Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    केवळ एकच उद्देश

    ख्रिस्ताचे जीवन हे उद्धाराचे महान कार्य करण्यासाठी तो आला होता. त्या व्यतिरिक्त दुसरे कोणते महत्त्वाचे कार्य नव्हतेच तशीच भक्ति तसाच आत्मत्याग आणि तशीच वचनाची साक्ष व अधीनता त्याच्या शिष्यांमध्ये सुद्धा दिसायला हवी होती.MHMar 401.2

    प्रत्येकजण जो ख्रिस्ताला आपला वैय्यक्तिक उद्धारकर्ता मानतो तो परमेश्वराची सेवा करण्याची संधी आवश्य मिळविण्यात आनंद मानील. स्वर्गाने त्याच्यासाठी किती मोठा त्याग केला आहे हे लक्षात घेऊन त्याचे हृदय अति प्रेमाने व कृतज्ञतेने भरुन येईल. तो आपल्या योग्यतेला कृतज्ञतेबरोबर परमेश्वराची सेवा करण्यातच आपले सर्व लक्ष त्यामध्ये केंद्रित करील. तो आपले प्रेम ख्रिस्ताने खरेदी केलेल्या लोकांवर केंद्रित करण्याची इच्छा बाळगतो. तो परिश्रम, कठीण समस्या आणि बलिदानयुक्त जीवनासाठी उत्सुक आहे.MHMar 401.3

    परमेश्वरासाठी एक खरा कार्यकर्ता आपले सर्वोत्तम प्रयत्न करील कारण असे करण्यानेच आपल्या गुरुचे गौरव करु शकतो. परमेश्वराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठीच तो योग्य कार्य करील. आपली कार्यक्षमता वाढविण्याचे तो प्रयत्न करील. तो आपले प्रत्येक कार्य असे करील की जसे तो परमेश्वरासाठीच करीत आहे. त्याची एकच इच्छा असते की आपण जे काय करतो ते ख्रिस्ताचे गौरव व्हावे व त्याची सेवा सिद्ध व्हावी. एका चित्रामध्ये एक बैल नांगर आणि वेदीच्यामध्ये उभा असलेला पाहिला आणि त्याच्याखाली “दोन्ही पैकी एकासाठी तयार राहा’ असे लिहीले होते. म्हणजे नांगर घेऊन नांगरणीसाठी तयार आणि वेदीवर बलिदानासाठी सुद्धा तयार होणे.MHMar 402.1

    परमेश्वराच्या खऱ्या मुलांची ही सत्य अवस्थ आहे. जेथे कोठे कर्तव्याचे पाचारण होते तेथे जाणे, आत्म बलिदान करण्यासाठी जाणे आणि उद्धारकर्त्याच्या कार्यासाठी समर्पण होण्यासाठी.MHMar 402.2

    *****