. परंतु हे तिसरे भोजन सूर्यास्ताअगोदर किंवा लवकर हलके व सहज पचनास हलके असावे. यामध्ये फळे किंवा धान्यांची बनविलेली कॉफी असली तर योग्यच होईल. MHMar 247.2

    काही लोक सतत काळजी करतात की त्यांचे साधारण भोजन पदार्थ त्यांना हानिकारक असतात. त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की त्यांनी समजू नये की त्यांचे साधारण व पौष्टिक भोजन त्यांच्यासाठी हानीकारक आहे. आपल्या सर्वोत्तम समजानुसार आपले अन्न खा. आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करताच की ते अन्नपदार्थ तुमच्या शरीराला शक्ति देईल. तो तुमच्या भोजनावर आशीर्वाद देईल, त्याचे पाचन सुलभ होण्यासाठी आशीर्वाद मागितला. आपला विश्वास आहे की देव आशीर्वाद देईलच. तो प्रार्थना ऐकतो. यानंतर या विषयावर निश्चिंत राहा. MHMar 247.3

    सिद्धांताचे मागणे असे आहे की जे पदार्थ आपल्या पोटासाठी त्रासदायक आहेत. आरोग्यासाठी नुकसानदायक आहेत ते पदार्थ वर्ज करावेत. आम्ही लक्षात ठेवावे की निकृष्ट भोजन रक्तही निकृष्ट बनविते. यामुळेच असे आजार निर्माण होतात की ते लवकर बरे होत नाहीत. यामुळेच शरीराला योग्य पोषण प्राप्त होत नाही. यामुळे अपचन आणि सामान्य दुर्बलता निर्माण होते. जे लोक अशा प्रकारचे भोजन करतात ते गरीबीमुळे विवश होऊन करत नाही. परंतु त्यांची अज्ञानता आणि निष्काळजीपणाने तसे करतात. आरोग्याच्या चुकीच्या विचाराने आणि गैरसमजूतीमुळे तसे करतात. जेव्हा शरीरारोग्याकडे दुर्लक्ष केले व त्याची हेळसांड केली तर परमेश्वराला ते मान्य होत नाही. कारण परमेश्वराच्या सेवेसाठी हे अयोग्य कार्य होते. कुटुंबातील सर्वांची पहिली जबाबदारी अशी आहे की शरीरासाठी त्यांनी पौष्टिक आणि रुचकर अन्नपदार्थ बनवावेत. त्यामुळे त्यांची शक्ति वाढावी. आपण घरगुती इतर वस्तुंवर म्हणजे कपडे व इतर सामानावर जास्त खर्च करण्याऐवजी पौष्टिक खाद्यपदार्थांवर जास्त खर्च करावा. MHMar 247.4

    काही कुटुंबातील लोक पाहुण्यांची खातरीदारी करण्यासाठी स्वतःची काटकसर करतात. यामध्ये शहाणपणा नाही. तेव्हा सर्वप्रथम आपल्या कुटुंबाची गरज पुरविणे आवश्यक आहे.MHMar 248.1

    अडाणीपणाची बचत आणि दिखावूपणाचे रीतिरिवाज जेथे आवश्यक आहेत तेथे नकलीपणाचे वाटतात. आलेल्या पाहूण्यांचा योग्य पाहूणचार करणे हा देवाचा आशीर्वाद आहे. आपल्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी जे पदार्थ आपल्या टेबलावर असतात तेच पाहूण्यांनीसुद्धा खावेत भले त्यांच्या आवडी वेगळ्या असल्या तरी मग एखादा अंगतुक आला तरी त्यालाही भरपूर मिळावे असे पदार्थ टेबलावर असावेत.MHMar 248.2

    सर्वांना शिकणे आवश्यक आहे की काय खावे आणि कोणते पदार्थ बनवावेत ? स्त्री पुरुष दोघांनाही आरोग्यवर्ध पदार्थ बनविण्याची कला अवगत असावी. जेथे त्यांना आरोग्यदायी भोजन मिळत नाही तेथे ते असतील तर त्यांनी स्वतः ते पदार्थ बनवावेत. म्हणून त्यांना आरोग्यवर्धक पदार्थ बनविण्याची कला अवगत असावी.MHMar 248.3

    आपल्या आहाराकडे शहाणपणाने लक्ष द्या. त्याचे कारण अणि प्रभावावर अभ्यास करा. स्वतःवर संयमाची सवय लावा. भूकेला बुद्धीच्या नियंत्रणामध्ये ठेवा. गरजेपेक्षा जास्त खाऊन पोटावर अन्याय करू नका. आणि आपले आरोग्य लक्षात घेऊन पौष्टिक आहारापासून स्वतःला वंचित सुद्धा करु नका. MHMar 248.4

    आरोग्य सुधारक बनण्यास आतुर असणाऱ्या लोकांची संकोचि बुद्धी असते त्यांच्या विचारांमुळे नुकसान होऊ शकते. आरोग्यदायी आहाराच्या कार्यकत्यांनी लक्षात ठेवावे की आपल्या टेबलावर त्यांनी कोणत्या प्रकारचे अन्नपदार्थ असावेत. आणि त्यांनी इतरांना स्वतःच्या उदाहरणाने एक आदर्श समोर ठेवावा आणि पटवून द्यावे की आरोग्यदायी अणि पौष्टिक आहाराचा वापर करून आपले आरोग्य सुरक्षित राखता येते. एक वर्ग असाही आहे की आरोग्यदायी आहारापेक्षा स्वादिष्ट आणि जिभेचे चोचले पुरविण्यासाठी काहीही खातात जे आरोग्याच्या हिताचे नसते. जे स्वतःला आरोग्यदायी आहाराचे भोक्ते समजतात. परंतु त्यांना स्वतःलाच आरोग्यदायी आहार कोणता आहे हे ठाऊक नसते. पारंपारिक रीतीरिवाज बाळगणारेही आहेत देवाने सर्वप्रकारची वनस्पति फळे आहार म्हणून मानवास दिला आहे. परंतु काही धार्मिक परंपरेनुसार काही वनस्पति आणि कंदमुळे न खाणारेही आहेत काही ठराविक व आरोग्यहितासाठी चांगले पदार्थ असणारे खात नाहीत.MHMar 248.5

    आरोग्य सुधारण्याची वकीली करणारे आरोग्याच्या चरणसीमेला जातात. त्यांच्याबद्दल हे ऐकून आश्चर्य वाटेल की ते सुद्धा आरोग्य सिद्धांताचा अस्वीकार करतात. यामुळे आपण संकुचितपणाने आपल्या विचारांनी व व्यवहाराने आरोग्यदायी सिद्धांताचे महत्व कमी करू नये. परंतु जर कोणी आरोग्य सिद्धांताचा विरोध केला, थट्टा केली तर आपण आपले सिद्धांत सोडू नये. कारण मनुष्याचे आरोग्य महत्वाचे आहे. जे लोक आरोग्यदायी सिद्धांताचा स्वीकार करतात. ते सत्यासाठी ठाम उभे राहतात. आपल्या संकल्पापासून दूर जात नाहीत. ते आपल्या पूर्ण व्यवहाराकरवी एक धैर्यवान ख्रिस्ती आत्मा प्रगट करतात. MHMar 249.1

    “प्रियजनहो, जे तुम्ही प्रवासी व परदेशवासी आहात त्या तुम्हास मी विनंती करतो की जिवात्म्याबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनांपासून दूर राहा.” (१ पेत्र २:११).MHMar 249.2

    *****