Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    उदाहरणाची शक्ति

    जो डॉक्टर घरामध्ये रुग्णाची सेवा करतो त्याची सेवा करतो तो त्या रुग्णाच्या वेदना व त्रास कमी करतो. त्याला मृत्युच्या दारातून परत आणतो आणि मृत्युपंथाला लागलेल्यांना आशा देतो. तो त्यांचे प्रेम आणि विश्वास जिंकतो. ही संधी कोणालाही मिळू शकते. दूरपर्यंत जाणारे या महान प्रभावाच्या शक्यता स्वार्ता प्रचाराकामध्येच दिसून येतात.MHMar 87.1

    चिकित्सक किंवा डॉक्टरांचे उदाहरण आणि त्यांचे शिक्षण हे दोन्ही सकरात्मक योग्य पक्षामध्ये प्रभाव पाडतात व तसे होणे आवश्यक आहे. सुधारणा चळवळीला अशा स्त्री-पुरुषांची गरज आहे की ज्यांचे जीवन एक सजीव नमूना असेल. नियमांचे पालन करण्यानेच आमच्या सांगण्याला वजन येते व जगासाठी अशा प्रकारच्या आचरणाची व त्याच्या प्रदर्शनाची गरज असते. यामुळे असे सिद्ध होते की परमेश्वराच्या नियमांचे पालन आणि त्याच्या कृपेनेच मानव आपला गमावलेला आनंद व आरोग्य पुन्हा प्राप्त करु शकतो. त्यामुळे तो आपल्या दुर्बलतेवर विजय प्राप्त करु शकतो. जगातील सर्वात मोठी गरज आहे. ख्रिस्ताच्या जीवनाप्रमाणे आपले जीवन आचरण करुन त्याने दिलेल्या सुसमाचाराचा अंगीकार करुन आपली शक्ति पुन्हा प्राप्त करुन घेऊ शकतो.MHMar 87.2

    ज्यांना योग्य शक्ति आणि प्रोत्साहनाची गरज असते अशांच्याच संपर्कात चिकित्सक नेहमी येत असतात. अनेक लोक नैतिकरित्या दुबळे असतात. त्यांच्यामध्ये आत्मनियंत्रणाच्या कमतरतेमुळे ते सहज परीक्षामध्ये अयशस्वी होतात. चिकित्सकांनी स्वत:च्या राहणीमानाचे उदाहरण इतरांना देऊन प्रत्येक हानिकारक सवयीपासून वेगळे होऊन किंवा वाईट सवयीवर विजय मिळविण्यासाठी आरोग्याच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अशा आत्म्यांना चिकित्सक प्रोत्साहन देऊ शकतात की जे लोक आरोग्य नियमांचे पालन करीत नाहीत त्यांचे जीवन चुकीच्या सवयीमुळे उध्वस्त झाले आहे. असे अनेक लोक आजारांची शिकार होऊन रुग्णालयामध्ये भरती होतात. MHMar 87.3

    त्यांना अनेक प्रकारचे धक्के मिळालेले असतात, ते जखमी झालेले असतात व शक्तिहीन झालेले असतात. स्वत:च्या दुर्बलतेमुळे ते असमर्थ झालेले असतात. त्यांच्या या दुर्बल अवस्थेसाठी कारणीभूत झालेल्या त्यांच्याभोवती असणाऱ्या सर्व गोष्टी त्यांना दर करायच्या असतात. त्यांच्या भावना आणि विचारसुद्धा त्यामुळे दूषित झालेले असतात. ज्या लोकांना इतरांसाठी सकरात्मक बनायला हवे होते ते स्वत:च हानिकारक सवयींचे गुलाम झालेले असतात. त्यामुळे ते अडचणीत व त्रासामध्ये पडलेले असतात. त्यांची अवस्था गंभीर होते.MHMar 87.4