Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ६—“सेवा करण्यासाठी वाचविले”

    गालील समुद्रावर सकाळची वेळ होती. समुद्रातील वादळाशी सामना केल्यावर येशू आणि त्याचे शिष्य जेव्हा किनाऱ्यावर आले तेव्हा उगवत्या सूर्याची किरणे समुद्र आणि धरतीवर स्वर्गीय शांतीचा वर्षाव करीत होते. परंतु जसे त्यांनी समुद्रातून बाहेर पाऊल टाकले तसे त्यांना समुद्राच्या वादळापेक्षाही भयंकर प्रसंगाला तोंड द्यावे लागले. कबरस्थानातून दोन वेडे झाडांमागून अचानक त्या सर्वांवर असे धाऊन आले, सर्वांचे तुकडे तुकडे करावेत असा त्यांचा पवित होता. ते वेड्यांच्या कैदेतून साखळ्या तोडून पळून आले होते. कारण त्यांच्या हातापायांमध्ये तुटलेल्या साखळ्या लोंबत होत्या. त्यांच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा होत्या व त्यातून रक्त वाहत होते. वाढलेले केस व विस्फारित डोळे ते दोघे मानवासाठी कलंक वाटत होते. मनुष्याऐवजी ते जंगली श्वापदासारखेच दिसत होते.MHMar 56.1

    येशूचे शिष्य आणि त्यांचे सोबती तेथून पळून गेले कारण ते खूप घाबरले होते. त्यांनी पाहिले की त्यांच्यामध्ये येशू नाही तेव्हा त्याला शोधण्यासाठी ते परत त्या ठिकाणी आले. त्यांनी पाहिले की तो तेथेच उभा होता जेथून ते पळाले होते. ज्याने समुद्र शांत केला होता आणि त्याने सैतानाला आधीच पराभूत केले होते, तो दुष्ट आत्म्यांना घाबरला नाही. जेव्हा ते तोंडातून फेस गाळत आणि दात चावत येशूकडे आक्रमण करण्यासाठी आले तेव्हा येशू ने आपला हात वर केला ज्या हाताने समुद्र शांत झाला होता. ज्याच्या इशाऱ्याने समुद्राच्या लाटा शांत झाल्या होत्या. तेव्हा हे दोघे पुढे येऊ शकले नाहीत. त्याच्यासमोर ते क्रोधित परंतु असहाय्य असे उभे होते. MHMar 56.2

    अधिकारयुक्त वाणीने अशुद्ध आत्म्यांना त्यांच्यामधून निघून जाण्यास सांगितले. ते अभागी लोक समजून चुकले की त्यांच्यासमोर तो उभा आहे जो त्यांना छळणाऱ्या अशुद्ध आत्म्यांपासून सुटका करु शकतो. त्यांच्या बेड्या तोडू शकतो. त्यांना स्वतंत्र करु शकतो. ते मुक्तिदात्याकडे दयेची भीक मागण्यासाठी त्याच्या पायावर पडतात. परंतु बोलण्यासाठी जेव्हा तोंड उघडतात तेव्हा अशुद्ध आत्मा त्यांच्या तोंडातून बोलतो. “हे देवाच्या पुत्रा तू मध्ये का पडतोस ? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हांला पीडावयास येथे आलास काय ?” (मतय ८:२९). या दुष्ट आत्म्यांना शरीरे सोडण्यास भाग पडले. त्या भूतग्रस्तांमध्ये परिवर्तन घडून येऊ लागले. त्यांची बुद्धी शुद्धीवर आली त्यांची मने प्रकाशित झाली, डोळ्यामध्ये शुद्धतेची चमक आली. त्यांचे चेहरे सैतानासारखे विकृत झाले होते ते आता अचानक कोमल झाले आणि रक्ताळलेले हात शांत झाले आणि हे दोघे आता परमेश्वराची स्तुति करीत होते.MHMar 56.3

    आतापर्यंत या मनुष्यांमधून निघालेले अशुद्ध आत्मे डुकरांमध्ये शिरली व डुकरांचा कळप कड्यावरुन धडक धावत समुद्रात जाऊन पडला व सर्व डुकरे बुडून मेली. मग डुकरे चारणारे नगरात पळाले व त्यांनी जाऊन भूतग्रस्तांच्या गोष्टीसकट सर्व वर्तमान जाहीर केले तेव्हा पाहा सर्व नगर येशूला भेटण्यासाठी निघाले. दुष्टाला लागलेली ही दोघे नगरासाठी आतंकवादी झाले होते ते आता व्यवस्थित कपडे घालून नम्रपणे येशूच्या पायाशी बसले होते. व त्याचे ऐकत होते आणि त्याची स्तुति करीत होते. कारण त्याने त्यांची दुष्ट आत्म्यांपासून मुक्तता केली होती, परंतु ज्यांनी हे अद्भुत दृष्य पाहिले ते खुश नव्हते. कारण त्या दोन भूतग्रस्तांच्या मुक्ति ऐवजी त्यांच्या डुकरांचे नुकसान झाले ते जास्त महत्त्वाचे होते. भयभीत होऊन ते त्याच्याभोवती गोळा झाले आणि येशूला त्यांच्या नगरातून जाण्यास सांगू लागले. तेव्हा येशूने त्यांच्या विनंतीचा सन्मान करुन तेथून जाण्यास निघाला.MHMar 57.1

    दुष्ट आत्म्यांपासून स्वतंत्र्य झालेल्या त्या दोघांचे विचार आता नवे झाले होते. ते त्यांच्या मुक्तिदात्याच्या संगती राहण्याची त्यांची इच्छा होती. त्याच्या सहवासामध्ये दुष्ट आत्म्यांपासून त्यांना सुरक्षित वाटत होते. कारण दुष्ट आत्म्यांनी त्यांना त्रास दिला होता, त्यांचे जीवन नष्ट केले होते. त्यांचे तारुण्य कष्टमय केले होते. जेव्हा येशू नावेमध्ये बसत होता तेव्हा त्यांनी त्याच्या जवळ राहण्याची इच्छा व्यक्त केली. गुडघे टेकून त्याला विनंती करु लागले. त्याचे वचन ऐकण्याची मनीषा व्यक्त केली, परंतु येशू त्यांना म्हणाला “तुम्ही जाऊन लोकांना सांगा की परमेश्वराने तुम्हांवर कृपा करुन तुमच्यासाठी कोणकोणती मोठी कामे केली आहेत.MHMar 57.2

    येथे त्यांच्यासाठी कार्य आहे. मूर्तिपूजकांच्या घरी जाणे आणि येशून त्यांच्यासाठी जे आशीर्वाद दिले आहेत ते त्यांना सांगणे त्यांच्यासाठी येशूपासून वेगळे होणे कठीण आहे. त्यांच्या देशामध्ये मूर्तिपूजकांमुळे त्यांच्या कार्यामध्ये अडथळे येतात आणि दीर्घकाळ ते समाजापासून वेगळे राहिल्यामुळे या कार्यासाठी अयोग्य ठरु शकत होते. परंतु जसे त्यांनी त्यांचे कार्य सांगितले ते त्याच्या आज्ञापालन करण्यास तयार झाले.MHMar 57.3

    ते केवळ त्यांचेच लोक आणि नाते संबधितांना येशूविषयी सांगण्यासाठी आले नव्हते तर पूर्ण दिकापुलिसमध्ये सर्व ठिकाणी येशूच्या सामर्थ्याचे वर्णन केले की कशाप्रकारे त्याने त्यांना दुष्ट आत्म्यांपासून स्वतंत्र केले हे सांगत फिरले. अजूनही गदरेकसातील लोकांनी येशूचा स्वीकार केला नाही. तरीही येशून त्यांना अंधारातच सोडले नाही. कारण जेव्हा त्यांनी येशूला तेथून निघून जायला सांगितले होते तेव्हा त्यांनी येशूचे वचन ऐकले नव्हते त्यांना ठाऊक नव्हते की ते कोणाचा तिरस्कार करीत होते. म्हणून त्याने त्यांना पाठविले जे त्याचे वचन ऐकण्यास आनंद मानीत होते.MHMar 58.1

    डुकरांचा नाश करण्यामागील सैतानाचा उद्देश होता की येशूने त्या नगरामध्ये प्रवेश करु नये आणि यामुळे तेथे राज्याची सुवार्ता पोहोचू नये, परंतु याच घटनेने लोकांचे लक्ष ख्रिस्ताकडे लागले. या घटनेशिवाय इतर कोणत्याही चमत्काराने त्यांना येशू विषयी समजू शकले नसते. उद्धारकर्ता तर निघून गेला, परंतु ज्या भूतग्रस्तांना त्याने बरे केले ते त्याच्या सामर्थ्याचे साक्षी होऊन त्यांच्याकरवी त्याचा महिमा पसरला. भूतांच्या अंधकार जीवनामध्ये असणाऱ्यांकरवीच येशूचा प्रकाश पाडण्यासाठी ते माध्यम बदले, ते येशूचे संदेशवाहक झाले. जेव्हा येशू परत आला तेव्हा तीन दिवस हजारो लोकांनी त्याच्याभोवती गराडा घातला होता आणि त्याचे संदेश ऐकत होते.MHMar 58.2

    दिकापुलिस क्षेत्रामध्ये येशू विषयीचे सूसमाचार पोहचविणारे हे दोन भूतग्रस्त पहिले संदेशवाहक होते. थोड्या काळासाठीच त्यांनी येशूचा संदेश सांगितले होते व येशूकडूनही ऐकला होता, परंतु पूर्ण धर्मोपदेश ऐकला नव्हता, परंतु संपूर्ण क्षेत्रात त्यांनी येशूचा समाचार पसरविला होता. येशूच्या शिष्यांप्रमाणे आता ते सुद्धा रोज त्याच्याबरोबर राहात होते. ते लोकांना उपदेश करु शकत नव्हते, परंतु त्याच्या सहवासात राहून आपल्या डोळ्यांनी त्यांनी जे पाहिले, ऐकले त्याचे सामर्थ्य पाहिले व जे त्यांना ठाऊक आहे त्याविषयी ते सांगू शकत होते. हेच सर्वांचे कार्य आहे. ज्यांच्या हृदयामध्ये येशूचा विश्वास त्याचा अनुभव आला आहे. ते सर्व स्वत:चा येशू विषयीचा अनुभव सांगू शकतात. ते स्वत:ची साक्ष देऊ शकतात. आज येशू आपणास त्याच्या अनुभवाची साक्ष देण्यासाठी पाचारण करीत आहे. आपले अनुभव आणि साक्ष यांच्या कमतरतेनेच आज जगाचा नाश होत आहे.MHMar 58.3

    देवाची सुवार्ता ही एक मृत सिद्धांताच्या रुपाने नाही, परंतु एक जिवंत साक्षीच्या रुपाने लोकांसमोर सादर करणे आवश्यक आहे. या साक्षीने लोकांच्या जीवनामध्ये बदल घडून येऊ शकतो. परमेश्वर आपल्या सेवकांकरवी अशा सत्य साक्षीदारांच्या रुपात पाहण्याची इच्छा प्रकट करतो की त्याच्या कृपेने मानव स्वत:मध्ये ख्रिस्ताचे शील इतरांमध्ये दिसून येण्याची कृपा देव करील. त्याच्या महान प्रीतिच्या आशेवर मानव सदासर्वकाळ सुखी व आनंदी राहू शकेल. त्याची इच्छा अशी आहे की आमच्या जीवनातून ही साक्ष तो पर्यंत सांगू. देव संतुष्ट होऊन प्रत्येकाचा उद्धार होईपर्यंत त्याचे समाधान होणार नाही. कोणाचाही नाश होऊ नये अशी देवाची इच्छा आहे. त्याने आपला अनुग्रह करुन प्रत्येक जे त्याच्या वचनात राहतात त्या सर्वांना त्याचे पुत्र आणि मुली होण्याचा हक्क त्याने देऊ केला आहे.MHMar 59.1

    एवढेच नाही, परंतु ज्यांना तो आवडत नाही त्यांनाही तो आपली मुले होण्याचा हक्क देण्याची त्याची इच्छा आहे, परंतु त्यांचे परिवर्तन आवश्यक आहे. जेव्हा त्यांना पश्चात्ताप होतो तेव्हा तो त्यांना स्वर्गीय आत्मा देऊन आज्ञाधारक लोकांमध्ये पाठवितो. म्हणजे त्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्याविषयी येशूच्या दयेची माहिती त्यांना मिळेल. सैतानाकरवी अपमानीत केले. आत्मेसुद्धा ख्रिस्ताच्या सामर्थ्याने धार्मिकतेचे राजदूत बनवून जगामध्ये साक्ष देण्यासाठी पाठविले जातात. यावरुन परमेश्वराने त्यांच्यावर दया करुन किती मोठे कार्य केले आहे ते समजून येते.MHMar 59.2