Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    आईची सुसंधी

    स्वर्गात एक परमेश्वर आहे आणि त्याच्या सिंहासनापासून आलेला प्रकाश व महिमा त्या आईवर पसरत असतो. ती आई आपल्या मुलांवर येणाऱ्या वाईट प्रभावावर सतत सामना करीत असते. तिच्या या अतिमहत्वाच्या कार्यापुढे इतर कोणत्याच कार्यांना जास्त महत्व नसते. एक कलाकारासारखे सुंदर चित्र बनविण्यासाठी जी कुशलता असावी लागते ती तिच्यामध्ये असते.ती एका मूर्तिकारासारखी संगमरवरावर सुंदर मुर्ती तयार करू शकत नाही. एक लेखकासारखी तिच्या लेखणीमध्ये प्रभाव नसतो की कुशल संगीतकारासारखे मधुर संगीत तयार करू शकत नाही परंतु तिचे कार्य त्याही पुढे जाऊन परमेश्वराच्या मदतीने मानवामध्ये परमेश्वराचे चरित्र निर्माण करू शकते. त्यामध्ये मुलांचा विकास करू शकते.MHMar 291.1

    ती माता या गोष्टींची प्रशंसा करते की ती आपला समय बहूमोल समजते. नम्रतेने ती आपल्या मुलांसमोर स्वतःचा आत्मत्याग त्यांच्यासमोर एक आदर्श व्यक्तिमत्व ठेवते. तत्परतेने, संयमाने, धीराने आणि धाडसाने आपली योग्यता वाढविण्याचा प्रयत्न करते. आपल्या मुलांना या सर्व गोष्टी शिकविण्यासाठी आपली सर्व शक्ति पणाला लावते. प्रत्येक पावलावर ती उत्सुकतेने ती समजून घेते की “परमेश्वराने काय सांगितले आहे?” परिश्रम करून ती परमेश्वराच्या वचनाचे अध्ययन करते. ती आपली दृष्टी येशूकडे लावते. म्हणजे आपल्या छोट्या छोट्या दैनिक कार्यामध्ये व देखरेखीमध्ये तिचा अनुभव खऱ्या स्वर्गीय जीवनामध्ये दर्शविते.MHMar 291.2

    *****