Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    प्रार्थनेची सुसंधी

    आम्हाला सुद्धा दररोज पवित्र आत्म्याकरवी ताजेतवाने होण्यासाठी एक ठराविक केवळ प्रार्थना आणि मनन करण्यासाठी वेळ देण्याची गरज आहे. प्रार्थनेचे बळ आणि क्षमतेच्या विषयी जसे आम्ही जाणतो तसे जाणत नाही. प्रार्थना आणि विश्वासाकरवी जी शक्ति प्राप्त होते इतर कोणत्याही प्रकारे प्राप्त होऊ शकत नाही. कदाचित आम्ही सर्व गोष्टींमध्ये एकाच परिस्थितीसाठी दोन वेळा घेऊ शकतो.MHMar 407.2

    ख्रिस्त त्यांच्यासाठी नेहमी संदेश देत असतो आणि जे त्याची वाणी ऐकतात ते त्यासाठी सावधच असतात. गेथसेमाने बागेमध्ये मानसिक वेदनायुक्त येशूला त्याच्या शिष्यांनी पाहिले नाही कारण झोपेत असल्यामुळे त्यांनी त्याचा आवाज ऐकला नाही. त्यांनी देवदूतांच्या अस्तित्वाची अंधुक कल्पना होती. परंतु त्यांनी त्या दृश्याची शक्ति व महिमा पाहिला नाही. झोप आणि थकव्यामुळे ते त्या अवर्णनीय दृश्यास मुकले होते. यामुळे भविष्यामध्ये येणाऱ्या संकटाशी त्यांनी टक्कर देण्याची तयारी केली असती. आजसुद्धा देवाचे लोक ज्यांना स्वर्गीय शक्तिच्या मार्गदर्शनाची अति आवश्यकता आहे ती मिळविण्यासाठी ते चुकतात कारण ते स्वत:ला प्रार्थनेकरवी स्वर्गाशी जोडू शकत नाहीत.MHMar 407.3

    ज्या परीक्षांना आम्ही रोज तोंड देतो तेव्हा आपण प्रार्थनेला आपली आवश्यकता मानतो. प्रत्येक मार्गावर धोके आहेत. जे लोक वाईट आणि नाशातून लोकांची सुटका करण्याचा प्रयत्न करतात ते सतत परीक्षांना तोंड देत असतात आणि सतत वाईटाचा संपर्कामध्ये राहिल्याने परमेश्वरावरील त्यांची पकड मजबूत असणे अति आवश्यक आहे, नाहीतर ते स्वत:ही भ्रष्ट होऊ शकतात. ती पाऊले निर्णायक असतात जी मनुष्याला त्याच्या पावित्र्याच्या शिखरावरुन खोल गर्तेत जाऊ शकतात. एकाच क्षणात असे निर्णय घेतले जाऊ शकतात ते कायमचे दृढ होऊ शकतात निश्चित केले जाऊ शकतात. विजयी होण्यासाठी एक वेळचे यश मिळविण्यास अपयश झाल्यास आत्मा असुरक्षित होतो. एका वाईट सवयीशी निकराचा सामना केला नसल्यास ती सवय लोखंडाची साखळी बनून पूर्ण मनुष्याला बांधून टाकते.MHMar 408.1

    बहुतेक लोकांना परीक्षेत अपसश येते. त्याचे कारण हे आहे की ते आपल्या प्रभुला सतत समोर ठेवित नाहीत. जेव्हा आपण परमेश्वराशी गप्पा गोष्टी करण्याचे बंद करतो तेव्हा आपण धोक्यात येतो. आपण असुरक्षित होतो. आपले सर्व चांगले उद्देश आणि चांगले निर्णय वाईटाच्या मार्गाने जाऊ शकतात. कारण ते वाईटाशी सामान करु शकत नाहीत. तेव्हा आपण प्रार्थना करणारे असावे. प्रार्थनेमधील आपले निवेदन अस्पष्ट व अनिर्णित असू नयेत तर स्पष्ट व दृढ असावेत. नेहमीच गुडघे टेकून प्रार्थना करावी असे नाही, तर रस्त्याने चालत असता एकटे असताना किंवा एखाद्या कामात मग्न असतानाही आपण परमेश्वराशी बोलू शकता. आपण आपल्या हृदयाला सामर्थ्य, ज्ञान आणि प्रकाश मिळविण्यासाठी विनंती करु शकता. आपला प्रत्येक श्वास एक प्रार्थनाच असावी.MHMar 408.2

    देवाचे कार्यकर्ते या नात्याने आपण जे अंधारात आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. ते अत्याचाराच्या आणि दुष्टतेच्या दूषित वातावरणामध्ये बुडले असतात, परंतु आपण जेव्हा आपल्या तारणाऱ्या बरोबर असतो तेव्हा आपल्यावर त्याचा प्रकाश आपल्यावर असतो म्हणून कोणत्याही वाईट प्रकारचा कलंक आपल्यावर येत नाही. जे आत्मे शिक्षेस पात्र असतात आणि जेव्हा आपण त्यांना ख्रिस्ताच्या प्रकाशात आणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांना लज्जास्पद व हीन वागणूक आपण कधीच देऊ नये. तर उलट ते आपल्या प्रमाणेच असल्याची सन्मानाची वागणूक द्यावी. आपल्या हृदयात ख्रिस्त असावा आणि जीवनामध्ये ख्रिस्तीपणा असावा. हीच आपली सुरक्षा आहे. त्यांच्या भोवतीचे वातावरण सतत दुष्ट आणि वाईटपणाचेच असते. आमचा आत्मा परमेश्वराच्या आत्म्यामध्ये इतका मिळाला आहे की आमच्या मनामध्ये वाईट विचार कधीच येणार नाहीत. त्याचे आणि आमचे उद्देश आणि विचार एकच असतील. MHMar 409.1

    विश्वास आणि प्रार्थना करवीच याकोबासारखा अशक्त व पापी मनुष्य परमेश्वराचा राजकुमार बनला. अशाप्रकारे तुम्हीसुद्धा उच्च आणि पवित्र विचारांनी आपले उद्दीष्ट साध्य करण्यासाठी श्रेष्ठ स्त्री व पुरुष बनू शकता. जे सत्य आणि योग्यतेपासून कधीही वेगळे होऊ शकत नाही. सर्व लोक अत्यंत महत्त्वपूर्ण चिंताच्या ओझ्याने दबून गेले आहेत, परंतु जितकी कठीण आपली समस्या व जबाबदारी आमची आहे. तितकेच जड ओझे असणार आहे. आणि तितकीच जास्त आपल्याला येशू ख्रिस्ताची गरज असणार आहे.MHMar 409.2

    परमेश्वराची सार्वजनिक उपासना टाळणे ही एक गंभीर बाब आहे. ती एक मोठी चूक असेल. स्वर्गीय उपासनेला साधी गोष्ट समजू नये. जे लोक आजाऱ्यांची शुश्रुषा करतात ते अशी संधी सोडत नाहीत. कारण ही संधी त्यांना क्वचितच मिळत असते. अशांनी अति सावध असायला हवे. अनावश्यकतेने त्यांनी उपासनेला गैरहजर राहू नये.MHMar 409.3

    आजारी लोकांच्या सेवेमध्ये यश मिळते, परंतु जगिक व्यवहारापेक्षाही अधिक समर्पणाची भावना आणि आत्म बलिदानाला प्रेरित होऊन ही सेवा केली जाते. ज्यांच्यावर जबाबदाऱ्या आहेत त्यांच्यासाठी अति आवश्यक आहे की त्यांना अशा ठिकाणी उपस्थित राहावे. तेथे परमेश्वराचा आत्मा त्यांच्या जीवनातील खोलवर सहकार्यासाठी सतत हजर राहातो. आपल्याला पवित्र आत्म्याचे सहाय्य आणि परमेश्वराच्या ज्ञानासाठी इतरांपेक्षा अधिक चिंता असली पाहिजे कारण इतरांपेक्षा तुमची जबाबदारी फार मोठी आहे. परमेश्वराशी बोलण्याकरवी (प्रार्थना) आपण त्याच्या संपर्कामध्ये असणे अधिक आवश्यक आहे आणि यापेक्षा इतर कोणत्याच गोष्टीच आवश्यकता नसते. आमच्या दैनंदिन जीवनामध्ये असे दाखवून द्यायला हवे की आमच्या जवळ परमेश्वराचा विश्वास आणि शांती आहे. हृदयामध्ये असणाऱ्या ख्रिस्ताच्या शांतीने आमचा चेहरा चमकतो. आमच्या बोलण्यामधील ती कबूली आहे. ती आम्हास शक्ति देईल. परमेश्वरावर असणारा सततचा संवाद (प्रार्थना) आमचे चरित्र उत्तम बनविले जाते. आमचे जीवन आनंदी होते. येशूच्या प्रथम बारा शिष्यांप्रमाणे लोक आम्हांलाही ओळखतील की आम्हीही त्याचे शिष्य आहोत. तो आपल्या लोकांना अशी शक्ति देईल की अशी शक्ति कोठेच मिळत नाही.MHMar 409.4

    आम्हाला अशा प्रकारचे जीवन जगण्यासाठी आमचे विचार, आमचे कर्म शांत आणि उत्साहाने देवाच्या कार्यामध्ये कार्यरत असायला हवे अशा प्रकारचे आपले जीवन पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनाची योजना प्रार्थनापूर्वक व नम्रतेने करायला हवी. आपल्या कर्तव्याची तयारी करावी. मग कोणतीही परिस्थिती असो आत्म्याला शांती प्राप्त होते.MHMar 410.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents