Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    ऐतिहासिक आणि धर्म वैज्ञानिक विद्या

    ख्रिस्ती सेवाकार्य करणाऱ्यांनी त्या तयारीसाठी लोक विचार करतात की त्यांना ऐतिहासिक आणि धर्मवैज्ञानिक लेखाचा विस्तृतपणे अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यांना वाटते की हे ज्ञान सुवार्ताप्रसारामध्ये त्यांना सहाय्यकारी सिद्ध होईल. परंतु परिश्रमाबरोबरच मनुष्याच्या विचारांचे अध्ययन केल्यास त्यांचे सेवा कार्य सशक्त होण्याऐवजी दुबळे होते. जेव्हा मी धर्मवैज्ञानिक ज्ञान आणि ऐतिहासिक ज्ञानाचे भंडार असलेले ग्रंथालय पाहतो तेव्हा माझ्या डोक्यात विचार येतो की ‘जे भोज नाही त्याला तुम्ही दाम का देता?MHMar 343.3

    योहान कृत शुभवर्तमानाध्ये सहाव्या अध्यायामध्ये आम्ही इतके काही शिकू शकतो की जे या ग्रंथालयाच्या भांडारातून मिळू शकत नाही. मी तर म्हणते की जी भोजनवस्तू नाही त्यासाठी पैसे का खर्च करावेत ? योहान कृत शुभवर्तमान याच्या सहाव्या अध्यायापासून आपणास शिकायला मिळते की ते इतर कोणत्याच पुस्तकातून ज्ञान मिळणार नाही. “येशू त्यांना म्हणाला मीच जीवनाची भाकर आहे जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि मी जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही.” (योहान ६:३५).MHMar 344.1

    “स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे, ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळे जगेल. जी भाकर मी देईन. ती माझा देह असून जगाच्या जीवनासाठी आहे.” (योहान ६:५१). “जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते.” (योहान ६:४७). आत्मा हा जिवंत करणारा आहे. देहापासून काही लाभ नाही. मी जीवने तुम्हाला सांगितली आहेत. ती आत्मा व जीवन अशी आहेत.” (योहान ६:६३).MHMar 344.2

    इतिहास एक अभ्यास आहे त्याची निर्भसना करू नये. संदेष्टयांच्या शाळांमधून पवित्र इतिहास हा अध्ययनाचा विषय होता. जगातील देशांमधून जे काय होत होते त्यामध्ये यहोवाचा हात स्पष्ट दिसून येत होता. त्या प्रमाणेच आजही आम्हाला पृथ्वीवरील देशांमध्ये घडणाऱ्या घटनांमध्ये परमेश्वराच्या योजना आणि उद्देश पूर्ण होताना पाहिले पाहिजे. इतिहासामध्ये आम्हाला भविष्यवाणी पूर्ण होताना पाहायचे आहे. महान सुधारणेच्या आंदोलनामध्ये परमेश्वराच्या कार्याचे अध्ययन करणे आणि महान वादाच्या अंतिम संघर्षासाठी देशांतील लोकांचे एकमत होण्यासाठी समजायला हवे. अशाप्रकारचा अभ्यास जीवनाची विस्तृत समज प्रदान करील. एकमेकांचे संबंध विसंबून राहण्याची समज यासाठी सहाय्य होईल. ते म्हणजे आम्हामधील ऐक्य व बंधुभाव अद्भुतपणे समाज आणि इतर देशाची आपली बांधिलकी असेल. आणि कशाप्रकारे एखाद्याचा त्रास आणि पतन सर्वांसाठी नुकसानीचे कारण बनते.MHMar 344.3

    परंतु सर्वसामान्यपणे इतिहासाच्या अभ्यासामधून मनुष्याची उपलब्धता युद्धामध्ये त्याचा विजय व शक्ति आणि महानता प्राप्त करण्यामध्ये त्याच्या यशस्वीपणाच्या गोष्टी दिसून येतात. मनुष्याच्या बाबतीत परमेश्वराच्या कार्याला पूर्णपणे दुर्लक्षित केले जाते. परंतु खूप कमी लोक असे आहेत की जे राष्ट्रांचा उत्कर्ष आणि पतनामागे परमेश्वराच्या उद्देशाला पूर्ण होताना पाहतात. धर्मविज्ञान ज्याप्रकारे शिकविले जाते, ज्या स्वरूपात शिकविले जाते ते मानवी कल्पनेचे कागदपत्रे आहेत. “जी अज्ञानतेच्या शब्दाकरवी भटकविणारी शिक्षा आहे” तसेच दिसून येत आहे. तसे पाहता पुस्तकांचे ढीग एकत्र करण्याचा उद्देश म्हणजे बुद्धीसाठी पोषण प्राप्त करण्याऐवजी हे विचार आणि धर्मशिक्षकांची रचनांशी परिचित होणे आणि लोकांसमोर ख्रिस्ती विद्वानांची मते आणि विचार त्यांच्यापुढे मांडण्याची इच्छा होते.MHMar 345.1

    सर्व पुस्तके जी लिहीली आहेत ती पवित्र जीवनाचे उद्देश पूर्ण करीत नाहीत. महान शिक्षकाने सांगितले “माझ्याकडून शिका, माझे जू आपल्यावर घ्या. माझी नम्रता व लिनता शिका.” मनुष्याच्या जीवनाची घमेंड जीवनाच्या भाकरीच्या अभावाने त्यांच्या आत्म्याचा नाश होत आहे. इतर पुस्तके आत्म्यांशी संवाद करण्यास सहाय्य करणार नाही. या पुस्तकांचा अभ्यास करण्याने आपण ख्रिस्ताच्या साधारण शिक्षणापासून वंचित रहाल. ज्याची आपणास अति आवश्यकता आहे. अशाप्रकारच्या अध्ययानाचेच हे परिणाम आहे की ज्यामुळे आत्म्याची भूक शमत नाही. आपली बुद्धी थकविणारे हे अध्ययनामुळे थोडाच फायदा आपल्या आत्मिकतेचे समाधान करते. MHMar 345.2

    मुक्तिदाता हा “दीनास सुवार्ता सांगण्यासाठी आला.” (लूक ४:१८). आपल्या शिक्षणामध्ये ख्रिस्ताने सर्वात सरळ आणि अतिसाधारण शब्दामध्ये त्याचे मत मांडले होते आणि म्हटले होते की सामान्य लोक त्याचे शिक्षण आनंदाने ऐकतात. जे लोक यावेळी ख्रिस्ताची साधारण शिकवण गंभीरतेने घेऊन त्याचे अध्ययन करतात. त्यांना ते प्राप्त होईल.MHMar 345.3

    परमेश्वराचे वचन आपल्या जीवनामध्ये जगणे हे जगिक शिक्षणापेक्षाही उत्तम असे आहे. इतरांची सेवा करणाऱ्यांनी जीवनाची भाकर खावी त्यांना त्याची गरज आहे. यामुळे त्यांना आत्मिक बळ मिळते तरच ते सर्व वर्गातील लोकांची सेवा करण्यास तयार होतील.MHMar 345.4

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents